निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, श्रावणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
दिनेशदा, इंद्रधनुष्य आणि रांगोळीच्या बाबतीत शशांकजींना १००% अनुमोदन!
जिप्सी, तुमच्या ऑफिसचा हेवा वाटतो, एअढे कलाकार हरहुन्नरी लोक त्या ऑफीसात आहेत. Happy

श्रावणीच्या शुभेच्छांबद्दल श्रावणीकडून सगळ्यांना धन्यवाद. आज संध्याकाळी या सगळ्यांनी वाढदिवसाला Happy
मी आज रजेवर आहे. तयारी चालू आहे वाढदिवसाची आणि उद्याच्या निघण्याची. मी आता आठवडाभर नसेन. खुप मिस करेन सगळ्यांना. आल्यावर फोटो टाकतेच.

साधना मी आंबोलीत येणार आहे ग.

जिप्स्या खरच तुझ्या ऑफिसच कौतुक वाटत. सगळे सण काय, रांगोळ्या आणि त्यातही इतके विविध प्रकार ? मस्तच.

दिनेशदा - तुमचे हात जादूभरे असल्याने तुम्ही रांगोळी, पेंटींग, पाककला, हस्तकला ...... अशा व अजून कुठल्या कुठल्या कलात प्रविण आहात हे माझ्यातरी कल्पनेपलिकडे आहे....
परमेश्वराने खास वेळ काढून काही व्यक्ति बनवल्या आहेत यावर माझा पूर्ण विश्वास काय खात्रीच आहे - विशेषतः तुमच्याकडे पाहिल्यावर तर नक्कीच...

शशांकजी,
पुर्ण अनुमोदन !
नेमकं मनातलं बोललात (तस आमच्या मनात असं समर्पक/अचुक अजुन सुचत नाही..)
Happy
मला कधी कधी वाटतं , दिनेशदा दिवसाचे तास वाढवुन (जसे २५ तास, ३० तास..)घेत असतील, आणि मग निसर्गाची इतकी माहीती घेत असतील.
Lol

अनिल दिनेशदांच कराव तेवढ कौतूक कमीच आहे. काही कलाकार माणसे अशी असतात ज्यांना सगळ्याच कलांमध्ये रस असून त्यात ते प्राविण्यही मिळवतात. खास कलेसाठी देवाने बनवलेली माणसे असतात ही. त्यातलेच एक दिनेशदा.

जागु, आंबोलीत क्व्हा जाणार ते सांग, हॉटेलात राहायची गरज नाहीय. माझ्या घरी राहा. घरी राहुन बाहेर जेवायला जाता येईल, किंवा घरीच जेवण बनवुन खाता येईल. (मी गेले त्याच दिवशी गॅस संपलेला, त्यामुळे त्यामुळे आता गॅसची टाकीही फुल्ल आहे Happy घराबाजुलाच एस्टी स्टंड आहे तिथे सक्काळी ताजे मासे येतात मालवणहुन Happy )

तसेच तुमची गाडी नसेल तर चुलत भावाची सुमोपण आहे तिथे. त्याचा टुरिस्ट गाईड हाच व्यवसाय आहे, तो मदत करेल. पण तारिख सांग म्हणजे तो मोकळा ठेवेल दिवस.

(आणि हे आमंत्रण आंबोलीला जाऊ इच्छीणा-या सगळ्यांनाच आहे)

https://lh3.googleusercontent.com/-wlA0olb-7yo/Tq6DHkAKyJI/AAAAAAAABwU/T..." /

जिप्सी - सर्व रांगोळ्या खुपच सुंदर... दिवाळी ला रांगाळी भारतातुन आणली नाहि म्हणुन फुलांची काढली.. आता त्यात ह्या सगळ्या कल्पनां चि भर पडली

दिनेशदा.... मी animals are beautiful people बघितला... खुप च सुंदर आहे... असे आजुन काहि चांगले माहिती चे चित्रपट असतील.. तर नक्कि च सांगा..

जागु,
श्रावणीला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
Happy

जिप्सी,
वाह ! एकापेक्षा एक सुंदर रांगोळ्या पाहायला मिळाल्या.
Happy

गावाकडे सहज बांधाजवळ फिरताना ४-५ चंदनाची झाडे/झुडुपवजा दिसली, पण लहान अशी खुप दिसतात, पण मोठी झाली की हमखास गायब होतात,याच वाईट वाटल.

साधनाच्या घराच्या आणि नातेवाईकांच्या अतिथ्याचा मी अनुभव घेतलाच आहे. कुणालाही तिकडे परके वाटणार नाही याची खात्री देतो.
(घरासमोर हिरवळ आणि दिवे नवीन दिसताहेत.)

आणि दिनेशचे कौतुक बास झाले रे. मला अजून बरेच शिकायचे आहे.

आज दुपारी आमच्या कंपनीजवळच आज चक्क अचानकपणे माझी भेट श्री.अच्युत गोडबोले यांच्याशी झाली, हे माझ भाग्य म्हणावं लागेल,त्यांचे अनेक लेख वाचायला मला नेहमी आवडायचं.

>>>>शक्य झाल्यास झाडाचा पत्ता मिळाला तर फारच उत्तम होईल असे वाटते- उदा. गोरखचिंच - पुण्यात -पुणे विद्यापीठ -मुख्य इमारतीसमोर बागेत, दुसरे ठिकाण- बाजीराव रोड व टिळक रोड चौकात मेहेंदळे म्युझिक सेंटरबाहेर, इ.<<<<<<<अनुमोदन शशांकजी.
हे फार आवश्यक आहे. लगेच झाडाच्या भेटीला निघता आलं पाहिजे.एकदा असा डेटा तयार झाला की फार बरं होईल, आणि ठरवता येईल की या विकांताला पुणे विद्यापीठात जाऊन कोणकोणत्या वृक्षमित्रांना भेट द्यायची ते !
'ट्रीज ऑफ पुणे' या पुस्तकात अशी माहिती आहे का?

जागू आमच्यातर्फे श्रावणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सांग.
साधना तुझं घर छान आहे गं!
अवनी,आम्ही असा थोडा डेटा तयार केलाय पुण्यातल्या वृक्षांचा.
जिप्सी रांगोळ्या सुंदरच आहेत पण रांगोळी शिवाय इतर गोष्टी वापरून डिझाईन्स फार अप्रतिम!!!!
(तुझ्या ऑफिसातले लोक्स पण तुझ्यासारखेच कलाकार आहेत अगदी!)

साधना छान आहे ग घर तुझ. आम्ही गुरुवारी किंवा शुक्रवारी जाणार आहोत. पण राहू की नाही ते तिथल्या वेळापत्रकावरून ठरवू. राहणार असलो तर तुला नक्की फोन करेन.

श्रावणीचा वाढदिवस छान झाला. व्हेज बिर्याणी, दही रायता, पापड असे बाहेरूनच ऑर्डर केली होती. पुन्हा एकदा सर्व नि.ग. प्रेमिंना श्रावणी तर्फे धन्यवाद.

धन्यवाद लोक्स Happy
श्रावणीला वाढदिवसाच्या (उशीराने) शुभेच्छा!!! Happy

व्हेज बिर्याणी, दही रायता, पापड असे बाहेरूनच ऑर्डर केली होती>>>>काय हे जागू, घरात इतकी चांगली सुगरण असताना बाहेर ऑर्डर?

(आणि हे आमंत्रण आंबोलीला जाऊ इच्छीणा-या सगळ्यांनाच आहे)>>>>>पुढच्या पावसाळ्यात नक्कीच Happy दिवाळी होती म्हणुन नाहीतर तुझ्याबरोबरच आलो असतो. Happy
आत एक हॅमॉक्स बांधुन घे Happy

जिप्सी, मस्त कल्पना. माझी काही मदत होण्यासारखी असेल तर सांग.
सगळ्यांच्या रांगोळ्या सुंदर आहेत.

सर्व निसर्गप्रेमींसाठी ही माझी दिवाळीची भेट:

DSCF0865_reduced.JPG

फेब्रुवारीमध्ये प्रभात रस्त्याच्या गल्लीत हा भरभरून फुललेला वेल भेटला होता ... परवा अचानक त्याचं नाव समजलं ... मला वाटतं हा queen's wreath (Petrea volubilis) चा वेल आहे.

गौरी, त्यासाठी पिकासा वरची लिंक द्यायची. इथे मदतपुस्तिकेत सविस्तर माहिती आहे. इथेही हि वेल भरभरुन फुलते.
रस्त्यावरच्या राऊंड अबाऊटमधे पांढर्‍या स्थंभावर सोडलेली आहे. खुपच मस्त दिसते.

पण राहू की नाही ते तिथल्या वेळापत्रकावरून ठरवू. राहणार असलो तर तुला नक्की फोन करेन.

राहिली नाहीस तरी फ्रेश होण्यासाठी जा गं... माझ्या मावशीला नी काकाला खुप बरे वाटते इथुन इतक्या लांबुन कोणी तिथे आले की.

योग्या, डिसेंबरात जाणार आहे परत. तेव्हा जमले तर ये. हॅमॉक ची काळजी नको.. तिथे आहे एक आणि इथला पण नेणार आहेच...

गौरी - queen's wreath (Petrea volubilis) चा वेल>>फुलांचे व पानांचे क्लोज अप्स टाक ना जमलं तर - त्यावरुन लक्षात राह्यला मदत होईल आपल्या सगळ्यांना......

queen's wreath (Petrea volubilis) - गुगलकृपा -

petrea_volubilis.jpgpetrea_volubilis1.jpgगुगलकृपा - माझे काहीही कर्तृत्व नाहीये - केवळ -गुगलकृपा -

अगदी अगदी मृण्मयी.
कुणाकडे प्लांट आणि अ‍ॅनिमल किंगडमचा थोडक्यात characteristics लिहिलेला चार्ट असेल तर वर हेडरमध्ये चिकटवा प्लिज.

जिप्सी,
रांगोळ्यांसाठी __/\__ सगळ्या एक से एक आहेत.
पुस्तकाच्या/ब्लॉगच्या निर्मितीत काही हातभार लागण्यासारखा असेल तर नक्की सांगा.
दिनेशदांच्या कौतुकातील सगळ्या शब्दांना जोरदार अनुमोदन. Happy
साधना , ते टुमदार घर बघुन तर आमंत्रण स्विकारायचा मोह होतोय >> मोनाली,+१.
( अवांतर <<जिप्सी, तुला लागेल ती मदत मी आणि अहो - (शशांक) करू. >> शशांक आणि शांकली पती-पत्नी आहेत हे मला आजच कळ्ळं. दोघेही माबोकर, दोघांनाही निसर्गाची इतकी आवड... सहसा न आढळणारा पण छान योग ! :))

Pages