Submitted by vaiddya on 3 September, 2010 - 14:24
नाही हरवत कोणीही
आपल्या स्वतःच्याच सावलीत ..
नाही जात हृदयच
स्वतःनेच उसळवलेल्या रक्तामधे वाहून ..
जीवनाला नसते प्रतीक्षा
दुसर्या कोणत्याही
जादुगाराची ..
कारण जीवनच आहे एक जादूचा पेटारा !
जीवनाची जादूची कांडी
फिरतच असते ..
काळजात जमा होत जाणारं
भुरकट राखाडी रसायन
हिरवंशार बनवून
पांचूसारखं चमकत ठेवणारी ही जादू
निसर्ग चैत्राला जसा चेतवतो
तशीच नित्य चेतवावी लागते !
मूळ कविता : रविंद्रनाथ टागोर
मी केलेला हा मराठी मुक्त अनुवाद चैत्र नाटकासाठी.
गुलमोहर:
शेअर करा
वाह छान !
वाह छान !
सुंदर आहे.चैत्र नाटकासंबंधी
सुंदर आहे.चैत्र नाटकासंबंधी जरा सांगाल का?
सही..
सही..