विविध­ दैनिकात/ मासिकात मायबोलीकरांचे साहित्य

Submitted by आशूडी on 27 December, 2010 - 23:07
साजिर्‍याची 'गावशीव' ही कथा, त्याचसोबत चिनूक्सचा "किनारा तुला पामराला" हा 'चाकोरीबाहेर' सदरातील लेख, श्रध्दाची 'सती' ही कथा आणि चमन ची 'मेघाची गोष्ट' हे 'माहेर' जानेवारी २०११ अंकामध्ये प्रसिध्द झाले आहेत. 'माहेर'च्या फेब्रुवारी अंकात पूनमची 'तुझ्या नसानसांत मी' आशूडीची 'गणित' या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच 'चाकोरीबाहेर' या सदरात चिनूक्सचे 'फक्त इच्छा हवी' आणि 'अन्नब्रम्ह' सदरात मिनोतीचे 'नेत्र निवावेत, क्षुधा शमावी' हे लिखाण प्रसिद्ध झालं आहे. सर्वांचे खूप खूप अभिनंदन! मायबोलीकरांच्या नवीन वर्षाची सुरुवात धडाक्यात झाली!!
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पद्मगंधा दिवाळी अंकात २०१० साली प्रकाशित झालेल्या ललीच्या कथेला 'दिवा प्रतिष्ठान'कडून सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार मिळाला.

नुकताच माहेरचा अन्नपूर्णा विशेषांक वाचण्यात आला. सुंदर आहे अंक !
मायबोलीकरांच्या साहित्याची रेलचेल आहे अगदी. जागूच्या ऑल टाईम हिट माश्यांच्या रेसिपी, दिनेशदांच्या द्राक्ष बटाटा, पालक मकई आणि इतर यशस्वी भाज्या, अल्पनाचं खरंखुरं पंजाबी जेवण हे लेख मस्त आहेत.. अरभाटाचा कॉकटेल्सवरचा लेख तर फारच सुंदर. अगदी लगेच कॉकटेल्स चाखून बघावीशी वाटली...सोप्प्या, ओघवत्या आणि कुठलाही आवेश नसलेल्या भाषेत आहे हा लेख ! बाकीचं अजून वाचलं नाहीये. पण मायबोलीकरांचं इतकं छान लिखाण वाचून भारी वाटलं एकदम.

ज्यांना मिळेत त्यांनी नक्की वाचा हा अंक..

धुंद रवी यांचे 'माझी लुंगीखरेदी' हे लेखन 'श्री व सौ' मासिकाच्या मार्च २०१२च्या अंकात प्रकाशित झाले आहे.
अभिनंदन!

मी माहेरच्या ह्यावर्षीच्या अन्नपूर्णा विशेषांकाबद्दल इथे लिहायला आलो आणि माझ्या गेल्यावर्षीच्या पोस्टला 'डिट्टो' म्हणायची वेळ आली. Happy
ह्याही वर्षीचा अंक मायबोलीकरांनीच लिहिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही!
जागू, अश्विनीमामी, सुलेखा, शोनू, चिनुक्स ह्यांचे लेख आणि रेसिप्या, सिंडीची 'करायला गेले गुळ पोळी' हे सर्व वाचून झाले..
अंकात लेख असलेल्या सर्व मायबोलीकरांचे अभिनंदन.

नक्की वाचा हा अंक !

Pages