माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं
पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं
उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं
जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!?
असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..
****************
पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत.
धम्माल
धम्माल प्रस्तावना आहे
मी बहुधा इथे रोजच येइन 
(No subject)
सही! कविता
सही! कविता मस्तच!
नमस्कार
नमस्कार लाल्वाक्का. ही इंगळी तुम्हालाही डसलीच का? मस्त लिहीलंय
(आणि हे टायटल, नातेसंबंध कोणाशी तरी बोलायचयंला पण उठून दिसेल. म्हणजे एकच तिर और कयी बाफ )
आता उरलेली
आता उरलेली हास्यचित्रे लालू च्या वि.पु. मध्ये टाका... इथे टाकण्यात माजं काय चुकलं विचारु नका :g
हीहीही,
हीहीही, मला कळलं 'तुझं काय चुकलं'
आईसारखं
आईसारखं पिठलं करायला तू हो म्हणालीस.. इथंच चुकलं तुझं
(No subject)
आईसारखं
आईसारखं पिठलं करायला तू हो म्हणालीस.. इथंच चुकलं तुझं >>> अरे वा, एवढं सास बहू प्वालिटिक्स समजतय म्हटल्यावर सचिन बी हा आयडी मुलीचा आहे की काय अशी शंका यायला लागली मला
धम्माल
धम्माल प्रस्तावना आहे मी बहुधा इथे रोजच येइन >>>
अगदी, अगदी !
धम्माल
धम्माल प्रस्तावना आहे

आणि हे
आणि हे टायटल, नातेसंबंध कोणाशी तरी बोलायचयंला पण उठून दिसेल>>>> म्हणूनच 'पाककृतींसंबंधी' हा शब्द बोल्ड लिहीलाय तिने :p
धमाल प्रस्तावना, लालू
(No subject)
सचिन न
सचिन न म्हटलय तेच चुकलय.:P
धमाल लिहिलयः)
हो बरोबर.
हो बरोबर. माझंही सचिन सारखंच मत आहे. नवर्याने 'आई' सारखं पिठलं म्हटल्यावरच कोल्हापूरी ठसक्यात(कमरेवर हात आणि हातात लाटणं) ठणकावून सांगायचं की खायचं असेल तर माझ्या चवीचं पिठलंच खा म्हणून.
सायो,
सायो, लालुचा प्रत्यक्ष कृतीवर भर दिसतोय. नाही तर तिने सासूबाईंना विचारुन नसतं का केलं
ए, इथे टीपी
ए, इथे टीपी करु नका. प्रश्न असतील तर विचारा.
लालु, तु
लालु, तु ससुबाईंना विचारुन (का नाही) केलं पिठलं ?
आज हा बाफ
आज हा बाफ अस्तित्वात आला अन आजच माझ्या इडल्या बिघडल्या
(त्यातल्या त्यात समाधान.. कुठेतरी पहिला नं आला :P)
काय चुकलं असेल??
इडल्या वाफवल्यावर चक्क पीच/ लाईट पिंक कलर आलाय
प्रस्तावन
प्रस्तावना सहीच... लवकरच हा बीबी पॉप्युलर होईल... ( यात काय शंका :
)
विकतचे नारळाचे दूध ( कॅन मधले ) किंवा टिन मधला पायनॅपल आणला, तर त्यावर transfer the contents after opening अस लिहील असत, मी ते काचेच्या बाटलीत ठेवल तर नारळाच्या दुधावर पहील्या दिवशी गुलाबी झाक आली. आणि नंतर ते खराबच झाल. अस का झाल असाव ? हे स्टिल च्या डब्यात ठेवल तर चालत का ?
माझी
माझी शेवयाची खीर बिघडली. मी शेवया परतल्या आणि गार दुधात टाकल्या. त्या शेवटपर्यंत मऊ झाल्याच नाहीत.
सुरुची,
सुरुची, शेवया परतत असताना एकीकडे दूध उकळायला ठेवायचं नी शेवया त्या गरम दुधात टाकून थोडा वेळ उकळू द्यायचं की चांगल्या शिजतात.
सुरभी,
सुरभी, माझंही होतं कधीकधी. तसंही कॅनमधून काढून ठेवलेला पदार्थ जास्त दिवस टिकत नाही असा अनुभव आहे. स्टिलच्या डब्याऐवजी प्लॅस्टिकचा डबा वापरुन पहा पुढच्यावेळी.
मला वाटतं
मला वाटतं सुरुची, शेवया परतून गरम करत ठेवलेल्या दूधात टाकाव्या आणि तशा पाच मिनिटे ढवळत राहाव्या. त्या शिजल्या की मग थंड करत ठेवायच्या आणि खायच्या आधी पुन्हा त्यात थोडे थंड/गरम (आवडीनुसार) दूध घालावे. कारण शिजवताना दूध आटते / आळते.
लालू, हा धागा सुरु केल्याबद्दल धन्स! आणि प्रस्तावना जबरीच!
----------------------
एवढंच ना!
इथे जुन्या
इथे जुन्या हिगू वर 'करायला गेलो मारूती नी झाला गणपती होता ना'?
'करायला
'करायला गेले गणपती..' पण त्यात पाककृतीत चुकून भलतंच काहीतरी केल्याने घडलेले गंमतीदार किस्से होते. तसं अपेक्षित नाही आहे. खरोखर प्रश्न असतील तर विचारावेत. सगळेजण तिकडे 'रेसिपी माहित आहे का?' बीबीवरच विचारत होते म्हणून हा नवीन धागा सुरु केला.
लालु
लालु आमच्या सारख्या नवख्या लोकाना अतिशय छान आहे धागा.. धन्स
आत प्रश्न..
शिरा किंवा उपमा करताना बर्याचदा गुठ्ळ्या होतात रव्याच्या आणि नीट मिळून येत नाही..
त्यासाठी काहि उपाय? आणी पाण्याचे प्रमाण साधारण कसे घ्यावे? (१ वाटीसाठी बहुदा १-१.५ वाटी असे मला माहित आहे)..
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
शिरा किंवा
शिरा किंवा उपमा करताना रवा व्यवस्थित अगदी लालसर होईपर्यंत आणि मंद गॅसवर खमंग भाजून घ्यायचा असतो, म्हणजे मग गुठळ्या होत नाहीत. आणि पाण्याचं प्रमाण साधारणपणे दुप्पट घ्यावं, आणि लागल्यास अजुन थोडं वाढवावं. काही काही प्रकारचे रवे (रव्याचं अनेकवचन
) जास्तच पाणी पितात. 
केद्या,
केद्या, रवा आधी निट भाजुन घेतला की अस होत नाही.
उपमा २ पद्धतीने करतात (३ री पण असेल पण मी २ च बघितल्यात - आई ची १ ,साबाईंची २ री)
पद्धत १. फोडणी करुन त्यात मिरच्या, उडदाची डाळ,कांदा, टोमॅटो (बाकी भाज्या ऑप्शनल अस बरच काही जे तू नेहमी करतोस ते) घालुन त्यात गरम पाणी घालायच, त्याला उकळी आली की भाजलेला रवा घालुन नीट ढवळायच
पद्धत २. कांदा परतला की रवा पण त्याबरोबर पुन्हा थोडासा परतुन वरुन गरम पाणी घालायच आणी ढवळायचं
आवडत असेल तर सगळ्यात शेवटी वाफ देण्यापुर्वी थोड साजुक तुप सोड मस्त लागतात मग वर ओल खोबर, कोथिंबीर लिंबु अहाहा, मस्तच ना रे!
धन्स
धन्स मन्जुडी..
काही काही प्रकारचे रवे (रव्याचं अनेकवचन ) जास्तच पाणी पितात.>>> बरोबर आहे...रवा बदलला की कधि-कधी उपमा बिघडायचा.... )
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
Pages