माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं
पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं
उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं
जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!?
असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..
****************
पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत.
मी मोड
मी मोड आणण्यासाठी यापैकी काहीही करत नाही. कडधान्य व्यवस्थ्ति नळाच्या पाण्याखाली धुवून घेत्ल्यावर जवळ जवळ दुप्पट पाणी घालून झाकून ठेवते. साधारण पाच सहा तासानंतर मी ते पाणी बदलते. बारा तासानी कडधान्य एका चाळणीत निथळून घेते. आणि मग वर एखादे ओलसर फडके टाकून अंधार्या जागी ठेवून देते. सहा तासानी मस्त मोड येतातच.
--------------
नंदिनी
--------------
धन्यवाद
धन्यवाद मनुस्वीनी !
चाळणी,
चाळणी, ताटली सगळं डिश वॉशर मधे घालता येतं.>> शोनू आणि दगडाचं काय?

प्राजक्ता
मी 'मुगवडि'
मी 'मुगवडि' एवजी चुकुन 'chaura vadI' लिहलेली वडि घेवुन आली आहे पटेलकडुन.आकाराने मुगवडिसारखिच आहे ,फक्त रंग पांढरट आहे. याच काय करता येईल?
जे
जे मुगवडीचे करणार होता तेच याचे लहान प्रमाणात करुन पहाता येईल. चवित थोडा फरक होईल पण बाकिचा काही फरक पडयला नको.
धन्स
धन्स मिनोती! थोड्या प्रमाणात करुन पाहिन.
शोनू आणि
शोनू आणि दगडाचं काय?

सगळ्याना
सगळ्याना परत धन्यवाद.
पहिल्यांदाच एवढे सुंदर मोड आले आहेत मटकीला.
इडली तान्द
इडली
तान्दुळ रवा घालुन छान झाल्या. पण तान्दुळ घातल्यावर दडदडित. १:२ प्रमाण होते. काय चुकले?
३:१
३:१ प्रमाणाने छान होते. एकदम हलकी.
माझं
माझं इडलीचं प्रमाण : दिड वाटी इडली रव्याला पाऊण वाटी उडीद डाळ. वेगवेगळ्म भिजत घालून, वेगवेगळं वाटून एकत्र करुन फरमेंट करायचं. आयत्या वेळी मीठ घालायचं. छान मऊ,हलक्या इडल्या होतात.
सुमेधा
सुमेधा इडली रवा उकड्या तांदळाचा असतो . व इडलीला उकडे तांदूळच घेतात. तुमचे प्रमाण बरोबर आहे.
जर साधे तांदूळ घेतले असतील तर एक वाटी उडद डाळ दोन वाट्या साधे तांदूळ व अर्धी वाटी शिजवलेला भात घेऊन वाटून इडल्या केल्या तर मस्त हलक्या होतात.
सुमेधा,
सुमेधा, पिठ नीट "आले" नव्हते म्हणजे आंबले नव्हते. इडलीचे पिठ रात्री भिजवताना त्याची पातळी लक्षात ठेवावी. इडल्या करण्यापुर्वी ती पातळी निदान ३० टक्क्याने तरी वाढलेली असावी, तरच इडल्या करायला घ्याव्यात नाहीतर आणखी वेळ जाउ द्यावा.
पिठ आंबण्यासाठी अनेक उपाय करता येतात, जसे यीस्ट वापरणे, कांदा, नारळाचे पाणी, खोबरे वगैरे घालणे, असे अनेक उपाय आहेत.
रात्रभर
रात्रभर इडलीचे पीठ नुस्ते फ्रीजवर जरी ठेवले, तरी सकाळी मस्त फुगते.
इडलीचे पीट
इडलीचे पीट भिजवताना मूठभर चुरमुरे टाकले तर इडल्या मस्त हलक्या होतात,
आज चॉकोलेटच्या वडयाची वाट लागली. चव चांगली आली आहे पण बहुधा लोणी जास्त झाल्याने "वड्या" पडत नाही आहेत. साधारण जेलीपेक्षा थोडं दाट असं झालय. फ्रीझरमधे ठेवूनही फरक नाही.
आता माझं काय चुकलं आणि चूक कशी निस्तरू??
--------------
नंदिनी
--------------
इडलीला मी
इडलीला मी पॅरबॉइल्ड तांदूळ घेते. २-१ प्रमाण. इडली रवा असेल तर (शोनुच्या सल्ल्याने) २-१ प्रमाणच. भारतात आई कुठला तरी जाड तांदूळ आणते. रात्रभर/दिवसभर झाकुन ठेवल्यास सोडा, यीस्ट असे काहीही न घालता छान इडल्या होतात.
आता प्रश्न, पॅरबॉइल्ड तांदळाच्या इडल्या पांढर्या स्वच्छ होत नाहीत. जरा पिवळसर होतात. पांढर्या होण्यासाठी काही करता येइल ?
सिंड्रेला,
सिंड्रेला, त्या इडल्या पांढर्या करायचा अट्टहास का करायचा ? उलट त्याचे मसाला इडली, कांचीपूरम इडली असे आणखीनच रंगीबेरंगी प्रकार करायचे.
अट्टाहास
अट्टाहास नाही पण काही सोपा उपाय असेल तर बघावा म्हणुन विचारले. एरवी मी त्यात थोडी कसूरी मेथी चुरुन घालते. चवही चांगली येते आणि रंगाचे कळत नाही
मध्यंतरी
मध्यंतरी ना, सर्व पदार्थ तलम, शुभ्र वगैरे करायची क्रेझ होती. मग मैदा, डालडा यांचा अतिवापर व्हायला लागला. आणि त्यात आपले गावठी घटक आणि पदार्थ विसरले गेले. आता ति चूक आपल्या लक्षात आलीय. म्हणून लिहिले तसे. बाकि कसूरी मेथीचा प्रयोग मी केला नाही अजुन. करायला पाहिजे.
....
....
इडलीचं पिठ
इडलीचं पिठ चांगल होण्यासाठी डाळीबरोबर चार-पाच दाणे मेथ्याचे घालावे. पिठ मस्त फुगते इडले हलकी होते.
माझं प्रमाण १:२ अर्थात उकडा तांदूळ किंवा इडली रव्यासाठी. किंवा कुठेही मिळणारा जाडा तांदूळ वापरला तरी चांगलीच झालिये
अरे त्या
अरे त्या चॉकोलेटसाठी पण काही टिप्स द्या ना!!!
--------------
नंदिनी
--------------
दुधात
दुधात घालून पिउन टाका ते. chocolate केक करा नाहीतर साधा केक करा आणि त्यावर थापा फ्रोस्टिन्ग म्हणून.
मला
मला साबुदाण्याची खिचडी खूप आवडते. म्हणून मी खूप मन लावून करायचा प्रयत्न करतो. पण दर वेळी एकदम मोकळा दिसणारा साबुदाणा फोडणीमधे घातला कि चिकट गोळा होऊन बसतो.
भरपुर दाण्याचं कूट घालूनही काहीच उपयोग होत नाही मग? काही युक्ति असते का खिचडी चिकट होऊ नये म्हणून?
अविकुमार,
अविकुमार, साबुदाणा कितीवेळ भिजवला होता ? खिचडी करण्यापूर्वी, ज्यावेळी आपण कूट मिसळतो त्यावेळी साबूदाणा हाताने मोकळा करायचा असतो. त्यावेळी हाताला अजिबात ओलसरपणा जाणवू नये. साबूदाण्यात पाणी उरले तर खिचडी चिकट होते. अलिकडेच यावर इथे चर्चा झालीय.
अविकुमार,
अविकुमार, शक्यतो रात्रीच साबुदाणा भिजत घाला दुसर्या दिवशी सकाळकरता खिचडी हवी असेल तर.छान भिजतो आणि फुलतो खिचडीकरता. पाणी घालताना साबुदाणा ज्या लेव्हलवर असेल त्यापेक्षा अगदी किंचितच वरपर्यंत पाणी घाला. वर दिनेश म्हणाले तसं करा फोडणीत घालण्यापूर्वी.
दिनेशदा,
दिनेशदा, साबुदाणा ६ तास भिजवला होता. आणि सायो, पाणी साबुदाण्याच्या लेव्हलएवढेच घातले होते. साबुदाण्याचा प्रकारही कारणीभूत असू शकतो का? कारण यावेळी साबूदाणा नविन आणला होता आणि खिचडी जास्तच चिकट झाली होती. साबुदाण्यात पाणी उरले असेल असेही वाटते.
तो मोठा घट्ट गोळा बघून खाण्याची उमेदच गेली निघून. पण खाल्ला २-३ वेळा microwave मधे गरम करुन थोडा थोडा. सरळ मिठ टाकून पेज केली असती तर बरं झालं असतं असं वाटलं.
हो
हो साबुदाण्यावरही अवलंबून असते. टोक्योत माझी खिचडी कधीच चांगली व्हायची नाही त्याचं कारण साबुदाणाचं होतं.
मी असं
मी असं ऐकलंय की गुजराथी लोक साबुदाण्याची खिचडी करण्यापुर्वी भिजवलेला साबुदाणा वाफवून घेतात आणि मग फोडणीला टाकतात. खिचडी छान मोकळी होते आणि तूपही कमी लागतं. कोणी तसं करून पाहिलंय का? असेल तर प्लिज त्याच्या टीप्स द्या ना..
साबुदाणा
साबुदाणा शिजवून घ्यायची कृति अशी ( गुजराथी लोक असे करतात का याची कल्पना नाही, आपली मराठमोळी खिचडी सोडून त्यांची कोण खाणार ? )
भिजवलेला साबुदाणा एका ताटलीत पसरून, कूकरमधे प्रेशर न लावता दहा मिनिटे वाफवून घ्यायचा. मग ती ताटली थंड पाण्यात सोडायची. थोड्या वेळाने साबुदाणा मोकळा होतो. न झाल्यास तो हाताने करावा. मग पाण्यातून काढून तो निथळून घ्यावा. हा साबुदाणा वाळवून ठेवता येतो. त्याचा चिवडा वा लाडू करता येतात. पण असे करतानाही शिजवण्यापूर्वी साबुदाणा ओलसर राहिला तर त्याची घट्ट वडी होते.
असा मोकळा झालेला साबुदाणा वापरुन खिचडी केली तर तूप कमी लागेल.
Pages