२ वाट्या तांदूळ
२ वाट्या गूळ
१ वाटी नारळाचा चव
४ वाट्या पाणी
तीन चार लवंगा
वेलचीपूड, केशर
आवडीनुसार बेदाणे, बदाम काप, काजू तुकडे
तांदूळ धुवून निथळून ठेवा. मग प्रेशरपॅनमध्ये तुपावर लवंगांची फोडणी करुन त्यावर तांदूळ परतून घ्या. त्यात खोबरे घालून पुन्हा दोन मिनिटे परता, मग पाणी (आधणाचे घातल्यास उत्तम) आणि गूळ घालून ढवळा. कडेने थोडे तूप सोडा. वेलचीपूड, केशर घाला. प्रेशरपॅनचे झाकण लावून दोनतीन शिट्ट्या आणा. झाकण निघाले की वरून बदाम काप, बेदाणे, आवडत असल्यास काजूचे तुकडे इत्यादी घाला.
या प्रकारात भात नीट खुटखुटीत शिजवणे, शिजल्यावर ढवळताना शीत मोडू न देणे इ. टेन्शन्स न राहता उत्तम मऊ, मोकळा आणि अखंड शितांचा भात तयार होतो.
ही प्रमाणं तुम्ही वापरत असलेला तांदूळ आणि तुमची गोडाची आवड यानुसार बदलावी लागतील. मी इथे टिल्डा बासमती तांदूळ वापरते.
जुन्या मायबोलीवरील माहितीचा दुवा
नारळी भात
स्वाती,
स्वाती, मस्त नी सोपी आहे क्रुती! धन्यवाद
स्वाती,
स्वाती, आधणाच्या पाण्यातच गूळ विरघळवून घेतला तर चालेल का?
मी याच क्रुतिने केलाय आज
मी याच क्रुतिने केलाय आज नारळिभात...खुप मस्त झालाय, (मी पाणी १/२ वाटि जास्त घातले).
क्रुतीसाठि धन्यवाद!
आज करुन बघते या कृतीने.
आज करुन बघते या कृतीने.
खरेच नारळीभात एकदम मस्त जमला
खरेच नारळीभात एकदम मस्त जमला ! मला देखील पाणी १ वाटी जास्त लागले. मन्जुडी, मी आधणाच्या पाण्यात आधी गुळ वीरघळवून घेतलेला.
माझाही नारळी भात चांगला झाला
माझाही नारळी भात चांगला झाला ह्या पद्धतीने. अति गोडही नव्हता चवीला. पाणी मात्र दुप्पटच घातले.
मी पण केला होता वरचे प्रमाण
मी पण केला होता वरचे प्रमाण वापरुन, माझ्यामते छानच झाला होता
माझ्यामते छानच झाला
माझ्यामते छानच झाला होता<<<
मग नवर्याला आवडला नाही का? मला किंचित गोड चालला असता असं वाटलं. पुढच्या वेळी गूळ किंचित जास्त घालेन.
स्वाती, गुळाऐवजी साखर घालून
स्वाती,
गुळाऐवजी साखर घालून केला तर साखरेचे प्रमाण काय घ्यायचे? आणि मग त्याला 'साखरभात' म्हणायचे का?
नारळ घालणार नसाल तर साखर
नारळ घालणार नसाल तर साखर तांदुळाच्या पाऊण पट पुरायला हवी. आणि मग पाणीही तांदुळाच्या दुपटीहून थोडं कमीच लागेल.
(ही प्रमाणं तुम्ही वापरत असलेला तांदूळ आणि तुमची गोडाची आवड यानुसार बदलावी लागतील. मी इथे टिल्डा बासमती तांदूळ वापरते.)
मी पण टिल्डा बासमती वापरुनच
मी पण टिल्डा बासमती वापरुनच केला.
या रेसिपीने नारळीपौर्णिमेला
या रेसिपीने नारळीपौर्णिमेला भात केला होता मी. मस्तच झाला.
धन्यवाद स्वाती.
वर्षा बरे झाले धागा वर
वर्षा बरे झाले धागा वर काढलास.
मला रेसिपी हवी होती तेव्हा सापडला होता.. पण काल मिलालाच नाही. मी पण नारळीपौर्णिमेला केलेला भात या पध्दतीने. मस्त आणी सोपा
ही रेसिपी मिळाल्यापासून मी
ही रेसिपी मिळाल्यापासून मी ह्याच पद्धतीने करते नारळीभात. मस्त होतो.
आज केला होता या पद्धतीने
आज केला होता या पद्धतीने नारळीभात. एकदम मस्त आणि सोप्पा. आमच्याकडे गोड जरा जास्त लागतं म्हणून गुळाचं प्रमाण थोडं वाढवलं होतं.
स्वाती या पाककृतीसाठी खूप धन्यवाद.
स्वाती, मीपण गेल्या कित्येक
स्वाती, मीपण गेल्या कित्येक वर्षापासुन तुझ्याच पध्दतीने करते. एकदम मस्त होतो हा भात. कधीच बिघडला नाही.
मी गेल्या वर्षी हीच कृती
मी गेल्या वर्षी हीच कृती वाचून २-३ दा केलाय. छान होतो एकदम.
मी कधीच केलेला नाहीये. या
मी कधीच केलेला नाहीये. या क्रुतीने करून बघते सोपी आहे. भात तूप व लवंग यांचा वास किती मस्त येतो ना. भिशीच्या मैत्रीणींसाठी करून नेते.
आस, रेस्पी वर काढायची होती गं
आस, रेस्पी वर काढायची होती गं
नारळाचा चव कसा करायचा?
नारळाचा चव कसा करायचा?
मंजुडी, सोनपरीने लिहिलेय की
मंजुडी, सोनपरीने लिहिलेय की तिने गुळ आधीच विरघळवुन घेतला होता.
नारळाचा चव कसा करायचा? >>
नारळाचा चव कसा करायचा? >> खवणीने खवतात त्यालाच चव म्हणतात ना ?
खवणीने खवतात त्यालाच चव
खवणीने खवतात त्यालाच चव म्हणतात ना ? >>>>>> हो का? मला वाटलं काहितरी वेगळंच असेल म्हणून...... शंका समाधानाबद्दल धन्यवाद!
नारळाचा चव ताजा लागेल की
नारळाचा चव ताजा लागेल की फ्रीजरमधला चालेल आधी करुन ठेवलेला ?
सोपा वाटत आहे या कृती ने. एकदम वाचून आत्ताच करुन बघावासा वाटत आहे.
मवा, फ्रिजरमधलं खोबरं आधी
मवा, फ्रिजरमधलं खोबरं आधी बाहेर काढून ठेवून नॉर्मल टेम्पला आल्यावर वापर.
काढलं. धन्यवाद !
काढलं. धन्यवाद !
आज घरी जाऊन करतेच!!!
आज घरी जाऊन करतेच!!! नारळीभाताबरोबर दुसरं काय करायचं? म्हणजे फक्त नारळीभातच करायचा का?
कृती वर आणल्याबद्दल धन्यवाद
कृती वर आणल्याबद्दल धन्यवाद
बरं झालं वर आणली कृती.
बरं झालं वर आणली कृती. यावर्षी पण करणार .:)
कृती वर आणल्याबद्दल
कृती वर आणल्याबद्दल धन्यवाद>>>> अनुमोदन. मीही १-२ दिवसांत शोधणारच होते ही कृती.
मवा, बिन्धास्त कर. खूप मस्त होतो या कृतीने.
Pages