लहान मुलांचे आजार

Submitted by admin on 1 July, 2008 - 05:31

निर्मयी माझ्या मते तिचा घसा दुखत असावा.तिला फिवर रिड्युसर+पेन रिलिवर ची गरज आहे.क्रोसीन पेक्षा आयबुप्रोफेन द्यावे असे वाटते.एकदा डॉ. ना विचारा.तिची भूक थोडी मंदावणार.नेहमी इतके ती नाही घेणार पण थोडे थोडे फिड करत रहा.उकळलेले पाणी द्यायला बहुदा हरकत नसावी.पण ओ.आर.एस ने तकवा राहील.डॉ. ना सगळे स्पष्ट विचारुन घ्या.सुट्टी असली तरी नेहमीच्या डॉ.ना फोन करुन सांगा.शक्य झालं तर एकदा बघण्याची विनंती करा म्हणजे तुमची काळजी कमी होईल.

निर्मयी, तुम्ही फार विचार करु नका.आपल्याला काही कळत नाही.त्याने टेंशन वाढेल.दुखणं साधसं सुद्धा असतं.
तिला मोकळं ठेवा.सैल कपडे घाला आणि गुंडाळू नका.

नेहमीचे डॉ. उद्या शिवाय भेट्णार नाहीत. उद्या जाणार च आहे. फोन वर बोलणे पण शक्य नाही. त्यामुळे घरीच काहीतरी उपाय करायचे आहेत. उद्या सकाळ पर्यंत......

तापात लहान बाळाला रॅश आली म्हणजे गोवर असं होत नाही. व्हायरल फीवरची देखिल रॅश येते. त्यात काळजीचं कारण नसतं. डॉक्टरांची/नर्सेसची हेल्पलाइन असेल तर एकदा फोन करून त्यांच्या कानावर घाला. ताप १०३-१०४ गेला तर सरळ गार पाण्याने अंग पुसायला सांगतात. आपल्याला घाम येऊन ताप उतरतो तसा इफेक्टिव्ह मेकॅनिझम बाळांमधे नसतो म्हणून त्यांचा ताप अचानक १०० वरून १०३-१०४ जातो. ताप उतरेपर्यंत कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या आणि हातपाय (मुख्यता: तळहात आणि तळपाय) पुसत रहा. अंगं पुसताना बाळं रडतात आणि 'तापात आणखी कशाला रडवा' म्हणून आपण पुसायचं टाळतो. तसं नको. सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे डीहायड्रेट होऊ देऊ नका. ताप उतरल्यावर बर्‍यापैकी अ‍ॅक्टीव्ह होतेय का, हातपाय हलवून खेळतेय का यावर लक्ष ठेवा.

बाळं घाबरवतात आणि घरी फक्त आई-बाबा एवढेच दोघे असले की काही सुचेनासं होतं. पण घाबरू नका. बाळाला लवकरच बरं वाटेल.

टायलेनॉल(असिआमिनोफेन) किंवा आयबुप्रोफेन चालेल. मामी म्हणतात तसे इन्फन्टसना देण्यासाठी वेगळे मिळते त्यावर डोस लिहिला असेल. मी इथे कधी क्रोसिन दिलेले नाही, भारतात देतात पण ५ महिन्याच्या बाळाला देतात का लक्षात नाही.

Its difficult for me to type in Marathi, but I can tell u not to worry. I have a daughter who is about a year and has got viral fever likethis in the past. If doctorhasnot given anything you can try Baby Crocin. It is safe. The dosage is written on the bottle acc to the weight of the baby. If you dont have one, ask your Indian friend. It will reduce the fever and the bodyache. You check with local medical shop. They will have fever reducing medicine which could be sold across the counter.
Also its better to keep general basic medicines at home specially when living abroad and with a small baby.If you check with indian doctors they will prescribe these to you. And sorry for not typing in Marathi.

मी इंडियाच्या डॉ ला विचारले ते म्हणाले क्रोसिन चालते बाळांना दिले तर. ते म्हणाले पुसुन काढा आणि क्रोचिन द्या ६ तासांनी.
मला १ प्रश्न आहे की सिरप आणि ड्रॉप्स मधे काय फरक आहे.

<<<मला १ प्रश्न आहे की सिरप आणि ड्रॉप्स मधे काय फरक आहे.>>>

कॉन्सट्रेशन चा. सिरप थोड्या मोठ्या मुलांसाठी असते एकावेळि ज्यास्त व्हॉल्युम घ्यायचा असतो आणि पर एमेल ड्र्ग च कॉन्सट्रेशन कमी असत. ड्रॉप्स लहान बाळांसाठी असतात व्हॉल्युम कमी असतो म्हणुन कॉन्सट्रेशन ज्यास्त असत. कुठल्याही औषधाच प्रमाण हे शरीराच्या आकारमानावर असत त्यामुळे बाळांना २ वर्षावरिल मुलांपेक्षा कमी औषध लागत पण एकावेळी त्यांना ०.४ मिलि इतका व्हॉल्युम सोईचा असतो (२ वर्षावरिल मुल एकावेळी ५ मिलि इतक औषध घेउ शकतात) त्यामुळे त्या व्हॉल्युम मध्ये बसवण्यासाठी पर एमेल औषधाच कॉन्सट्रेशन ज्यास्त असत.

निर्मयी, बाळाला लवकरच बर वाटेल काळजी करु नका.

अरे हे आता वाचले, निर्मयी ताप कमी आहे का?

वर लिहीले आहे तसे कपाळावर, तळहात-तळपायावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेव.
ताप कसा मोजला आहेस? रेक्टल थर्मामीटरने असेल तर तिथे काखेतल्यापेक्षा १डेग्रीने जास्त असतो, त्यामुळे आकड्याने घाबरुन जौ नकोस

घरात काही औषध आहे का? सूतशेखर्/सुवर्ण सूतशेखर असेल तर उगाळून (३-४) वेढे दर ६ तासांनी दे.

लहान मुलांचे क्रोसीन असेल तर ०.६ मिली दर ४ तासांनी दे.

बाळ दुध घेणार नाही तापात, चिमुटभर धणे/जिरे/सुंठ यातले जे असेल ते घालून पाणी उकळ, ते पाणी गार करुन त्यात किंचित साखर घाल, चमच्याने/डृओऑपरने दर तासाने देत रहा.

निर्मयी तु जपान मधे आहेस ना? इथे इमर्जन्सी केअर मधे गेल्यावर सहसा खरच इमर्जन्सी नसेल तर औषध देत नाहीत. हे त्रासदायक आहे खरे. पण भारतातुन ते बाळाचे क्रोसिनचे ड्रॉप आणले असशील तर ते त्यावर लिहिले आहे त्याच प्रमाणात तित्क्याच वेळा दे. जास्त देऊ नकोस.
सगळ्यांनी लिहिलेय तसे कपडे सैल ठेव. इथे प्रचंड उन्हाळा आहे म्हणुन साधा ( कोमट नव्हे) पाण्याने पुस. शिवाय इथे जेल भरलेल्या पिशव्या मिळतात त्या फ्रिज मधे ठेवायच्या थंड झाल्या की कापडात गुंडाळुन मधे मधे बाळाच्या पोटा पाठीला लावायच्या. काखेत लावायच्या पिशव्या सुद्धा मिळतात. हि उशी सारखी डोक्याखाली दिली तरी चालेल. माझी लेक हॉस्पीटल मधे अ‍ॅडमीट असताना सुद्दा तिथे अशी उशी दिली होती फक्त बाळ अति थंड होत नाही ना ते बघ.
इथे ओआरएस असे लिहिलेले पाणि बाटली मिळते. ते भरपुर पाज. जितके जास्त देशील तितके चांगले, एकावेळी घेत नसेल तर दर पाच दहामिनीटांनी दोन तीन चमचे देत रहा.
आज तुला डॉ. भेटतीलच. ते एक गुलाबी ताप उतरायची पावडर देतील, शक्य असेल तर त्यांच्याकडुन दोन तीन डोस जास्तीचे घेऊन ठेव. ते पुढच्या वेळी कधी इमर्जन्सीला लागलेच तर वापरता येतात. फक्त बाळाचे वजन खुप बदलले कि ते पुरेसे नसतात, त्यामुळे मधे एखाद वेळा चेकअपला जाशील तेव्हा खात्री करुन, हवे असल्यास डोस बदलुन घे. डॉ. ओळखीचे असेल तर हे सहज शक्य आहे.

आणि हो केव्हाही गरज लागली तर कॉल कर. माझा नंबर मागे दिला होता तुला, पण पुन्हा पाठवला आहे.

माझ्या डॉक्टरच्या मते १०४.५ पर्यंत ताप असेल तर ठिक आहे. त्यावर गेला तर मात्र इमर्जन्सीत न्यावे.
तसच व्हायरल असेल तर अ‍ॅसिटोमोफिन (टायलेनॉल) आणि आयब्रुफेन (मॉट्र्निन) देतात. याव्यतिरिक्त औषधाची गरज डॉकला वाटत नाही.
त्यामुळे निर्मयी काळजी करु नका. शक्य असेल तर टायलेनॉल आणि मॉटरिन अल्टर्नेट द्या. जपान मध्ये Over the counter काय ब्रँड मिळतोय तो देता आल तर बर. कंटिन्युअस एकच औषध ( उदा. "क्रोसिन") देत राहिल तर थोड्यावेळान त्याचा इफेक्ट होईनास होतो. इति माझी डॉक. पाणी/इलेक्टोलाईट/ साखर+मीठ+पाणी व्यवस्थित देत रहा

सगळ्यांचे खुप खुप आभार. खरेच खुप बरे वाटले. तुम्ही सगळ्यांनी माझी खुप मदत केली.
मी काल तिला (४ मि.लि डॉ. नी सांगितले म्हणुन) २-३ मि.लि. दिले. त्या बरोबर तिचा ताप कमी झाला. आज मी इथल्या डॉ कडे जाउन आले.त्यांनी जर अगदी परत ताप वाढ्ला तर ओषध दिले आहे.समर कोल्ड झाला आहे म्हणाले. २-३ दिवस अजुन त्रास होइल म्हणाले.
हो सावली तु म्हणालीस तसे आणले होते काल नवर्याने रात्री. पण तिला कपाळाला लावाय्च्या पट्ट्या मिळतात त्या लावल्या होत्या.

माझि मुलगि ६ महिन्याचि आहे. तिचे अधुन मधुन डओक head गरम होत व ते १०-१५ मि.रहते अनि अपोअप थड होते यात घाबरन्या सार्खे कहि अहे का....दिवसतुन एकद शी चा रंग हिरवट व वास येनरा अस्तो यचा अर्थ कय म्ह्नन्जे कहि problem तर नहि ना क्रुपया कुनि तरि यावर प्र्तिक्रिया द्या

माझा मुलगा दिड वर्षाचा आहे, गेल्या आठवड्यात त्याला सर्दी झाली होती, नंतर आता ४-५ दिवसात त्याला खोकल्याचा संध्याकाळी/रात्रीच वाढतोय,दिवसा अगदी कमी.कफ सिरप २-३ दिवस देऊन काही फायदा झाला नाही.
अशावेळी नक्की काय द्याव ?
कफ सिरपमध्ये देखील (लक्षणांनुसार) वेगवेगळे प्रकार आहेत का ?
दुसर्‍या ४ वर्‍शाच्या मुलांला नेहमी (डोक्याला जास्त) घाम खुप येतो,अगदी गरम होत नसताना.हे कशामुळे ?
जाणकारांनी कृपया सल्ला द्यावा.

माझ्या बाळाच्या कपाळावर्,मानेवर्,ओठांच्या खाली आणि डोक्यात बारीक बारीक खुप पुरळ आली आहेत. कशामुळे ते कळत नाही. डॉ. कडे गेले होते ते म्हणाले हीट मुळे आहेत. त्यांनी जेल दिले आहे लावायला पण कमी झाल्यासारखे नाही वाट्त. नक्की हीट च असेल का दुसरी काही अ‍ॅलर्जी असेल. मी तिला नाचणी सत्व सुरु केले आहे. तिला सर्दी पण खुप झाली आहे. मला काही घरगुती उपाय असतील तर सांगा.
डास कीडे असु शकेल का पण मग तसे असेल तर हातापायावर का नाही? तिला घाम पण खुप येतो डोक्यात. कपाळावर. ती कानाच्या मागे सारखी खाजवत असते.

निर्मयी तू कोरफड घरात असेल तर ताजा गर लावून बघ . कारण हीट त्यामुळे नक्की कमी होईल. थोड्याथोड्यावेळाने पावडर / चंदनाची पावडर असेल तर उत्तम लावून बघ. माझ्या मुलालाही डोक्यात प्रचंड घाम येतो अगदी ए.सी.त सुद्धा त्यामुळे पुरळ उठतात. त्याच्या बाबतीत हा उपाय खूप उपयोगी ठरला आहे. तूही करून बघ.

नमस्कार काहि उपयोगि पड्नारि ऑषध

खो गो च्या गोळ्या मधा मधये वातुन त्याचे चाट्न देने

ओवा अनि सुंट सम प्रामानात पावडर करुन १ चमचा १ कपात पान्यात थोडा गुळ टाकुन उकळुन त्याचा काडा देने

निर्मयी अजून एक कडुलिंबाची पाने उकळून आंघोळीच्या वेळी त्या पाण्यात घाल आणि मग बघ खूप फरक पडेल.

खो गो च्या गोळ्या मधा मधये वातुन त्याचे चाट्न देने

>>
आर्या एलर्जी असेल तर मध, अन्डे, शेलफिश, भुइमुग, साम्भाळुनच
बाहेर लावायला
१) चंदन उगाळुन
२) कैलास जीवन

सर्दी झाली आहे तर पुरळ उश्णतेमुळे नसुन अ‍ॅलर्जी असण्याची चान्सेस जास्त.
धणे, कांदा, गुळ याचे पाणी उकळुन चांगले.
कांदा गुळ सर्दीला उपायकारक, तर धणे उष्णता वाढु देत नाहित.

मधाबद्दल माहिती
मधाने इम्युन सिस्टीम चांगली होते पण मध हा लोकल असावा.
मधात मधमाशाने पचवलेले पोलन असतात त्यामुळे ते नॅचरल वॅक्सिन सारखे शरिराची एम्युनीटी वाढवितात
पण जर मध बाहेरगावचा आणि चांगल्या क्वालिटीचा नसेल असेल तर लहान मुलांना दुसर्याच अ‍ॅलर्जी होउ शकतात. (इती आमचे डॉक्टर, माझ्या १ वर्षाच्या मुलीला पुरळ आले तेव्हा)

मी इथे नवीन आहे...आपल सहकार्य अपेक्षित आहे...प्रश्न माझ्या ३ वर्षाचा मुलीबद्दल आहे...
तिचा जन्म अमेरिकेतला आहे मात्र ती ६ महिन्याची असताना भारतात गेल्यावर मी तिला BCG ची लस दिली होती..ह्या वेळचा भारत भेटीनंतर तिच्या डॉक्टरांनी टीबीची टेस्ट केली..टेस्ट positive आहे..डॉक्टर नक्की सांगत नाही..तिचा चेस्ट xray nagative आहे .कदाचित bcg मुळे असाव..मला हेअल्थ department मध्ये काल कर अस सांगितलाय..मला काहीच कळत नाहीये..तिला शाळेत जाता येणार नाही का?किंवा खूप औषध घ्यावी लागतील का? कृपया मार्गदर्शन करा

Tuberculin Skin Test (TST). BCG vaccination may cause a false-positive reaction to the TST, which may complicate decisions about prescribing treatment. The presence or size of a TST reaction in persons who have been vaccinated with BCG does not predict whether BCG will provide any protection against TB disease. Furthermore, the size of a TST reaction in a BCG-vaccinated person is not a factor in determining whether the reaction is caused by LTBI or the prior BCG vaccination.

खालील लिंक पहा.
http://www.mass.gov/?pageID=eohhs2terminal&L=7&L0=Home&L1=Provider&L2=Gu...

टेस्ट पॉझिटिव्ह आली की एक्सरे काढतात. लस घेतली असेल तर टेस्ट पॉसिटिव्ह येते. एक्सरे निगेटिव्ह असेल तर काहीही करावे लागत नाही. आपलीही स्किन टेस्ट पॉझिटिव्ह येते. म्हणून ग्रीन कार्डच्या वेळी एक्सरे काढतात.

Pages