IPL च्या जखमा आणि भरपुर क्रिकेट हे कारण धोणी गेले दोन वर्ष देत आहे. नशीब आपले की वल्डकप आधी होता नाही तर हे कारण पुरले असते. तसेही आपला संघ वल्डकप आधी काय दिवे लावत होता हे सगळ्यांना माहीत आहे. मला गांगूलीचे काही वाक्य आवडले. उदा भरपुर क्रिकेट, भरपुर क्रिकेट म्हणायचे असेल तर इन्टरनॅशनल क्रिकेट मध्ये खेळू नका.
चेतेश्वर पुजारा सोबत रायडूला संधी देता आली तर बघावे. तसेच रोहित शर्माला टेस्ट मध्ये संधी द्यावी असे मला प्रामाणिकपणे वाटते कारण त्याच्याकडे टेक्निक आहे. पण त्याला जरा घासून पुसून त्याच्यावर असलेल्या आयपीएल मरगळीचे पॉलीश व्हायला पाहीजे.
हर्ष भोगलेने क्रिकेट बद्दल बोलण्यात वावगं काय ते कळलं नाही? फुड क्रिटिक असायला स्वतः शेफ असायला पाहिजे असा नियम नाही. वृत्तपत्रांचे संपादक राजकारण्यांवर आणि सरकारी निर्णयांवर अग्रलेख लिहू शकतात तसंच हे पण.
कळणं, व्यक्त करता येणं, हे गुण आहेत की त्याच्याकडे. त्यातून त्याची मतं स्टबर्न नसतात, हे मला फार आवडतं.
कपिल देव महान क्रिकेटपटू. पण तो क्रिकेटबद्दल जे बोलतो त्यात किती अर्थ असतो?
>>हर्ष भोगलेने क्रिकेट बद्दल बोलण्यात वावगं काय ते कळलं नाही?
काहीच नाही.. मंदीरा बेदी देखिल बोलते. माझे हर्षा भोगले वरील विधान हे एकूणात आजकाल कुठल्याही बाजूने बोलत असाल तरी पैसा कमावता येतो या गोष्टीच्या अनुशंगाने होते. त्यातही जे आधी मैदानावर एक बोलायचे/करायचे ते मैदानाच्या बाहेर दुसरेच बोलतात/करतात हा मूळ मुद्दा होता. असो.
>>फुड क्रिटिक असायला स्वतः शेफ असायला पाहिजे असा नियम नाही. वृत्तपत्रांचे संपादक राजकारण्यांवर आणि सरकारी निर्णयांवर अग्रलेख लिहू शकतात तसंच हे पण.
<<त्यातही जे आधी मैदानावर एक बोलायचे/करायचे ते मैदानाच्या बाहेर दुसरेच बोलतात/करतात हा मूळ मुद्दा होता. >>
हे मान्यच आहे. अशोक मल्होत्रा, अरुण लाल, अतुल वासन, मणिंदर सिंघ यांनी जितका वेळ टेस्ट क्रिकेट ग्राउंडवर घालवला नसेल त्याच्या काही पट वेळ न्युज चॅनेल्सच्या स्टुडियोजमधे घालवला असेल. सचिनबद्दल असे लोक बोलतात तेव्हा त्यांना हे सांगायची मला फार फार इच्छा होते.
>>तिवारी यष्टीरक्षण करत नाही, रायडू यष्टीरक्षक आहे
आयपिल मध्ये केलं होत ना तिवारी ने?
असो. थोडक्यात धोणी ची रिप्लेसमेंट आवश्यक आहे यावर ईथे एकमत दिसते
बाकी कुणालाही दुखापत होणे वाईटच व ती होवू नये पण सर्व भारतीयांनी देव पाण्यात ठेवल्याने भज्जी एकदाचा बाहेर गेला.. युवी दुर्दैवी! आता गंभीर, विरू चा हात आणि झहीर ची मांडी आयत्या वेळी दगा दिली नाही म्हणजे मिळवले. मला वाटतय सद्य दौर्यासाठी २२ जण निवडायला हवेत- प्रत्येकाला एक रिप्लेसमेंट रेडी हवी. कसोटी मालिका संपेपर्यंत अजून किती जखमी/घायळ ना "हलवावे" लागेल नेम नाही.
या मालिकेत धोणी संपूर्ण फेल गेला आणि द्रविड अपेक्षेप्रमाणे चमकला तर कसोटी संघाचे कप्तानपद पुन्हा द्रविड ला सोपविले जाईल असे वाटते. अन्यथा विरू ने धुमाकूळ घातला तर त्याला करतील कॅप्टन, काही नेम नाही आपल्या निवड समितीचा.
>>आज लोकसत्तामध्ये सांझगिरीचा लेख मस्त आलाय !सॉलिड पंचेस आहे
अरे वा! आला का एकदाचा.. शोधतच होतो.. सामन्यात डोकावलं तर नव्हता तिथे. संझगिरी शेवटी सामन्यातून बाहेर पडले का?
>>बॉल मागे यायला पाहीजे ना?
लय भारी रे...... जाम हसलो.....
तसेच आपले गोलंदाज पिटरसन ला गोलंदाजी करताना नेमके कोण कोणाच्या अंगावर चालून जातोय हेच कळत नाही
आपली थिंकटॅन्क पिटरसन , बेल, ब्रॉड यांच्या बाबतीत चुकली आहे......आणि चुकत ही आहे.......बहुतेक फक्त स्ट्रोस, कुक आणि स्वान.....यांच्यावरच काय तो अभ्यास केला गेलेला होता.............
हे बघा. सन्निभाय ने देखिल बोर्डाला दोष देण्यापेक्षा आपल्या फलंदाजांच्या तंत्राला, किंवा ते अवगत नसणे याला दोष दिला आहे:
"There will be talk about preparation etc, but even if this Indian team had played five first-class games before the Test series they would have struggled as the technique is not there."
(source: http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/series-tournaments/ind...)
थोडक्यात ऊर्वरित सामन्यात हे तंत्र (ऊसळते चेंडू खेळने, स्विंग, सीम मुव्हमेंट वि. खेळणे) अचानक प्रकट होणार नसल्याने पुनः एकदा तोच निकाल लागायची शक्यता आहे. विरू, विराट कडे देखिल ते अपेक्षित तंत्र आहे असेही नाही. माझ्या मते फलंदाजीच्या जोरावर सामना जिंकायचा असेल तरः
१. सेहवाग चा दमदार खेळ आवश्यक आहे, जोडीला दुसर्या सलामीच्या फलंदाजाने किमान ऊभे रहायला हवे.
२. सेहवाग लागल्यावर जुन्या चेंडूवर सुरुवात करताना द्रविड, सचिन मोठा डोंगर ऊभा करू शकतात
३. एकंदरीत दमदार सलामी अन ईं. च्या गोलंदाजांवर असा दबाव आल्याने मधल्या व खालच्या फळीतील फलंदाजांना फार तिखट मार्याला सामोरे जावे लागणार नाही.
आणि गोलंदाजी करताना ईं. च्या फलंदाजांना बाद करण्यासाठी अभ्यास, सापळा रचणे हे केले तर नक्कीच निर्णायक फरक पडू शकतो. यात कोच म्हणून फ्लेचर आणि क्षेत्ररक्षण व्युह रचनेसाठी धोणी चे योगदान आवश्यक आहे.- धोणी किमान तेव्हडे तरी करेल काय?
आयसीसीने नियमात बदल केला आहे. भारताविरूद्ध खेळताना प्रत्येक संघाला खालील नियम पाळायला हवेत.
१. चेंडू स्विंग झाल्यास भारतीय फलंदाज बाद देता येणार नाहीत.
२. चेंडूचा वेग फलंदाजास विचारून ठेवावा लागेल.
३. कमरेच्या वर उसळलेल्या चेंडूवर भारतियांना झेलबाद देण्याआधी बीसीसीआयची परवानगी घेणं गरजेचं आहे.
४. खेळपट्टीवरच उसळी जास्त असेल तर गोलांदाजांना दोन टप्पी बॉलिंग करावी लागेल.
५. जेव्हा भारतियांचे क्षेत्ररक्षण असेल तेव्हा एक टप्पा झेलबादचा निर्णय आपोआप अंमलात येईल.
६. भारतियांच्या विरूद्ध कुठल्याही फलंदाजाला एका तासापेक्षा जास्त वेळ क्रीझवर राहता येणार नाही. एक तास होऊन गेल्यास त्याला टाईम आउट घोषीत करण्यात येईल.
तिस-या टेस्टमधे या नियमांची अंमलबजावणी होणार असल्याचं अनधिकृत सूत्रांच्या हवाल्याने समजतं.
हर्ष भोगलेने क्रिकेट बद्दल बोलण्यात वावगं काय ते कळलं नाही?
मला पण नाही कळले. जन्मभर मुन्शिपाल्टीच्या कार्यालयात जन्म मृत्यूचे दाखले देणारे म्हातारे जर पर्वतीच्या पायथ्याशी बसून रशियाचे काय चुकले, अमेरिकेचे काय चुकले, इंग्लंडचे लोक कसे हुषार, आपल्या लोकांना काही कळत नाही असे म्हणू शकतात तर हर्ष भोगलेने नक्कीच बोलायला हरकत नाही.
परवा इथे अनेक म्हातारे काही कारणाने एकत्र जमले होते. विलो च्या कृपेने इंग्लंडच्या दुसरा डाव टीव्ही वर दाखवत होते. त्या लोकांपैकी माझ्या सकट कुणिहि गल्ली क्रिकेट तरी खेळले होते की नाही अशी शंका आहे. तरीपण मला त्यातून खालील माहिती मिळाली:
तेंडूलकर, द्रवीड यांना कसे खेळायचे हेच कळत नाही!
श्रीशांत स्पिन गोलंदाजी करतो.
प्रवीण कुमार ला का गोलंदाजी देताहेत?
तो कोण 'बंगाली दादा' म्हणतात तो कुठे उभा आहे?
माझ्यासकट हे सर्व लोक, अजित वाडेकर कॅप्टन होण्यापूर्वी भारतातून अमेरिकेत आले. त्यामुळे 'आपले लोक हरणारच' असे म्हणत होते. दुर्दैवाने त्यांचे म्हणणे खरे झाले त्यामुळे पुढच्या वेळी भारतीय क्रिकेट संघाबद्दल पुनः ते अधिकारवाणीने बोलू शकतील. सुदैवाने ते मायबोलीवर लिहीत नाहीत, त्यामुळे माझ्याखेरीज इतर कुणाला तुम्हाला सहन करावे लागणार नाही.
प्रश्न फक्त बोलण्याचा, लिहिण्याचा आहे हो. व्यक्तिस्वातंत्र्य असले की चूक-बरोबर, योग्य- अयोग्य, खरे- खोटे असे काही बघायचे नसते.
<< एकंदरीत दमदार सलामी अन ईं. च्या गोलंदाजांवर असा दबाव आल्याने.... >> योगजी, कुणावरही दबाव आणण्यासाठी प्रथम आक्रमक पवित्रा तरी घेणं सर्वात महत्वाचं; फलंदाजानी दबाव आणायचा तर प्रत्येक वेळी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतल्याने हें कसं काय जमायचं ?
<< जन्म मृत्यूचे दाखले देणारे म्हातारे जर पर्वतीच्या पायथ्याशी बसून रशियाचे काय चुकले, अमेरिकेचे काय चुकले, ...... >> ते आपापसात [किंवा स्वगत ]बोलत असतात, हर्षा तज्ञ म्हणून माध्यमांतून लिहीतो, बोलतो हा फरक आहे. त्याने तसं करावं कीं नाही हा मुद्दा अर्थात वेगळा.
<< हे बघा. सन्निभाय ने देखिल बोर्डाला दोष देण्यापेक्षा आपल्या फलंदाजांच्या तंत्राला, किंवा ते अवगत नसणे याला दोष दिला आहे: >> आपले सर्वोत्तम फलंदाज आपण संघासाठी निवडले; त्याना जर इंग्लंडमधे खेळण्याचं तंत्रच जमत नसेल, तर दोनच पर्याय दिसतात - १] संघ इंग्लंडला पाठवूंच नये किंवा २] त्याना निदान तिथं सराव सामने खेळण्याची कमाल संधी तरी उपलब्ध करावी. हे दोन्ही पर्याय झिडकारणे हा बोर्डाचा दोष नाही ? सन्नीभायबद्दल आत्यंतिक आदर असूनही त्याचं हें म्हणणं मात्र अजिबात पटत नाही.
या मालिकेत धोणी संपूर्ण फेल गेला आणि द्रविड अपेक्षेप्रमाणे चमकला तर कसोटी संघाचे कप्तानपद पुन्हा द्रविड ला सोपविले जाईल असे वाटते. अन्यथा विरू ने धुमाकूळ घातला तर त्याला करतील कॅप्टन, काही नेम नाही आपल्या निवड समितीचा. >> पटत नाहि रे. २-३ वर्षांनंतर एका मालिकेवर विसंबून एव्हढा मह्त्वाचा निर्णय घेउ नये. एकटाच धोनी नाहि तर द्रविड नि थोडाफार लक्ष्मण वगळता बहुतेक सगळेच जण फेल गेले आहेत.
हे दोन्ही पर्याय झिडकारणे हा बोर्डाचा दोष नाही ? सन्नीभायबद्दल आत्यंतिक आदर असूनही त्याचं हें म्हणणं मात्र अजिबात पटत नाहि > ह्याबद्दल पूर्ण अनुमोदन. एक गोष्ट लक्षात घ्या, कि आपले खेळाडूंना अशा प्रकारच्या गोलंदाजीची पुरेशी सवय नाहि. This is fact of life. अर्थात त्याबरोबर खेळायचे शॉट्स तेव्हधे घोटलेले नाहित हे उघड आहे. रैना म्हणतो तसे नुसते शॉट्स खेळणे उपयोगी नाहि तर your mind has to be in right place. जे आता नक्कीच नाहिये. mental strength is also equally important which we are lacking.
शॉर्ट बॉल टाकून गेले तीन वर्ष लोक आपल्याला बाद करत आहेत. अनेक मालिका गेल्या त्यात, प्रॅक्टीस झालीच की. अगदी मागच्या सिरीजलाही - विडिंजलाही उसळते चेंडू येत होते. अफ्रिकेला मागे गेलो, तिथेही असेच झाले.
सुनिल गावस्कर म्हणतो ते बरोबर आहे. मुळात आपण ते खेळू शकत नाही ही तंत्रातील उणीव आहे. जे आडात नाही ते पोहर्यात कुठे येणार? मग भलेही कितीही सराव सामने खेळले तरी. त्यामुळे ते तंत्र शिकावे.
<< मग भलेही कितीही सराव सामने खेळले तरी. त्यामुळे ते तंत्र शिकावे. >> जर आपल्याकडे तशा खेळपट्ट्या बनवायच्याच नाहीत तर तंत्र काय पुस्तकात बघून शिकायचं का ? जिथं तशा खेळपट्ट्या आहेत निदान तिथं तरी सराव झाला तर तंत्र कसं आत्मसात करायचं हें तरी कळेल ना आपल्या खेळाडूना ! गावसकर, द्रविड, तेंडुलकर इ.च्या पंक्तीत नाही सगळे फलंदाज बसूं शकत. मोहिंदर अमरनाथसारखा प्रतिभावान फलंदाजसुद्धां एक वेळ उसळत्या चेंडूपुढे नांगी टाकून आपली कारकिर्दच अकाली संपवून बसणार होता; पुढे सरावाने तोच असे चेंडू खेळण्यात माहीर झाला ! इंग्लंडमधे सामने तर खेळायचे पण तिथले उसळते चेंडू खेळायचं तंत्र नाही म्हणून सराव सामन्यांची मात्र गरज नाही, हें म्हणणं हास्यास्पद वाटतं, अगदीं गावसकरने म्हटलं तरीही !
जर आपल्याकडे तशा खेळपट्ट्या बनवायच्याच नाहीत तर तंत्र काय पुस्तकात बघून शिकायचं का ? जिथं तशा खेळपट्ट्या आहेत निदान तिथं तरी सराव झाला तर तंत्र कसं आत्मसात करायचं हें तरी कळेल ना आपल्या खेळाडूना ! >>बरोबर ! फक्त तेव्हढेच नाहिये, पूर्वी मॅटींगवर किंवा न झाकलेल्या पिचेसवर खेळून तंत्र घोटवले जाते. सध्या तेव्हढा वेळहि नाहिये, हेहि लक्षात घ्या.
टेबलाखालून कट देऊन मलाहि
टेबलाखालून कट देऊन मलाहि भारतात क्रिकेट बोर्डाच्या पगारावर नोकरी मिळेल का, हरभजन सारखी>>>
मला वाटले येथे तुम्ही तेच करत आहात. (दिवा)
असो! ओझा जावो अथवा सेहवाग, पुढच्या कसोटीत आपण फिरंग्यांना फेफरे आणणार हे नक्की, कारण 'स्टॅटिस्टिक्स से सो'!
-'बेफिकीर'!
त्या चेतेश्वर पुजाराचा विचार
त्या चेतेश्वर पुजाराचा विचार झाला होता का या दौर्याच्या अगोदर. तो तर स्पेशालिस्ट टेस्ट ओपनर होता. बहुतेक मुकुंदपेक्षा जरा बरा पण होता
त्या चेतेश्वर पुजाराचा विचार
त्या चेतेश्वर पुजाराचा विचार झाला होता का या दौर्याच्या अगोदर.>> हो तो IPL आधीपासून जखमी आहे.
तो तर स्पेशालिस्ट टेस्ट ओपनर होता. >> तो ओपनर नाहि.
बहुतेक मुकुंदपेक्षा जरा बरा पण होता >> बर्याच जणांपेक्षा बराच बरा आहे.
IPL च्या जखमा आणि भरपुर
IPL च्या जखमा आणि भरपुर क्रिकेट हे कारण धोणी गेले दोन वर्ष देत आहे. नशीब आपले की वल्डकप आधी होता नाही तर हे कारण पुरले असते. तसेही आपला संघ वल्डकप आधी काय दिवे लावत होता हे सगळ्यांना माहीत आहे. मला गांगूलीचे काही वाक्य आवडले. उदा भरपुर क्रिकेट, भरपुर क्रिकेट म्हणायचे असेल तर इन्टरनॅशनल क्रिकेट मध्ये खेळू नका.
चेतेश्वर पुजारा सोबत रायडूला संधी देता आली तर बघावे. तसेच रोहित शर्माला टेस्ट मध्ये संधी द्यावी असे मला प्रामाणिकपणे वाटते कारण त्याच्याकडे टेक्निक आहे. पण त्याला जरा घासून पुसून त्याच्यावर असलेल्या आयपीएल मरगळीचे पॉलीश व्हायला पाहीजे.
धोनी च्या जागी सौरभ तिवारीला
धोनी च्या जागी सौरभ तिवारीला आणले तरी चालेल
हर्ष भोगलेने क्रिकेट बद्दल
हर्ष भोगलेने क्रिकेट बद्दल बोलण्यात वावगं काय ते कळलं नाही? फुड क्रिटिक असायला स्वतः शेफ असायला पाहिजे असा नियम नाही. वृत्तपत्रांचे संपादक राजकारण्यांवर आणि सरकारी निर्णयांवर अग्रलेख लिहू शकतात तसंच हे पण.
कळणं, व्यक्त करता येणं, हे गुण आहेत की त्याच्याकडे. त्यातून त्याची मतं स्टबर्न नसतात, हे मला फार आवडतं.
कपिल देव महान क्रिकेटपटू. पण तो क्रिकेटबद्दल जे बोलतो त्यात किती अर्थ असतो?
बिचारा
बिचारा द्रविड
Http://www.indianexpress.com/news/a-team-man-or-indias-oddjobs-guy/826369/0
धोनी च्या जागी सौरभ तिवारीला
धोनी च्या जागी सौरभ तिवारीला आणले तरी चालेल>>>>>>>>>>>>>>>>.. किपिंग साठी मग????????
तिवारी किपिंग पण करतोच.. धोणी
तिवारी किपिंग पण करतोच.. धोणी ईतकीच वाईट
मायबोलीमधल्या सगळ्या नागांनो
मायबोलीमधल्या सगळ्या नागांनो (नगांनो)..............शुभ नागपंचमी................
>>हर्ष भोगलेने क्रिकेट बद्दल
>>हर्ष भोगलेने क्रिकेट बद्दल बोलण्यात वावगं काय ते कळलं नाही?
काहीच नाही.. मंदीरा बेदी देखिल बोलते. माझे हर्षा भोगले वरील विधान हे एकूणात आजकाल कुठल्याही बाजूने बोलत असाल तरी पैसा कमावता येतो या गोष्टीच्या अनुशंगाने होते. त्यातही जे आधी मैदानावर एक बोलायचे/करायचे ते मैदानाच्या बाहेर दुसरेच बोलतात/करतात हा मूळ मुद्दा होता. असो.
>>फुड क्रिटिक असायला स्वतः शेफ असायला पाहिजे असा नियम नाही. वृत्तपत्रांचे संपादक राजकारण्यांवर आणि सरकारी निर्णयांवर अग्रलेख लिहू शकतात तसंच हे पण.
क्रिटीक" शब्द वगळला तर बाकी वाक्य ओके आहे.
<<त्यातही जे आधी मैदानावर एक
<<त्यातही जे आधी मैदानावर एक बोलायचे/करायचे ते मैदानाच्या बाहेर दुसरेच बोलतात/करतात हा मूळ मुद्दा होता. >>
हे मान्यच आहे. अशोक मल्होत्रा, अरुण लाल, अतुल वासन, मणिंदर सिंघ यांनी जितका वेळ टेस्ट क्रिकेट ग्राउंडवर घालवला नसेल त्याच्या काही पट वेळ न्युज चॅनेल्सच्या स्टुडियोजमधे घालवला असेल. सचिनबद्दल असे लोक बोलतात तेव्हा त्यांना हे सांगायची मला फार फार इच्छा होते.
>>> तिवारी किपिंग पण करतोच..
>>> तिवारी किपिंग पण करतोच.. धोणी ईतकीच वाईट
तिवारी यष्टीरक्षण करत नाही, रायडू यष्टीरक्षक आहे.
>>>> धोनी च्या जागी सौरभ तिवारीला आणले तरी चालेल>>>>>>>>>>>>>>>>.. किपिंग साठी मग????????
द्रविड यष्टीरक्षण करू शकेल. तो धोनीपेक्षा जास्त वाईट यष्टीरक्षण करणार नाही.
आज लोकसत्तामध्ये सांझगिरीचा
आज लोकसत्तामध्ये सांझगिरीचा लेख मस्त आलाय !सॉलिड पंचेस आहेत
>>तिवारी यष्टीरक्षण करत नाही,
>>तिवारी यष्टीरक्षण करत नाही, रायडू यष्टीरक्षक आहे
आयपिल मध्ये केलं होत ना तिवारी ने?
असो. थोडक्यात धोणी ची रिप्लेसमेंट आवश्यक आहे यावर ईथे एकमत दिसते
बाकी कुणालाही दुखापत होणे वाईटच व ती होवू नये पण सर्व भारतीयांनी देव पाण्यात ठेवल्याने भज्जी एकदाचा बाहेर गेला.. युवी दुर्दैवी! आता गंभीर, विरू चा हात आणि झहीर ची मांडी आयत्या वेळी दगा दिली नाही म्हणजे मिळवले. मला वाटतय सद्य दौर्यासाठी २२ जण निवडायला हवेत- प्रत्येकाला एक रिप्लेसमेंट रेडी हवी. कसोटी मालिका संपेपर्यंत अजून किती जखमी/घायळ ना "हलवावे" लागेल नेम नाही.
या मालिकेत धोणी संपूर्ण फेल गेला आणि द्रविड अपेक्षेप्रमाणे चमकला तर कसोटी संघाचे कप्तानपद पुन्हा द्रविड ला सोपविले जाईल असे वाटते. अन्यथा विरू ने धुमाकूळ घातला तर त्याला करतील कॅप्टन, काही नेम नाही आपल्या निवड समितीचा.
>>आज लोकसत्तामध्ये सांझगिरीचा लेख मस्त आलाय !सॉलिड पंचेस आहे
अरे वा! आला का एकदाचा.. शोधतच होतो.. सामन्यात डोकावलं तर नव्हता तिथे. संझगिरी शेवटी सामन्यातून बाहेर पडले का?
>> द्रविड यष्टीरक्षण करू
>> द्रविड यष्टीरक्षण करू शकेल. तो धोनीपेक्षा जास्त वाईट यष्टीरक्षण करणार नाही.
आरे पण यष्टीरक्षण करण्याची जरूरच काय? बॉल मागे यायला पाहीजे ना?
>>बॉल मागे यायला पाहीजे
>>बॉल मागे यायला पाहीजे ना?
लय भारी रे...... जाम हसलो.....
तसेच आपले गोलंदाज पिटरसन ला गोलंदाजी करताना नेमके कोण कोणाच्या अंगावर चालून जातोय हेच कळत नाही
>>> आयपिल मध्ये केलं होत ना
>>> आयपिल मध्ये केलं होत ना तिवारी ने?
तिवारीने यष्टीरक्षण केल्याचे आठवत नाही. पण रायडूने मुम्बई इन्डियन्सकडून खेळताना आयपीएलच्या अनेक सामन्यात यष्टीरक्षण केलेले आहे.
'यष्टीरक्षक' म्हणजे
'यष्टीरक्षक' म्हणजे सिक्युरीटी गार्ड वाटला काय... जल्ला कोणी पण यावे नी लोळून जावे.
चिमण
आपली थिंकटॅन्क पिटरसन , बेल,
आपली थिंकटॅन्क पिटरसन , बेल, ब्रॉड यांच्या बाबतीत चुकली आहे......आणि चुकत ही आहे.......बहुतेक फक्त स्ट्रोस, कुक आणि स्वान.....यांच्यावरच काय तो अभ्यास केला गेलेला होता.............
हे बघा. सन्निभाय ने देखिल
हे बघा. सन्निभाय ने देखिल बोर्डाला दोष देण्यापेक्षा आपल्या फलंदाजांच्या तंत्राला, किंवा ते अवगत नसणे याला दोष दिला आहे:
"There will be talk about preparation etc, but even if this Indian team had played five first-class games before the Test series they would have struggled as the technique is not there."
(source: http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/series-tournaments/ind...)
थोडक्यात ऊर्वरित सामन्यात हे तंत्र (ऊसळते चेंडू खेळने, स्विंग, सीम मुव्हमेंट वि. खेळणे) अचानक प्रकट होणार नसल्याने पुनः एकदा तोच निकाल लागायची शक्यता आहे. विरू, विराट कडे देखिल ते अपेक्षित तंत्र आहे असेही नाही. माझ्या मते फलंदाजीच्या जोरावर सामना जिंकायचा असेल तरः
१. सेहवाग चा दमदार खेळ आवश्यक आहे, जोडीला दुसर्या सलामीच्या फलंदाजाने किमान ऊभे रहायला हवे.
२. सेहवाग लागल्यावर जुन्या चेंडूवर सुरुवात करताना द्रविड, सचिन मोठा डोंगर ऊभा करू शकतात
३. एकंदरीत दमदार सलामी अन ईं. च्या गोलंदाजांवर असा दबाव आल्याने मधल्या व खालच्या फळीतील फलंदाजांना फार तिखट मार्याला सामोरे जावे लागणार नाही.
आणि गोलंदाजी करताना ईं. च्या फलंदाजांना बाद करण्यासाठी अभ्यास, सापळा रचणे हे केले तर नक्कीच निर्णायक फरक पडू शकतो. यात कोच म्हणून फ्लेचर आणि क्षेत्ररक्षण व्युह रचनेसाठी धोणी चे योगदान आवश्यक आहे.- धोणी किमान तेव्हडे तरी करेल काय?
खूषखबर आयसीसीने नियमात बदल
खूषखबर
आयसीसीने नियमात बदल केला आहे. भारताविरूद्ध खेळताना प्रत्येक संघाला खालील नियम पाळायला हवेत.
१. चेंडू स्विंग झाल्यास भारतीय फलंदाज बाद देता येणार नाहीत.
२. चेंडूचा वेग फलंदाजास विचारून ठेवावा लागेल.
३. कमरेच्या वर उसळलेल्या चेंडूवर भारतियांना झेलबाद देण्याआधी बीसीसीआयची परवानगी घेणं गरजेचं आहे.
४. खेळपट्टीवरच उसळी जास्त असेल तर गोलांदाजांना दोन टप्पी बॉलिंग करावी लागेल.
५. जेव्हा भारतियांचे क्षेत्ररक्षण असेल तेव्हा एक टप्पा झेलबादचा निर्णय आपोआप अंमलात येईल.
६. भारतियांच्या विरूद्ध कुठल्याही फलंदाजाला एका तासापेक्षा जास्त वेळ क्रीझवर राहता येणार नाही. एक तास होऊन गेल्यास त्याला टाईम आउट घोषीत करण्यात येईल.
तिस-या टेस्टमधे या नियमांची अंमलबजावणी होणार असल्याचं अनधिकृत सूत्रांच्या हवाल्याने समजतं.
हर्ष भोगलेने क्रिकेट बद्दल
हर्ष भोगलेने क्रिकेट बद्दल बोलण्यात वावगं काय ते कळलं नाही?
मला पण नाही कळले. जन्मभर मुन्शिपाल्टीच्या कार्यालयात जन्म मृत्यूचे दाखले देणारे म्हातारे जर पर्वतीच्या पायथ्याशी बसून रशियाचे काय चुकले, अमेरिकेचे काय चुकले, इंग्लंडचे लोक कसे हुषार, आपल्या लोकांना काही कळत नाही असे म्हणू शकतात तर हर्ष भोगलेने नक्कीच बोलायला हरकत नाही.
परवा इथे अनेक म्हातारे काही कारणाने एकत्र जमले होते. विलो च्या कृपेने इंग्लंडच्या दुसरा डाव टीव्ही वर दाखवत होते. त्या लोकांपैकी माझ्या सकट कुणिहि गल्ली क्रिकेट तरी खेळले होते की नाही अशी शंका आहे. तरीपण मला त्यातून खालील माहिती मिळाली:
तेंडूलकर, द्रवीड यांना कसे खेळायचे हेच कळत नाही!
श्रीशांत स्पिन गोलंदाजी करतो.
प्रवीण कुमार ला का गोलंदाजी देताहेत?
तो कोण 'बंगाली दादा' म्हणतात तो कुठे उभा आहे?
माझ्यासकट हे सर्व लोक, अजित वाडेकर कॅप्टन होण्यापूर्वी भारतातून अमेरिकेत आले. त्यामुळे 'आपले लोक हरणारच' असे म्हणत होते. दुर्दैवाने त्यांचे म्हणणे खरे झाले त्यामुळे पुढच्या वेळी भारतीय क्रिकेट संघाबद्दल पुनः ते अधिकारवाणीने बोलू शकतील. सुदैवाने ते मायबोलीवर लिहीत नाहीत, त्यामुळे माझ्याखेरीज इतर कुणाला तुम्हाला सहन करावे लागणार नाही.
प्रश्न फक्त बोलण्याचा, लिहिण्याचा आहे हो. व्यक्तिस्वातंत्र्य असले की चूक-बरोबर, योग्य- अयोग्य, खरे- खोटे असे काही बघायचे नसते.
>> विरू, विराट कडे देखिल ते
>> विरू, विराट कडे देखिल ते अपेक्षित तंत्र आहे असेही नाही.
>> सेहवाग चा दमदार खेळ आवश्यक आहे
योग्या, तूच तुला कॉन्ट्रॅडिक्ट करत नाहीयेस का? विरू कडे ते तंत्र नाहीये तर तो दमदार खेळ करणार कसा?
युवराज जखमी, उरलेले सामने
युवराज जखमी, उरलेले सामने खेळणार नाही. विराट कोहलीला बोलावून घेतले.
<< एकंदरीत दमदार सलामी अन ईं.
<< एकंदरीत दमदार सलामी अन ईं. च्या गोलंदाजांवर असा दबाव आल्याने.... >> योगजी, कुणावरही दबाव आणण्यासाठी प्रथम आक्रमक पवित्रा तरी घेणं सर्वात महत्वाचं; फलंदाजानी दबाव आणायचा तर प्रत्येक वेळी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतल्याने हें कसं काय जमायचं ?
<< जन्म मृत्यूचे दाखले देणारे म्हातारे जर पर्वतीच्या पायथ्याशी बसून रशियाचे काय चुकले, अमेरिकेचे काय चुकले, ...... >> ते आपापसात [किंवा स्वगत ]बोलत असतात, हर्षा तज्ञ म्हणून माध्यमांतून लिहीतो, बोलतो हा फरक आहे. त्याने तसं करावं कीं नाही हा मुद्दा अर्थात वेगळा.
<< हे बघा. सन्निभाय ने देखिल बोर्डाला दोष देण्यापेक्षा आपल्या फलंदाजांच्या तंत्राला, किंवा ते अवगत नसणे याला दोष दिला आहे: >> आपले सर्वोत्तम फलंदाज आपण संघासाठी निवडले; त्याना जर इंग्लंडमधे खेळण्याचं तंत्रच जमत नसेल, तर दोनच पर्याय दिसतात - १] संघ इंग्लंडला पाठवूंच नये किंवा २] त्याना निदान तिथं सराव सामने खेळण्याची कमाल संधी तरी उपलब्ध करावी. हे दोन्ही पर्याय झिडकारणे हा बोर्डाचा दोष नाही ? सन्नीभायबद्दल आत्यंतिक आदर असूनही त्याचं हें म्हणणं मात्र अजिबात पटत नाही.
या मालिकेत धोणी संपूर्ण फेल
या मालिकेत धोणी संपूर्ण फेल गेला आणि द्रविड अपेक्षेप्रमाणे चमकला तर कसोटी संघाचे कप्तानपद पुन्हा द्रविड ला सोपविले जाईल असे वाटते. अन्यथा विरू ने धुमाकूळ घातला तर त्याला करतील कॅप्टन, काही नेम नाही आपल्या निवड समितीचा. >> पटत नाहि रे. २-३ वर्षांनंतर एका मालिकेवर विसंबून एव्हढा मह्त्वाचा निर्णय घेउ नये. एकटाच धोनी नाहि तर द्रविड नि थोडाफार लक्ष्मण वगळता बहुतेक सगळेच जण फेल गेले आहेत.
हे दोन्ही पर्याय झिडकारणे हा बोर्डाचा दोष नाही ? सन्नीभायबद्दल आत्यंतिक आदर असूनही त्याचं हें म्हणणं मात्र अजिबात पटत नाहि > ह्याबद्दल पूर्ण अनुमोदन. एक गोष्ट लक्षात घ्या, कि आपले खेळाडूंना अशा प्रकारच्या गोलंदाजीची पुरेशी सवय नाहि. This is fact of life. अर्थात त्याबरोबर खेळायचे शॉट्स तेव्हधे घोटलेले नाहित हे उघड आहे. रैना म्हणतो तसे नुसते शॉट्स खेळणे उपयोगी नाहि तर your mind has to be in right place. जे आता नक्कीच नाहिये. mental strength is also equally important which we are lacking.
शॉर्ट बॉल टाकून गेले तीन वर्ष
शॉर्ट बॉल टाकून गेले तीन वर्ष लोक आपल्याला बाद करत आहेत. अनेक मालिका गेल्या त्यात, प्रॅक्टीस झालीच की. अगदी मागच्या सिरीजलाही - विडिंजलाही उसळते चेंडू येत होते. अफ्रिकेला मागे गेलो, तिथेही असेच झाले.
सुनिल गावस्कर म्हणतो ते बरोबर आहे. मुळात आपण ते खेळू शकत नाही ही तंत्रातील उणीव आहे. जे आडात नाही ते पोहर्यात कुठे येणार? मग भलेही कितीही सराव सामने खेळले तरी. त्यामुळे ते तंत्र शिकावे.
<< मग भलेही कितीही सराव सामने
<< मग भलेही कितीही सराव सामने खेळले तरी. त्यामुळे ते तंत्र शिकावे. >> जर आपल्याकडे तशा खेळपट्ट्या बनवायच्याच नाहीत तर तंत्र काय पुस्तकात बघून शिकायचं का ? जिथं तशा खेळपट्ट्या आहेत निदान तिथं तरी सराव झाला तर तंत्र कसं आत्मसात करायचं हें तरी कळेल ना आपल्या खेळाडूना ! गावसकर, द्रविड, तेंडुलकर इ.च्या पंक्तीत नाही सगळे फलंदाज बसूं शकत. मोहिंदर अमरनाथसारखा प्रतिभावान फलंदाजसुद्धां एक वेळ उसळत्या चेंडूपुढे नांगी टाकून आपली कारकिर्दच अकाली संपवून बसणार होता; पुढे सरावाने तोच असे चेंडू खेळण्यात माहीर झाला ! इंग्लंडमधे सामने तर खेळायचे पण तिथले उसळते चेंडू खेळायचं तंत्र नाही म्हणून सराव सामन्यांची मात्र गरज नाही, हें म्हणणं हास्यास्पद वाटतं, अगदीं गावसकरने म्हटलं तरीही !
जर आपल्याकडे तशा खेळपट्ट्या

Pages