माती आणि गणपती

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

गणपती बाप्पा माझा अतिशय आवडता. गणपतीची चित्रं काढायला, गणपती बनवायलाही खूप आवडतात. सिरॅमिक पावडर किंवा चॉक पावडर वापरून ह्या आधी मी बरेचदा गणपती बनवले. पण ते कश्यावर ना कश्यावर चिकटवावे लागायचे. मग त्याला पर्याय म्हणून एम सिल वापरून पाहिले. पण टेराकोटा किंवा मातिच्या वस्तू किंवा मूर्ती बनवून त्या भाजून बघायच्या हि उत्सुकता खूप वर्षांपासून होती. पण योग येत नव्ह्ता. माती कुठून मिळवायची ? कसं काय करायचं ? किती दिवस लागतात मातिच्या मूर्ती सुकायला? भाजायच्या कश्या ? कुठे ? एक ना अनेक प्रश्न होते मनात. शेवटी एक्दाचा योग आला. आणि मला माती मिळाली.

मातिच्या बर्‍याच वस्तू बनवता येतात. बाप्पा आवडिचे म्हणून मग सुरवात त्यानेच केली. काही छोटे छोटे गणपती आणि काही वेग वेगळ्या वस्तू बनवल्या. दोन तिन इंच उंचिच्या ह्या गणपतींना पक्कं सुकायला चार दिवस लागतात. बर्‍याच लहान सहान वस्तू बनवल्या सुकवल्या आणि कित्येक महिने जिवापाड सांभाळल्या. पण आता त्या भाजायच्या कश्या आणि कुठे? त्यात काही महिने गेले. त्यावर एकदा आमचे अहो म्हणाले मी भाजून देतो उद्या होळी पेटवणार आहेत तशीच आपण गवताची भट्टी करू. Uhoh

पण मग शेवटी गंगेत घोडं न्हालं. एका ड्रॉईंग शिकवणार्‍या सरांच्या ओळखीत छोटीशी भट्टी होती. त्यांनी मला माझ्या ह्या वस्तू भाजून आणून दिल्या.

अतिशचय आनंदाने हावरटासारख्या एका दिवसात रंगवून टाकल्या. बरेच दिवस कसलेच काही पेंटींग न केल्यामुळे खुपसे रंग सुकले होते. मग जे होते त्यातच काम भागवून टाकले. Proud अजून चांगले करता आले असते. किंवा नसते केले तरी छानच दिसत होते.

आराम गणेश

रंगवण्याआधिचे

नंतरचे

गणेश वाद्यवृंद

रंगवून

पिंपळपान

हत्ती उंट घोडा Happy

घोडोबा Happy

मास्क

आणि थोडे गणपती

आशीर्वाद देणारा

आणखी दोन

अजून दोन

अगं काय सुरेख आहेत सगळ्या मूर्ती. मला नरंगवलेल्या जास्त आवडल्या. बाकीच्या घोडा, उंटपण एकदम छान आहेत. Happy

अमेझिंग!! किती गोऽऽड आहे सगळे बाप्पा. खूपच आवडले. गणेश वाद्यवृंदाची माझी एक ऑर्डर घेवून टाक. कश्या काय करतेस इतक्या सुंदर मूर्त्या.
मलापण अंजलीसारखे न रंगवलेले नुसते टेराकोटावाले मातीचेच गणपती आवडले.
तुला भट्टीचा शोध लागला का एकदाचा? माणसाने पहिल्यांदा आगीचा शोध लावला तेव्हा जेवढा आनंद त्याला झाला असेल तेवढाच तुला झाला असणार ह्या मातीकामाच्या भट्टीचा/आगीचा शोध लागल्यावर.

सुरेख! मला पण न रंगवलेले आवडले. ऑर्डर्स घेणार असाल तर नक्की सांगा. मला पण वाद्यवृंद हवा Happy

फारच सुंदर आहे. गणेश वाद्यवृंद जबरी!! मला पिंपळपान गणेश पण प्रचंड आवडला. अतिशय निरागस भाव आहेत त्याचे. Happy
गणेश वाद्यवृंदासारखा गणेश बएअन्डबाजा (How to write Band??) पण बनवता येइल.

कसले इटुकले पिटुकले QT petutie गणपती आहेत. फारचं क्यूट.

गणेश वाद्यवृंद आणी हत्ती ऊंट घोडा खूपच आवडले. रंग काम केलेले सुंदर आहेतच पण मला न रंगवलेले
किंवा टेराकोटा कलर मधलेच खूप आवडतात.

आता ETSY account ओपेन करून टाक.

मsssस्त झाले आहेत. Happy न रंगवलेले जास्त आवडले. हत्ती, उंट, घोडाही कसले गोड आहेत!
मलाही पाहिजेत.

छान झाले आहेत एकदम.
माती कोणती वापरली आहे? मागच्यावर्षी आमच्या ह्यांनी इथली तयार ओली माती वापरुन केलेला गणपती. बघु ह्यावेळी अशा छोट्या मुर्ती ट्राय करायला सांगते.

सगळेच बाप्पा खुपच छान झाले आहेत..मला टेराकोटाचे न रंगवलेले जास्त आवडले..
असाच काली मातेचा मुखवटा करता येइल..

वा, काय अफलातून आहेत सगळेच बाप्पा. Happy एकदम हसरे अन फ्रेंडली वाटताहेत !
तुमचं घर सहीच आहे, बायको कलाकार, नवरा कवी. Happy
मी एक मातीचं तोरण आणलं होतं, ७ गणपतीबाप्पांचं, रंगवायला म्हणून. पण आता हे बघून वाटतंय, तसंच ठेवावं, गोड दिसतंय. किंवा फक्त थोडाच भाग रंगवेन त्यातला, हायलाईट करण्यापुरता.

Pages