शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद गजानन, अर्धपारदर्शक असा शब्द मला सुचला होता पण मला वाटले असा शब्द अस्तित्वातच नाही मी मनानेच असे काही तयार करतेय की काय.

एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यात/लिहिण्यात वारंवार येणार्‍या शब्दसमूहाला 'तकिया कलाम' म्हणतात.
मराठी प्रतिशब्द कदाचित 'पालुपद' म्हणता येईल.

आलवाले नाही माहीत. शोधते.

आलवाले म्हणजे अळं - झाडाच्या बुंध्याभोवती केलेला खड्डा. तिथे पाणी साचून ते झिरपत झाडांच्या मुळांना पोहोचावे असा उद्देश. पाणी जास्त साचले तर अळ्यातून ओसंडून बाहेर येते. (सुंदर कविकल्पना आहे.)

एम्प्लॉयी एन्गेजमेंटमधील एन्गेजमेंटसाठी कार्यबांधीलकी/कार्यगुंतवणूक/कार्यस्वारस्य/कार्यासक्ती असे काही शब्द सुचवता येतील. ('कार्यसक्ती'सुद्धा चालेल जर तुम्ही 'निगेटीव्ह एन्गेजमेंट' बघणार असाल तर :))

'Conflicts between teams are addressed early and solved constructively.'
या वाक्यातील constructivelyला काय शब्दयोजना करावी?

पालुपद म्हणजे पदामध्ये पुन्हा पुन्हा येणार्‍या ओळी . तकिया कलाम ही लकब असते. काही लोकाना बोलणे झाल्यावर नुसतेच 'काय?' असे म्हणण्याची सवय असते. पुन्हा प्रपंच मधले टेकाडे भावजी 'म्याड' म्हनत असत. त्याला तकिया कलाम म्हणता येईल..

'प्लेटलेट्स'ना मराठीत 'रक्तघटक' म्हणतात का? संदर्भः http://epaper.esakal.com/esakal/20091106/5258846056812940880.htm

माझ्याकडील दोन्ही मराठी>इंग्रजी, इंग्रजी>मराठी शब्दकोशांमध्ये हे शब्द नाहीत.
तसंच ’प्लेटलेट्स ट्रान्सफ्युजन’ ला काय म्हणतात?
ट्रान्सफ्युजनचा अर्थ 'एकाचे रक्त दुसर्‍याला चढवणे' असा दिला आहे, पण काही एकच संज्ञा असल्यास हवी आहे.

"जिया जले जान जले..." या गाण्यात "तितलीयोंकी क्यारीया..." अशी ओळ आहे. तिथे क्यारी चा अर्थ काय लावायचा मग? फुलपाखरांचा थवा (झुंड) या अर्थी???

हिंदीतल्या "सरमाया" चा अर्थ काय?? आजच एका गाण्यात ऐकला हा शब्द.
उल्फत ला मराठीत समान अर्थी काय शब्द आहे?

सरमाया म्हणजे मालमत्ता किंवा जमापुंजी

उल्फत म्हणजे प्रेम... चाहत , उल्फत, मुहब्बत सगळे एकच पण त्यातले सूक्ष्म फरक माहित नाहीत Sad म्हणजे कधी कुठला शब्द वापरायचा

उल्फत म्हणजे प्रेम... चाहत , उल्फत, मुहब्बत सगळे एकच पण त्यातले सूक्ष्म फरक माहित नाहीत म्हणजे कधी कुठला शब्द वापरायचा
>>>
एक्झॅटली. म्हणूनच मराठीत तसाच्या तसा अर्थ असणारा शब्द आहे का विचारतेय. Happy

उर्दू भाषेतल्या काही शब्दांना मराठीत इक्विवॅलंट शब्दच नाहीत ना. आता "नजाकत" या शब्दाचं घ्या. "सुंदर" हा शब्द "नजाकत" ला पर्याय म्हणून घेता येईल. पण "नजाकत" ची नजाकत त्याला यायची नाही. Happy

मिल्या, सरमाया च्या अर्थासाठी धन्यवाद. Happy

Pages