एक वाटी काबुली चणे, २ मध्यम आकाराचे कांदे, एक मोठा टॉमेटो, एक इंच आल्याचा तुकडा, २-३ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, १ चमचा गरम मसाला, १ चमचा जीरेपुड, २ चमचे छोले मसाला, एक चमचा आमचुर पावडर, हळद, मीठ
काबुली चणे रात्रभर भिजवत ठेवावेत. सकाळी साधारण: १५-२० मिनीट कुकरमध्ये मीठ घालून कमी पाण्यात शिजवून घ्यावेत.
एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो, हिरव्या मिरच्या आणि आलं काढावं. त्यात हे शिजलेले चणे अर्धवट मॅश करून घालावेत. आता बाकीचे सगळे मसाले कपभर पाण्यात मिक्स करून छोल्यांमध्ये घालावे. गरज असेल तर थोडं मीठ घालावं. गॅसवर ठेवून कमी आचेवर १५-२० मिनीट किंवा त्यापेक्षा जास्तही शिजू द्यावे.
मधून अधून हलवत रहावं. पाणी आटल्यास वरून अजून थोडं पाणी घालता येईल. याची कन्सिसटंसी पावभाजीच्या भाजीसारखी असते. जितका जास्तवेळ गॅसवर हे शिजेल तितकी छान चव येते. वरून कोथिंबीर घालायची. हवं असल्यास कच्चा कांदा उभा चिरून वर घालता येईल.
हे असे छोले इथे कुलच्यांबरोबर खायला मिळतात. बॉन या कंपनीचे रेडीमेड कुलचे बेकरी सेक्शनमध्ये मिळतात. (मला औरंगाबादला पण मिळाले होते. ) तव्यावर बटर लावून हे कुलचे गरम करायचे आणि त्याबरोबर हे छोले खायचे. सोबत मिठी किंवा नमकीन लस्सी आणि किसलेल्या मुळ्याची कोशिंबीर.
हे छोले करताना तेल अजिबात घालायचे नाही. याची चव हे जसंजसे शिजत जातात तसतशी वाढत जाते. बाहेर हे चोले ज्या भांड्यात बनवतात ते पुर्णवेळ गॅसवर असते.
मसाल्याचं प्रमाण चव घेवून कमी जास्त करता येतं.
मसाला मिक्स करून शिजवताना गॅसऐवजी मायक्रोवेव्हमध्ये शिजवले तर १०-१५ मिनीटं लागतात.
अल्पना काल पाहुण्यांसाठी हे
अल्पना
काल पाहुण्यांसाठी हे छोले केले होते. पावभाजीच्या स्मॅशरने अर्धवट बारीक करून घेतले, एकदम मिळून आली होती भाजी अगदी पावभाजीसारखी आणि चवही खूप आवडली सगळ्यांना, तेल घातलेले नाही हे अजिबात कळले नाही. ही कृती इथे टाकल्याबद्दल धन्यवाद.
आता करायलाच हवेत. मस्त
आता करायलाच हवेत. मस्त दिसताहेत सगळ्यांचे.
अल्पना, खूपच मस्त झाले छोले!
अल्पना,
खूपच मस्त झाले छोले! धन्यवाद रेसिपीबद्दल..
मीही मॅशरनं जरासे कुस्करले छोले सगळं मिसळण्याआधी. दीपच्या फ्रोझन भटुर्यांबरोबर खाल्ले. आणि भरपूर कौतुक करून घेतलं सगळ्यांकडून.
हा बघा फोटो!
अमृतसरी चवळी: मस्त! मस्त!!
अमृतसरी चवळी:
मस्त! मस्त!! मस्त!!
चवळी दोन शिट्ट्यांमधे मस्त शिजते. शिवाय वीस मिनीटे उकळल्यामुळे छानच मऊ मऊ शिजली.
एकूणच ही अशी ग्रेव्हीवाली पण पानात न वाहणारी उसळ भारीच आवडली.
लवकरच हा प्रयोग छोल्यांवरही करण्यात येईल.
अमृतसरी मोड आलेले मूगही अ प्र
अमृतसरी मोड आलेले मूगही अ प्र ति म होतात. मी काल केले होते.
आर्फी परफेक्ट फोटो. अगदी
आर्फी परफेक्ट फोटो. अगदी छोले कुलचेवाल्याकडून आणलेल्या छोल्यांसारखा.
केदार, मंजू, चिनूक्स आता काळे चणे, चवळी आणि मुग यांवर मीपण हा प्रयोग करणार.
इतके मॅश करायचे का,
इतके मॅश करायचे का, पावभाजीसारखे? बर. मी थोडे मॅश केले आणि बरेचसे आख्खे ठेवले. छोले शिजले आहेत. कांदाही शिजला आहे.
मस्तच दिसतेय
मस्तच दिसतेय पाककृती.
सर्वांचे फोटो पण अगदी तोपासू.
मी पण आज छोले भिजवलेत. असेच करुन पाहणार.
>>छोले शिजले आहेत. कांदाही
>>छोले शिजले आहेत. कांदाही शिजला आहे>>>>
मस्त मस्त!!! आजच दुपारच्या
मस्त मस्त!!! आजच दुपारच्या जेवणाला केले होते, एकदम भन्नाट झालेत! पुढच्या वेळी गरम मसाला जरा कमी घालणार!! आत्ता गरमगरम पावभाजी खाल्ल्यावर डोक्याची जी काय हालत होते तशी (बधीर :फिदी:) हालत झालीए माझी!!
घरी हिट झाली रेसिपी एकदम.
घरी हिट झाली रेसिपी एकदम. धन्यवाद अल्पना.
बरेच फोटो आले की! मी पण, मी
बरेच फोटो आले की! मी पण, मी पण..
मी स्लो कुकर (crock pot) मध्ये केले. आवडले.
कॅनी, कॅसेरोल मस्त आहे.
कॅनी, कॅसेरोल मस्त आहे.
मोठ्या वाटीएवढा bowl आहे तो.
मोठ्या वाटीएवढा bowl आहे तो. छोले शिजलेत ना?
पौ, कांदा अजून बारीक चिरायला हवा.
अवल, अजून दाटपणा हवा.
आर्फी, कोथिंबीर ताजी नाही.
मंजूडी, फोटोत भांडं दिसत नाही.
कॅनी, छोले शिजलेत व्यवस्थित
कॅनी, छोले शिजलेत व्यवस्थित पण कोथिंबीरच मिसिंग
लालुच्या अ.छोले पा.कृ. फोटो
लालुच्या अ.छोले पा.कृ. फोटो आणि प्रेझेंटेशन सर्वात जास्तं आवडलं :).
पंजाबी लोकांना छोले कोथिंबीर टाकून गार्निश करताना पाहिलं नाही फारसं , कच्चा कांदाच पाहिलाय मोस्ट्ली !
अन्कॅनी, मला तुमची कोथिंबीरच
अन्कॅनी, मला तुमची कोथिंबीरच दिसत नैये
ओह, सायो म्हटली होय मगाशीच... बरं.
आर्फीचा फोटो सगळ्यात आवडला (
आर्फीचा फोटो सगळ्यात आवडला ( फक्त अजून किंचित पाणी हवं होतं का ? )
अन्कॅनीचा त्या खालोखाल.
मंजूडीचा फोटो मस्त आहे पण छोल्यांच्या जागी चवळी म्हणजे चिकनच्या ऐवजी बटाटा
आता करुन पाहिलेच पाहिजेत हे छोले.
डीजे, बरोबर. म्हणून मी कच्चा
डीजे, बरोबर. म्हणून मी कच्चा कांदा, पुदिना ठेवलाय.
फोटोंना नंबर देताय का..?
गणेशोत्सव ट्रकात चढणार्यांनी लक्षात ठेवा, स्पर्धा- रेसिपी टाकायची मग लोकांनी तो पदार्थ करुन, फोटो काढून टाकायचा.
मी केलेले छोले आर्फीने केलेत
मी केलेले छोले आर्फीने केलेत तसेच दिसत होते साधारण. छान फोटो. अन्कॅनी चे पण छोले चांगले दिसतायेत.
चला! म्हणजे माझा नंबर शेवटचा
चला! म्हणजे माझा नंबर शेवटचा लागला (किंवा लागलाच नाही असंही म्हणता येईल!) अतिउत्साह नडला! ह्म.
जे माझ्याकडून घडलं ते बरं झालं होतं चवीला. तुमच्या सूचना लक्षात घेऊन कांदा अजून बारीक
कापण्यात येईल आणि छोले मॅश करण्यात येतील. धन्यवाद.
तरी मी माझ्या छोल्यांचा फोटू
तरी मी माझ्या छोल्यांचा फोटू इथे काय कुठेच टाकला नाहीये.
अन्कॅनी, आमची चवळी आहे हो!!
अन्कॅनी, आमची चवळी आहे हो!! त्यामुळे आम्ही स्पर्धेत नाहीच आणि स्पर्धेत नाही त्यामुळे भांडं लपवलंय
छोले करू तेव्हा भांड्यासकट सजावटीचाही फोटो काढू
अल्पना झटपट रेसिपीसाठी
अल्पना झटपट रेसिपीसाठी धन्यवाद.. आधी मी कांदे किसून, टॉमेटो प्युरी करून वगैरे वेळ घालवत करायचे पण आज सकाळच्या डब्यासाठी लग्गेच तयार झाले.
सही ! फोटो भारी आहेत लोक्स !
सही ! फोटो भारी आहेत लोक्स !
आज पुन्हा केले होते.
आज पुन्हा केले होते.
मस्त दिसतायेत छोले. माझे सेम
मस्त दिसतायेत छोले. माझे सेम अस्सेच झाले होते.
मी पण केले आज हे छोले.
मी पण केले आज हे छोले. भाजलेल्या जिर्याची पूड होती तीच घातली. कोथिंबीर संपलेली म्हणून नुसताच कांदा बारीक चिरून घातला वरती. एकदम यम्मी.
मस्त फोटो आहे , सायो. लालु -
मस्त फोटो आहे , सायो.
लालु - सायोचे अ.छोले फोटो माझ्या फेव्हरेट्स मधे
(एवढे छोले पुरतील ना
(एवढे छोले पुरतील ना सर्वाना??)
Pages