अमृतसरी छोले

Submitted by अल्पना on 20 June, 2011 - 06:14
amritsari chhole
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

एक वाटी काबुली चणे, २ मध्यम आकाराचे कांदे, एक मोठा टॉमेटो, एक इंच आल्याचा तुकडा, २-३ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, १ चमचा गरम मसाला, १ चमचा जीरेपुड, २ चमचे छोले मसाला, एक चमचा आमचुर पावडर, हळद, मीठ

क्रमवार पाककृती: 

काबुली चणे रात्रभर भिजवत ठेवावेत. सकाळी साधारण: १५-२० मिनीट कुकरमध्ये मीठ घालून कमी पाण्यात शिजवून घ्यावेत.

एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो, हिरव्या मिरच्या आणि आलं काढावं. त्यात हे शिजलेले चणे अर्धवट मॅश करून घालावेत. आता बाकीचे सगळे मसाले कपभर पाण्यात मिक्स करून छोल्यांमध्ये घालावे. गरज असेल तर थोडं मीठ घालावं. गॅसवर ठेवून कमी आचेवर १५-२० मिनीट किंवा त्यापेक्षा जास्तही शिजू द्यावे.

मधून अधून हलवत रहावं. पाणी आटल्यास वरून अजून थोडं पाणी घालता येईल. याची कन्सिसटंसी पावभाजीच्या भाजीसारखी असते. जितका जास्तवेळ गॅसवर हे शिजेल तितकी छान चव येते. वरून कोथिंबीर घालायची. हवं असल्यास कच्चा कांदा उभा चिरून वर घालता येईल.

वाढणी/प्रमाण: 
४ जण
अधिक टिपा: 

हे असे छोले इथे कुलच्यांबरोबर खायला मिळतात. बॉन या कंपनीचे रेडीमेड कुलचे बेकरी सेक्शनमध्ये मिळतात. (मला औरंगाबादला पण मिळाले होते. ) तव्यावर बटर लावून हे कुलचे गरम करायचे आणि त्याबरोबर हे छोले खायचे. सोबत मिठी किंवा नमकीन लस्सी आणि किसलेल्या मुळ्याची कोशिंबीर.

हे छोले करताना तेल अजिबात घालायचे नाही. याची चव हे जसंजसे शिजत जातात तसतशी वाढत जाते. बाहेर हे चोले ज्या भांड्यात बनवतात ते पुर्णवेळ गॅसवर असते.

मसाल्याचं प्रमाण चव घेवून कमी जास्त करता येतं. Happy

मसाला मिक्स करून शिजवताना गॅसऐवजी मायक्रोवेव्हमध्ये शिजवले तर १०-१५ मिनीटं लागतात.

माहितीचा स्रोत: 
जाऊ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अल्पना
काल पाहुण्यांसाठी हे छोले केले होते. पावभाजीच्या स्मॅशरने अर्धवट बारीक करून घेतले, एकदम मिळून आली होती भाजी अगदी पावभाजीसारखी आणि चवही खूप आवडली सगळ्यांना, तेल घातलेले नाही हे अजिबात कळले नाही. ही कृती इथे टाकल्याबद्दल धन्यवाद.

अल्पना,
खूपच मस्त झाले छोले! धन्यवाद रेसिपीबद्दल.. Happy
मीही मॅशरनं जरासे कुस्करले छोले सगळं मिसळण्याआधी. दीपच्या फ्रोझन भटुर्‍यांबरोबर खाल्ले. आणि भरपूर कौतुक करून घेतलं सगळ्यांकडून. Proud
हा बघा फोटो! Happy

chhole LR-1.jpg

अमृतसरी चवळी:

Image0476.jpg

मस्त! मस्त!! मस्त!!
चवळी दोन शिट्ट्यांमधे मस्त शिजते. शिवाय वीस मिनीटे उकळल्यामुळे छानच मऊ मऊ शिजली.

एकूणच ही अशी ग्रेव्हीवाली पण पानात न वाहणारी उसळ भारीच आवडली.
लवकरच हा प्रयोग छोल्यांवरही करण्यात येईल.

आर्फी परफेक्ट फोटो. Happy अगदी छोले कुलचेवाल्याकडून आणलेल्या छोल्यांसारखा.
केदार, मंजू, चिनूक्स आता काळे चणे, चवळी आणि मुग यांवर मीपण हा प्रयोग करणार.

इतके मॅश करायचे का, पावभाजीसारखे? बर. मी थोडे मॅश केले आणि बरेचसे आख्खे ठेवले. छोले शिजले आहेत. कांदाही शिजला आहे.

मस्तच दिसतेय पाककृती.
सर्वांचे फोटो पण अगदी तोपासू.
मी पण आज छोले भिजवलेत. असेच करुन पाहणार.

मस्त मस्त!!! आजच दुपारच्या जेवणाला केले होते, एकदम भन्नाट झालेत! पुढच्या वेळी गरम मसाला जरा कमी घालणार!! आत्ता गरमगरम पावभाजी खाल्ल्यावर डोक्याची जी काय हालत होते तशी (बधीर :फिदी:) हालत झालीए माझी!! Lol

मोठ्या वाटीएवढा bowl आहे तो. छोले शिजलेत ना? Wink
पौ, कांदा अजून बारीक चिरायला हवा.
अवल, अजून दाटपणा हवा.
आर्फी, कोथिंबीर ताजी नाही.
मंजूडी, फोटोत भांडं दिसत नाही.

लालुच्या अ.छोले पा.कृ. फोटो आणि प्रेझेंटेशन सर्वात जास्तं आवडलं :).
पंजाबी लोकांना छोले कोथिंबीर टाकून गार्निश करताना पाहिलं नाही फारसं , कच्चा कांदाच पाहिलाय मोस्ट्ली !

आर्फीचा फोटो सगळ्यात आवडला ( फक्त अजून किंचित पाणी हवं होतं का ? )
अन्कॅनीचा त्या खालोखाल.
मंजूडीचा फोटो मस्त आहे पण छोल्यांच्या जागी चवळी म्हणजे चिकनच्या ऐवजी बटाटा Wink
आता करुन पाहिलेच पाहिजेत हे छोले.

डीजे, बरोबर. म्हणून मी कच्चा कांदा, पुदिना ठेवलाय.

फोटोंना नंबर देताय का..? Happy
गणेशोत्सव ट्रकात चढणार्‍यांनी लक्षात ठेवा, स्पर्धा- रेसिपी टाकायची मग लोकांनी तो पदार्थ करुन, फोटो काढून टाकायचा. Proud

चला! म्हणजे माझा नंबर शेवटचा लागला (किंवा लागलाच नाही असंही म्हणता येईल!) Proud अतिउत्साह नडला! ह्म.
जे माझ्याकडून घडलं ते बरं झालं होतं चवीला. तुमच्या सूचना लक्षात घेऊन कांदा अजून बारीक
कापण्यात येईल आणि छोले मॅश करण्यात येतील. धन्यवाद.

अन्कॅनी, आमची चवळी आहे हो!! त्यामुळे आम्ही स्पर्धेत नाहीच आणि स्पर्धेत नाही त्यामुळे भांडं लपवलंय Wink

छोले करू तेव्हा भांड्यासकट सजावटीचाही फोटो काढू Wink

अल्पना झटपट रेसिपीसाठी धन्यवाद.. आधी मी कांदे किसून, टॉमेटो प्युरी करून वगैरे वेळ घालवत करायचे पण आज सकाळच्या डब्यासाठी लग्गेच तयार झाले. Happy

मी पण केले आज हे छोले. भाजलेल्या जिर्‍याची पूड होती तीच घातली. कोथिंबीर संपलेली म्हणून नुसताच कांदा बारीक चिरून घातला वरती. एकदम यम्मी.

Pages