वास्तुशास्त्र, वास्तुरचना, वास्तुदोष यावर चर्चा व प्रश्नोत्तरे

Submitted by निंबुडा on 20 May, 2011 - 06:50

वास्तुशास्त्राविषयी चर्चा व प्रश्नोत्तरे यांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा धागा उघडत आहे. इंटीरीअरच्या धाग्यावर मला या संदर्भात असलेले प्रश्न मी विचारले होते. पण कुणीच शंकानिरसन न केल्याने हा स्वतंत्र धागा बनवत आहे. कुणाचा या शास्त्राचा अभ्यास असेल तर कृपया मार्गदर्शन करावे. ज्यांना या विषयाबद्दल उत्सुकता आहे, कुतूहल आहे, अनुभव गाठीशी आहे अश्यांनी इथे माहिती व प्रश्न शेअर करावे.
शिवाय वास्तुशास्त्र खरे कि खोटे, या शास्त्राच्या वाटेला जाणे योग्य कि अयोग्य, वाटेला गेलेल्यांनी घेतलेले बरे - वाईट अनुभवही इथेच शेअर करायला हरकत नाही. Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरातील स्त्री/पुरूष जर किचनम्धे एकटीच/एकटाच काम करत असेल तर बाकीच्यानी तिला/त्याला मदत करावी. Proud समानतेचे युग आहे..

>> उत्तर ही कुबेराची दिशा असल्याने त्या दिशेला टॉयलेटचे ड्रेनेज असू नये.
चला म्हणजे दक्षिण धृवावर घर घ्यायलाच नको.. कारण तिथून कुठल्याही बाजूला गेलं तरी उत्तरेलाच जातो आपण. Wink

चिमण तिकडे घर घेणार असशील तर सदोषही चालेल.. ड्रेनेजचे पाईप सरळ आकाशाकडे सोडून दे (म्हणजे दक्षिण). एवढ्या थंडीत कुणाला काय कळणार? Proud

नंदिनीची संपूर्ण पोस्ट एकदम सडेतोड Proud

मध्यंतरी या विषयावर आंतर्जालावर माहिती शोधत असताना एक मराठी लेख वाचनात आला. त्यात हल्लीच्या वास्तुशास्त्रज्ञांच्या अकलेची इज्जत काढली होती. मस्त होता तो लेख पन आता नेमकी लिंक मिळत नाहीये. Sad

त्यातले लेखकाने मांडलेले बरेचसे मुद्दे सडेतोड होते आणि मला वाटते हल्लीच्या वास्तुशास्त्रज्ञांकडे त्याची उत्तरे असतील की नाही शंका आहे. उदा. कुठलेही वास्तुवरचे पुस्तक वाचायला घ्याल तर जुन्या संस्कृत श्लोकांचा आधार घेत दाखले दिले जातात. या दिशेला अमुक असावे, त्या दिशेला द्रव्यकोठी असेल तर द्रव्य नाश इ छाप. तसेच जुन्या वास्तुग्रंथांनुसार पूर्वेला घराचे मुख्य द्वार असावे म्हणतात. ते कशासाठी तर नंदिनी वर म्हणते तसे पूर्वेचा प्रकाश घरात यावा म्हणून. तर व्हरांड्यात (लॉबीमध्ये) घराचे मुख्य द्वार उघडले व ते पूर्वेकडे असेल तरी चालेल का? तर अर्थातच काही उपयोग नाही, कारण लॉबीतून पूर्ण सूर्यप्रकाश येणे जवळपास अशक्यच! शिवाय हल्ली सामान्य माणूस वास्तुशास्त्रज्ञांकडे गेला की नजीकच्या भूतकाळातल्या घटना सांगायला लावतात व वास्तुमुळेच झाले असे छातीठोकपणे सांगतात. त्या लेखाची लिंक मिळाली तर इथे देईन.

थोडक्यात, प्राचीन भारतात उदय पावलेल्या अनेक शास्त्रांपैकी वास्तु हे एक अतिशय उपयोगी व खरे शास्त्र असेलही पण आजच्या काळातल्या पैसाकाढू वास्तुशास्त्रज्ञांनी त्याचा धंदा म्हणून उपयोग केल्याचेच चित्र दिसत आहे. याला सन्माननीय अपवाद असतीलही. पण फार थोडे. Sad

दक्षिणेकडे पाय करून झोपू नये असे म्हणतात. त्याला नक्कीच काहीतरी शास्त्रीय कारण आहे आणि गुरुत्त्वाकर्षणाशी काहीतरी संबंधित आहे, इतके माहीत आहे. गुरुत्त्वाकर्षणाचा प्रभाव उत्तरेकडून दक्षिणेकडे असतो. आणि पृथ्वी ही अंतराळात दक्षिणोत्तर स्थित आहे. त्यामुळे दक्षिणेकडे पाय करून झोपणे शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने हानीकारक असे काहीसे कारण आहे. परंतु सामान्य जनतेला असे अगडबंब लॉजिक किती झेपेल / किती पटेल याची शंका वाटल्याने चाणाक्ष पूर्वजांनी त्याला जन्म - मृत्यु, पाप - पुण्य याची पुटे चढवली असण्याची शक्यता आहे. सामान्य व कर्मकांडावर विश्वास असलेल्या
भोळ्या जनतेचा चटकन विश्वास बसू शकेल व त्या भीतीने ती-ती तत्त्वे चटकन आचरणातही आणली जातील असा कार्यकारणभाव त्यामागे असावा.

कुठल्यातरी सायकॉलॉजी सम विषयावरच्या एका पुस्तकात असे वाचल्याचे स्मरते आहे की एखाद्या गोष्टी /वस्तु/व्यक्ती/ तत्त्चावरचा आंधळा विश्वासही त्या व्यक्तीसाठी तत्सम अनुभव येण्यास कारणीभूत ठरू शकतो. मग ते अमावस्येच्या दिवशी केस कापणे/ दाढी करणे असो वा मांजर ओलांडल्यामुळे काम न होणे असो!

आमच्या ओळखीतल्या एका घरात सहा महिन्यात पाचजण मेले. आधी एक कावळा मेला अंगणात. मग लगेच मुलगा, बाप, म्हैस आणि कुत्रे मेले..... त्याना वास्तुवाल्याने सांगितले घरातला पाण्याचा बोअर बंद करुन दुसरीकडे नवा खणा.. त्यानी तसे केले. मग दोन नारळीची झाडे काढून टाकून तिथे संदास बाथरुम करण्यास सांगितले.. .. झाड काढताना भिंत आणि दार पडले. सध्या त्याचे काम सुरु आहे... बोअर खणुन २० वर्षे तरी झाले असावीत.. एकदम ६ महिन्यात त्या बोअरने काय केले?

नंदिनी >> जोरदार अनुमोदन. specially
घरातील स्त्री जर किचनम्धे एकटीच काम करत असेल तर बाकीच्यानी तिला मदत करावी. >> ह्या वाक्याला Wink

>> गुरुत्त्वाकर्षणाचा प्रभाव उत्तरेकडून दक्षिणेकडे असतो.

Rofl

निंबुडा असलं कायच्या काय बिनबुडाचं कशाला लिहीत बसली आहेस?

Rofl

>> ड्रेनेजचे पाईप सरळ आकाशाकडे सोडून दे (म्हणजे दक्षिण). एवढ्या थंडीत कुणाला काय कळणार?
ओ परदेसाई तुम्हाला पण गुरुत्त्वाकर्षणाचा प्रभाव उत्तरेकडून दक्षिणेकडे असतो असं वाटतं काय? Lol

>> गुरुत्त्वाकर्षणाचा प्रभाव उत्तरेकडून दक्षिणेकडे असतो.

Proud

गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या केंद्राकडे ओढते.. यत दिशेचा संबंध येतो कुठे? पूर्वेला पाय करुन झोपू नका असे ग्रंथात असते तर मग पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते याच्याशी संबंध जोडायचा का?

माझे भौतिक शास्त्राचे नॉलेज चव्हाट्यावर आणू नका हो तुम्ही लोक. म्हटलं ना की काहीतरी शास्त्रीय कारण आहे. मी आपला तर्क चालवून लिहिले. मुद्दा कळल्याशी मतलब ना! Wink

तसं बघायला गेलं तर पूर्व दिशा तरी स्थिर कुठे आहे? सूर्य उगविण्याची दिशा पूर्व धरली जाते. ६ महिन्यांनी ती बरोबर उलटी होते कारण पृथ्वी ६ महिन्यांनी सूर्या पलिकडे जाते.

रंगाशेठ,
मी देखिल तीच लिंक देणार होतो.. असो.
वास्तूशास्त्र हे "शास्त्र" होते/आहे यात वाद नाही. मात्र त्याचा दुरूपयोग करून किंवा सोयीस्कर अर्थ काढून सामान्य जनांना फसवण्याचे जे अनेक धंदे आहेत त्याला आक्षेप आहे. मुंबई सारख्या गर्दीच्या शहरात आधी जागा मिळणे मुश्कील, त्यातही कुठे पाय करून झोपावे किंवा कुठल्या दिशेला संडास चा मार्ग असावा वगैरे असले पर्याय ऊपलब्ध नसतात. Happy ऊपलब्ध जागेचा व्यवस्थित वापर करता यावा अन हवा, पाणी, सूर्यप्रकाश ई. च्या अनुशंगाने काही केलेले आतील सकारात्मक बदल ईथवर काय ते वास्तूशात्राचे कौतूक करता येते.
गावाकडे किंवा मोकळ्या जमिनीवर स्वताचे घर बांधणार्‍यांना हे असे पर्याय (सोयी, सुविधा) पाहून त्या अनुशंगाने बांधकाम करता येते. एव्हडे करूनही "गृहपुरूष" दिवट्या निघाला तर दोष वास्तूला तरी देवू नये Happy

पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्याने आपल्याला सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असल्याचे भासमान दृश्य दिसते. आणि पृथ्वी अंतराळात दक्षिणोत्तर स्थित आहे. मग सूर्याच्या अलीकडे असली काय आणि पलीकडे असली काय, पूर्व दिशा पृथ्वीवासीयांसाठी तीच राहणार ना??
हं, जर का पृथ्वीबाहेरच्या एखाद्या ग्रहावरून पृथ्वीकडे पाहिले तर दिशा इलट सुलट होऊ शकतात, असा माझा तर्क.

पाय दक्षिणेकडे करून न झोपण्याचे कारण गुरुत्वाकर्षण नाहीतर तर पृथ्वीचे चुंबकीय बळ आहे. या वरची माहिती शोधून लिहितो.

योग, अगदी बरोबर. अज्ञानात खरेच सुख असते. वास्तू शास्त्र वाल्यांचे या मुळेच फावते. कारण एकदा भुंगा पोखरू लागला की सगळे संपले.

वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवण्याआधी जरा एक प्रॅक्टिकल विचार करावा.

पूर्वी लोकांची स्वतःची जमिन घेऊन बैठी घर बांधलेली असायची. घराभोवती झाडंझुडं, नदी वगैरे नैसर्गिक घटक असायचे. आजुबाजुला मोकळी जागा असल्याने पाऊसपाणी, वारावादळ इ गोष्टींचा विचार करावा लागत असे.

आता यातली एकही गोष्ट शहरातून नसते. आपण घर घेतो ते आपल्या खिशाकडे बघून. त्यात असंख्य तडजोडी कराव्या लागतात. बरं आज घराबाहेर मोकळी जागा असली तरी एका वर्षात तिथे इमारत उभी राहते.

अशा परिस्थितीत वास्तुशास्त्रावर किती विश्वास ठेवायचा? मला स्वतःला हे इथे आणि ते तिथे असल्यामुळे घरात ऐश्वर्य, शांती लाभेल हे सगळं फारच भंपक वाटतं. जे घर आहे त्यात आनंदाने रहा, ते स्वच्छ ठेवा आणि मोकळ्या मनाने वावरा. बघा तुम्हाला आणि सर्व कुटुंबाला किती आनंद मिळतो ते.

हे जे सो कॉल्ड वास्तुशास्त्रतज्ञ असतात त्यांच्या घरी जाऊन एकदा सर्वे केलाच पाहिजे. जर ते सगळे ऐश्वर्यसंपन्न, जीवनातला सगळा संघर्ष यशस्वीरित्या दूर केलेले आणि सदासर्वकाळ आनंदात राहणारे असतील तर मी वास्तुशास्त्र मानायला तयार आहे.

माझी सर्वांना एक नम्र विनंती वास्तुशास्त्राच्या आहारी जाऊ नका. माझ्या माहेरी अस्ल्या फॅड्सना काहिच किंमत नव्हती आणि नाही पण माझे सासरे म्हणजे कहरच मी लग्न होऊन ज्या दिवशी घरात आले त्याक्षणापासून तुझे सामन या दिशेला ठेव , तुम्ही असे बसा, या दिशेला तोंड करा/ करू नका इ.इ. एक ना अनेक...अरे बापरे आग्नेय दिशेला पाण्याचा नळ नसला पाहिजे, ईशान्येला अभ्यासाची खोली इ.इ. कारणावरून घरात जिथे तिथे लाल ऑईल पेंटने पट्टे मारलेले. मला आधी कळायचंच नाही मग लक्षात आलं बांधकाम पाडून पुन्हा बांधण्यात वेळ आणि पैसा घालवायचा नाही म्हणून सोकॉल्ड वास्तुतज्ज्ञाने हा उपाय सांगितला होता....
आम्हाला जेवतानाही इकडे तोंड करून बसा /बसू नका इतकेच काय तर घरात कितीतरी दिवस डायनिंग टेबल नव्हता माझ्या सासरी !! सगळे लग्नात पंगतीला बसल्यासारखे बसायचे जेवायला बापरे नको त्या आठवणी म्हणूनच सांगते या पासून दूरच राहा.

नंदिनीची संपूर्ण पोस्ट एकदम सडेतोड >> निंबूडा, तुझा काहीतरी घोळ झालाय का??

मी वास्तुशास्त्राचे अजिब्बत समर्थन करत नाहिये. इन फॅक्ट मी त्याला शास्त्र मानायला देखील तयार नाही. साधं उदा. देते.
समोरासमोरचे दोन फ्लॅट आहेत. ज्याची ही भिंत पूर्व असेल समोरच्याची पश्चिम असेल तेव्हा त्या दिशाच्या देवता ती भिंत काय फिफ्टी फिफ्टी वाटून घेतात की काय? यामध्ये त्या देवताचा अपमान करायचा बिल्कुल हेतू नाही पण जे लोक असले फुकटच्या फाकट सल्ले देतात यावर त्याचे काय उत्तर असेल?

त्यातूनच जर "शास्त्रीय कारणे" द्यायचीच असतील त॑र देण्या आधी थोडासा भूगोलाचा (नुसते भौतिकशास्त्र नव्हे!!) अभ्यास करावा अन्यथा गूगल महाराजाना शरण जावे.

एक उदाहरण, शेजारी शेजारी दोन घरे आहेत. सामायिक भिंत पूर्व - पश्चिम अशी आहे, म्हणजे 'अ' घराची उत्तर दिशा आणि 'ब' घराची दक्षिण दिशा त्या भिंतीवर आहे. असे सांगतात कि उत्तर दिशेला काही अडचण असू नये, पण दक्षिणेला अवजड वस्तू ठेवाव्यात. आता जर 'ब' घरामध्ये अवजड वस्तू ठेवली तर त्याचा परिणाम 'अ' घरावर होणार नाही का? तर या प्रश्नाला उत्तर देता येत नाही या वास्तू वाल्यांना.

जितके खोलात जाऊ, तितके अडकणार. त्यामुळे हलके घ्या.

>>जितके खोलात जाऊ
"खोल्यात" जाऊ म्हणा.. Happy

असो. या धाग्याचेही दिवस भरले म्हणायचे. तूर्तास बंद करा... पुन्हा काही काळाने नविन रूपात ऊगवेल. तेव्हा ऊर्वरीत चर्चा करा. कसे? Happy

वास्तुपुरुष हा घराच्या भिंतीनी मर्यादीत असतो म्हणे.. त्यामुळे भीतीच्या पलीकडे दुसर्‍या वास्तुपुरुषाची हद्द सुरु होते.. असे काही तरी लॉजिक असेल त्यात

बरे वाईट हे जसे सापेक्ष आहेत तशाच दिशा सुद्धा.

> जितके खोलात जाऊ, तितके अडकणार. त्यामुळे हलके घ्या.

बरोब्बर. खड्डा खणला तर अमेरीकेतील लोक भारतात नाही पोचणार - मधेच अडकतील. (गुरुत्वाकर्षणामुळे आरपार नाही जाणार).

आस्चिग, दोन्ही बाजूंनी टनेल खोदत आणला तर? Proud

जामोप्या.. हल्ली बिल्डींगचा असा एकच वास्तूपुरूष असतो म्हणे. मग परत आपल्या घरात वेगळा बसवायचा का? आणि असे असेल तर एकाच विंगेत वर्-खाली रहाणार्‍यांच्या घरात वेगवेगळ्या घटना कशा घडतात? साधारण वास्तुफल सेमच हवे ना?

तेच तर... वास्तुवाले याचे उत्तर देत नाहीत.. वास्तुच्या जमिनीत वास्तुपुरुष असतो... मग फ्लॅट असेल तर वरच्या फ्लॅटचा वास्तुपुरुष खालच्या फ्लॅटच्या सिलिंगमध्ये असतो का?

बोगद्यात पृथ्वीच्या केंद्रभागीच चिकटून बसतील उच्च गुरुत्त्वाकर्षणामुळे.

असे कसे? काही अम्तर खणले की दोघनाही लाव्हारस भेटेल की. दोघेही त्याच्याबरोबर बाहेर पडतील... सगळा लाव्ह गेला दोन्ही भोकातून वाहून गेला की मग जायचं आरामात पलीकडे.. ( लावारसाला गुरुत्वाकर्षण लागू होत नाही का? तो उलटा बाहेर कसा पडतो? वास्तु, अध्यात्म, भूगोल, भूगर्भशास्त्र, भौतिक्शास्त्र.... कसं अगदी डोक्याचा पार नारळीकर होऊन गेलाय! Proud )

Pages