१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
स्गळ्या युक्त्या छान आहेत
स्गळ्या युक्त्या छान आहेत (हेम यांची सोडून :))
लाजो फळांवर मध घालून खायची युक्ती अमलात आणली.
दिनेशदा, चवळी एकदम भारी
दिनेशदा, चवळी एकदम भारी राहिली...चिकड, काळी झाली नाही...अत्यंत थँक्स...
२ दिवसांपूर्वी काळी द्राक्षं
२ दिवसांपूर्वी काळी द्राक्षं आणली, पण सगळी बर्यापैकी आंबट निघाली
२-३ पौंड तरी असतील. काय करू आता त्यांचं?
प्रज्ञा, साखर घालून जेली,
प्रज्ञा, साखर घालून जेली, किंवा जॅम किंवा प्रिझर्व्ह कर.
जेली किंवा जॅम कसा करतात? मी
जेली किंवा जॅम कसा करतात? मी अजून कधीच कुठल्या फळाचा केला नाहिये.
हे बघ ग. सोप्पी
हे बघ ग. सोप्पी आहे.
http://www.cybergrass.com/Recipes/Jelly/foolproofgrapejelly.html
कापा फणसाच्या पिकलेले गरे
कापा फणसाच्या पिकलेले गरे आहेत खाउन संपणार नाही, अजुन काय करता येइल?
हसरी गरे घालून आमटी कर.. मस्त
हसरी गरे घालून आमटी कर.. मस्त लागते
पण पुर्ण पिकलेले आहेत शिवाय
पण पुर्ण पिकलेले आहेत शिवाय गोड आहेत आमटी गोड होणार नाही ना?
रेसिपी दे ना?
प्रज्ञा, वाइन बनविता येइल का?
प्रज्ञा, वाइन बनविता येइल का? घरगुती वाइन. नेट वर रेसिपी मिळेल.
उकडगर्यांची भाजी करता येईल.
उकडगर्यांची भाजी करता येईल.
गर्यांचा चाळणीत रस काढुन
गर्यांचा चाळणीत रस काढुन फणसाचे वडे किंवा पोळ्या करता येतील.
दही, ताक, लोणी नस्ताना विरजण
दही, ताक, लोणी नस्ताना विरजण लावता येइल का? (चांदीचं नाण वापरतात अस ऐकल्यासारखं आठ्वत. पण खात्री नाही.)
दही, ताक, लोणी नस्ताना विरजण
दही, ताक, लोणी नस्ताना विरजण लावता येइल का? (चांदीचं नाण वापरतात अस ऐकल्यासारखं आठ्वत. पण खात्री नाही.)
दही, ताक, लोणी नस्ताना विरजण
दही, ताक, लोणी नस्ताना विरजण लावता येइल का? (चांदीचं नाण वापरतात अस ऐकल्यासारखं आठ्वत. पण खात्री नाही.)
हसरी खरंतर कढीत पण हे गरे
हसरी खरंतर कढीत पण हे गरे सोडतात... तु गोड आजिबात खात नाहीस का? आमच्याकडे कढी/आमटी गोड असते. तुला आवडत असल्यास कढीत सोडून पहा, फक्त शिजलेले गरे गोड लागतील.
योडे फणसाचे वडे करायला बरका जातीचा फणस लागेल ना?
रावी, दही किंवा ताक नसेल तर
रावी,
दही किंवा ताक नसेल तर विरजणासाठी किंचित गरम दुधात तुरटी फिरवायची एकाच दिशेने आणि मग ते दुधाचं भांडं न हलवता ७-८ तास ठेवा.. दही लागेल.
बाकी लोणी वापरून पण विरजण लावतात का?
योडे, काप्याचा रस निघत
योडे, काप्याचा रस निघत नाही.
दक्षिणा, फणसाची कढी! तों.पा.सु.
रावी, विरजण कसे लावावे यावर
रावी, विरजण कसे लावावे यावर इथे भरपूर चर्चा झाली होती. वेगळा बीबी च असणार.
हसरी, पिकलेल्या गर्यांचे सांदण, शिरा, इडली, भाकरी असे बरेच प्रकार करता येतात. मिक्सरमधून काढायचे आणि या प्रकारासाठी वापरायचे. घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवले तर फ्रिजमधेही राहतात.
माझ्याकडे आणलेल्या मैद्यावर
माझ्याकडे आणलेल्या मैद्यावर आणि गुळाच्या ढेपेवर एक्सपायरी डेट दिलेली आहे. खरेच अशी मैद्याला/ गुळाला असते का?
स्वप्ना, इथे पण मैद्यावर,
स्वप्ना, इथे पण मैद्यावर, मधावर, साखरेवर अशी डेट लिहीलेली असते.
यात २ प्रकार असतात.
- बेस्ट बिफोर (डेट) - याचा अर्थ या तारखेच्या आधी त्यापदार्थाची क्वलिटी चांगली असते. पण या तारखेनंतर त्याची क्वालिटी हळुहळु घसरत जाते. तरी हे पदार्थ खराब झाले नसतिल तर या डेट नंतर खाऊ शकता जसे पीठ, साखर इ इ
- युज बाय (डेट) - याचा अर्थ या तारखेपर्यंतच हे पदार्थ संपवावेत. या तारखेनंतर हे पद्दर्थ खराब होतात आणि खाऊ नयेत जसे दूध, दही, चिकन स्लाईस इ. इ.
भारतातुन जेव्हा पदार्थ बाहेरच्या देशात पाठवतात तेव्हा त्यांना अश्या डेट्स पाकिटावर घालणे बंदहनकारक असते. त्यामुळे आपल्याकडुन येणार्या मालावर सरसकट डेट ऑफ एक्सपायरी असेच लिहीलेले असते.
मैदा आणि गुळ सहसा लवकर खराब होत नाहित. पण मैदा अगदीच काळपट पडला असेल, गुठळ्या झाल्या अस्तिल तर वापरु नये. गुळालाही पाणी सुटले असेल तर खाऊ नको.
दिनेशदा आणि जाणकार अजुन माहिती देतिलच.
स्वप्ना, मैद्याचं माहीती
स्वप्ना,
मग त्यांच्या शाळेतल्या शिपायाने ती ढेप नेली... पुढे त्या ढेपेचे काय केले याची उगिचच कुतुहलाने विचारणा केल्यावर समजले की त्याने ती कुणा देशी दारू तयार करणार्याला विकली... त्यात खराब गुळ वापरतात म्हणे. खखोदेजा 
मैद्याचं माहीती नाही, पण बहुतेक करून भाकरीचं पीठ कसं कालांतरानं विसविशीत होतं, तसं काहीतरी होत असणार.
गुळाचं म्हणशील तर हो, गुळ खराब होतो नक्कीच... ऑरगॅनिक्/कोरडा घेऊन नीट वाळवून कापून्/खिसून ठेवला तर कदाचित आयुष्य वाढते.
मला आठवतंय मी लहान असताना आमच्याकडे एक गुळाची ढेप आणली होती.. त्याला नंतर वास येऊ लागला.. बाबांना समजेना काय करावे
इथे खूप पोस्टी पडल्यामुळे,
इथे खूप पोस्टी पडल्यामुळे, आता ह्या पुढच्या टिप्स नवीन धाग्यावर लिहूया का? युक्ती बाफ- भाग २ वर ह्या पुढच्या समस्या आणि त्यांचे समाधान लिहा
धन्स लाजो आणि दक्षु
धन्स लाजो आणि दक्षु
माझ्याकडचा मैदा पांढरा शुभ्र आहे अजून आणि मुंग्याच्या भीतीने मी गूळाची ढेप डीप फ्रीजर मध्ये ठेवली होती आणि हो त्या दोन्ही वर बेस्ट बिफोर च डेट्स आहेत. थोडासा वापरून पाहिन चांगले असल्यास वापरेन नाहितर सरळ टाकून देईन !!
मागे प्रवासासाठि नेण्याच्या
मागे प्रवासासाठि नेण्याच्या पदार्थाची चर्चा झाली होती ती कशि शोधता येइल?
मला ५० जणांसाठी वेज पुलाव
मला ५० जणांसाठी वेज पुलाव करायचा आहे. वाट्यांच्या प्रमाणात किती तांदुळ घ्यावा लागेल. सोबत एक चाट प्रकार, टोमॅटो सुप आणि गोड पदार्थ आणि केकही असेल.
श्रद्धादिनेश, इथे मागच्या
श्रद्धादिनेश, इथे मागच्या पानांवर कुणीतरी दिलंय प्रमाण, फक्त ते शोधायला लागेल.
माझ्या मावशीने सांगितलेले प्रमाण : एका मोठ्या व्यक्तीसाठी १ नैवेद्याची लहान वाटी शिगोशीग भरून तांदूळ घेणे.
रच्याकने, नेहमी लागणारी प्रमाणे, अंदाज ओगले आज्जींच्या पुस्तकातून किंवा अन्य कोणत्या संदर्भ पुस्तकातून इथे लिहून ठेवता आले तर चटकन सापडू शकेल.
धन्स अरुंधती, मी ही इथेच आधी
धन्स अरुंधती, मी ही इथेच आधी वाचलय्...आत्ता सापडत नाहीय्..मागे जावं लागेल.
श्रद्धा, ह्या बाफवरची चर्चा
श्रद्धा, ह्या बाफवरची चर्चा आता युक्ती सांगा बाफ. नं२ वर चालू आहे. तुझा प्रश्न तू तिथेच विचारलास तर अधिक प्रतिसाद मिळतील.
बाकरवडी (म्हणजे वरील पारी)
बाकरवडी (म्हणजे वरील पारी) कुरकुरीत कशी बनवायची ....हे सांगेल काय कोणी?
Pages