युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आजवर दोन्ही टाकताना पाहिलंय. पातेलंभर रसात नैवेद्याच्या वाटीएवढं दूध आणि वाटीभर रसात अर्धा चमचा तूप.
*पातेलं, वाटी आणि चमचा यांची मापे दाखवायला मी ओगलेआजी नाही. Wink

आशूडीशी सहमत.
आम्ही तर रस करताना आंबे पिळून झाल्यावर चक्क अर्धा लिटर दूधात त्या साली कोयी टाकून त्या पुन्हा पिळून घेतो, ते दूध मग रसात घालायचं आणि लागल्यास वरून साखर... जेवताना वाटीत रस घेतला की त्यात चमचाभर साजूक तूप. निदान २ वाट्या रिचवून.. त्यानंतर झोप ही अत्यावश्यक.. Happy

वर्षा - जोक्स अपार्ट पायरीचा रस काढून त्यात दूध घाल, माझ्यामते तरी दूध नासणार नाही...

ओके, आशुडी, दक्स Happy

वर्षा - जोक्स अपार्ट पायरीचा रस काढून त्यात दूध घाल, माझ्यामते तरी दूध नासणार नाही...<< आणि नासला तर??? रस नाही दुध नाही पातेल्यात राहिलं आंबा पनीर Lol

मी हापुसच्या रसाला फक्त दुध वापारते.. आणी पायरीला ( भितीपोटी ) पाणी.. पण थोडे ट्राय करयला हरकत नाही Happy

आंब्याच्या रसात नारळाचे दूध वापरता येईल. किंवा त्याचे सासव करता येईल. गूळ थोडा जास्त घालायचा.

ए वर्षे आमचा काय वेळ जात नाहिये का इथे.. उगिच नविन नविन टुमा काढत बसलेयस ती... हात दिला तर बोटच धरायलिये...
जा$$$$ काय करायचं ते कर.. Rofl

सगळेच आंबे आंबट आहेत हे कसे काय कळले? Uhoh Proud

ए वर्षे आमचा काय वेळ जात नाहिये का इथे.. उगिच नविन नविन टुमा काढत बसलेयस ती... >>>>> Lol सही जवाब दक्षिणा!

पूर्ण पिकलेल्या आंब्याचंही कैरीसारखं पन्हं करता येतं. आंबा उकडवून गराएवढी साखर घालायची आणि मिश्रण एकजीव करायचं. सही सही मँगोला होतो.

सगळेच आंबे आंबट आहेत हे कसे काय कळले? >>> ३ कापुन पाहिले Proud
सही जवाब दक्षिणा! >> मी तिला बोलवलेय जेवायला Lol
मँगोला >> आयडिअया छान Happy

सासम करता येईल. (पाकृ विचारू नये कृपयाच. धन्यवाद. :फिदी:)
किंवा कैरीची आमटी करतो तशी आमटी करता येईल. Happy

काल दुधी भोपळ्याची पिठ पेरून भाजी केली. नवर्‍याला आज्जिबात आवडली नाही, कोरडी कोरडी लागतीये म्हणे आणि नेमकी जास्त पण झाली. आता त्याचं काय? थालिपिठात घातले तर दुधीचे तुकडे आहेत त्यामुळे फाटू शकेल ना? उपाय सुचवा प्लीज. भाजी वाया नको जायला, मी एकटी किती खाऊ Happy

एक मोठा ग्लास पाणी घालून उकळंव. वर काजू पेर. एक टोमॅटोचं फुल करून खोच. हिरवी कोथिंबीर चिरून पसरव. आणि दुधी बहार असं लाडिक नाव देऊन खपव. हाकानाका. Happy Light 1

कामवाल्याबाईला सरळ घरी देऊन टाकायची ना. (देशात असशील तर).

मामी, यु आर सिंपली ग्रेटच Happy
देशात नाही ना? म्हणूनच तर वांदा झालाय...माझे भोग मलाच भोगायचेत ... Happy

अ,न्जली, त्याच्यात जमलं तर थोडंसं पाणी घालून पिठल्याटाईप प्रकार कर. नाहीतर मिक्सरला फिरव आणि मग थलिपीठ कर त्याचं.

अंजली, तेलाची खमंग फोडणी करून त्यात ती भाजी जरा परत, कोरडी वाटली तर त्यात नंदिनीने सांगितल्याप्रमाणे पाणी घाल व पिठल्यासारखं कर. एक प्रयोग सुचतोय, पण कितपत यशस्वी होईल माहित नाही : फोडणीवर भाजी परतल्यावर त्यात थोडे दही फेटून घालून जरा गरम झाले की गॅस लगेच बंद करायचा. दुधीच्या कढीसारखा प्रकार होईल हा. फक्त दही फाटणार नाही हे पहायचे व चवीला जरा आंबट असले की झाले.

अंजली , ती भाजी (फोडी) थोडी ठेचून त्यात थोडं अजून बेसन घाल, आलं, लसूण, कोथिंबीर पेस्ट घालं आणि कोफ्ते बनव. मस्तपैकी ग्रेव्ही करून त्यात ते सोड आणि आजची स्पेशल डीश 'कोफ्ता करी' म्हणून ठेव पुढे Happy

दुधी पकोडे कसे होतील? भाजीत तांदळाचम पीठ घालून, वर लागेल ते मसालापूड (धने-जिरे इ) घालून साबुवड्यांसारखं करून घेऊन वडे शॅलोफ्राय करायचे. कसे होतील नो आयडिआ! इथे वरचे उपाय वाचूनच सुचलंय हे. Wink

काजू-बेदाणे-बदाम मी नेहमी ड्ब्यात घालून ठेवते कपाटात. कधी खराब होत नाहीत. पण यावेळी त्यांत किडा झालाय. Sad
कसे स्टोअर करावेत? फ्रीजमध्ये ठेवावेत का? की फ्रिजरमध्ये?

फ्रीजर. पण काजु फ्रीजरमधुन काढुन फार वेळ बाहेर नको ठेवुस.. जेव्हा वापरायचेत तेव्हाच बाहेर काढायचे. नाहीतर सादळतात..

काल मी आईसक्रीमचे सामान घेतले.. त्यात ते बटारस्कॉच नट्स ( की दुसरे काही नाव आहे Uhoh ) घेतले. १०० ग्रॅम ३५ रुपये.. खरच इतके महाग असतात का Uhoh

जेव्हा वापरायचेत तेव्हाच बाहेर काढायचे.>>> म्हणजे बाहेर काढून लगेच पदार्थात घालायचे का?

ए वर्षे आमचा काय वेळ जात नाहिये का इथे.. उगिच नविन नविन टुमा काढत बसलेयस ती... हात दिला तर बोटच धरायलिये...
जा$$$$ काय करायचं ते कर..
>>>>>>>>>>>>>> दक्षिणा अगदी शाळेतल्या पोरीटोरी भांडताहेत असं वाटलं. कीप इट अप!

वर्षा, ते प्रालिन ना ? घरी करता येतात. साखरेचा पाक करुन तो गोठवायचा. मग थंड झाला कि लाटण्याचे त्याचे तूकडे करायचे. डिटेलवार कृति हवी तर देऊ शकेन.

दिनेशदा द्याच पाक्रू ... मी आणले ते मस्त गोल आहेत.. चवपण अप्रतिम लागते..
हे असे दिसते
butterscoch_nuts.jpg

Pages