युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अल्पना तसे नाही. एक लिटर दूधाचे साधारण २५० ग्रॅम पनीर बनायला हवे. जास्त फॅट असेल तर पनीर मऊ होते. पण त्यात थोडा तूपाचा अंश राहतो. असे पनीर ग्रील करायला चांगले. पण बंगाली मिठाईसाठी करायचे असेल, तर कमी फॅट असलेले किंवा असल्यास साय काढून घेतलेले दूध वापरायचे.

तेच! जास्त नाही पण वेगळ्या क्वालिटीचे बनेल.

शिकरण बनविताना केळे कुस्करून घालता कि कापून? कापून घातलेले एलिगंट दिसते पण कुस्करून घातले कि चांगले मिळून येते. खरी पद्धत काय?

अश्विनी, केळे कुसकरशिवाय काही मजा नाही. पेरुचे शिकरण पण छान लागते. बिया नसलेला भाग किसून, दूधात घालायचा. साखर नाममात्र. आम्ही अवाकाडोचे पण शिकरण करतो. मस्त लागते.

स्लो कुकर मधे बासुंदी?कशी करायची?मी ऐकले आहे की दुध स्लो कुकर मधे फाटते म्हणून.
होत असेल तर आजच करीन की Happy

सॉरी परत मागच्या पोळ्या-फुलके फ्रीज करण्याच्या मुद्याकडे...

पोळ्यांबद्दलच्या माबोवरच्या बहुतेक सर्व पोस्टी वाचल्या...मान खाली घालून प्रयत्न करते आहे...पण फार उत्तम नाही होत...------------ आठवड्याच्या पोळ्या करून ठेवण्याची काही पद्धत आहे का...प्रत्येक वाराची वेगळी झिपलॉक ठेवायची का...पोळ्या भाजून ठेवायच्या की नुसत्या लाटून...आणि लागतील तशा भाजून घ्यायच्या....अत्यंत गोंधळ...कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा...

मी जे ऐकलं, वाचलं, की खूप जास्त वेळ थॉ केलं तर हानिकारक बॅकटेरियांची वाढ होते. या माहितीत काही दम आहे का...

बाहेर जे पराठे मिळतात त्यातले काही नुसते लाटलेले असतात. ते भाजले की महान लागतात. ते मैद्याचे असतात म्हणून का?

रोज पोळ्या नाही करू शकत...कंटाळा आणि वेळेचे गणित जमत नाही.

चिवा
हे वाचलेलं का मागच्या पानावर

फुलके पूर्ण गार करून, फॉईलमधे घट्ट गुंडाळून डीप फ्रीज करू शकतेस. एकावेळी लागतील एवढेच एकेका झिप्लॉक मधे ठेवायचे. रोज सकाळी एक बॅग लंच साठी न्यायची. ते फुलके बाहेर मस्त थॉ होतील लंच टाइम पर्यंत. शिवाय सकाळीच एक बॅग काढून फ्रीज मधे ठेवली तर ती रात्रीच्या जेवणापर्यंत व्यवस्थित थॉ होईल.
गरम करताना पेपर टावेल वर दोन थेंबा पाणी शिंपडून त्यावर फुलके ठेवून गरम करायचे मावे मधे -१५-२० सेकंद लागतील २-४ फुलक्यांना .

दोन तीन दिवसांचेच केले तर ते फ्रीजमधे पण चांगले रहातात.

हो हो ...हे वाचलं होतं...पण इतका वेळ थॉ करू नये असं कुठेतरी वाचलं-पाहिलं होतं...म्हणून शंका...

एक मदत हवी आहे. माझ्या लेकीला बर्फाचा गोळा खायची ईच्छा आहे. बाहेरच्या गाडीवरचा योग्य नाही म्हणुन मी घरीच प्रयत्न केला. एका चौकोनी प्लास्टीकच्या डब्यात बर्फ तयार केला आणि तो किसणीवर किसला. पण किसलेल्या बर्फाचे लगेच पाणी होते. बाहेर जो बर्फ मिळतो तो काही विशेष पद्धतीने बनवल असतो कां? कारण तो किसल्यावर त्याचे पाणी होताना दिसत नाही. आपण घरी त्या पद्धतीने बनवु शकतो कां??? कारण बाहेरुन आणलेला बर्फ देखिल आरोग्याचा दृष्टीने योग्य असेलच असे नाही.

धन्यवाद

भ्रमा, पुर्वी आम्ही बर्फाचे खडे मिक्सरमधे हाय पॉवरवर बारीक करून त्याचा चुरा काडीला लावून सरबतात घोळवून खायचो, पण त्याचं लगेचच पाणी होत असे. घरचा मिक्सर पॉवरफुल असेल तर हा प्रयोग करून बघ.

किंवा कुल्फीचे मोल्ड्स असतिल तर त्यात पाणी भरून काडी खुपसून ठेवून त्याचा बर्फ बनव आणि मग गोळ्यासारखं त्यावर सरबत घालून दे. अर्थातच, काडी मध्यभागी राहणार नाही आणि गोळ्याचा खसखशीतपणा पण असणार नाही, पण फूल ना फुलाची पाकळी Wink

कुल्फीचे मोल्ड्स >> यात सरबत शोषलं जाणार नाही, त्यामुळे सुर्र करुन चोखायची मज्जा नाहि येणार. मिक्सरची कल्पना डोक्यात आली होती पण ब्लेड मोडलं तर घरचा स्त्रीवर्ग माझाच चुराडा करेल. Happy

डीप-फ्रीजर (जे दुकानात आईसक्रीम स्टोरेजसाठी वापरतात) मधे बनवलेल्या बर्फाचा गोळा बनु शकेल कां, ज्याचं पाणी लगेच होणार नाही?

खरंय मंजुडी...पण आळस झटकला तरी वेळेच्या गणितात नाही बसतेत रोज पोळ्या करणं...ऑफिसला लवकर जायचं आणि यायचं कधीपण...मग आल्यावर अंगात शक्ती नसते...आणि करून ठेवल्या असल्या पोळ्या तर फक्त भाजी कोशिंबीर करणं फार वाटत नाही...म्हणून विचारलं.

भ्रमा, तू एखाद्या गोळेवाल्याला विश्वासात घेऊन विचार ना ते किसलेल्या बर्फाचं रहस्य (आणि इथे पण लिही).

>>ब्लेड मोडलं तर घरचा स्त्रीवर्ग माझाच चुराडा करेल Lol

बर्फाचा चुरा करावाच लागेल. आधी थोडा फोडून घेतला तर ब्लेड नाही मोडणार. आणि चुरा झाला की त्यात थोडे मीठ मिसळतात.

आणि चुरा झाला की त्यात थोडे मीठ मिसळतात. >>> एक्झॅक्टली लालू ! मला पण हीच शंका आहे. मीठामुळे तापमान अजून कमी होतं. परंतु ते गोळेवाले तर आरामात हातात बर्फ किसून घेऊन ग्लासात दाबून, काडी हातात धरुन त्यावर सरबत ओततात आणि मग वर कसलासा मसाला घालतात. त्या मसाल्यात मीठ असेल पण मधला वेळ जो जातो तेवढ्यात तो बर्फ वितळतच नाही.

ते गोळेवाले बर्फाची लादी खिसण्यासाठी रंधा (लाकुड तासायला वापरतात तसला) वापरतात. त्याला प्रचंड धार असते त्यामुळे अगदी पटकन नीट बर्फ खिसला जातो.

घरी करायचे तर एखाद्या पोत्यात/कापडात घेऊन बर्फ बत्त्याने धोपटायचा. तो काढून परत फ्रीझरमधे टाकायचा. मग एकदा परत तसेच करायचे. यावेळेस बर्फ बर्‍यापैकी बारीक झालेला असेल. तो परत एकदा फ्रीजमधे ठेवुन वरून रोझ सिरप वगैरे टाकुन दिला किंवा लिंबू-मीठ-साखरेचे संपृक्त द्रावण टाकायचे!

फारा वर्षांपूर्वी मातोश्रींनी असला प्रयोग करून गोळे खायला घातलेले आठवतात Happy

फुड प्रोसेसरला बर्फ किसायची खास बर्फ गोळ्यासाठीची अ‍ॅटॅचमेन्ट असते...माझ्याकडे सुमित आहे जुना त्याला पण आहे.

भ्रमर मिनोती ने सांगितलेला उपाय बेस्ट आहे पोत्या ऐवजी आकाराने मोठा आणि जाडसर टर्किश नॅपकीन घेऊ शकता. तो परत फ्रिज मधे टाकायची पण गरज पडणार नाही.

घरी करायचे तर एखाद्या पोत्यात/कापडात घेऊन बर्फ बत्त्याने धोपटायचा. >> हे बेस्ट आहे.

भ्रमर, Semedhav ने लिहिल्याप्रमाणे जून्या सुमीतमधे एक ब्लेड यासाठी योग्य होते आणि त्यांच्या पुस्तकात ती रेसिपी पण होती.
एका मजबूत कापडी पिशवीत (मजबूत म्हणजे जवळजवळ गोणपाटाइतकी किंवा ताडपत्री इतकी मजबूत )
बर्फ टाकून लाटण्याने धोपटले तरी असा चुरा होतो. अशी बॅग काहि फेरीवाले वापरतात.
सरबत करुन मजबूत ग्लासात गोठवत ठेवले तरी पण असा गोळा तयार होईल.
बर्फाच्या चूर्‍यावर दाब दिल्यास त्यामधले काहि बर्फ वितळते आणि दाब काढल्यावर परत त्याच बर्फ होतो, हे तत्व वापरतात. पण भारतातील सध्याच्या उष्ण हवामानात हे जमणे कठीण आहे.

एक अतिशय सोपी युक्ती. सरबत बनवून तेच कुल्फीच्या मोल्ड्मध्ये घालायचे. चोखले की बर्फाच्या गोळ्याचाच ईफेक्ट येतो.

Pages