१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
माझ्याकडे
माझ्याकडे 'बोर्नव्हिटा'चा अर्धा किलोचा पॉलिपॅक आहे. निम्म्य्यापेक्षा जास्त संपलाय, पण जो उरलाय त्या सगळ्याचा जवळजवळ 'दगड' झालाय
डब्याला चिकटून बसलाय. सुरी, काट्याने उकरला तरी निघत नाहीये. गरम पाणी घातले, तर लवकर खराब होतो (आणि तसा बराच उरलाय). तर तो बाहेर काढण्यासाठी कोणी मला एखादी युक्ती सांगू शकेल का?
-----------------------------------
Its all in your mind!
किंचीत दुध
किंचीत दुध घालून डबा (अर्थात डबा धातूचा असेल तर) थोडा थोडा गरम कर. एकिकडे चमच्याने उकरायला बघ. चॉकलेटसारखा पदार्थ हाती लागेल
चिवट झाला तरी टाईमपास म्हणून चघळायला छान वाटतं.
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग
आता जे
आता जे झालंय त्यावर काय करावे हे मला माहित नाही पण हे होऊ नये म्हणून एक युक्ती आहे.
जाऊदे इथेच वाच. 

आता हे उत्तर कुठल्या धाग्यावर लिहू?
बोर्नव्हिटा किंवा तत्सम पदार्थात चमचा घालताना तो पूर्ण कोरडा आहे याची काळजी घ्यावी. पाण्याचा अंश जरी त्याला लागला तर त्याचा दगड बनतो. त्यावर एक सोपा उपाय असा की त्याचा असा एक स्वतंत्र चमचा त्या बरणीतच ठेवावा.
-----------------------------------------------
स्वतःचा असतो तो स्वाभिमान ,दुसर्याचा तो माज!
ती लिहितेय
ती लिहितेय ना वर पॉलीपॅक आहे म्हणून.
पूनम गरम पाणी घालून उरलेला बोर्नव्हिटा सगळा विरघळवून घे आणि मग तो काचेच्या बाटलीत भरुन फ्रिजमधे ठेव. खराब होत नाही अजिबात फक्त चव किंचित फिकी होते. पाणी थोडच घाल म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड डिकॉक्शन होईल. मग दुधात लागेल तितके चमचे टाक हवं असेल तेव्हां. नेसकॉफी दगड झाली तरी मी असंच करते.
अगं आशु,
अगं आशु, ऑलरेडी जे झालंय त्याचं काय करायचं असं विचारतेय ती.
पुनम, काहीच नाही झालं तर तो डबा फोड रागाने. आतला दगड बाहेर काढ व बत्त्याने फोडून फोडून खा तिघंही
अरे हो की ट्युलीप. निसटलंच बघ नजरेतून.
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग
त्या
त्या दगडाच्या गोष्टीसारखं कायम तो बोर्नव्हिटाचा दगड दुधात फिरवायचा तुरटी फिरवल्यासारखा आणि परत ठेवून द्यायचा.
वा वा हे
वा वा हे म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ झालं
याचा
याचा चॉकलेट सॉस करता येईल. गरम पाण्यात तो विरघळवून त्यात थोडीशी कॉर्न फ्लोअरची पेस्ट घालून सॉस करायचा. आईस्क्रीम, केक वगैरे वर घालून खायचा.
पेस्ट न घालता केलेला सॉस दूधात घालून खाता येतो. पण तो फ्रीजमधेच ठेवावा लागेल.
ते चॉकोलेट
ते चॉकोलेट सॉस वगैरे तो दगड पॅक मधून बाहेर आल्यावर्ची गोष्ट आहे. आधी तो दगड कसा सोडवायचा ते सांगा कुणीतरी. या पुनमने डोक्यात भुंगा सोडलाय माझ्या
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग
पॉलीपॅकच
पॉलीपॅकच आहे ना, कात्रीने कापायचा तो.
ती मधेच
ती मधेच डबा म्हणालीय.
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग
अगदी अगदी
अगदी अगदी अश्विनी. तो दगड बाहेर कसा काढू? गरम पाणी घालण्याला पर्याय नाही का? (दगडाने डबाच फोडण्याची आयडीया मला प्रॉमिसिंग वाट्टेय :फिदी:)
बरं, कात्रीने कापेन.. प्लॅस्टिकच्या डब्याचा मोह ठेवत नाही
-----------------------------------
Its all in your mind!
असं कर ! गरम
असं कर ! गरम दूध घाल एक कपभर. थोडावेळ ठेवून दे, मग डबा हलवून पुन्हा कपात काढून घे व साखर घालून पिवून टाक. डबा परत फ्रिजमधे ठेवून दे. परतच्या वेळेला असंच कर. हळू हळू बोर्न्व्हीटाचा दगड नाहीसा होईल. अगदी डब्याच्या कंगोर्यांमधे अडकलेला बो.व्ही. उदारपणे कोकणस्थीपणा न करता डब्यासकट टाकून दे.
हे डबे कात्रीने कापायच्या आवाक्यातले नसतात. उगाच कात्री वाया घालवशील.
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग
अगं आशु,
अगं आशु, ऑलरेडी जे झालंय त्याचं काय करायचं असं विचारतेय ती.
>> अश्विनी, मी वर ते स्पष्ट केलंच आहे.. की पुन्हा असं होऊ नये म्हणून काय कर..
-----------------------------------------------
स्वतःचा असतो तो स्वाभिमान ,दुसर्याचा तो माज!
************ अवघा
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग
पूनम, ट्यु
पूनम, ट्यु म्हणते तसेच कर. फक्त बाटली दरवेळी फ्रिजमध्ये ठेवायला विसरू नकोस. मी हे केलेले आहे. रामबाण आहे.:)
................................
माझे जगणे होते गाणे...
प्राचीला
प्राचीला अनुमोदन.. ट्यूचा उपाय योग्य आहे. मीही अस केलेले आहे. गरम दुध घाल, पण बेताबेताने. घाईघाईत दुध ओतू नको थोडं थोडं ओत. अन बाटली गोल गोल फिरव.
अजुन एक
अजुन एक सांगु का? टुलिप म्हणतेय तसे पाणी तयार कर. पण डबा फ्रीज मधे न ठेवता आईसक्युब्स कर आणि नचिकेत ला एक एक क्युब आईसक्रीम म्हणुन दे.
पूनम,
पूनम, माझ्याकडे झालाय हा प्रकार हल्लीच. पण मी एवढं डोकं खाल्लं नाही(माझंच) त्यावर. एवदम सोप्पा उपाय केला.
एवदम
एवदम सोप्पा उपाय केला. << यातून काय सांगायचं आहे (किंवा नाहीये) ?
सुरी जरा
सुरी जरा गरम करुन तो डबा फाड. आतला दगड बाहेर येइल. मग तो फोडुन त्याचा पुन्हा भुगा कर.
युक्ती
युक्ती वापरायचा बीबी आहे, शक्ती नव्हे.
मिलिंदा,
मिलिंदा,
सांगायचं नाहीये. 'ओळखा पाहू' आहे...
>>>>युक्ती वापरायचा बीबी आहे, शक्ती नव्हे.
सायो,
सायो, योग्य जागा दाखवलीस का??

लालू
(No subject)
सोप्पये.
सोप्पये. तो डबा फेकुन दे. नविन आण. अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
पत्राचा
पत्राचा असतो ना हा बोर्न्विटाचा डब्बा? मला आता आठवत नाही. पण आधी तो काचेचा असायचा नी त्यात अॅलुमीनियमच्या फॉइलमध्ये ते मिश्रण असायचे. काचेचा असेल तर सरळ मायक्रोवेव मध्ये ठेवू शकतो.
नाहीतर दुसर्या कोणाला ह्या कामाला बसवून करून घेवु शकतो. 
नाहीतर पत्र्याचा असेल तर एका मोठ्या परातीत गरम पाण्यात तो पुर्ण डूबवून न ठेवता ३/४ डूबवून ठेवून पहायचा. माझा मध असाच वितळवला. कारण मला मायक्रोवेव मध्ये न्हवता गरम करायचा मला. नाहीतर तोंड मोठे असेल तर्(डब्याचे ) तर आत हँडमिक्सी फिरवून बहुधा होवु शकेल. नाहीतर रात्रभर खणत बसायचे टोच्याने.
त्यापेक्ष
त्यापेक्षा, गरम दूध त्या डब्यात घालून फिरवून एकाच दिवशी अख्ख्या घराल बोर्नव्हिटा पाजून टाका. सगळेच शक्तिमान. वाया ही जाणार नाही. गरम नसेल आवडत तर थोडी कॉफि मिक्स करून फ्रिज मध्ये ठेवून ४/५ तासानी कोल्ड कॉफी म्हणून द्या..
सगळेच
सगळेच शक्तिमान. )))
आणि अगोदरच शक्तीमान असतील तर
-----------------------------------------
- सक्षम दळवी
पूनम,
पूनम, ह्यातली नक्की कुठली टीप तुला उपयोगात आली हे इथे नक्की लिही बरं का.........
Pages