Submitted by नीलू on 27 January, 2009 - 04:31
मालवणी शिकायचंय? थोडं थोडं येतंय पण आठवत नाहीये? इथे विचारा. किंवा तुम्हाला छान बोलता येत असेल तर इतरानाही सांगा.
या अगोदरचं मालवणी भाषेबद्दलचं हितगुज इथे पहा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोन दिसानी
दोन दिसानी कोकणी / मालवणी व्याकरणाचो तास सुरू होतलो. सगळ्यानी हजर रवा.
होय काका
होय काका
मास्तरांन
मास्तरांनु.. या लौकर..
सोमवारी
सोमवारी तास सुरु होतले.
शाळा
शाळा कितीची आसा? मी तर केव्हापासून हजर आसय
|| श्री
|| श्री गणेशाय नमः ||
झिलग्यानू ,चेडवानू ,पयल्यान प्रार्थना करया ना ?
"गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः |
गुरु: साक्षात परभ्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ||
****************************************
पयली समजावणी.........
मालवणी हि मराठीचीच धाकटी भयण. फक्त कांय शब्द गावधाटणीचे, कांय शब्द मराठीतले पण तेंची रूपा थोडी येगळी होतत. बाकी तुमका शिकूक काय एक कठीण नाय. फुढे फुढे जेवा संभाषणातल्या वाक्यांचो सराव होतलो तेवा तुमका बरोबर समजतला वाक्य कसा तयार होता. तुमच्या बोलण्यातले चूको माज्या धेनात इलेहत, त्यानुसार मी थोडो व्याकरणाचो भाग समजावतलय. हेतू जाणून घेवा . थोडी मराठीच्या व्याकरणाची उजळणी होतली. पण तेच्यामागे मालवणी / कोंकणी शिकण्याची तुमची ओढ आसा ह्या धेनात घेवा.मालवणी बरोबर तुमका कोंकणी सुद्धा शिकयतय.शैलजा , ललितादीदी कोंकणी [ गोय / कारवारी ] साठी मदत करतली . तर मग तयार मा ? [ लक्षात ठेवा --> मा..मालवणी ; कों-->कोंकणी .
*************************************************
तास पयलो. सोमवार..........२ फेब्रु.२००९.
* ************** ****************
नाम
माणसा, वस्तू ,प्राणी , वनस्पती हेंका नावानी वळखतता ह्या तुमका म्हायत आसा. [मा]
मनशांक,वस्तूंक, प्राण्यांक , वनस्पतींक नावानी वळखतात तुमी जाणां ,
उदा.. झिल, चेडू ,घोव , बायल [मा] : चलो, चली,दादलो , बायल [कों] ;
संगणक, आरसो,पंको .[मा]: सायकल, पुस्तक , [कों];
बोको, कोंबो , म्हस, [मा] ; माजर, दुकर, [कों];
आंबो , माड, [मा] ; आंबो , माड. [कों];
थोड्या
थोड्या येळान येतय.
थोड्या
थोड्या येळान येतय.
बुध॑..दि.४
बुध॑..दि.४ /२ /२००९. अमूर्त नामा............ भावना नायतर गुण दाखवन देणार्या नामांका " अमूर्त नामा " म्हणतत. [मा]
उदा. राग,अपुरबाय, भीति इ.
भावना नायतर गुण उकती करून दाखवपी नामाक " अमूर्त नामा " म्हणुचा.[कों]
रास नामा नायतर समुह नामा....उदा. [माणसांचो ] घोळको ,[ माश्याची गातन ],[नालांची ] रास .[मा]
[मनशांचो ]जमो ,[नुस्त्याची ]गाथन, [नाल्लांची ] रास.[कों]
*******************
विशेश नामा.... उदा. बाबलो, सिंधुदुर्ग, नीलग्या, [मा]
बाबुलो, पणजी, आयट्या .[कों]
*******************
लिंग........ [पु]..भ्रमा, फणस, चाकू,गूळ इ.[मा]; माड, दोळो, दुदी इ. [कों].
[स्त्री]..शेळी, आडोळी, वय ,भयण इ.[मा]; बोकडी, पाल ,बांय ,भयण इ.[कों]
[अलिंगी नायतर नपु. ] शीत ,तवशे ,फाणास, इ[मा]
शीत,तवशें , तांती [अंडे] इ [कों]
************************
काकानु
काकानु
आमकाव बराच शिकूक गावता हा.
बाकी सगळे हौशे गौशे खय गेले???
काकानु काय काय शब्द माका पण नवीनच आसत जरा त्याचो अर्थ सांगा.. गातन? दोळो? वय? तांती म्हणजे अंडा काय!!
तांती
तांती माकाय ठावक नव्हता! गातन ऐकलेलय..
दोळो
दोळो म्हणजे माका वाटता डोळो.. गातन म्हणजे?? निस्त्याक काय?
भावन,
भावन, निस्त्याक खय आसा?? नुस्ते!! म्हणजे माशे काय गो आयटे?
होय,
होय, नुस्ते म्हळ्यार माशेच.
गातन म्हणजे गाभोळी की रास (माश्यांची रास - मराठी) की आणि काय अर्थ, ह्याच इसारलय!
रासच आसतला.. समूहनाम मां..
एकाद्या
एकाद्या झुडपाच्या कोवळ्या फांदयेची पाना काढून त्या लवचिक दांड्याक सुळे [मुडदुशे,नगली] , मळवे इ. माशे माळेसारखे गुंतत. तेका गातन नायतर गोयात गाथन म्हणतत.[समुहनाम].
[ ह्या व्याकरण फक्त म्हायतीसाठी, डीटेल न्हय. तेच्यामुळा वाक्यरचना करताना फरक समजलो कि मदत होयत . [लिंग, विभक्ती च्यो चुको चड दिसतत बोलताना ] .
आता मुख्य म्हणजे क्रि.वि. ; क्रियापद आणि विभक्ती घेवन मग आपण " फाड फाड मालवणी "क सुरवात करया. चलात मा.
दोळो....डोळो; वय.[वई].. कुंपण गावातल्या परड्यात आसता ता.
नुस्ते...ताजे माशे. निस्त्याक...माश्याची आमटी.
हां, बरोबर
हां, बरोबर हो काका!
आता आठावला..
तांती =
तांती = एग.अंडा.
बाकी सगळे
बाकी सगळे हौशे गौशे खय गेले??? >>>
मी हयसरच हा.. रोज हजेरी लावतंय... पण ते व्याकरण म्हळ्यार... चिडिचाप बसान वाचूक होया...भियालंय..
होय काकानू
होय काकानू चलात गृहपाठ पण होयोच
अगो भिवचा काय त्यात... आपणाक काय म्हायत नाय ता शिकाक गावता. तू गजालेर कित्या नाय येनस??
डॅफो
काकानू ते नवीन शब्द थय शब्दार्थात पण घाला ना.
मंडळी, कोंक
मंडळी,
कोंकणीतल्या शब्दार्थांचा एक मुक्त सामायिक शब्दकोश असावा, म्हणून मी कोंकणी विक्शनरीच्या निर्मितीकरता विकिमीडिया फाउंडेशनाला विनंती केली आहे. या विनंतीवर विकिमीडिया फाउंडेशनाचे प्रशासक निर्णय घेतील. त्यांचा होकार आल्यास इंग्लिश विक्शनरी व मराठी विक्शनरीप्रमाणे कोंकणी विक्शनरी प्रकल्पही सुरू करता येईल. त्यांची निर्णयप्रक्रिया अशी असते.
निर्णयप्रक्रियेबद्दल हालहवाल मी कळवत राहीनच. पण तुमच्याकडून एक सहकार्य अपेक्षित आहे : लॉगिन होऊन कोंकणी विक्शनरीच्या विनंतीपत्रावर "Arguments in favour" विभागात सकारात्मक टिप्पणी नोंदवा (अर्थातच, मनापासून वाटत असल्यास; वाटत नसल्यास "Arguments agains" विभागातही टिप्पणी नोंदवावयास हरकत नाही.
). तुमच्या टिप्पण्यांचा फाउंडेशनाच्या निर्णयावर थेट परिणाम होणार नसला, तरी अनुकूल प्रतिसादावरून त्यांना संभाव्य विक्शनरी प्रकल्पाच्या भवितव्याबद्दल आश्वासक परिस्थिती जाणवू शकेल.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
बाजार हो
बाजार हो शब्द देखील माशे म्हणान वापारतत..
'आज बाजार काय गावलो'.
व्हाळावर गेल्लंय खवळे गरवंक.. (अर्थ लिवा).
विनय
व्हाळावर
व्हाळावर गेल्लंय खवळे गरवंक.. (अर्थ लिवा).>>>>
व्हाळ म्हणजे वहाळाचे वाहते पाणी , गरवक म्हणजे मासे पकडायला.
खवळे म्हनजे काय ? देवगड (सिंधुदुर्ग ) येथील खवळे गणपती प्रसिद्ध आहे.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा
खवळे
खवळे म्हणजे एक प्रकारचो मासो.. तेच्यार खवळा जास्ती असतत म्हणान खवळो.
म्हणजेच माशे पकडुक जाणा. (अर्थ)
अर्थ लिहा.
अर्थ लिहा. (कृती महत्वाची नाही भाषा महत्वाची).
१. हेका होंडो खणान जित्तो पुरल्यार बरां
२. भानशेरां कनवटेक लावान ती होवर्यात इली. धारणाक बांदलेली रवि घेवान ताक घुसळूक लागली. पेजेची मडकी आजून थंयच होती. डवली घेवान एकदा ढवळलेन, आणि चेडवाक साद घातलेन...
विनय
१. ह्याला
१. ह्याला खड्डा खणून पुरलेलं बरं ... ? ( बरोबर आहे का ? होंडो म्हणजे माका कळणा नाय..
)
(हय धारणा कळणा नाय...
ताक घुसळण्याक खांबाक रवी अडकवूक लोखंडी रिंग लावतात तेका म्हणतंत का हो विनयानु धारणा ? )
२. चुली जवळचं हाती धरायचं फडकं कमरेला खोचून ती स्वयंपाक घरात आली. खांबाला बांधलेली रवी घेउन ताक घुसळू लागली. पेजेची मडकी अजून तिथेच होती. पळी घेउन एकदा ढवळले आणी लेकीला हाक मारली.
१. हेका
१. हेका होंडो खणान जित्तो पुरल्यार बरां >>>>
ह्याला **** खणुन जिवंत पुरलेले बरे. होंडो म्हणजे हंडा का ?
२. भानशेरां कनवटेक लावान ती होवर्यात >>>>
स्वयंपाक घरातले फडके कनवटीला लावुन ती **** मध्ये आली. **** ला बांधलेली रवी घेऊन ताक घुसळु लागली. पेजेची मडकी अजुन तिथेच होती. डाउल घेऊन एकदा ढवळले आणि मुलीला हाक मारली.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा
विद्यार्थ
विद्यार्थी अभ्यास करुक लागले तर
गो आयटे
गो आयटे आमका बघलंय ना आभ्यास करताना.. मगे धारणाक म्हणजे काय ता सांग बघया लवकर
माकाही नाय
माकाही नाय गो ठावक..
पण माका वाटता पूर्वी ना घरात एक खांब असा. ह्या खांबाक रवेचे दोर वगैरे बांधलेले आसत, तेका म्हणतत वाटता...
आयटेचां
आयटेचां उत्तर बरोबर हा... (धारण - होवर्यातलो खांब.. तेच्यार ताक करण्यासाठी रवि बांदतत)
वायलांवरच्या टोपातसून रोवळेतल्या तांदळात तिणां खतखतीत पाणी वतलेन. मग जरा तांदूळ धुवान घेतलेन. आता झिलगे येवाक झाले. भूक भूक करतले. चुलीर भात लावन ती वाटाप वाटूक बसली. गाबतीण बांगडे टाकून गेली नायतर आमटेची पंचायती होतली होती...
विनय
Pages