Submitted by नीलू on 27 January, 2009 - 04:31
मालवणी शिकायचंय? थोडं थोडं येतंय पण आठवत नाहीये? इथे विचारा. किंवा तुम्हाला छान बोलता येत असेल तर इतरानाही सांगा.
या अगोदरचं मालवणी भाषेबद्दलचं हितगुज इथे पहा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उतारेच्या
उतारेच्या उतारे असतत मायबोलीर. खंयचोय घेवान करूक लागा. गुलमोहरच्या गोष्टीतलो घेवा.
विनय
हयसर
हयसर डोकावन बघितलाच नाय..
विनयांनु... लै शॉलिड
गुरुजी
गुरुजी तुम्हीच एखादा उतारा द्या.
नाहीतर एखाद्या चांगल्या ललिताचे विडंबन केले म्हणुन मा.बो.करांच्या रोषास सामोरे जावे लागेल.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा
चालेल..
चालेल.. पुढील उतार्याचे उत्तम मालवणीत भाषांतर करा...
: किती माणसं होती?
: दोन सरदार.
: अरे मग त्यानी तुम्हाला विनोद सांगितले की काय?
: नाही, ते दोन होते , तुम्हाला सरदार म्हणालो.
: ते दोन आणि तुम्ही तीन. तरी तसेच परत आलात हात हलवत. एकादी कोंबडी, चार अंडी पण आणता आली नाहीत? काय समजून आलात, की मी खूश होईन? अरे इथून पन्नास पन्नास घरापर्यंत, कधी कोणाची कोंबडी चोरली तर लोक म्हणतात 'अरे बब्बन बोंडेचोर आला', आणि तुम्ही? माझी सगळि इज्जत धुळीत मिळवलीत. एक कोंबडी चोरता आली नाही तुम्हाला.
विनय
विनय
विनय
मस्तच!
: कितली
: कितली माणसं होती?
: दोन सरदार.
: अरे मग त्यानी तुमका विनोद सांगल्यान की काय?
: नाही, ते दोन होते , तुमका सरदार म्हणालो.
: ते दोन आणि तुम्ही तीन. तरी तसेच परत इलात हात हलवत. एकादो कोंबो, चार अंडी पण हाडुक गावली नाय? काय समजलास, की मीया खूश होतलय? अरे इथून पन्नास पन्नास घरांपातुर, कधी कुणाची कोंबडी चोरली तर लोक म्हणतत 'अरे बब्बन बोंडेचोर इलो', आणि तुम्ही? माझी सगळि इज्जत धुळीत मिळवलीत. एक कोंबडी चोरुक आली नाही तुमका.
बहुतेक नापास.
दुसर्या कुणीतरी सोडवा हा पेपर
गुरुजी विमान खाली आले. आता परत पहील्या पासुन सुरुवात करावी लागणार असे दिसतेय.
: कितली
: कितली माणसा होती?
: दोन सरदार.
: अरे मग त्यानी तुमका विनोद सांगल्यान की काय?
: नाही, ते दोन होते , तुमका सरदार म्हणलंय.
: ते दोन आणि तुम्ही तीन. तरी तसेच परत इलात हात हलवित. एकादो कोंबो, चार अंडी पण हाडुक गावली नाय? काय समजलांस, की मीया खूश होतलंय? अरे इथून पन्नास पन्नास घरांपातुर, कधी कोणाची कोंबडी चोरली तर लोक म्हणतत 'अरे बब्बन बोंडेचोर इलो', आणि तुम्ही? माझी सगळी इज्जत धुळीत मिळवल्यान. एक कोंबडी चोरुक आली नाय तुमका.
माका ह्या वाटता..
मालवणीत्सून कुणाक नाही असो स्पष्ट बोल्लेलो आईकलंय नाय ... नाय
****************
पानावरती कितीक मजकूर शब्द नव्हे ती किटकिट रे...
कित्याक रे
कित्याक रे सतिषा.. तुझोच पेपर कॉपी करूक घावलो माका.
****************
पानावरती कितीक मजकूर शब्द नव्हे ती किटकिट रे...
मी अश्या
मी अश्या विचारात होतंय...
:किती झिलगे होते? (तरूण माणसे)
:अरे मग तेणी तुमका विनोद सांगल्यानी की काय?
:नाय, ते दोन होते , तुमका सरदार म्हटलंय...
:चार कवटां पण हाडुक गावली (अंडी पेक्षा मालवणी शब्द).
:माझी सगळी इज्जत धुळीत मिळवल्यात
बाकी बरोबर (सतीशचे चुके डॅफोन काडलेले आसत)...
: ह्याची सजा द्यायला हवीच.
: अरे मा..... सांबा. किती शिव्या येतात रे मला?
: सरदार, हजार दोन हजार...
: सरदार? मला बबन्या म्हण, बोंडेचोर म्हण पण सरदार म्हणू नको.
: बबन्या तुझं मीठ खाल्लंय.
: रोज कोंबडीवडे खातोस आणि तुला फक्त मीठ आठवतंय? आता शिव्या खा.... कुठली शिवी मी कुणाला घालेन काय सांगता येणार नाही..
विनयांनु,
विनयांनु, 'मालवणी शोले'
अरे हा...
अरे हा... अंड्यांना तांटी पण म्हणतंत ना.. कॉपी करूच्या भानगडीत नजरचूकीनं मिया मिसलंय ते.
: ह्येची सजा देवक होयीच.
: अरे मा..... सांबा. किती गाळ्यो येतंत रे माका ?
: सरदार, हजार दोन हजार...
: सरदार? माका बबन्या म्हण, बोंडेचोर म्हण पण सरदार म्हणा नको.
: बबन्या तुझा मीठ खाल्लंय.
: रोजच्याला कोंबडीवडे खातंस आणि तुका फक्त मीठ आठवतां? आता श्या खा.... खैची गाळी मी कुणाक घालीन काय सांगता येणा नाय..
****************
पानावरती कितीक मजकूर शब्द नव्हे ती किटकिट रे...
>>'मालवणी
>>'मालवणी शोले'
मालवणी निखारे म्हण गो!
आयटे डॅफो
आयटे
श्या न्हय गाळ्ये/ गाळी

डॅफो
द्याया व्हयीच = देवक होयीच
तांटी नया नाव ऐकलय..
बोंडेचोर
एडीटलय गो
एडीटलय गो भावना.
****************
पानावरती कितीक मजकूर शब्द नव्हे ती किटकिट रे...
रोज
रोज कोंबडीवडे खातंस आणि तुका फक्त मीठ आठवता? आता गाळी खा.... खैची गाळ मी कुणाक घालीन काय सांगता येणा नाय..
विनय
मस्तच. आता
माXXX
निलु माजी
निलु
माजी आवस कदी चिडली काय म्हणा 

आजुन एक एकदम वापरातलो शब्द = आवशिक खाव व्हरान
नीलूताय,
नीलूताय, भावना

कोकणी गाळीये हो एक करमणूकीचो विषय आसा नाय?
जीवा
जीवा सकाळीच घाटी चढून वाटेला लागला. सुर्य वर यायच्या आधी त्याला शेतावर पोहोचायचे होते. एवढ्या पहाटे तो शेतात जात नसे, पण दुपारी शिकारीला जायचा विचार होता. पहाट असल्याने आजूबाजूला कुणाचाच आवाज नव्हता. त्यामुळे कमरेला अडकवलेला कोयताच काय तो चालण्याच्या तालावर 'लपाक लपाक' वाजत होता. आज सकाळीच करवंदाची आणि तोरणांची झुडपं तोडून तो कुंपणाची सोय करणार होता. आता चार पावलांवर 'तळी'. डोंगर उतारावरचे पाणी सगळं इथे जमा होत असे. त्यामुळे जीवाच्या शेतालाही पाणी मिळत असे. तळी म्हटल्यावर मात्र त्याचं लक्ष गेलं. कुठून तरी गुरगुरण्याचा आवाज आला....
जीवा
जीवा फाटफटीक (?) घाटी चढान वाटेक लागलो. निबार जावुच्या आत त्येका शेतार पोहचुचा होता. इतक्या बेगिना तो शेतार जात नसे, पण दोंपारा पारधीक जावुचा विचार होतो. पहाट असल्यान आजूबाजूक कसलोच आवाज नव्हतो. त्यामुळे कमरेक अडकवलेलो कोयतोच काय तो चालण्याच्या तालार 'लपाक लपाक' वाजत होतो. आज सकाळीच करंदाची आणि तोरणांची झुडपा तोडून तो वईची (?) सोय करणार होतो. आता चार पावलांवर 'तळी'. डोंगर उताराचा सगळा पाणी हय जमा होता. तेच्यातसुन जीवाच्या शेताकही पाणी मिळा. तळी म्हटल्यार मात्र त्याच्या ध्यानात इला. खयसुन तरी गुरगुरण्याचो आवाज इलो....
===================
कठीण आहे. pha मालवणी शब्दकोषाचे काय झाले ? माझा निम्मा उतारा तर मराठीच आहे.
एकादा
एकादा कुत्रा असेल तिथे म्हणून जीवाने दगड उचलला. 'पटकीचा रोग यावा या कुत्र्यावर?' तो मनाशीच म्हणाला. वळणावर पोहोचताच त्याला कुत्रा दिसला. त्याच्या पेकाटात लाथ घालावी की हातातला दगड भिरकावून मारावा हे ठरेपर्यंत त्याचं लक्ष तळीवर गेलं. एक रानडुक्कर तिथे पाणी पीत होता. हातातला दगड तसाच धरून जीवा बघत राहीला. डुक्कर म्हटल्यावर त्याला वडे-मटण दिसायला लागले. 'मटण खाऊन बरेच दिवस झाले. हल्ली शिकारीला कोणी जात नाही, आणि गेले तरी मटण कोणी आणून देत नाही.'
एकादो सुनो
एकादो सुनो थय असतलो असा म्हणान जीवान गुंडो उचल्यान. 'पटकी होवुक व्हयी या कुत्र्यार?' तो मनाशीच म्हणालो. वळणार पोहोचल्यार त्याका कुत्रो दिसलो. त्याच्या पेकाटात लाथ घालु की हातातलो गुंडो फेकुन मारुचो ह्या ठरेपर्यंत त्याचा लक्ष तळीर गेला. एक रानडुक्कर थय पाणी पीत होता. हातातलो गुंडो तसोच धरून जीवा बघत रव्हलो. डुक्कर म्हटल्यार त्याका वडे-मटण दिसाक लागला. 'मटण खाऊन बरेच दिस झाले. हल्ली पारधीक कोणी जाणा नाय, आणि गेले तरी मटण कोणी आणून देणा नाय.'
===================
कुत्र्याला कुत्रो तसेच सुनो म्हणतात ना ?
सुनो?? कदि
सुनो?? कदि ऐकाक नाय.
गुंडो म्हणतत.
फटकेचो वाको येंवदे ह्या कुत्र्यार.
भाषांतरात मराठीचो वापर जास्ती झालो हा.. आजुन प्रयत्न होयो.
भाषांतरात
भाषांतरात मराठीचो वापर जास्ती झालो हा.>>> म्हणून मिया घाबरतंय हय प्रयत्न करूक.
माका तर काही एक कळणा नाय.
डॅफो अगो
डॅफो अगो म्हणान घाबराचा कित्याक? चुकलव तरच कळतला मा पुढे तसा करुचा नाय ह्या.
सुनो.. गोव्याकडल्या भागात बोलत आसतित.. मगे माकाव एक नयो शब्द कळलो तर!
dog in konkani language --
dog in konkani language -- sunnem
>सुनो?? कदि
>सुनो?? कदि ऐकाक नाय.
सुणें हो शब्द आसा, पण तो कारवारीत. कुत्र्याक सुणें म्हणतत.
विनयांनु...
विनयांनु... सहिये
कोयत्याने
कोयत्याने रानडुक्कर मारता येणार नव्हता. गावात जाऊन कुणाला बोलावून आणणेही शक्य नव्हते. मटणाच्या आशेने तोंडात पाणी आलेले असले तरी एकट्याने रानडुक्करासमोर जायच्या कल्पनेने तोंडचे पाणी पळाले होते. शेवटी धीर करून जीवा पुढे झाला. लपत छपत का होईना तो डुक्कराच्या बरोबर मागे आल आणि पाठच्या दोन तंगड्या उचलून त्याने घट्ट धरून ठेवल्या. अचानक झालेल्या हल्यामुळे डुक्कराचे नाक पाण्यात गेलं. नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा श्वास गुदमरला असावा. पुढचे दोन पाय चिखलात असल्याने त्याला काहीच करता येईना.....
कोयत्यान
कोयत्यान रानडुक्कर मारुक जमला नसता. गावात जाऊन कुणाक बोलावून आणुचाही शक्य नव्हता. सागोतीच्या आशेन तोंडात पाणी इला असला तरी एकट्यान रानडुक्करासमोर जावुच्या कल्पनेन तोंडचे पाणी पळाले होते. (मालवणीत काय बोलतात ?) शेवटाक धीर करून जीवा पुढे झालो. लपान छपान का होईना तो डुक्कराच्या बरोबर मागे इलो आणि पाठच्या दोनव तंगडे उचलान त्याने घट्ट धरले. अचानक झालेल्या हल्यामुळे डुक्कराचा नाक पाण्यात गेला. नाकातोंडात पाणी गेल्यान त्याचो श्वास गुदमरलो असतलो. पुढचे दोन पाय चिखलात असल्याने त्याका काहीच करुक येईना.....
===================

डुक्कराचे नाक पाण्यात गेलं. नी मायबोलीवर शिकवणी लावुन देखिल मालवणी शिकायला न आल्याने कोकणी फकाणे गृपचे नाक कापले गेले.
या शनिवारी मी गावी चाललोय. वाटल होते, यंदा फाडफाड नाही पण तोडक मोडक मालवणी बोलता येईल. पण या ऊतार्यात तर माझ्याकडुन मराठीचाच भरणा जास्त झालेला दिसतोय. कठीण आहे.
Pages