Submitted by नीलू on 27 January, 2009 - 04:31
मालवणी शिकायचंय? थोडं थोडं येतंय पण आठवत नाहीये? इथे विचारा. किंवा तुम्हाला छान बोलता येत असेल तर इतरानाही सांगा.
या अगोदरचं मालवणी भाषेबद्दलचं हितगुज इथे पहा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मास्तर
मास्तर पोरा धारणा म्हणजे काय ता विचारतत काय ता सांगा त्यांका. माकाव ठावक नाय.
आज बुधवारचे बांगडे हाडलास बरा हा.
त्या
त्या स्वयंपाकाच्या वर्णनान माका आजोळची चूल आणि तिच्यावरचो स्वयंपाक आणि गाबतीण घरां येई, तां सगळा आठावल्यान
मस्त वाटलां 
वायलांवरच
वायलांवरच्या टोपातसून रोवळेतल्या तांदळात >>>>
**** वरच्या टोपातुन **** तांदळात तिने उकळते पाणी ओतल्र. मग जरा तांदुळ धुवुन घेतले. आता मुलगे यायची वेळ झाली. भुक लागली, भुक लागली करणार. चुलीवर भात लावुन ती वाटप वाटायला बसली (ते ओला मसाला दगडी पाटावर वरवंट्याने कूटतात). कोळीण बांगडे न देता गेली तर आमटीची पंचायत होणार होती....
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा
वायल
वायल म्हणजे कदाचित मांडणी असावी
सतिश रोवळी म्हणजे तांदूळ पोहे धुण्यासाठी वापरतात ती चाळणी
चुल
चुल पाहिलेय ना? चुलीवर काही शिजवायला वगैरे ठेवलं की बाजुलाच मुख्य चुलीतली आग तिकडे जावुन तिथुनहि ज्वाळा बाहेर येतात ते 'वायल' त्यावर पाणी वगैर तापवण्यासाठी आपण ठेवु शकतो. रोवळी बरोबर.
अच्छा
अच्छा म्हण्जे ४ बर्नर वाल्या चुलीचे मागचे २ बर्नर (भिंती जवळचे ) बरोबर ना
गोखा घेवान
गोखा घेवान तो फुलां काडुक गेलो. हातातली परडी बावीच्या काठार ठेवान तेणां हळूच चार पाच जांस्वदीचे कळे काडले. कवठी चाफ्यार मात्र हुमल्यांची रांग लागलेली. फांदी हलवन बगल्यार हुमले आंगार पडतले. मग लांब उभो रवान तेणां चाफ्याची फांदी वाकयली आणि चाफो परडेत टाकल्यान. आज इतकी फुलां पुरे. कालची केगदां देवाक घालूक होतीच..
विनय
**** घेवुन तो
**** घेवुन तो फुले काढायला गेला. हातातली परडी विहीरीच्या काठावर ठेवुन त्याने हळूच चार पाच जांस्वदीच्या कळ्या काढल्या. कवठी चाफ्यावर मात्र लाल मुंगळ्यांची (बरोबर का ?) रांग लागलेली. फांदी हलवुन बघितल्यावर मुंगळे अंगावर पडणार. मग लांब उभा राहुन त्याने चाफ्याची फांदी वाकवली आणि चाफा परडीत टाकला. आज इतकी फुले पुरे. कालची **** देवाला घालायला होतीच..
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा
गोखा
गोखा [पर्यायी.. गका,गखा= लांब काठीक एका टोकाक विटीसारखी छोटी काठी लघुकोनात बांधतत नायतर चिव्याची आदीच त्या स्वरुपातली काठी पालो काढून तासून गोखा बनवतत.]
केगद्याची
केगद्याची फुलां म्हणजे हो कसली काका? कोरांटी काय?
केगदा ऐकलय
केगदा ऐकलय खरा.. केवड्याची फुला??
आयटे कोरांटीची फुला काय सुंदर आसतत नाय? रंगव येगयेगळे आसतत. मिया वळयसार बनय आबोली घालुन.. बरो होय.
होय गो,
होय गो, सगळीच सुंदर दिसतत अगदी.. जांभळी तर माका भारी आवाडतत..
भावनान
भावनान बरोबर सांगल्यान केवड्याची . बोणगीची सुद्धा तशीच आसतत पण वास कमी.
वळेसार
वळेसार म्हणजे गजरा
फाटी घेवान
फाटी घेवान ते कुंभाराकडे गेले. तिनसांज पर्यंत श्या-शंभर नळे आणुचे होते. मिरगाच्या आदी ह्यां काम पुरां होवक होयां. यंदा हुपियानी धुमशाण घातलां. केळी खावक येतत पण एका उडकेत चार दोन नळे फोडल्याशिवाय रवणत नाय. घराची निसती चाळण केल्यानी. उद्या मिरग कोसळाक लागलो काय घारात रवाक नको होतालां. शिरां पडो त्या हुपियांर.....
विनय
पाटी घेऊन
पाटी घेऊन ते कुंभाराकडे गेले. तिन्हीसांजेपर्यंत शंभर एक कौलं आणायची होती. मृगाच्या आधी हे काम पुरं व्हायला हवं. यंदा मोठ्ठ्या वानरांनी धिंगाणा घातलाय. केळी खायला येतात आणी एका उडीत चार दोन कौलं फोडल्याशिवाय रहात नाहीत. घराची नुसती चाळण केलीये. उद्या मृग कोसळायला लागला तर घरात रहाणं मुश्कील होईल. वाईट्ट आहेत मेली ही माकडं....
फाटी म्हणजे ? ?
नळे म्हणजे घराची कौलंच ना ?
हुपियो म्हणजे मोठ्ठी माकडं आणि केडलां म्हणजे पण माकडंच ना ?
शिरां पडो ह्यो एक वाक्यप्रचार हयसरच खयतरी वाचलेलो.. शब्दशः अर्थ लिवाक जमलो नाय्..पण कुणाचा वाईट होवो अश्याच काय तां...
काय तां बराबर सांगा मास्तरानु
१०० पैकी
१०० पैकी १०० गो डॅफो!
फाटी म्हणजे ? ? मोठी टोपली असते...
नळे म्हणजे घराची कौलंच ना ? हो
पाननीनी
पाननीनी वाट, खरां तर जवळची वाट. रस्त्यान धा मिन्टा लागली तर पाननीतसून गेल्या तीन चारात भागतलां. पण पानन झालीया बेणूक. करनीचे काटे, तोरणाचे झाळी, खंय घाणेरिचे फांदीये. दिवसा गेल्यार पण भ्याव वाटात अशी परस्थिती. पायाबुडि कमारभर वाड्लां गवात. सरडो जरी सुळसुळलो तरी जीव अर्दो जाता. आणि आता तीनसान झाली. आता तर त्या वडा खालसून जावची भीती. आयतवारा भगताची सून 'देवचार देवचार' म्हणान धावत इली. नको बाये, मिंया काय नाय आज रवतंय. उद्या कोंब्यार लात मारून जायन....
बेणुक = रान,
बेणुक = रान, काटेकुटे ,पालोपाचोळो साफ करणा.
करनीचे = करवंदीचे.
तोरणा= याक गोड सोनेरी बारीकश्या बोरासारक्या पिठूळ फळ.
झाळी=दाट झुडूप.
घाणेरी = याक झुडुप.घाण वासाची फुला येतत .
गवात= गवत.
तीनसान= कातरवेळ, तिन्हिसांजा.
काका, बरे
काका, बरे आसात मां हो?
काका, अहो
काका, अहो तो गॄहपाठ होतो.. हेडमास्तर सवताच गॄहपाठ करूक लागले तर पोरांनी काय करूचा
मास्तरान प्रश्न घातले, आता पोरां उत्तरा देतली म्हणान, तर हेडमास्तर सवताच सगळी प्रश्नपत्रिका सोडवन मोकळे... (घराक गेले का काय?)
विनय
हेडमास्तर
हेडमास्तरच बरे आसत आपले. मदत करतत गृहपाठात
देसायानु
देसायानु
ह्यो गॄहपाठ वायच अवघड हा.. आमका तर सारेच शब्द नव्ये.
तरी बरा ह्या मास्तरान्नीच अर्धो सोप्पो उलगङो केल्यान..
ह्या पाननी काय आसत ?
**** वाट, खरं तर जवळची वाट. रस्त्यानं दहा मिनिटे लागली तर ***तून गेल्यावर तिन चार मिनटात भागेल. पण ***(पायवाट) साफसूफ करायला झालिये. करवंदाचे काटे, तोरण्याची झुडपं, कुठेतरी घाणेरीच्या फांद्या. दिवसा जाताना पण भिती वाटेल अशी परिस्थिती. ***(पायाबुडि) कमरे एवढे गवत वाढलेले. सरडा जरी सुळसुळला तरी अर्धा जीव जातो. आणि आता तिन्हीसांज झाली. आता तर त्या वडा खालून जायची भीती. रविवारी भगताची सून 'देवचार देवचार' धावत आली. नको बाई, मी काही नाही आज रहातो/ते . उद्या **वर (कोंब्यार) लाथ मारून जाईन....
पाननी =
पाननी = पाणंद गं. पायवाटच.
पायाबुडी= पायाखाली.
कोंब्यार = कोंबड्यावर? की घराबाहेर एक दगड असतो त्याच्यावर?
अरे वा
अरे वा शाळा मस्तच चल्ली हा. एक मास्तर नी दोनच विद्यार्थी

बाकी मास्तरांची गाडी मातर एकदम फॉर्मात आसा
'कोम्ब्यार
'कोम्ब्यार लात मारून' सकाळीच आरवतो तो कोम्बडा..
वाक्यप्रचाराचा अर्थ पहाटे, किंवा ऊठल्या ऊठल्या...
पानन = पाणंद.. किंवा पायवाट...
देवचार = एका प्रकारचे भूत,....
विनय
ओह! हो
ओह! हो वाक्प्रचार नाय ऐकूक होतय मी...
अरे विनय,
अरे विनय, शिकवताना कठीण शब्दाचे अर्थ मास्तरान सांगूक नको काय?
शिकवताना
शिकवताना कठीण शब्दाचे अर्थ मास्तरान सांगूक नको काय???? ---
पण जरा प्रयत्न केल्यार.. उत्तरपत्रिका फोडल्यार गॄहपाठ कसलो...
विनय
म्हणजे
म्हणजे शिकवच्या आधीच परीक्षा ?
Pages