आमीर खानचा आकाश मल्होत्रा vs. रँचो उर्फ फुनसुख वांगडू

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

परवा सहज कुठल्यातरी संभाषणात आमीर खानच्या 'दिल चाहता है' आणि 'थ्री इडियट्स' मधल्या रोल्स ची तूलना केली गेली .. तर असा एक पोल घ्यावा असं वाटलं .. (हा प्रश्न 'प्रश्न' मध्ये विचारला तर चालेल का?)

आमीर खानचा कुठला रोल तुम्हाला जास्त आवडतो?

'दिल चाहता है' मधला आकाश की 'थ्री इडियट्स' मधला रँचो उर्फ फुनसुख वांगडू?

(बरेच लोक थ्री इडियट्स मधला रँचो असं 'अकॅडेमीक' उत्तर देतील असं वाटतंय तर दुसरा प्रश्न आहे की ) ह्यापैकी कुठलं कॅरॅक्टर मुलींनां जास्त आवडेल असं तुम्हाला वाटतं?

(दोन्ही प्रश्नांची उत्तरं द्या शक्य असेल तर .. :))

प्रकार: 
शब्दखुणा: 

आमीर खानच्या २ कॅरॅक्टर्समधील एक निवडायचं? अरे बापरे.
पण मला 'थ्री इडियट्स' मधला रँचो उर्फ फुनसुख वांगडू जास्त आवडतो. कारण "क्युट अँड गीकी" हा माझा आवडता टाईप Happy
पण बर्‍याच मुलींना आकाश जास्त आवडेल असं वाटतंय कारण तो कूल वगैरे पण आहे.

आमच्या कॉलेजात ब्रम्हदेव नावाचा मुलगा होता, त्याला माहीती होते कोणा मुलीला कोण अ‍ॅक्टर आवडतो ते. Proud

उत्तर: कधीही कुठल्याही वेळेला "आकाश" हेच कॅरॅक्टर म्हणून पळेल. Happy

बरं हा पोल घेवून पुढे काय करणार(ह्या माहीतीचे)? लोणच्याचा सिझन संपत आलाय तसा, जागू पण आधीच लोणचे घालून राहिलीय. Wink

वांगडु कॅरॅक्टर जास्त कॉलेज क्रश टाइप अपिल होणारं वाटतं :).
कायम काही तरी 'हटके' करणारा, रँगिंग घेणार्‍या सिनिअर्स ना धडा शिकवणारा जुनिअर, खडुस प्रोफेसर्स ना चॅलेंज करणारा, एवढं सगळं करून पहिला येणारा हॅन्डसम हंक :). अजुन काय पाहिजे !.
आकाश ची उजळाणी करायला हवी परत त्याच्या विषयी लिहिण्या आधी :).

बरं हा पोल घेवून पुढे काय करणार(ह्या माहीतीचे)?

>> उद्देश लोकांनां (आणि मुलींनां) कोण जास्त आवडते हे जाणून घेणे आणि पुढे मागे कुठल्या संभाषणात गरज पडली तर evidence-based conviction देता येईल .. Wink

प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!

मुलांनो,
तुम्ही क(ट)रिना Vs करिना पोल घ्या, इथे वांगडु कि अकाश राहु द्या Proud
( मग आम्ही तिथे असंबध्द उत्तर देउ कि मुलांना काय कोणीही आवडतं पण मुलींना ह्रितिक-जॉन आवडतात.)

Go DJ! :p

ईशा, अगं मला प्रश्न ह्या दोन कॅरॅक्टर्स बद्दल आहे .. (कारण आमीरच्या रोल्स पैकी हे दोन माझे सर्वांत आवडते म्हणून)

आकाssssssssssssssssश Proud

जोक्स अपार्ट, मला ह्या दोन्ही रोल्सपेक्षा त्याचा सरफरोश मधला रोल फार्फार म्हणजे फारच आवडतो.

सिंडरेला, सरफरोश मध्येही मस्तच आहे त्याचा रोल लेकीन वो थोडा सिरीअस और शर्मिले टाईप का है .. इन दोनोंकी बात ही कुछ अलग है!

पण रँचो ला मुद्दाम थोडा गबाळा दाखवलाय ना, गीकी दिसण्यासाठी? अ‍ॅक्च्युअली, गीकी शब्द बरोबर नाही .. 'I care less!' हा अ‍ॅटिट्युड दाखवण्यासाठी ..

उत्तर १ : फुनसुख वांगडू उर्फ रँचो Happy

रच्याकने, IMO थ्री ईडियटस मधला आमीर दिल चाहता है पेक्षा गोबरा, गोंडस दिसतो.

उत्तर दोन : मुलींना कुणीही चालेल बहुतेक, बायकांना दोघेही वाह्यात वाटण्याची शक्यता आहे Proud

श्री Lol

माझं वोट आकाशलाच. ३ इडियट्स मध्ये त्याचा रोल त्यानी चांगला केलाय. आपण सिनेमा बघताना विसरायला होतं की तो १८-१९ वर्षांचा नसून ४२-४३ वर्षांचा आहे ते. ह्याला कारणीभुत थोडीफार त्याची अ‍ॅक्टिंग असली तरी जास्त सिनेमाचा कॉन्सेप्ट आणि डायलॉग्स वगैरे.

आकाश म्हणून अमिर इतका सहज वावरलाय, एकदम शोभून दिसतो बडे बाप की बिगडी हुई औलाद! एकदम मस्त काम!

मुलींना कोण आवडेल त्याबद्दल श्री म्हणतो तसच. Proud

आऽऽकाऽऽऽश He is mean (hence has great sense of humor) Proud
सशल खास असे (निरर्थक) प्रश्न विचारण्यासाठीच तर नवीन प्रश्न ही सुविधा दिली आहे ना मायबोलीने, जिथे लोकांच्या प्रतिसादाला मत पण देता येते. मग असा धागा का. Happy

अगं रुनी, मला वाटलं ज्यांनां खरोखर मदत हवी असते, non-trivial प्रश्न पडतात त्यांच्यासाठे योग्य आहे ती सुविधा .. पण माझा प्रश्न/पोल काही एव्हढा महत्वाचा नाही म्हणून माझ्या रंगीबेरंगीवर लिहीलंय ..

आकाश आकाश आणि आकाशच!
ब्रॅश, मीन, अ‍ॅट युअर फेस, तरीही कनफ्युज्ड! तो नॅचरल आणि बिलिव्हेबल आहे.
रँचो इज सुपरमॅन अँड दे डोंट एक्झिस्ट!

नवरा म्हणतो आकाश..

कॉलेज कुमारच घ्यायचा तर मग दिल है की मानता नही, दिल (अरारा), जो जिता वही सिकंदर, QSQT वगैरे का नाहीत?
हम है राही प्यार के, रंगीला, अंदाज अपना अपना ...

मी DJ बरोबर - जॉन Wink

छान आहे ................मी आकाश ला मत देइन..........

आता सगळ्यात वाईट चित्रपट कोणता म्हणुन ही धागा काढा.......... Happy
\
चला मीच काढतो.......

कधीही आकाश मलहोत्रा ! Happy

"ब्रॅश, मीन, अ‍ॅट युअर फेस, तरीही कनफ्युज्ड! तो नॅचरल आणि बिलिव्हेबल आहे."
आगाऊला अनुमोदन..
आणि ब्रॅश, मीन जरी असला तरी सेकंड हाफ मध्ये जो आकाश साकारलाय तो निव्वळ अप्रतिम ! खरंच नॅचरल आणि बिलिव्हेबल.. Happy

Pages