१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
आमचूर आणि आमसुल पदार्थात
आमचूर आणि आमसुल पदार्थात आंबटपणासाठीच घालतात.
मागे मी भुसावळच्या एकाकडून आमसुल मागवलेले तर त्याने कैरीच्या वाळवलेल्या फोडी आणून दिल्या होत्या.
ओके. धन्यवाद मानुषी, दिनेशदा,
ओके. धन्यवाद मानुषी, दिनेशदा, प्राची. प्राची, मी अजून नागपूरला एकदाही गेले नाहीये हां!
हो दिनेशदा पाहिलं
हो दिनेशदा पाहिलं लोणचं....आता जाईल नव्या डायरीत! धन्यवाद!
आमचूर आणि आमसुल पदार्थात
आमचूर आणि आमसुल पदार्थात आंबटपणासाठीच घालतात >>> आमसुलाने पित्त शमते तसे आमचुराने होत असेल असे वाटत नाही. तुरीच्या वरणात आमसूल त्यासाठीच घालतात.
हो सिंडरेला. आमसूलाचा
हो सिंडरेला. आमसूलाचा पित्तनाशक गुण, आमचूरात नसतोच. आमसूल / कोकम आधी परदेशी मिळत नसे. पण गल्फमधे आंबाडीच्या बोंडांच्या पाकळ्या, त्याला पर्याय म्हणून वापरता येतात. (तिथे त्याला करकाटे म्हणतात.) पण पदार्थ शिजवताना त्या वापरता येत नाहीत. फक्त सरबत करता येते. केवळ गल्फ मधे नाही तर इतर आफ्रिकन मुसलमान देशात पण (उदा. सुदान, इजिप्त, नायजेरिया ) त्या वापरतात. रोजे सोडताना, त्याचे सरबत पितात.
बरीच माहिती मिळाली. सर्वांना
बरीच माहिती मिळाली. सर्वांना धन्यवाद!! ज्वारीचे पीठ संपवायचे आहेच .. गुड.
ज्वारीचे पीठ संपवायचे आहेच
ज्वारीचे पीठ संपवायचे आहेच >>> ऑ???
मला पाठवून दे ग... सोलापूरहून आणलेस का? तर नक्कीच पाठव
होय होय -------- बस्के, आभार
होय होय
.. दरवेळी थोडे टाकते मी कासकेड बरोबर.
--------
बस्के, आभार आभार आभार!!! लेमी शाईन काम करतय. स्टीलची चकाकी परत आली आहे.
भिजवलेली कणीक फ्रीज मध्य
भिजवलेली कणीक फ्रीज मध्य ठेवली की ती एका दिवसात -काळी पडते. अस का होतय? यावर उपाय काय??
धन्यवाद, मिनोती.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/25385 इथे कळेल ...
सुनिधी, वेलकम.. गल्ली चुकली
सुनिधी, वेलकम..
गल्ली चुकली पण तुझी बहुतेक..
माझ्याकडे जी साखर आणली गेली
माझ्याकडे जी साखर आणली गेली आहे तिला गोडेतेलाचा वास येतोय ...दुकानातूनच घेताना न पहाता घेतल्याने सगळा गोंधळ झालाआहे. ती साखर कशातही घाला इतका उग्र वास येतोय ..आणूनही खूप दिवस झालेत मी सध्या माहेरी असल्याने दुकानदाराकडे जाऊन परत करायचे कष्ट नवरोबा करणार नाहीत याची खात्रीच आहे. साखर जवळ जवळ २ किलो आहे काय करू? उपाय सुचवा...
मदत! मदत! मी काल लेकाच्या
मदत! मदत!
मी काल लेकाच्या वाढदिवसानिमित्त केक केला आणि त्यासाठी भरपू sssर व्हीप्ड क्रीम फ्रॉस्टींग केलं. केक वर भरपूर चोपडून देखील खूप उरलयं. ते फ्रीझर मध्ये टाकलं तर चांगलं राहील का? शनिवारी एका पार्टीला जायचयं तेव्हा काहीतरी वापर करता येईल. पण मुख्य प्रश्न ते राहील का अजून ४ दिवस? कशा पद्धतीने ठेवू? फ्रीज मध्ये की फ्रीझर मध्ये?
मला पण मदत पायजे! मी काल
मला पण मदत पायजे!
मी काल भोपळी मिरच्यांची भाजी केली, कांदा-टोमॅटो घालून. शेंगदाण्याचं कूटही घातलं. बाकीच्या सगळ्या पदार्थांची चव व्यवस्थित मुरलिये भाजीत, पण भोमिच भयाण कडू आणि उग्र लागतेय.
एरवी कधी अशी बिघडली नव्हती.
थालिपीठ करणे इ. उपाय सोडून भाजी आहे ती भाजीच ठेवायची आहे, तर काय भर घालू म्हणजे भोमिचा उग्रपणा आणि कडवटपणा जाईल? गूळ आणि काळा मसाला घातलाय भाजीत.
सावनी, त्याचे आइसक्रीम केले
सावनी, त्याचे आइसक्रीम केले तर चांगले.
प्रज्ञा. कधी कधी मिरच्या कडू निघतात. थोडी भाजी वेगळी काढून त्यात उकडलेला बटाटा घालून चव सुधारतेय का ते पहा. सुधारली तर बाकीच्या भाजीवर प्रयोग करायचा.
अशा मिरच्या कापतानाच वेगळा वास येतो. या मिरच्यांची टोके आतल्या बाजूला वळलेली नसतात तर बाहेर आलेली असतात. पण हा फक्त एक आडाखाच.
थँक्यू दिनेशदा. करून बघते.
थँक्यू दिनेशदा. करून बघते.
माझ्याकडे चेरिज चा डबा (सिरप
माझ्याकडे चेरिज चा डबा (सिरप व काही फ्रेश चेरीज) फोडल्यानन्तर थोडे वापरले व बाकी उरले आहे तसेच क्रिम पण उरले आहे. दर वेळेस केक केल्यानन्तर हे उरते..त्याचे काय करता येइल?
फ्रूट सलादमध्ये वापरता येईल.
फ्रूट सलादमध्ये वापरता येईल.
काल घरी ३ डझन पायरी आंबा
काल घरी ३ डझन पायरी आंबा आणलाय.. खुप आंबट आहे
काय करता येइल 
काल घरी ३ डझन पायरी आंबा
काल घरी ३ डझन पायरी आंबा आणलाय.. खुप आंबट आहे काय करता येइल >> नावडत्या पाहुण्यांना आग्रहाने बोलव, या आंबट आंब्यांचा रस काढून आग्रह करून करून जेवू घाल...
सुमेधा, चेरी पाय, चेरी जॅम
सुमेधा, चेरी पाय, चेरी जॅम करता येइल. किंवा चेरी चे तुकडे आणि सिरप + साखर घालुन पाक कर आनि कोरड्या बाटलीत भरुन फ्रिज मधे ठेव. पुढे आईस्क्रिमवर टॉपिंग म्हणुन वापरता येइल. यात प्रिझर्वेटीव्ह्ज घातले तर जास्त टिकेल. दिनेशदा सांगतिल या बद्दल जास्त
वर्षा, सारेच आंबे आंबट आहेत?
वर्षा, सारेच आंबे आंबट आहेत? झालेही नसतील कदाचित पूर्ण पिकून. एरवी हापूसचा रस वाढवायला पायरी टाकतो, तू हापूसने वाढवशील का? रस काढून त्यात साखर थोडे दूध घालून मिक्सरमधून फिरव. खाता तरी येईल.
नावडत्या पाहुण्यांना आग्रहाने
नावडत्या पाहुण्यांना आग्रहाने बोलव, या आंबट आंब्यांचा रस काढून आग्रह करून करून जेवू घाल... >> दक्षे ये(च) उद्या माझ्याकडे जेवायला
एरवी हापूसचा रस वाढवायला
एरवी हापूसचा रस वाढवायला पायरी टाकतो, तू हापूसने वाढवशील का? >> काल पाहुने येणार म्हणुन आणल होता.. पण आंबट असल्यामुळे बेत बदलला... पाहुण्यांनी हापुस आणला आहेच.. तेव्हा दोन्हीचा मिळुन रस करणे हा ऑप्शन छान
काल घरी ३ डझन पायरी आंबा
काल घरी ३ डझन पायरी आंबा आणलाय.. खुप आंबट आहे <<< रस काढ...उकळ...साखर घाल... सरबत कर
आशुदी दुध घातले तर नासणार
आशुदी दुध घातले तर नासणार नाही का आंबा खुप आंबट असेल तर???
रस काढ...उकळ...साखर घाल...
रस काढ...उकळ...साखर घाल... सरबत कर >>> याचे फ्रोजन प्रकरण करता येइल का काही
नक्कीच... सरबत कॉन्संट्रेट कर
नक्कीच... सरबत कॉन्संट्रेट कर आणि आईस क्युब्ज कर. झाल्या की वेगवेगळ्या झिप लॉक बॅग्ज मधे घालुन ठेव. पाहिजे तेव्हा १-२ क्युब्स घाल + गार पाणी.. सरबत तय्यार
यात हवे तर २-४ हापुस आंब्यांचा रस पण घाल म्हणजे स्वाद चांगला येइल 
ही आयडिया भारिये धन्स जो
ही आयडिया भारिये

धन्स जो
आंबटपणामुळे दूध नासण्याचं
आंबटपणामुळे दूध नासण्याचं माझ्या लक्षात आलं नव्हतं.. पण आंबा बाधू नये म्हणून आपण थोडे रसात टाकतो तसे म्हणाले मी. ते आता वर्षालाच बघावे लागेल.
Pages