Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21
निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....
आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शोभा काही काळजी करु नको मी
शोभा काही काळजी करु नको मी कधी पुण्याला आले तर मी रोप घेउन येईन आणि तुझ्याकडची रोप घेउन जाईन. तु माझ्याकडे आलीस तर तुझ्याकडची रोप आणुन माझ्याकडची घेउन जा.
अगं इथेच देते म्हणजे
अगं इथेच देते म्हणजे सगळ्यांच्या इमेल आयड्या विचारत बसायला नको
जाऊदे.. इथे द्यायचा प्रयत्न केला पण जे द्यायचे ते नेमके चित्र होऊनच येतेय.. आयड्या द्या ज्यांना पाहिजे त्यांना. जागु तुला पाठवले गं....
शोभा, त्या केशरी फूलांच्या
शोभा, त्या केशरी फूलांच्या वेलीला संक्रांत वेल म्हणतात. कधी काळी ती संक्रांतीच्या आसपास फूलत असे.
इथे त्या वेलीलाही फळे येतात.
मिळाला ग खुप खुप धन्स.
मिळाला ग खुप खुप धन्स.
हिरनंदानीला कुठे?
हिरनंदानीला कुठे?
आनंदी आनंद गडे...... मी १
आनंदी आनंद गडे......
मी १ तारखेला आंबोलीला जातेय.....

६ ला परत
कॅमेरा घेऊन जे जे दिसेल ते ते सगळे पकडणार आहे. अर्थात घरातही भरपुर काम आहे, पण वेळ काढायलाच हवा.. अंजन भेटेल तिकडे भरपुर. तिकडे त्याला कोणी हिंग लावुनही विचारत नाही
सगळ्यात महत्वाचे म्हणजे सोनघंटेचे रोपटे शोधायचे आहे. इतके दिवस फुल कसे दिसते हेच माहित नसल्याने रोपटे दिसुनही ओळखु शकणे अशक्य होते.
सोनघंटेचा फोटो नाही का
सोनघंटेचा फोटो नाही का कोणाकडे ?
अगं फ्लॉवर्स ऑफ इन्डीया वर मी
अगं फ्लॉवर्स ऑफ इन्डीया वर मी पाहिला. दिनेशही शोधताहेत त्याला. आता त्यांनाही सापडले नाही तर आपण किस पेड की पत्ती???????
तेरवा जायचे म्हणजे आज्/उद्या/परवा दिनेशच्या घरी भेट देऊन माझे पॅशनफ्रुटचे रोपटे क्लेम करायलाच हवे. अमितालाही भेटून होईल त्या निमित्ताने.
जिप्सी मी परत आल्यावर राणीबागेत जाणर आहे एक रविवार. तुला कळवेन, इथेही लिहिन म्हणजे अजुन कोणाला यायचे असेल तर येता येईल.
जिप्सी मी परत आल्यावर
जिप्सी मी परत आल्यावर राणीबागेत जाणर आहे एक रविवार. तुला कळवेन, इथेही लिहिन म्हणजे अजुन कोणाला यायचे असेल तर येता येईल.
आणि त्यात असही लिहीशिल की जागु ला बहुतेक नाही जमणार संसारी आणि क्लब सेक्रेटरी असल्याने हो ना? मी कस ओळखल तुझ्या मनातल ?
आमच्या घराच्या बाजुला
आमच्या घराच्या बाजुला जांभळाचे झाड होते ते खुप उंच होते आणि त्याचे फाटे गच्चीवरुन आत येत होते त्यामुळे सहजच उंदीर आणि इतर किटकांचा त्रास व्हायचा म्हणून यंदा ते कापून टाकले. पण आता त्याला पालवी येत आहे पुन्हा याची पुर्ण वाढ होउन पुर्वीसारखी जांभळ येतील का?
<"https://picasaweb.google.com/lh/photo/dABfvTehXs6K1G_g4oFjqQ?feat=embedwebsite">
<"https://picasaweb.google.com/lh/photo/YtQe-s5W6S-Mg0WlWhsDQg?feat=embedwebsite">
<"https://picasaweb.google.com/lh/photo/rMNOU78D9_fV5EwlbCXXIg?feat=embedwebsite">
आता तर ते झुडपासारखे दिसते.
साधना, अवश्य. आधी सांगितले तर
साधना, अवश्य. आधी सांगितले तर आई घरी थांबेल.
एक पाकळी, त्याला नक्कीच जांभळे येतील, पण एक दोन वर्षे थांबावे लागेल. हि कोवळी पाने खायला छान लागतात. सकाळी खाल्ली तर माऊथ फ्रेशनरचे काम करतात.
हो दा, आम्हाला आवडतात पाने
हो दा, आम्हाला आवडतात पाने चघळायला.
जिप्सी,साधना,जागु,शोभा१२३
जिप्सी,साधना,जागु,शोभा१२३ ..

सगळे फोटो आवडले !
पांढरा लिलीदेखील असतो का ?
दिनेशदा,

साधनांनी टाकलेले कॉलनीचे शांत आणि शेजारी झाडी पाहुन मला तर तिल्लारीची कॉलनी आणिपरिसर ,दिवस आठवले ..
एक पाकळी,
या कोवळ्या जांभळांच्या पानांचा वास खुप छान असतो,लहानपणी खुप रोपटे उगवलेली दिसायची, मग आम्ही ती मुळासकट उचलुन शेतात,पाटाशेजारी छान्पैकी आळे करुन लावायचो,अशी वर्षाला कितीतरी झाडे लावायचो, पण हे सगळी रोपटे जवळचे पीक निघालं कि ही रोपटंदेखील गायब व्हायची.
अनिल त्या कॉलनीत कधी होतास तू
अनिल त्या कॉलनीत कधी होतास तू ? मी त्या घाटातून प्रवास करायचो खूप वेळा. त्यावेळी तिथे कुणी राहताना दिसत नसे.
ऐन उन्हाळ्यातही ती नदी झुळझुळ वहात असे. गिरिराजमूळे मला, निषिद्ध ठिकाणी पण जाता येत असे. (त्याच्याकडे सरकारी ओळखपत्र होते.) त्या काळात तो प्रकल्प रखडला होता. सगळी मोठी मशिनरी गंजत पडली होती. पण तरीही तो घाट, खासच आहे. फार कमी वाहने त्या घाटातून जायचे धाडस करतात.
(तो घाट पायी उतरावा, असे माझे पुर्ण न झालेले स्वप्न आहे.)
दिनेशदा धन्यवाद.
दिनेशदा धन्यवाद.
जागु
जागु
फार कमी वाहने त्या घाटातून
फार कमी वाहने त्या घाटातून जायचे धाडस करतात.

दिनेशदा,
अगदी खरयं,
माझे साडु तिथे तिल्लारीच्या प्रोजेक्टवर २००६-०७ मध्ये तिकडे होते,१०-१२ दिवस त्या कॉलनीत राहिलोय,मी कोल्हापुरला कंपनीत होतो,चंदगडला माझ बैंकेत काम असलं की मी तिल्लारीला राहायचो. त्या घाटातुन त्या महावितरणच्या बसमधुन खाली तळात जाऊन मी २-३ वेळा तो हायड्रोपावरचा प्रोजेक्ट पहायला,फिरायला गेलेलो, तिथली झाडी, लांब दिसणारी दरी आणि जंगलाचा भाग तर भयानक,गुढ वाटला !
घाट अगदी अरुंद आहे, तिथे मग मैलाचा दगड पाहिला..पणजी ६० किमी,वाटलं जाव आता गोव्याला.पण ते स्वप्नच राहिलयं अजुनही.
अरे त्याच काळात मी होतो
अरे त्याच काळात मी होतो तिथे.
तो घाट गुढ आहे खराच. बाकिच्या घाटातून, कुठेतरी मानवी वस्तीच्या खुणा दिसत राहतात. त्या घाटात बराच काळ तसे काही दिसत नाही. १०० मीटर सरळ रस्ता नाहीच, सगळी अवघड वळणे. तिथल्या विमा कंपन्या, त्या घाटाला वगळूनच, वाहनांचा विमा उतरवतात.
आमच्याही बागेतील सध्या
आमच्याही बागेतील सध्या फुललेली ही रानजाई व कुंडीतील मटकीचे एकमेव रोप
शांकली, रानजाईचा सुवास घरभर
शांकली, रानजाईचा सुवास घरभर दरवळत असेल ना?? :-
सगळ्यांचे फोटो मस्त
तीन- चार दिवस मला येथे येणे
तीन- चार दिवस मला येथे येणे जमले नाही तर किति पाने पुढे गेलित. आणि सर्व फोटो सॉलीड.
शोभा मी तुझ्यावर खुप रागावलेय
हि झाडे फुले कोणती??? हि
हि झाडे फुले कोणती???
हि शेंग आहे कि कळी काहिच कळत नाही.


हि टेंभुर्णी का?
हि फुले कोणती?

थोडा क्लोज-अप

याची फुले थोडीफार करंजच्या फुलासारखीच दिसत आहे पण हा करंज नाही.


थोडा क्लोज-अप

दिनेशदा, तूम्ही दिलेल्या
दिनेशदा,
तूम्ही दिलेल्या गोव्याच्या पत्यावर वारस च झाड सापडल्.पण त्याला शेंगा आल्या नव्ह्त्या.पूण्याला वेताळ टेकडी वर वारस फूलला आहे अशी बातमी समजली. कोणी माबोकर आसपास रहात असतील तर मला वारस चे बी हवे आहे. आणखी कूणाला वारस चे रोप नर्सरीत सापडत असेल तर कळवा. ते आणायची व्यवस्था मी करतो.
दिनेशदा मला ब्राऊनिया चे रोप बंगलोर च्या लालबाग मधे सापडले. ते मी आणले आहे.
मागील रविवारी मी मोरगाव ला गेलो होतो. तेथे कल्पव्रूक्शाचे मंदिर आहे. तेथे असलेल्या झाडाला छान पांढरी फूले आली होती. फोटो काढुन देत नाहीत. पूजारयाने त्याचे नांव कल्पव्रूक्श सांगीतले.फुल क्रूश्नकमळा सारखे मोठे होते. पण क्रूश्नकमळा ला असतो तसा नाग फणा नव्हता. गूगल वर त्याच नाव तरटि असे कळले. असेच दूसरे झाड कान्होपात्रा मंदिरात (पंढरपूर) आहे. पण बाकी तपशील कळला नाही. तूम्हाला त्या बाबत काही माहिती आहे का?
जिप्सी, पिवळी फुले कनकचंपा /
जिप्सी,
पिवळी फुले कनकचंपा / रामधनचंपा (Ochna obtusata) हीच असावी.
प्रचि मात्र सर्वच अप्रतिम !
विजय, कमाल आहे तूमची. तूमच्या
विजय, कमाल आहे तूमची. तूमच्या वृक्षप्रेमाला सलाम. तरटी बद्दल माहीत नव्हते. मला गुगलची लिंक पाठवणार का ? त्या झाडाच्या शेजारीच माझे घर होते.
शांकली छानच फूललीय वेल. मटकीला पण लवकरच शेंगा लागतील.
जिप्स्या. ते तपकिरी फळाचे झाड बहुतेक टेंभुर्णी. हि फळे जरा लांबट दिसताहेत. पिवळ्या फुलाचे कनकचंपा / रामधनचंपाच वाटतेय. आणि जांभळ्या फूलांचे करंजच आहे, नायजेरियात हेच दिसते.
दिनेशदा, तरटि ची
दिनेशदा,
तरटि ची लिन्क
http://en.wikipedia.org/wiki/Morgaon_Ganesha_Temple
तरटी
http://marathi.mangalwedha.com/Home/shri_sant_chokhamela/sri-sant-kanhop...
मागे तूम्ही शारंगधर शेती ची लिन्क दिली होतीत. तॅ मूळ पूस्तक मी हैद्राबादहून आणल आहे.व्रूक्श आयुवेद.
शशांक, दिनेशदा धन्यवाद
शशांक, दिनेशदा धन्यवाद
जांभळ्या फूलांचे करंजच आहे, नायजेरियात हेच दिसते>>>>हि माहिती नवीन. मी जे करंज बघितले त्यापेक्षा हे झाड थोडे वेगळे होते.
विजय, मोरगावला अनेक वेळा
विजय, मोरगावला अनेक वेळा गेलोय, ते झाड काही नाही दिसले.
या करंजाचीच पिवळी फूले येणारी एक जात नायजेरियात दिसते, आणि याची एक बुटकी जात सिंगापूरला बघितली होती.
दिनेशदा, गुगलवर कनकचंपा सर्च
दिनेशदा, गुगलवर कनकचंपा सर्च केला असता मुचकुंदाचे फोटो दाखवत आहेत.

आणि रामधनचंपा सर्च केले असता वरील फोटो
कनक म्हणजे सोने ना ?
कनक म्हणजे सोने ना ? मुचकुंदाच्या फुलांचा रंग पिवळा कुठे असतो ?
पण दोन वेगवेगळ्या झाडांना मुचकुंद म्हणतात हे मात्र खरे.
Pages