आपल्या भिंगाच्या चष्म्यातून,
तुझी ती अतिचिकित्सक नजर माझ्यावर खिळवत तू म्हणालास,
लिखाणात आता तोचतोचपणा यायला लागलाय...
मग म्हटलं आता पुरेच झालं नाहीतरी..
माझ्याकडे काही गुलजा़रसारखा चिरतरुण चंद्र नाही
किंवा साहिरसारखी चिरंजिवी वेदना पण नाही..
सतत तिच चुकार-मुकार किरणं..
फुलांचे रंग..
पौर्णिमेचा समुद्र..
श्रावणातला पाऊस...
स्वप्नांचे प्रदेश वगैरे...
मग बाहेर काही भेटतय का ते बघावं म्हटलं..
बाहेर पडतच होते,
तर सगळ्यात आधी ऋतूच रुसले..
आतले सगळेच फुरंगटुन बसले..
त्यांची समजुन घालणं तसं अवघडच..
कारण ग्रीष्माचा दाह, शिशिराची वेदना, वर्षेची उत्कटता..
सगळं एकाच वेळी कसं बाजुला सारायचं..?
पुढे जावं तर स्वप्नं होती..
चांगली क्षितिजापर्यंत पसरलेली...
कित्येक तपं मनात मुरल्यावर,
आता कुठे अंकुरु लागलेली..
सूरांकडे तरी किती कानाडोळा करावा...
कितीही दाट असलं धुकं तरी,
कानात घुमत रहातातच की कायम..
ह्म्म...
मनाच्या कुठल्यातरी कोपर्यातून
माझा चंद्र बघत होता हे सगळं..
इतकी युगं सोबत काढल्यामुळे,
आपण फक्त शांतपणे वाट बघायची असते हे समजलेलं त्याला
अनुभवातुन..
त्याच्या पौर्णिमेची मात्र अमावस्या झाली माझ्या या फसलेल्या प्रयत्नात..
तो म्हणालाच शेवटी न रहावुन,
"बाई गं.. पुरे आता..!
किती त्रागा करशील..?"
मीही सुखावले..
स्वतःल सोडून बाहेर पडणं कदाचित जमणारच नाही आपल्याला..
मग पुन्हा तिच चुकार-मुकार किरणं..
फुलांचे रंग..
पौर्णिमेचा समुद्र..
श्रावणातला पाऊस...
स्वप्नांचे प्रदेश वगैरे...
जाऊ दे...
आपण आपले असेच बरे...
तुझे प्रश्न तुझ्याजवळ...
शेवटी माझ्या चंद्रालातरी कोण आहे म्हणा माझ्याशिवाय...!
आता बास्स..!
Submitted by मी मुक्ता.. on 17 March, 2011 - 10:53
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त! याद तेरी आ गयी जब फूल
मस्त!
याद तेरी आ गयी जब फूल बरसे,दिल खिला
चांद तारों का समां था ये कहानी फिर सही
व्वा! मुक्ता मस्त कविता, खूप
व्वा! मुक्ता मस्त कविता, खूप खूप आवडली
मुक्ता -खरेच मस्त .कविता
मुक्ता -खरेच मस्त .कविता .आवडली
सुरेखच! आवडली!!
सुरेखच! आवडली!!
सर्वांचे खूप खूप आभार..
सर्वांचे खूप खूप आभार..
(No subject)
छान .आपल्या डोक्याएवढा आपला
छान .आपल्या डोक्याएवढा आपला देव ,आपल्या देवाएवढी आपली कविता .
<<त्याच्या पौर्णिमेची मात्र
<<त्याच्या पौर्णिमेची मात्र अमावस्या झाली माझ्या या फसलेल्या प्रयत्नात.>>
<<आपण आपले असेच बरे...
तुझे प्रश्न तुझ्याजवळ...
शेवटी माझ्या चंद्रालातरी कोण आहे म्हणा माझ्याशिवाय...!>>
फारच सुंदर..........कशाकशाला दाद देऊ?
पु.ले.शु.
आवडली. मस्त थॉट अन
आवडली. मस्त थॉट अन एक्स्प्रेशनही जमलय !!!
अवांतर : मेरे अश्कोंको तू कहातक गिनेगा हमदम
चश्म-ए-पुरआब को सीधेसे समंदर लिख दे !!!!
मुक्ता -मस्त भन्नाट !!
मुक्ता -मस्त भन्नाट !!
आपल्या भिंगाच्या चष्म्यातून,
तुझी ती अतिचिकित्सक नजर माझ्यावर खिळवत तू म्हणालास,
लिखाणात आता तोचतोचपणा यायला लागलाय...
मग म्हटलं आता पुरेच झालं नाहीतरी.
छाया देसाई.. अगदी अगदी..
छाया देसाई.. अगदी अगदी..
निशदे, धन्यवाद...
धन्यवाद प्रकाश..
गिरिश.. व्वा.. आभार...
आवडली.
आवडली.
एकदम हृदयाच्या पाकळ्यांतून
एकदम हृदयाच्या पाकळ्यांतून अलगद काढलीस वाटते ही कविता! नाजूक, निरागस.
मुक्ता, कविता छान वाटली पण
मुक्ता,
कविता छान वाटली पण ...
आता बास्स ..!
सर्वांचे आभार.. अनिलजी,
सर्वांचे आभार..
अनिलजी, समजलं नाही.. आता बास्स म्हणजे लिहु नको का आता असं?
(No subject)
खल्लास !!
खल्लास !!
सहज सुंदर.
सहज सुंदर.
सर्वांना धन्यवाद..
सर्वांना धन्यवाद..
झक्कास कविता... खूप खूप
झक्कास कविता... खूप खूप आवडली...........
मुक्ता, अहो ते मी प्रतिक्रिया
मुक्ता,
अहो ते मी प्रतिक्रिया देताना ,तिसर्या ओळीत थांबण्यासाठी ...मलाच बास्स म्हणालो,तुम्हाला नाही !
निशब्द..!
निशब्द..!
"तुझे प्रश्न
"तुझे प्रश्न तुझ्याजवळ...
शेवटी माझ्या चंद्रालातरी कोण आहे म्हणा माझ्याशिवाय...!"
...... छान
सुरेख!
सुरेख!
मस्त.
मस्त.
अनिल.. ओके.. मला वाटलं मला
अनिल.. ओके.. मला वाटलं मला म्हणालात की काय..?
धनेष, अमित, UlhasBhide, आशूडी, शोभा.. खूप खूप आभार.. धन्यवाद..
व्वा
व्वा
छान... खूप सुरेख!
छान... खूप सुरेख!
धन्यवाद डुआय, vidmum..
धन्यवाद डुआय, vidmum..
मस्तच...
मस्तच...
Pages