लहान मुलांचे आजार

Submitted by admin on 1 July, 2008 - 05:31

नमस्कार ,

माझी मुलगी (वय ४) गेल्या २-३ दिवसापासुन तळपाय दुखतात आनी गरम आहे म्ह्ण्त आहे. सारखं थंड पाणी लाव म्हण्ते आहे. मी तळपाय चेक केले तर मला गरम जाणवत नाही आहे.

उष्नता किंवा अश्क्तप्णा असेल का? काय उपाय करता येइल?

मितान, हे घरगुती उपचार करत रहा पण आधी डॉक्टरला दाखव.

लहान मुलं तब्येतीची तक्रार करत असतील तर डॉक्टरांना फोन करायचे सोडून मायबोलीवर का येता तुम्ही ? इथे कुणीही डॉक्टर नाहीयेत. असले तरी तब्येत स्वतः बघितल्याशिवाय ते तरी कसे काय उपाय सांगणार ?

मितान मुठ्भर धणे मोठा ग्लास कोमट पाण्यात तास दोन तास भिजत घालायचे . मग हातानीच कुसकरून पाणी गाळून तिला वरचेवर प्याय्ला दे. तिच्या ओटीपोटावर थोडे तेल लावून गरम टर्कीश टॉवेल ने शेक.
तिला जळजळ/खाज ई. होतेय का ? किवा शू पिवळी होतेय का?ताप आहे का या कडे लक्ष दे. असे असेल तर ही इन्फेक्शन ची लक्षणे असू शकतात.

तोषवी, वारंवार शू होणे ( तासाभरात चार वेळा ) आणि ती कंट्रोल न करता येणे याव्यतिरिक्त कोणतीही लक्षणे नाहीत. एरवी ती दर दीडदोन तासाने स्वतः सांगून शु करायला जाते. पण कालपासून तिला कळायच्या आत शू होतेय. कपडे ओले होतात याचं तिला फार वाईट वाटतंय. सकाळी म्हणत होती शू ला त्रास होतोय. आता दुपारपासून बरी आहे. धण्याजिर्‍याचं पाणी सुरू केलं आहे. दर अर्ध्या तासाने अर्धा कप पाजतेय. मला वाटतं त्याचा चांगला उपयोग होतोय.
आता पुन्हा काही अ‍ॅबनॉर्मल जाणवलं तर डॉ कडे नेईन. मी फोनवर बोलले तर त्यांनीही एक दिवस वाट बघायला आणि भरपूर पाणी पाजायला सांगितले आहे.

सिंडे, तू काळजीपोटी रागावतेयस हे कळतंय गं.. पण कुणीही १०० % माबोवरील उपायांवर अवलंबून राहात असेल असे वाटत नाही. काळजी वाटते, बरेचदा नेमकं काय होतंय ते कळत नाही, एखादी गोष्ट क्षुल्लक दिसतेय ती किती गांभिर्याने घ्यावी हे लक्षात येत नाही अशा वेळी इथे इतरांच्या अनुभवातून बरेचदा शिकायला मिळते. म्हणून इथे येतात सगळे.
माझेच उदा सांगायचे तर माझ्या गावात डॉ ची अपॉइन्टमेंट पाहिजे तेव्हा मिळत नाही. बहुतेक वेळा दोन दिवस तरी वाट बघावी लागते. हा वाट बघण्याचा काळ इथे मिळणार्‍या मानसिक आधाराने सुसह्य होतो. म्हणुन.....
असो.

हा सार्वजनिक धागा असला तर कोणीही ते वाचू शकते लिट्ल गर्ल्स ची प्रायवसी जपली पाहिजे असे आपले मला वाटले.

माझी लेक ३ १/2 महिन्यांचे आहे. गेल्या एक महिन्यापासून माझ्या बाळाला सारखा शी होतोय दिवसातुन ९-10 वेळा..पाण्याचे प्रमाण जास्त असते. थोडासा शी व पाणी येते. पाण्याला पिवळा फेस असतो .. बी पाण्यासारखा शी असतो. शी होताना आवाज पण येतो.
तीची रुटिन स्टुल टेस्ट केली होती.... तीचा रिपोर्ट नॉर्मल आहे.
Dr said that if she is having normal routine then dont worry.

सुरवाती पासून माझेच दुध चालू आहे.
भारतात उन्हाळा चालू झाल्यापासूनच हा त्रास सुरु झालाआहे.
डाळीम्बाच्या सालीने लगेच फरक पडलाय. दिवसातून एकदा साल उगाळून देतेय. गेले ३ आठवडे साल देतेय. पण नाही दिली कि पुन्हा शी होतोय.

काही उपाय आहे का?

माझ्या मुलीला अटोपिक / अलर्जीक डर्मटायटीस (अजून नक्की निदान व्हायचय) त्रास गेली २ वर्षे स्प्रिन्ग आणि फॉल मधे होतोय (चेहेर्यावर , पापण्यावर लाल रॅश ,खाज ) .तिला तिच्या डर्मा. नी अ‍ॅलर्जी टेस्टींग करायला सान्गितले आहे तिची ह्या शुक्र. अपॉ. आहे. ही टेस्ट कशी करतात? इंजेक्ट करून का ब्लड टेस्ट , का काही त्वचेला चोळून?? तिला ८ दिवस आधी पासून तिची अ‍ॅलर्जीची औषध बंद करायला सान्गितली आहेत.आण्खी एक की ह्या टेस्टीन्ग नन्तर ताप येणे, खाज येणे , रॅश असे त्रास पुढील दिवशी होतात का?
बर मी अस ऐकल होत की आपल्याला न वाटणार्या आणि नेहमीच आहारात असलेल्या पदार्थान्ची ही अ‍ॅलर्जी टेस्ट + येते ..(उदा. ती रोज दुध पिते /सिरीअल खाते पण तिला नेहमीच त्यामुळे रॅश नसतो किवा खाज येत नाही.) हे खरय का?

तोषवी माझ्या माहिती नुसार अ‍ॅलर्जी टेस्ट करताना ब्लड टेस्ट करतात. मुलगी अगदी लहान असेल तर माहित नाही.
ब्लड टेस्ट चा नंतर काहीही त्रास होत नाही.

बर मी अस ऐकल होत की आपल्याला न वाटणार्या आणि नेहमीच आहारात असलेल्या पदार्थान्ची ही अ‍ॅलर्जी टेस्ट + येते ..(उदा. ती रोज दुध पिते /सिरीअल खाते पण तिला नेहमीच त्यामुळे रॅश नसतो किवा खाज येत नाही.) हे खरय का?..>>>>>>>>>>>>>
ही माहिती मी पण ऐकली आहे पण माहीत नाही. माझ्या मैत्रिणीच्या मुलीला शेंगदाण्याची अ‍ॅलर्जी निघाली. (नट अ‍ॅलर्जी) पण २-३ काजु आहारात (भाजीत पेस्ट करुन घातले तर तिला त्रास होत नाही पण चमचा भर दाण्याच्या कुटाने त्रास होतो.

जुई सध्या रोज स्विमींगला जात्ये. सुरु केल्यापासुन २,३ दिवसांत तिला दंडावर अजुन एक लेअर आहे असं वाटतय. म्हणजे स्किनला टच केल्यावर वेगळं जाणवतय. सुरवातीला मी घाबरले पण मधे १ दिवस ती गेली नाही तर हे फिलींग गेलं. स्विमींग केल्यावर पुन्हा तसं जाणवतं. असं का होत असावं?? डॉ. कडे अजुन गेले नाहीये कारण तिचे लहानपणीचे डॉ. आता जरा लांब आहेत. बाकी कुणाकडे जावसं वाटत नाहीये. कुणाला असा अनुभव आहे का?

माहित नाही ग. मागे तरी कधी असं झालेलं नाहीये. आता ४ दिवस पाउस पडतोय त्यामुळे स्विमींग बंद आहे तर आता नॉर्मल आहे परत.

नमस्कार
माझा मुलगा २ वर्षाचा आहे आणि तो बोलायचा प्रयत्‍न करतो पण पूर्ण बोलत नाही
त्याला आम्ही बाबा आई बोलायला शिकवतो पण बोलायचा कंटाळा करतो
त्याला बोलायला कसे शिकवायचे?
मी असे ऐकले की विड्यच्या पानाचा देठ खायला दिल्यावर मुले लवकर बोलायला लागतात त्यात कितपत तथ्य आहे?
कोणती सीडी किवा कोणती औषधे असतील तर कृपया सुचवावीत
कृपया त्यासंदर्भात तंत्रा मंत्रा सांगावे

नीलू, तुमचा मुलगा खूप लहान आहे हो अजून. काही मुलं जरा उशिरा बोलतात, काही लवकर. तो बोलला नाही तरी तुम्ही बोलत रहा त्याच्याशी. आजूबाजूला लहान मुले असतील त्याच्या वयाची किंवा थोडी मोठी तर त्यांच्याबरोबर पाठवा खेळायला. खेळताना त्यांचे ऐकूनऐकून बोलायला सुरुवात करेल हासुद्धा. बाकी काही उपाय करायला जाऊ नका. Happy

माझ्या ५ महिन्यांच्या बाळाला खुप ताप आहे. ताप उतरत नाहिये. मी पट्ट्या ठेवते आहे पण काही फरक पडत नाही. डॉ. कडे जाउन आले आहे वायरल सांगितले आहे. ओषध नाही दिले काही. काय करु मला कळत नाही. ताप साधारण ४०डि. से. आहे. घरी सांगितले तर सगळ्यांना खुप टेन्शन येइल. म्हणुन आधी इथे विचारले. मला काहितरी उपाय सांगा ना.
खुप भिती वाट्ते आहे. काल पासुन आहे ताप. उद्या परत डॉ. कडे जाणार आहे. पण तोपर्यंत तरी काहीतरी उपाय सांगा.

आज रविवार असल्यामुळे नेहमीचे डॉ. नव्हते. त्यांच्याकडे उद्या घेउन जणारच आहे. पण तोपर्यंत काहीतरी उपाय करायचे आहेत. डॉ. नी बघितले. तिला ते म्हणाले १-२ दिवस येइल हा ताप तुम्ही उद्या तुमच्या डॉ. ला दाखवा. आज ओषधाची गरज नाही म्हणाले ते. पण ताप उतरतच नाहीये म्हणुन मला भिती वाटते.

काळजी करू नका, धीर धरा. तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांना किंवा फॅमिली डॉक्टरांना संपर्क करून बघा. लवकर बरं वाटू देत बाळाला.

व्हायरल आहे म्हणून औषध दिलेले नाही. त्यात असा १०४ वगैरे ताप येतो. पण ५ महिने म्हणजे लहान आहे, तर १०२ च्या पुढे ताप जाऊ लागल्यास ताप कमी होण्याचे औषध देता येईल. पण ४-५ दिवस तो दर ६-८ तासाने पुन्हा येईलच. मग बरा होईल. कदाचित खोकला होईल त्यानंतर. पट्ट्या ठेवणे, कोमट पाण्याने अंग पुसणे हे उपाय चालू ठेवा.

हो लालू मी अंग पुसते आहे. आणि क्रोसिन पण देते आहे. पट्ट्या पण ठेवते आहे. थोडा कमी होतो आहे पण परत वाढतो आहे. म्हणुन अजुन काय करु ते कळत नाही.
क्रोसिन कीती द्यायचे असते? आणि मी सध्या ब्रे. फी फक्त करते आहे. तिला तसे मी रोज २ वेळा फोर्मुला देते आणि २ वेळा पेज देते. पण आता हे सगळे बंद केले आहे तर ते बरोबर आहे का? पाणि देउ का प्यायला?

पेज दिलीच नाही फोर्मुला दिले होते पण तिला गिळायला त्रास होतो आहे ते ती गिळत नव्हती. मग मी परत आग्रह करुन नाही दिले. बरोबर आहे का? की परत देउन बघु. तिचे फक्त ब्रे. फी. नी पोट भरत असेल ना?

निर्मयी, लालूचं अगदी बरोबर आहे.भारतात असाल तर कल्पोल/आयबुप्रोफेन ही औषधे डॉ. ना विचारुन देता येतील.ताप खूपच वाटला आणि अंग पुसण्याचा उपयोग होत नसेल तर कोमट पाण्याने आंघोळ घाला.त्याने ताप पटकन कमी होतो.बाळाला फीड करत रहा.ओ.आर.एस देत रहा.डिहायड्रेशन होऊ देऊ नका.काळजी करु नका.मुलांना होतं असं.

तापात भूक कमी होते पण तिने डिहायड्रेट होता कामा नये. फ्लुइड्स पोटात जायला हवीत. तुमच्याकडे डॉ. स्पॉक चे पुस्तक आहे का? त्यातही उपाय सापड्तील. पण चिंता वाट्त असेल तर सरळ हॉस्पिटल इमर्जन्सीत न्यावे. कुठले व्हॅक्सीन इत्यादी दिले होते का? तिची हालचाल नॉर्मल आहे ना. खेळते आहे का? धीर धरा तुम्ही. ताप कमी करण्याचे पेडिआट्रीक सिरप असते , ३- ६ महिन्याच्या वयोगटा साठी खास असते ते मागवून घ्या. खूप कपड्यात गुंडाळल्याने ही शरीराचे तापमान वाढते. एसी नसलेल्या हळू पंखा लावलेल्या खोलीत तिला मोकळे सोडा बेडवर. डायपर घालून.

Pages