विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ, एक नंबर...

उत्तर - दोन्ही, घेतला वा नको घेतला...दोन्ही फिक्स फरक फक्त मिळनार्‍या $रांचा Lol Biggrin Proud

भाऊ... Lol

<< कोणत्याही एका खेळाडूच्या जीवावर आजतगायत विश्वचषक तर सोडाच एखादा सामनाही जिंकणे शक्य नाही. >> मास्तुरेजी, एकदम मान्य. तरीही, "मॅन ऑफ द मॅच" व "मॅन ऑफ द टूर्नामेंट / सिरीज " यांच्या विशेष सहभागाचं महत्व व सार्थ कौतुक तर असतंच ना आपल्याला !

"सचिनच्या २००० धावा विश्वचषक जिंकण्यासाठी निरूपयोगी ठरल्या किंवा विश्वचषक नाही का जिंकेना, सचिनची रेकॉर्डस तर झाली ना" अशा स्वरूपाची विधाने करणे फारसे रूचले नाही. वर एकाने लिहिल्याप्रमाणे १९९६ साली उपांत्य फेरीत व २००३ साली अंतिम फेरीत जाण्यात सचिनचा सिंहाचा वाटा होता. निदान हे योगदान तरी मान्य करा.

१३०/३ (३२ ओव्हर) आयरीश गोलदाजांनी चांगलच जखडुन ठेवलय वेस्टइंडिजला...
पण आज गेल नाही आहे...

<<........अशा स्वरूपाची विधाने करणे फारसे रूचले नाही. >> मास्तुरेजी, माझ्याही नेमक्या त्याच भावना व विचारही आहेत म्हणूनच कोणतीही मॅच/स्पर्धा जिंकणे /न जिंकणे याने कुणाच्याही व्यक्तिगत भरघोस कामगिरीचं मूल्यमापन - विशेषतः अवमूल्यन - होऊं नये , हें मलाही म्हणायचं होतं. कृपया गैरसमज नसावा.

सचिनच्या २००० घावांचा काSSSSSSही उपयोग नाही झाला. पण १९८३ साली सुनील वॉल्सनने काही न करता विश्वचषक जिंकून दिला. याला म्हणतात योगदान.

<<अहो, सामना हारण्याकरता ज्यांनी पैसे घेतल्याचे सिध्द झालं ते अजय जडेजा आणि अझरूद्दीन टीव्हीवर उजळ माथ्याने वावरतात>>
सिद्ध झालं? जाडेजाने कोर्टात जाऊन निर्दोषत्व शाबीत केलं ना?

माझ्या विधानाने भावना दुखावल्या गेलेले क्रिकेट रसिक मला क्षमा करतील अशी अपेक्षा :स्मित:. क्रिकेट प्रेमींचे दु:ख एक सच्चा क्रिकेट प्रेमीच जाणेल :डोमा:.

आनंदाची बातमी म्हणजे तुम्हा क्रिकेट रसिकांना मनसोक्त आनंद मिळावा म्हणुन मी या बाफ (केवळ २०११ साठी, २०१५ बद्दल गृहितके धरु नका) वर आता फिरकणार नाही...

भारतीय संघाला शुभेच्छा :स्मित:, फारशा उपयोगाच्या नसल्या तरी दिल्याशिवाय रहावत नाही.

भाऊ, मस्त !!

आयर्लंड १६०/३ ... ८८ चेंडुत ११६ रन्स पाहिजेत...
आज काय वेस्टइंडिजच खर नाही... पुन्हा अपसेट होतोय का ?

मी वर्तवलेला अंदाज --

ए ग्रुप
-----
पाक - १० (पाकडे ऑसीजना मारतील कारण मॅच कोलंबोत आहे, ते स्लो पिच आहे)
ऑसी - ९ (नेट रन रेट जास्त असेल म्हणून)
श्रीलंका - ९
न्यूझीलंड - ८

बी ग्रुप
-----
द. आफ्रिका - १० (भारताला हरवल्यामुळे)
भारत - ९
वेस्ट इंडिज - ८ (इंग्लंडला मारतील म्हणून)
इंग्लंड - ७

क्वार्टर फायनल्स
-------------
Q1: A1->B4 ... पाक -> इंग्लंड ---- ढाका --- इंग्लंड जिंकेल
Q2: A2->B3 ... ऑस्ट्रेलिया -> वेस्ट इंडिज---- अहमदाबाद - वेस्ट इंडिज जिंकेल
Q3: A3->B2 ... श्रीलंका -> भारत ---- ढाका --- भारत जिंकेल
Q4: A4->B1 ... न्यूझीलंड -> द. आफ्रिका ---- कोलंबो --- द. आफ्रिका जिंकेल

सेमी फायनल्स
-----------
Q1->Q3 ... इंग्लंड -> भारत ---- कोलंबो --- भारत जिंकेल
Q2->Q4 ... वेस्ट इंडिज -> द. आफ्रिका ---- मोहाली -- द. आफ्रिका जिंकेल

फायनलः द. आफ्रिका विरुद्ध भारत --- द. आफ्रिका जिंकेल.

आधी आत्ताच्या मॅच मध्ये आयर्लंड वेस्ट इंडीजला हरवण्याची चिन्ह दिसत आहेत.. ते बघा.. १० ओव्हर मध्ये ८५ धावा.. ५ विकेट बाकी..

चिमण सगळ बरोबर आहे ..
फकस्त शेवटच जरा ठीक करा.
फायनलः द. आफ्रिका विरुद्ध भारत --- भारत जिंकेल.

भाऊ Lol

कोथरुडमधला पोपटः

मी सोडून इतर सर्व पोपट कंप्लीट भंकस करतात व ते फिक्स्ड पोपट्स आहेत.

भारत क्वार्टर फायनल किंवा फार तर सेमि फायनलला गचक्या देऊन मरणार! ऑस्ट्रेलियाशी अंतिम सामन्यात खेळू शकणारे देश खालीलः

श्रीलंका

पाकिस्तान

दक्षिण आफ्रिका

न्युझीलंड

इंग्लंड

यातील श्रीलंका व दक्षिण आफ्रिकेला सर्वाधिक शक्यता आहे फायनलला जायची.

फायनल जिंकणारा देशः

ऑस्ट्रेलिया

फायनल मॅचनंतर 'संघात असावे की नाहीत याबाबत पुनर्विचार करण्यात येणारे' खेळाडू (भारतीय संघातील) :

चावला

हरभजन

धोनी

पठाण

मात्र हा पोपट सांगतो की कितीही रेकॉर्ड्स केली आणि कितीही संघाला अगदी अंतिम सामन्यापर्यंत नेले तरी सचिन तेंडुलकर नावाचा खेळाडू संघाला जिंकून देण्याच्या क्षमतेचा नाही.

इंग्लंडला बांगलाविरूध्द फक्त २२५ करता आल्या. या खेळपट्टीवर फलंदाजी अवघड आहे. बांगलाला जिंकणे अवघड आहे. तसेच संध्याकाळी पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. बांगलाला डकवर्थ्/लुईस पध्दतीने जिंकायचे असेल तर पहिल्या २० षटकात ३ पेक्षा जास्त गडी न गमाविता कमीतकमी ८०-९० धावा करायला लागतील.

हर्ष भोगलेचे अंदाज :
अश्विन हा धोनीचे लपवून ठेवलेले हुकुमाचे पान आहे. तो बलाढ्य संघाविरुद्ध मैदानात उतरवून त्यांना चकित करणार.
(चावलाला तो हेकेखोरपणे खेळवतोय हे भोगलेंना मान्य नसावे)

निवडसमिती, तो कोण गोरा कोच, ह्या सगळ्यांपेक्षा धोणीच्या म्हणण्याला जास्त महत्व आहे का? त्या लोकांच्या सल्ल्याशिवाय तो निवड करेल का? विशेषतः कोच गोरा नि परदेशातला आहे, म्हणजे तो म्हणतो ते महत्वाचे! कारण चावलाला काढा असे बहुतेक सर्वांचे मत होते, तरी तो खेळला, नि दोन गडी पण बाद केले त्याने (हीरो युवराजपेक्षा कमी सरासरीने), म्हणजे आता तो आता नक्की का?

उद्या कळेलच म्हणा.

अश्विन हा धोनीचे लपवून ठेवलेले हुकुमाचे पान आहे. तो बलाढ्य संघाविरुद्ध मैदानात उतरवून त्यांना चकित करणार. >> Ashwin is इन्दीद Dhoni's secret weapon (... for IPL) - Source : tweeter Lol

झक्की का उगाच पुड्या सोडता आहात ? Eng vs BL interesting चालली आहे मॅच ती बघा कि निवांतपणे Wink

कोथरुडमधला पोपटः

हारण्यासाठी कोच, कप्तान, खेळाडू, पंच, मॅस्युअर, फिटनेस ऑब्झर्व्हर्स, समालोचक यांच्यापैकी कुणाचाही 'विशिष्ट' जन्मदेश असण्याची वा त्वचेचा रंग विशिष्ट असण्याची गरज नाही. भारत स्वकर्तृत्वावर सहज हरू शकतो.

मला काही लोकांच्या "फिक्सींग ..फिक्सींग.." ओरडण्याचा अगदी कंटाळा आलाय. >>>>

अहो डोंगरे बाइ इतक्या चिडता कशाला उगाचच . दुर्ल़क्ष करा अशा लोकांकडे तुम्हि! Proud
त्यांना त्यांची समाजसेवा करु द्या कि! Proud

असो आता फिक्सिंग बद्द्ल नाहि बोलत या पोस्ट मधे. पुढ्च्या पोस्ट मधे बोलेन. एव्ढेच सांगतो कि या वेळेस सर्व मैच फिक्स आहेत. Biggrin

कोथरुडमधला पोपटः

गणू हे केनियाने मायबोलीवर घुसवलेले नाटकी पात्र आहे असा इतर सदस्यांचा संशय खोटा असून ते जे बोलतात त्यात ५० % तथ्य आहे व उरलेले पन्नास टक्के तथ्य नाहीच असे सांगता येत नाही आहे.

हा कॅच सोडला तर फिक्सिंग म्हणतील की घेतला तर? >>>

असे नसते भाउ ते!

" हा कॅच सोडला तर पैसे मिळतील की घेतला तर ? " असे आहे हो ते! Biggrin

Pages