विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या मॅचसाठी पियुष चावलाचा संघात समावेश आहे !!
आजच्याच "लोकसत्ते"त विनायक दळवीनी आपला स्तंभ लेग-स्पिनरवर लिहीला आहे - "शाही बिरादरी" ! [ पियूष चावलाबाबत त्याचं मत माझ्यासारखंच आहे हे वाचून दिलासा मिळाला !].चावलाला कुंबळेने मार्गदर्शन करावं हे मात्र तितकंसं नाही पटत. कुंबळे [व चद्रशेखर ] हे लेग-स्पिनच्या शाही बिरादरीतले नसून मध्यगती व स्पिन याच्या सीमारेषेवर राहून अधिराज्य करणारे महान गोलंदाज होते, असं वाटतं. मला माहित असलेले व आठवतात ते लेग्-स्पिन बिरादरीचे मातब्बर सभासद म्हणजे - रामाधीन [वे. इंडीज], सदू शिंदे, सुभाष गुप्ते [भारत ], रिची बिनॉ, शेन वॉर्न [ ऑस.], अब्दुल कादीर [पाक]. सध्या पियूष चावलाला मार्गदर्शन करायला खरं तर या बिरादरीतला पण तिथं न रुळलेला लेग-स्पिनर मला वाटतं फक्त शिवरामकृष्णनच असावा.[ याने आपली कारकिर्द बहरण्यापूर्वीच क्रिकेटेतर कारणांमुळे अकाली संपवली असं म्हणतात]. एक्सपर्ट म्हणून तो अभ्यासू वाटतो व त्याला आत्ताचं क्रिकेट व आत्ताचे क्रिकेटर्स व डांव पेच चांगलेच माहितीचे आहेत.
आज चावलानेच माझा पचका नाही केला म्हणजे मिळवलं ! Wink

किर्‍या गाढवा! तुमने मेरा पोल खोला! मी मुद्दामच ते व्हेग ठेवलं होतं.. Proud

डोन्टवरी भाऊ! मी पण करीन चावलाला मार्गदर्शन! Lol

केदार.. पहिल्या २० ओव्हर मध्ये विकेट घ्यायच्या नाहीत असे ठरवून खेळतायेत असं वाटतय..

हिरकु, पडली एकदाची....
एकुण भारतीय गोलंदाजीचे तीन तेरा वाजलेत. हॉलंड / आयर्लंड वगैरे लोक सतवत आहेत. Happy अजिबात भेदक वगैरे वाटत नाही. अर्थात त्यांनी २०० धावा पार कराव्यात पण २५०-२६० वगैरे म्हणजे खूप झाले.

"Haaa! Just before the (second) wicket-ball, Dhoni said .."Idhar aaja, yeh badmaash lagg raha hai" (Come here, this guy seems to be a naughty one) LoL.. the stump mic's are awesome!"

सौजन्यः www.cricinfo.com

अरे बॅट्समनना जरा क्रेडिट द्या. आता सगळे स्पिन खेळायला शिकले आहेत. आपल्यातले पण बरेच जण फास्ट बॉलिंगला फार घाबरत नाहीत आता. आठवा ते दिवस जेव्हा मदनलाल फास्ट बोलर पळत यायला लागला की हळूहळू लेग स्टंपाच्या बाहेर जायचा. आता असं बाहेर गेलं की समीक्षक 'तो घाबरून बाहेर गेला आहे' असं न म्हणता 'तो शॉट साठी जागा करायचा प्रयत्न करतोय' असं म्हणतात. Wink

अरेरे ४ आउट! हॉलंडने निदान २५० च्या वर रन्सा करायला पाहीजे होत्या म्हंजे मजा आली असती.

१०८/६..

म्हंजे आता तर १५० च्या आत चालले बहुतेक. फारच बोअर गेम! आपल्या ३/४ विकेटा झटपट पडल्या तरच थोडी गम्मत येईल.

ऑस्ट्रेलिया म्हणे वर्ल्ड कप मधे गेल्या २५ मॅचेस मधे एकदाही हरलेले नाहीत. ये बहुत नाइन्साफी है! कुणी तरी हरवा रे यांना! ग्रुपमधे पाकीस्तानच त्यातल्या त्यात जमवेल. आपला ५००% सपोर्ट पाकड्यांना!

कालचा पाकचा धुव्वा उडलेला बघूनही परत सपोर्ट पाकला म्हणणे म्हणजे वेडेपणाच आहे.. ऑस्ट्रेलिया एकही मॅच न हारता पुढच्या फेरीत जाणार..

साहेबांचे विश्वचषकातल्या २००० धावा पूर्ण... आणि आता ज्या पद्धतीने खेळत आहेत ते बघता ३०व्या ओव्हरमध्ये वगैरे मॅच संपेल असे वाटते आहे..

शेवाग पण गेलाय... येडेपणा केला नाही तर सहज जिंकता येईल अन्यथा आहेतच परत देव पाण्यात..

ह्याला म्हनतात इंडीया.. नेदरलँडच्या पहिल्या १५ ओव्हरमध्ये एकही विकेट नव्हती आणि आपल्य १० ओव्हरमध्येच ३ विकेट गेलेल्या आहेत हो....

>>>>अरेरे ४ आउट! हॉलंडने निदान २५० च्या वर रन्सा करायला पाहीजे होत्या म्हंजे मजा आली असती.
चिमण, हे वाक्य आठवतं का? खरच मजा आली असती. Proud

आपण नेहमी मॅच इंटरेस्टिंग करतो.>>> आणि ह्या अशा मेच इंटरेस्टिंग करण्यालाच काही बिचारे बापडे फिक्सिंग असे म्हणतात...

किरु आपल्या बॉलरचा प्रयत्न तोच होता पण झहीरनी हाणून पाडला आणि शेवटच्या दोन विकेट काढल्या..

Pages