भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/
सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.
सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.
विश्वचषकातला विक्रम ?>>नाही,
विश्वचषकातला विक्रम ?>>नाही, द्रविड-दादामधे World Cup highest partnership record (१९९९ against SL). Overall record Sachin-Dravid चा आहे (against NZ). पण हे बहुतेक दुसर्या विकेटचे आहेत, तेंव्हा World Cup First Wicket Record असू शकेल.
<< ते आकडे म्हणजे ऑड्स
<< ते आकडे म्हणजे ऑड्स असतात.>> इव्हन म्हणजे सम, ऑड म्हणजे विषम, म्हणून, बेटींग फीव्हर = विषमज्वर !!
<< चला, नऊशे प्रतिसाद झाले एकदाचे! >> आणि, बाद फेरीही अजून सुरू झाली नाहीय !!
<< चला, नऊशे प्रतिसाद झाले
<< चला, नऊशे प्रतिसाद झाले एकदाचे! >> आणि, बाद फेरीही अजून सुरू झाली नाहीय !!
---- भारताने विश्वचषक जिंकल्यावर किती प्रतिसाद होतील? माझा आकडा २००० चा असेल (सचिन तेंडुलकर यांनी या आधी भाग घेतलेल्या ६ विश्वचषक सामन्यांत २००० धावा पुर्ण केल्या - अभिनंदन आगे बढो).
अर्थात भारताला विश्वचषक जिंकायला या सर्व २००० धावा निरुपयोगी ठरल्यात - हरकत नाही त्याच्या बिचार्याचे रेकॉर्ड तर झाले. आम्हाला देशाने कसोटी सामना हरण्याच्या दु:खा पेक्षा त्याचे ५० वे कसोटी शतकाचा जास्त आनंद होतो.
पुढच्या सामन्यांत अजुन एक शतक आहे... a big inning is just around the corner... भाव पण चांगला लागेल आता.
>>> त्या महान फलंदाजाने तर
>>> त्या महान फलंदाजाने तर एकाच्या टाळक्यात हॉकी स्टिक घालून खूनही केलेला आहे व उजळ माथ्याने वावरतोयही! हाकलून दिले पाहिजे साल्याला टीव्हीवरून!
अहो, सामना हारण्याकरता ज्यांनी पैसे घेतल्याचे सिध्द झालं ते अजय जडेजा आणि अझरूद्दीन टीव्हीवर उजळ माथ्याने वावरतात आणि कोणी कसं खेळायला पाहिजे होतं याविषयी शहाजोगपणे सल्लेही देतात. अझरूद्दीनला तर लोकांनी खासदार म्हणून निवडून सुध्दा दिलेलं आहे. सिध्दू त्यांच्यापेक्षा काही वेगळा नाही. तिघांनाही टीव्हीवर कायमची बंदी घातली पाहिजे.
आयला झिंब्वाब्वे जबरी लढतंय.
आयला झिंब्वाब्वे जबरी लढतंय. आपला सपोर्ट त्यांना झिंब्वाब्वेच नागरिकत्व न घेता!
झिंबाब्वेचा टेलर सही खेळला..
झिंबाब्वेचा टेलर सही खेळला.. त्यांची सलामाची जोडी श्रीलंकेच्या गोलंदाजांविरुद्ध झुंजारपणे खेळताना बघून भारतीय गोलंदाजी आठवली...
अहो, सामना हारण्याकरता
अहो, सामना हारण्याकरता ज्यांनी पैसे घेतल्याचे सिध्द झालं ते अजय जडेजा आणि अझरूद्दीन टीव्हीवर उजळ माथ्याने वावरतात आणि कोणी कसं खेळायला पाहिजे होतं याविषयी शहाजोगपणे सल्लेही देतात.
---- पुराव्यासकट पकडले गेले म्हणुन अझर किंवा जडेजा हे टिव्ही वर नकोत? त्यांचे ते दिवस खराब होते म्हणुन पकडले गेलेत, मॅचचा ठरवुन निकाल लावणारे अनेक रथी महारथी खेळाडू आहेत बहुतेक सर्व उजळ माथ्याने वावरतात.
भारतीय राजकारण आणि भ्रष्टाचार (अवैध मार्गाने गोळा केलेली संपत्ती) ह्यांना वेगळे करता येत नाही तसेच क्रिकेट आणि मॅच फिक्स यांना पण वेगळे करता येणार नाही. भ्रष्टाचाराला कायदेशीर मान्यता देण्यात यावी असे वैतागाने सर्वोच्च न्यायालयानेच सांगुन आपली हतबलता (चिड !) व्यक्त केलेली आहे. तसेच क्रिकेटचे आहे... आता ICC मधे केंद्रिय कृषि मंत्री श्री. पवार यांचे राज्य आहे म्हणजे कारभार किती स्वच्छ असणार ह्याचा केवळ अंदाज बांधावा...
अर्थात भारताला विश्वचषक
अर्थात भारताला विश्वचषक जिंकायला या सर्व २००० धावा निरुपयोगी ठरल्यात - हरकत नाही त्याच्या बिचार्याचे रेकॉर्ड तर झाले. आम्हाला देशाने कसोटी सामना हरण्याच्या दु:खा पेक्षा त्याचे ५० वे कसोटी शतकाचा जास्त आनंद होतो. >>
उदय.. विश्वचषक किंवा सामना जिंकण्यासाठी सर्व ११ खेळाडूंनी प्रयत्न करायचे असतात. केवळ एका खेळाडूच्या कामगिरीने ते साध्य होत नाही. त्याने २००० धावा करून त्याचे काम केले आहे (तुमच्या म्हणन्याप्रमाणे रेकॉर्डस करण्यासाठीच का होइना).
भारतीय राजकारण आणि भ्रष्टाचार
भारतीय राजकारण आणि भ्रष्टाचार (अवैध मार्गाने गोळा केलेली संपत्ती) ह्यांना वेगळे करता येत नाही
'भारतीय' असे मुद्दाम लिहिण्याची गरज नाही. 'राजकारण आणि भ्रष्टाचार' हे समानार्थी शब्द आहेत. त्यांना एकमेकांपासून वेगळे करताच येत नाही. राजकारण करणे म्हणजे काय? शेती? नाही. उत्पादन? नाही. लोकांच्या जखमांवर इलाज करणे? नाही. घरे बांधणे? नाही? संगणक प्रणाली लिहीणे? नाही.
फक्त भ्रष्टाचार!
वास्तविक आजकाल बरेच भारतीय जगभरात सर्वत्र पसरलेले आहेत. त्यांना माहितच असेल की राजकारण (भ्रष्टाचार) यात भारत या देशाची मक्तेदारी नाही. तेंव्हा उगाच फुशारक्या मारू नका.
यूएसए इस नंबर १!!
काल साहेबांनी निराशा केली.
काल साहेबांनी निराशा केली. युसुफ ला पाठवला असताना स्वतः नाही ते हवेतले फटके खेळायची गरज नव्हती... ठीके साहेबांनी "आता मी मला हवे तसे मुक्त खेळणार" वगैरे ठरवले असेल पण संघाची स्ट्रॅटेजी तशी नसावी असा अंदाज... समोर हॉ. होते म्हणून ठीके.
असो. पुढील सामन्यांतून साहेबांकडून बेजबाबदार फटके अपेक्षित नाहीत. गंभीर ने "अपेक्षित" खेळी केलीच. रैना ने आता निव्वळ क्षेत्ररक्षणाचा सराव करावा...
युवी पुन्हा एकदा आवडला.. फारच "सिरीयस" झालाय गडी. चांगले आहे, निदान विश्वचषक संपेपेर्यंत सिरीयसनेस कायम ठेवावा नंतर आहेच "मसाला" क्रीकेट.
------------------------------------------------------------------------------------
जडेजा चांगले बोलतो. त्याच्या बोलण्यावर बंदी नाहीये. अझ्झूमिया ला देखिल बोलण्यावर बंदी नाहीये. पण असेही त्याचे "बोलणे" कुणी सिरियसली घेत नाहीत..
आयपिल मध्ये चीयर लिडर्स तस्स ईथे सिध्धू आहे.. निव्वळ करमणूक बाकी काही नाही.
झक्की, नवा बाफ जुनी वाफ?
झक्की,
नवा बाफ जुनी वाफ?
भारताने विश्वचषक जिंकल्यावर
भारताने विश्वचषक जिंकल्यावर किती प्रतिसाद होतील? माझा आकडा २००० चा असेल >>>
चला यावर बेटिंग करा आता!
जडेजा चांगले बोलतो. त्याच्या बोलण्यावर बंदी नाहीये. अझ्झूमिया ला देखिल बोलण्यावर बंदी नाहीये. पण असेही त्याचे "बोलणे" कुणी सिरियसली घेत नाहीत >>>
बोलायला हरकत नाहि फक्त दोघंनी ट्विट करु नये मैचच्या निकालाबद्दल
पुढील सामन्यांतून साहेबांकडून
पुढील सामन्यांतून साहेबांकडून बेजबाबदार फटके अपेक्षित नाहीत
--- शतक नक्की गॅरेंटेड.... a big inning is just around the corner...
आयपिल मध्ये चीयर लिडर्स तस्स ईथे सिध्धू आहे.. निव्वळ करमणूक बाकी काही नाही.
--- त्या मदिरा बेदी गायबल्यात कां? भारतात क्रिकेट प्रसाराला त्यांचा पण हातभार होताच.
त्या मदिरा बेदी गायबल्यात
त्या मदिरा बेदी गायबल्यात कां? >>>
त्या गरोदर आहेत बहुतेक!
तो सिद्दु म्हणजे ट्रेन
तो सिद्दु म्हणजे ट्रेन चाललीये शेजारून असा बोलतो! किती ते मुद्दाम पेरलेले शब्द आणि कैच्या कै मेटॅफोर्स!!!! कोई रोको भई इस सरदार को!!
रात्री झोपताना डिक्शनरी, थेसॉरस वगैरे ची पुस्तकं डोक्याजवळ घेऊन झोपतो असं वाटतं.
त्या गरोदर आहेत
त्या गरोदर आहेत बहुतेक>>>
एकतर गरोदर असणार नाहीतर नसणार! ही मधली स्टेप केव्हा येते? 'बहुतेक गरोदर'! व दिवा
तो सिद्दु म्हणजे ट्रेन
तो सिद्दु म्हणजे ट्रेन चाललीये शेजारून असा बोलतो! किती ते मुद्दाम पेरलेले शब्द आणि कैच्या कै मेटॅफोर्स!!!! कोई रोको भई इस सरदार को!!
रात्री झोपताना डिक्शनरी, थेसॉरस वगैरे ची पुस्तकं डोक्याजवळ घेऊन झोपतो असं वाटतं>>>
अहो पण खरच सांगतोय, त्याने तीन महिन्यांचा क्रॅश कोर्स केला होता इंग्रजीचा!
त्या मदिरा बेदी गायबल्यात
त्या मदिरा बेदी गायबल्यात कां? भारतात क्रिकेट प्रसाराला त्यांचा पण हातभार होताच. >> हात, भार, आणि इतर बरेच शारिरिक योगदान होते
रच्याकने, सिध्दु वि. इम्रान खानची एकदा(पाक दौरा ०४-०५ बहुतेक) बरीच हमरीतुमरी झालेली. सिध्दुने फुल्ल वाट लावुन इम्रानला गप्पगार केलेल. युट्युबवर असल व्हिडीओ कदाचित.
>> साहेबाचं शतक नक्की
>> साहेबाचं शतक नक्की गॅरेंटेड
इनसाईड एज घेऊन क्लीन बोल्ड! बरेच दिवसात तो त्याच्या या आवडत्या प्रकाराने आउट झालेला नाहीये.
क्रॅश कोर्स केलाय ते चांगलय
क्रॅश कोर्स केलाय ते चांगलय पण तो खुपच अती करतो ते डोक्यात जातय. हर्षा भोगले एकदम क्लासी वाटतो.
चिमण, तुम्ही सारखे "वाईटाची तयारी" मोड मध्ये असता असं मला वाटतं. खेळला तर खेळला तेंडल्या, नाही तर नाही. मला तर ह्यावेळी पठाण, कोहली, सेहवाग ह्यांची फटकेबाजी बघण्यात जास्त रस आहे. ह्याउपर काहीही करुन शेवटी मॅच जिंकले म्हणजे झालं!! क्लिफहँगर्स बघायला मजा येतेच की!
ह्याउपर काहीही करुन शेवटी मॅच
ह्याउपर काहीही करुन शेवटी मॅच जिंकले म्हणजे झालं!!
--- आपल्याला तर अर्धशतकांचे शतक आणि शतकांचे शतक पहायचे आहे :स्मित:... तमाम क्रिकेट रसिकांची तळमळ आहे जोडीला जाहिरात करणार्या कंपन्यांची तशी मागणी (शेवटी त्यांचा पैसा कामी लागतो आहे - हट्ट धरणारच) आहे. त्यामानाने विश्वचषक सामन्यांचे निकाल किंवा ते फिक्स असणे/ नसणे हे मुद्दे गौण (कमी महत्वाचे) आहेत.
>>> अर्थात भारताला विश्वचषक
>>> अर्थात भारताला विश्वचषक जिंकायला या सर्व २००० धावा निरुपयोगी ठरल्यात - हरकत नाही त्याच्या बिचार्याचे रेकॉर्ड तर झाले.
१९८३ नंतर सर्वच खेळाडूंच्या सर्व धावा आणि त्यांनी घेतलेले बळी विश्वचषक जिंकायला निरूपयोगी ठरलेत. कोणत्याही एका खेळाडूच्या जीवावर आजतगायत विश्वचषक तर सोडाच एखादा सामनाही जिंकणे शक्य नाही.
कोणत्याही एका खेळाडूच्या
कोणत्याही एका खेळाडूच्या जीवावर आजतगायत विश्वचषक तर सोडाच एखादा सामनाही जिंकणे शक्य नाही.>>अआणि हे फक्त भारतीयच नाहि तर England, NZ, SA नि एकदाचे अपवाद वगळता SL, PAK ह्यांच्याबाबत पण खरे आहे.
उदय, फारच अनुदार वाटली ती
उदय, फारच अनुदार वाटली ती कॉमेन्ट सचिनबद्दल. १९९६ मधल्या ५२३ आणि २००३ मधल्या ६७३ धावांचा भारताला सेमी आणि फायनल पर्यंत पोहोचवण्यात मोठा वाटा होता. १९९६ मधे तर सेमीत तो आउट झाला आणि मॅच फिरली. दोन्ही वेळेस इतरांनी थोडे काही केले असते तर भारत जिंकलाही असता. यावेळेस जिंकेलही.
त्याच्या २००० धावांपेक्षा फायनल मधले एक शतक खुद्द सचिनही जास्त महत्त्वाचे समजेल, पण "सर्व २००० धावा निरूपयोगी..." म्हणणे म्हणजे त्याला काहीच क्रेडिट न दिल्यासारखे आहे.
मला तर ह्यावेळी पठाण, कोहली,
मला तर ह्यावेळी पठाण, कोहली, सेहवाग ह्यांची फटकेबाजी बघण्यात जास्त रस आहे
<< सेम हिअर..
फारेंडा, आता पाकीस्तान न्यु
फारेंडा, आता पाकीस्तान न्यु झिलंडचे हायलाईट्स बघत होतो. शहजाद आऊट झाला एल बी तर तो कामरान अकमल ला विचारतोय आऊट आहे का म्हणून. तु काल लिंक दिलेली ते आठवून हसू आलं जास्त. तो सुटलेला कॅच पण होताच हायलाईट्स मध्ये. कमाल आहे बॉ पाकिस्तानवाल्यांची. काय रटाळ खेळतायत!!!!
कमाल आहे बॉ
कमाल आहे बॉ पाकिस्तानवाल्यांची. काय रटाळ खेळतायत!!!!
---- दोघांच्याही पे रोल वर रहाण्याची सवय :स्मित:... अत्यंत हुशार आणि दुरदर्शी आहेत.
त्यांचा खेळ बघून मलाही
त्यांचा खेळ बघून मलाही वाटायला लागलय की अगदी फुल ब्लोन फिक्सींग जरी नसेल तरी थोडं फार नक्की असणार आणि पाकिस्तान वाले नक्कीच सामील आहेत!
मला काही लोकांच्या "फिक्सींग
मला काही लोकांच्या "फिक्सींग ..फिक्सींग.." ओरडण्याचा अगदी कंटाळा आलाय.
एकदा झाले ना सांगून की सगळे फिक्स आहे ? मग परत परत तेच ते लिहीण्यामागचा हेतू काय? स्वतः आनंद घ्यायचा नाही आणि दुसर्याला घेऊ द्यायचा नाही अशी दुष्ट मनोवृत्ती आहे!
वैताग नुसता
(No subject)
Pages