२ वर्षांपर्यंतच्या मुलांचा आहार
बाळ ५-६ महिन्यांचे झाले कि हळू हळू आपण त्याला दूधाव्यतिरिक्तचे अन्न पदार्थ द्यायला सुरुवात करतो. घरात वडीलधारी माणसे असतील तर नक्की कशापासून आणि किती प्रमाणात सुरुवात करायची या बाबतीत मार्गदर्शन मिळते. पण बर्याच आयांना (विशेषतः सेपरेट कुटुंबातील) ते कसे करावेत याची माहीती असेलच असे नाही. अन्यथा मैत्रिणी / पुस्तके / आंतर्जाल इ. वर हवाला ठेवावा लागतो.
मूल साधारण १ वर्षाचे झाले की त्याला आपण जेवतो ते सर्व अन्न पदार्थ (भाजी + वरणभात + पोळी etc) देता येतात. अर्थातच कमी तिखटाचे. ५ महिने ते २ वर्ष काय काय पदार्थ देता येतील, ते करण्याची कृती काय, कोणत्या वेळेला काय काय देता येईल, काय काय पचू शकेल,अजून दात न आलेल्या, किंवा २-३ दात आलेल्या १ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीचे स्पेशल खाऊचे प्रकार, मूल २ वर्षांचे होईपर्यंत हळू हळू आहारात बदल करून मोठ्यांसारखे सर्व अन्नपदार्थ खायला लागणे इ. बद्दलची माहीती व प्रश्नोत्तरांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बीबी! उपयुक्त टीप्स, खाऊ ज्यातून भरवायचा ती utensils etc या विषयीची माहीती ही शेअर करु या.
सर्व would be mothers ना आणि ज्यांची बाळे ५ महिने ते २ वर्ष या वयोगटात मोडतात त्या पालकांना हे फायद्याचे ठरेल असे वाटतेय.
थँक्स मृनिश , सखी. सर्दी
थँक्स मृनिश , सखी.
सर्दी झालेली असेल तर नाचणी ने जास्त त्रास नाही ना होत??
सर्दी झालेली असेल तर नाचणी ने
सर्दी झालेली असेल तर नाचणी ने जास्त त्रास नाही ना होत??
>>> नाचणी गार पडते असे मीही ऐकलेय. रोज रोज नको पण अधुन मधुन द्यायला हरकत नाही, असे वाटते.
सर्दी असेल तर नको
सर्दी असेल तर नको देवु...पाहिजे तर आधी तांदुळ आणि नाचणी मिक्स द्यायचे. हळुहळू प्रमाण वाढवत न्यायचे. माझ्या मुलीची प्रकृती उष्ण आहे त्यामुळे तीला कधी त्रास झाला नाहि उलट उन्हाळ्यात फायदाच झाला.
नाचणी थंड असते..त्यामुळे
नाचणी थंड असते..त्यामुळे सर्दी असेल तर नको.नाचणी, डाळ आणि गहु असे १:१:३ अशा प्रमाणात मिक्स करुन दे..म्हणजे सर्दीचा त्रास नाही होणार
थँक्स ग . बर झाल सांगितल
थँक्स ग .
बर झाल सांगितल निमिष ला सर्दि झालिये , आता नाही देनार .
अथर्व आता ७ महिन्याचा आहे.
अथर्व आता ७ महिन्याचा आहे. त्याचा दररोजचा मेन्यू असा आहे
सकाळी उठल्यावर - दुध
१० - ११ दरम्यान - तांदूळ + मुग डाळ + मसुर डाळ ची खिमटी (त्यात मि चिमुट्भर हिंग आणि हळद टाकते)
१ - २ दरम्यान - नाचणी सत्व (गोड)
संध्याकाळी ५ - ६ - रव्याचि पेज (गोड)
७ ला - एक चिकु
१० pm - तांदूळ + मुग डाळ + मसुर डाळ ची खिमटी (वरिलप्रमाणे)
मि त्याच मेन्यु मध्ये काहि बदल करू का? किवा त्याला अजुन वेगळे काय देउ शकते?
आनि जर केळे द्यायचे असेल तर, वेलचि केळे कि साधे केळे?
शिंगाड्या च्या पिठाचि कोणति रेसिपि करता येइल?
अवंन्तिकाजी, तुम्ही देत
अवंन्तिकाजी,
तुम्ही देत असलेला आहार हा परिपुर्ण आहेच अस मला वाटतं....
या वयात रोज एक चिकु दिल तर चालतं का ? एक शंका .
माझा मुलगा दिड वर्षाचा होतोय, पण खायला मेनली दुध- २ वेळा,बिस्किटे,भात,चपाती,भाकरी कुस्करुन खातो, कधी कधी केळी खातो ..
आणखी कायकाय देता येईल्/दिल पाहिजे,हे कृपया kunitaree सुचवाल !
माझी लेक १३ महिन्याचि झाली आज
माझी लेक १३ महिन्याचि झाली आज ...जन्मवेळी वजन ८.५ पाउन्ड होत आत्ता २५ आहे डॉक्टर ला काहि प्रोब्लेम वाट्त नाहि पण मला सगळे लोक बाळ १-१/२ २ वर्र्शाचे आहे का? असे विचारले जाते
आहार काय असवा? mi tila diwasbharat he dete
२४ oz milk,1 cup cereal ,2 gerberstage 2 ,1 wati bhat /khichdi/ pasta etc
साहि, माझी मुलगी पण १ वर्षाची
साहि,
माझी मुलगी पण १ वर्षाची आहे. तिचे वजन २३ पाउंड आहे. आणि ती सध्या, तु वर लिहिलायस तोच आहार घेते.
ती १/२-२ वर्षाची आहे का? हा प्रश्न लोकं मलाही विचारतात. 
हा आहार योग्य आहे का नाही ते मी सांगू शकत नाही. पण तिचं दूध थोडं कमी करावं का? असा प्रश्न मला बरेच दिवस पडलाय. पुढच्या visit मधे Doctor ना विचारणार आहे मी.
इथे जन्माच्या वेळच्या वयाच्या
इथे जन्माच्या वेळच्या वयाच्या तिप्पट वजन वर्षभरानंतर असावे असं डॉक्टर सहसा सांगतात. त्यात थोडफार कमी जास्त चालतं.
त्याप्रमाणात बघितलं तर बरोबर आहे की वजन.
थन्क्स अल्पना आणि सोहा अग मला
थन्क्स अल्पना आणि सोहा
अग मला आई म्हणतेच कि छान गुटगुटीत बाळ आहे तर त्याची कस्लि काळजी कर्तेस पण विचारलेले बरे
अनिल७६, १.५ वर्ष म्हणजे
अनिल७६,
१.५ वर्ष म्हणजे त्याला हळु हळु सगळं आपण खातो ते सुरु करता येइल. दात आले नसतील तर मउ करुन. दोन वेळ पुर्ण जेवण (भाज्यांसहित, सुप वगैरे). पुर्ण आहार मिळेल असं बघा. डाळ, भाज्या तुप अस सगळ खाल्ल पाहिजे. आणी हिच वेळ आहे चांगल्या सवयी लावण्याची. हळु हळु सगळ सुरु करा
@अनिल७@, मला पण हे बरोबरच
@अनिल७@, मला पण हे बरोबरच वाटल होत. त्याच birth weight - 3.2 kg, आणि आता ७ महिन्यानी - 7.5 KG आहे. डॉ. म्हनतात वजन बरोबर आहे, पन काहि जण म्हनतात तो लहान वाटतो. म्हणून इथे विचारले.
रोज एक चिकु देत नाहि, जेव्हा मि किवा नवरा घरि असतो तेव्हाच देतो.
त्याला आता जरा खोकला झाला आहे, तर केळे चालु केले तर चालेल का?
मी भारतातुन नाचणी सत्व
मी भारतातुन नाचणी सत्व मागवलेय ते शिजवले तरि खुप काळपट आणि खुप च गोड आहे, खुप पातळ पण रहाते (मी पाण्यात शिजवते आणि १ टे स्पुन सीरीयल मिसळते, आणि नाचणी सत्व "रुचिरा"चे आहे)
माझी मुलगी आता ९ महीन्यची आहे, तर ते दूधात शिज्वुन दीले तर चालेल का? कारण इथे डॉ वरचे दूध देउ नका सांगतात.पण नाचणी बरोबर दीले तर चालेल का?
पूहू, साखर वेलदोडा घातलेलं
पूहू, साखर वेलदोडा घातलेलं सत्व आहे वाटते. मी माझ्या लेकासाठी पूर्णानंद की असच कुठलं तरी आणायचे त्यात साखर खूप कमी असते.
असो, नाचणी सत्व बनवताना एका वाटीत त्याची घट्ट पेस्ट करुन घे. पाणी उकळलं की लगेच त्यात ही पेस्ट घालून भराभरा हलव म्हणजे सगळं सत्व एक जीव होइल आणि खीर पातळ होणार नाही. २ टे स्पू सत्व असेल तर ४ औंस पाणी पुरेसं आहे. आधी पाणी पुरेसं असेल तरी ती खीर बनवल्यानंतर जरा वेळ तशीच राहिली तर पातळ होते असा माझा अनुभव आहे. दुधात केलेली खीर काळपट दिसत नाही.
सिंडरेला मी आधी केप्र चे
सिंडरेला मी आधी केप्र चे वापरत होते, ते चांगले होते .
हे मला नाही आवडले, मला प्रश्न हा आहे की मी ते दूधात बन्वले तर चालेल ना?म्हणजे विकतचे दूध आता ९ महीन्यची असताना नाचणी बरोबर चालेल का? की काही डेअरी प्रॉडक्ट अॅलर्जी वगैरे चा प्रॉब्लेम असतो का?
ते मी नाही सांगु शकत.
ते मी नाही सांगु शकत. डॉक्टरांनाच विचार. इथे एक दोघी आहेत ज्यांनी बाळ वर्षाचं व्हायच्या आधी होल मिल्क दिले होते. (कुठे गेल्या ? या उत्तर द्यायला.) मी भारतात असताना १ महिना गायीचं दूध दिलं होतं. इथे आल्यावर डॉ नाही म्हणाले मग थांबवलं.
थँक्स सिंडरेला , डॉ ना
थँक्स सिंडरेला , डॉ ना विचारते , तरी कोणी दिले असेल तर सांगा.मला तिला प्यायला द्याय्चे नाहीये दूध ,फ॑क्त नाचणी बरोबर द्यायचे आहे.
पीहू ईथे डॉक्टर नाही सांगतात
पीहू ईथे डॉक्टर नाही सांगतात वरचं दूध द्यायला. बरेचदा छोट्या बाळांना खिरी वगैरे देतो आपण. माझी वहिनी(ही स्वतः डॉक्टर आहे.) माझ्या भाच्याला चक्क फॉर्म्युला मधे खीर करून देत असे. तिने फॉर्म्युला बनवणार्या कंपनीलाच फोन करून विचारलं होतं की फॉर्म्युला कितपत गरम केला तर चालेल.
हे असंच कर असं नाही सांगत. पण एक ऑप्शन सांगतेय.
पीहू खिरीपुरतं नेहमीचं दूध
पीहू खिरीपुरतं नेहमीचं दूध दिलंस तरी चालेल असे मला वाटते.ते ऑर्गॅनिकच वापर.एकदा देऊन ४-५ दिवस वाट बघ.पचतय अस वाटलं तर कंटिन्यू कर.तरीपण दूध नको असे वाटत असेल तर पाण्यात खीर तयार करुन वरुन फोर्मुला घालून पातळ कर.लहान मुलांच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट सगळ्यांना लागू होत नाही.अंदाज घेऊनच ठरवावे लागते.ह्याबाबतीत डॉक्टरांची थिअरी आणि आपले अंदाज असा मध्य गाठायचा.
(No subject)
अग पिहू मि कधिची देतेय निमिष
अग पिहू मि कधिची देतेय निमिष ला दुधात शिजवून्..काही त्रास नाही होत त्याला.
पन एक प्राऑब्लेम होतोय ती खीर थंड झाली का खूप घट्ट होते मग मि त्यात थोडेसे दुध टाकुन पातळ करते..माझ्याकडे स्त्व नाही पिठ आहे, आता भारतात मिळेल स्त्व
इथे मला ब्रेस्ट्फिडींग ग्रुप मध्ये एक बुक दिले होते त्यात एक रेसिपी होती...रवा दुधात शिजवून त्यात फळे मिक्स करून द्यायचे मस्त यम्मी लागते.
माझं पिल्लू ८ महिन्यांचं
माझं पिल्लू ८ महिन्यांचं झालय. रिफ्लक्स च्या त्रासामुळे आम्ही सॉलीड खाण्यात थोडेसे मागे पडलोय. आता तो उभा रहातोय आणि चालायचंय त्याला. खूपच मस्ती करतो त्यामुळे वजन कमी होतय. हाय कॅलरी पण दूध नाही द्यायचं गाईचं. काय देऊ त्याला म्हणजे वजन वाढेल?
वरदा, दूध नाही, पण तूप चालतं
वरदा, दूध नाही, पण तूप चालतं का? खिमट, गुरगुट्या भात, केळं,वेगवेगळ्या भाज्यांची सुपं असं सगळं खातं -पितं का बाळ? वजन कमी वाटलं तर त्याचे डॉक्टर सांगतीलच तुम्हाला. ते काही बोलले नाहीत तर काळजी करू नका. (सगळ्या आयांना बाळं बारीक झालीत असं वाटंत असतं.
) रीफ्लक्सचा त्रास कमी झाला असेल तर आता पचायला किंचित जड असं नाचणीसत्त्व पण सुरू करता येईल.
पिहु, मी पण दिले होते बाहेरचे
पिहु,
मी पण दिले होते बाहेरचे दूध्.इथे आली तेव्हा लेक ७ महिन्यांची होती. तिला भारतात छान गाईचे दुध प्यायची सवय्.तिने इथे फॉर्मुल्याला तोंडच लावले नाही.दोनेक महिने अशी मारामारी झाली, शेवटी तिचा डॉक्टर म्हणाला, ती घेतच नाही तर द्या साधे दूध...
वरदा, डॉक्टरला विचारून सॉय मिल्क द्यायला हरकत नाही, गाईचे नको असेल तर. वजनासाठी मृण्मयीने म्हटले आहे तसे तूप देता येइल्.काही डॉक्टर पेडियाशुअर पण द्यायला सांगतात. एक झिन्क असलेले टॉनिक असते, पन ते डॉक ने म्हटले तरच द्यावे.माझी लेक कमी खायची, कमी झोपायची आणि खूप खेळायची. वजन कमीच. शेवटी इथे pediatric dietician कडे गेलो होतो.ती भारतीय असल्याने खूप फायदा झाला.
अजून आठवलं तर लिहीनच..
तूप देऊन पहा म्हणाली डॉक. आज
तूप देऊन पहा म्हणाली डॉक. आज पहिल्यांदाच एक कण चाटवुन पाहिलाय. आता काय होतय पाहूया. गाजर खाऊन खूप कॉन्स्टिपेशन झालय का कुणाच्या बाळाला? स्नेहा अगदी अगदी. आजच पिडीयाशुअर द्या म्हणाली डॉक. फॉर्म्युला मधे मिक्स करुन द्यायला सांगितलय.
वरदा, थेट कण चाटवण्यापेक्षा
वरदा, थेट कण चाटवण्यापेक्षा वरणाच्या पाण्यात किंवा खिमटात घालून बघा. यो बेबीचं सोया-योगर्ट येतं का? ते देता येईल. अंडं कधी देता येतं? विसरले.
गाजर खाऊन कॉन्स्टिपेशन होतं
गाजर खाऊन कॉन्स्टिपेशन होतं का माहिती नाही.पण प्रून्स मुळे पोट साफ होते. जास्त दिल्यास पोट बिघडू शकते.
म्रुण्मयी धन्स. चालेल आता
म्रुण्मयी धन्स. चालेल आता उद्या भातात घालून देईन कणभर तूप. पोळी कधी द्यायची. मी फोन केला डॉक ला. अंडं चालेल म्हणाली १ सेमी आकाराच्या तुकड्याने सुरुवात करायची. स्नेहा लक्षात ठेवेन प्रून्स चं.
मी हा सगळा बीबी खूप
मी हा सगळा बीबी खूप महिन्यांपासून वाचतीय.
पण मला मेज्जर चिंता आहे सद्ध्या.... आमचं पोरगं दात यायला लागल्यापासून जाम काही खात नाही. सारखं आपलं फॉर्म्युला एके फॉर्म्युला. खूप कष्टाने आणि चिवटपणे मागे लागले तर अर्धं कसंतरी संपवतो. राईस सिरिअल्स्/ओटमिल्/गर्बरचे फुड/पास्ता/व्हिट ब्रेड/नाचणी सत्व वगैरे त्यातल्या त्यात आवडीने खातो.. पण वरण्भात, खिचडी इल्ले.. फार मागे लागावं लागतं तेव्हा जर्रा पोटात जाते.. थोडीजरी शितं राहिली तरी जीभेने बाहेर काढतो. प्युरी करून, हाताने मऊ गरगट करूनही फार फरक नाही.
मला वाटतंय, मुळात रांगायला यायला लागल्यापासून व एकंदरीत खेळणं वाढलंय तेव्हापासून भूक तर लागते, पण खाण्याइतका पेशन्स राहात नाहीये. कसं मॅनेज करावे? ७-८ महिन्यांचा होईस्तोवर इतका मस्त खात होता हा मुलगा..
Pages