विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी १९७० ते १९८० या दशकात क्रिकेटशी संबंध शून्य. नंतर मात्र इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत इथे गेल्यावर अगदी आधाशीपणे गल्ली क्रिकेटसुद्धा अत्यंत उत्साहाने, लक्ष लावून बघतो. >>:-D व्वा झक्की!!! अस असल्यास, आपण खरे रसिक शिरोमणी.

कॅनडा मॅच बघतय का कोण? Canada require another 65 runs with 7 wickets and 17.0 overs remaining
जोरात चालली आहे एकंदरीत.

असाम्या,

रैनाला संधी देण्याचा "गंभीर" विचार व्हावा एव्हडेच मला म्हणायचे आहे..

आकडा लावायचाच आहे तर रैना वर.. (पुन्हा फिक्सींग या "मूळ" विषयाकडे चर्चा नेण्याचा एक प्रयत्न!) Happy

(सेमिजः भारत वि. आफ्रिका आणि ऑसी वि. लंका
फायनलः भारत वि. ऑसी, विजय अर्थातच भारताचा. )

<< आयला! इतक्या पिढ्या झाल्यानंतरही ते गुजराथी मराठीत बोलले हे विशेष आहे. >> खरंय! आणि, एकदाही मधेच "आयला", "मायला" न घुसडता !!
---- त्यात आश्चर्य वाटण्या सारखे काही नाही... आता चार पिढ्या महाराष्ट्रापासुन दुर राहिल्यावर बाहेरच्या चौथ्या पिढीची मराठी महाराष्ट्रात वाढलेल्या चौथ्या पिढीच्या मराठी पेक्षा नक्कीच शुद्ध असणार. जर वेगळे प्रयत्न केले गेले नाही तर महाराष्ट्रातील माराठी भाषेचा सतत विकास सुरु रहाणार आहे...

>> जर वेगळे प्रयत्न केले गेले नाही तर महाराष्ट्रातील माराठी भाषेचा सतत विकास सुरु रहाणार आहे...
आयडीया सारेगमप वगैरे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक यात हातभार लावत आहेतच.. Happy

(सेमिजः भारत वि. आफ्रिका आणि ऑसी वि. लंका
फायनलः भारत वि. ऑसी, विजय अर्थातच भारताचा. )
---- कुठे तरी भारत-पाक आणा रे... कोट्यावधी प्रेक्षक (आणि पैसे) लाभतील, पुन्हा सुगीचे दिवस येतील, मैत्री - आणि शांतीचे वारे म्हणजे दुधात साखर.

रैनाला संधी देण्याचा "गंभीर" विचार व्हावा एव्हडेच मला म्हणायचे आहे.. >> जरूर रे. मलाही आवडतो रैना, विशेषतः He is better slogger than Yuvi when it comes to walking out in the middle in end overs with hardly any time to get set. सध्या तेच काम पठाण मजबूतपणे करतोय.

सेमिजः भारत वि. आफ्रिका आणि ऑसी वि. लंका>> आफ्रिका विरुद्ध आपण हरू पण विंडीज बरोबर जिंकू, Thanks to tie against England, RSA will be top team followed by us. दुसर्‍या गटामधे SL तिसरे असण्याची शक्यता मला अधिक वाटते (मुख्यतः washout गेम मूळे) त्यामूळे Ind vs SL quarter final होईल बहुतेक.

पाकडे आणि आफ्रिका नेहमीप्रमाणे उपांत्यपूर्व किंवा उपांत्य फेरीत हरतील. भारत, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया यापैकी २ संघ अंतिम फेरीत असतील.

कुठे एक स्पेल चांगला पडला आहे तर त्याला डोक्यावर चढवत आहेत.. आधीच त्याच्या डोक्यात लगेच हवा जाते>> कालची त्याची innings खरच चांगली होती रे. म्हणजे he is not fluent against spinners and especially when ball does not come on to bat easily. पण काल he seem ready to bid his time and ride out dot balls. बहुतेक वेळा (मी तरि बघितलेल्या मॅचेस मधे) maiden over follows his downfall with some unsuccessful jailbreaking heave. काल तसे होउ दिले नाहि त्याने म्हणून कौतुक. कोहलीला run out केल्यावरही तो खेळत राहिला. who knows whats next !!

<< आता बहुतेक वेळा ३०० पेक्षा जास्त धावा होतात त्याची महत्वाची कारणे म्हणजे ....>> मास्तुरेजी, याचं हे एक आणखी महत्वाचं कारण असूं शकतं - धांवसंख्या रोखण्यासाठी ज्या प्रकारची गोलंदाजी पूर्वी परिणामकारकपणे वापरली जात असे, त्या गोलंदाजीचा समाचार घ्यायला फलंदाजानी नवीन तंत्र/फटके शोधून काढले ; उदा. प्लेयींग अगेन्स्ट द स्पीन, रिव्हर्स स्विप, पॅडल शॉट, आंखूड टप्प्याचे चेंडू टपली मारून स्लिप/यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून सीमापार करणे, गोलंदाजाच्या डावपेंचांचा अचूक अंदाज घेऊन आधीच यष्टीच्या डाव्या/ उजव्या बाजुस बाहेर जावून चेंडू टोलावणे इ.इ. मला वाटतं अचूक स्विंगींग यॉर्कर सोडला तर आता कोणताही चेंडू टोलावण्याचं तंत्र बहुतेक फलंदाजानी आत्मसात केलं आहे.

अनुमोदन भाऊ. आणि आता अचूक स्विंगींग यॉर्करवर पण एक रन लोक काढतात. काल ओडोयो ने यॉर्करला मस्त बॅट लावली. शॉर्ट मध्ये एक रन! फलंदाज कुठलाही बॉल खेळायचाच खेळायचा असे ठरवतात. ह्या विचारामुळे धावा जास्त निघतात. नाहीतर आपल्या शास्त्र्या ऑफ ला मस्त विड्थ दिल्यावरही "वेल लेफ्ट" करत होता आणि त्याच काळात श्रीकांत यॉर्करवर पण बॅट तिरकी करून एखाद रन घ्यायचा विचार करत होता.

मागच्या काळची तुलना करून काय फायदा? आज आहे हे असे आहे.

भारत जिंकला ही मोठी गोष्ट असली तरी कसा जिंकला हे पाहणे पण महत्वाचे आहे असे मलाही वाटते. नेट रन रेट थोडा वाढला असता, पुढच्या मॅच मध्ये विरोधी टीम वर देखील कसा खेळला ह्याचा थोडा प्रभाव असतो. नाहीतर त्या ओ ब्रायन ची एवढी जाहिरात केली नसती. Happy

असो रात गयी बात गयी!

चावला ऐवजी नेहरा! ज्या दिवशी लागला त्या दिवशी मस्त. चावला कधी लागतच नाही. Happy

भारतातून आपले प्रतिनिधी केदार ... Happy

सगळे संघ आपापल्या री-व्ह्यू मिटींग्जमध्येही इतके बोलत नसतील ... Proud
गांगुली एकदा स्पोर्ट्सस्टारच्या मुलाखतीत म्हटला होता ते आठवलं - आपल्या देशात मैदानावरच्या ११ खेळाडूंपेक्षा इतरांनाच क्रिकेट जास्त कळतं Lol
(समस्त क्रिकेट-बोलकांनो, हलके घ्या रे. छान समरसून चर्चा करता तुम्ही. मी नियमित वाचते. Happy )

<< भारतातून आपले प्रतिनिधी केदार ...>> अनुमोदन, पण केदारजी... हे विकतचं श्राद्ध आहे याची जाणीव आहे ना ! Wink
<< आपल्या देशात मैदानावरच्या ११ खेळाडूंपेक्षा इतरांनाच क्रिकेट जास्त कळतं >> ललिता-प्रीतीजी, गांगुली कॉमेंट्रीबॉक्समधल्या स्वतःचीच पाठ थोपटत होता, हे लक्षांत आलं का तुमच्या ! Wink
<< सगळे संघ आपापल्या री-व्ह्यू मिटींग्जमध्येही इतके बोलत नसतील >> वेगवेगळ्या देशातून इतकी बँडपथकं आपापलं ठेकेदार संगीत घेऊन आलीत इथं तें काय स्वतःच घेर धरून नाचायला ! खरी गंमत तर यातच आहे कीं येईल तसं मनसोक्त नाचावं प्रत्येकानं त्यांच्या संगीताच्या ठेक्यावर !! Wink
आजच्या सामन्यात पाकिस्तान सरस संघ असला तरीही कामगिरीत यू-टर्न घ्यायला धडपडणारा न्यूझीलंड संघ कडवी झुंज देईल अशी जोरदार अपेक्षा आहे.

आजच्या सामन्यात पाकिस्तान सरस संघ असला तरीही कामगिरीत यू-टर्न घ्यायला धडपडणारा न्यूझीलंड संघ कडवी झुंज देईल अशी जोरदार अपेक्षा आहे.>> नाही आजिबात वाटत मागील कामगिरी (७-८ मॅच) दोन्ही संघांची पाहता. पाक जिंकेल आरामात. रझ्झाक, गुल चालतील. आफ्रिदीची बोलींग लॉ ऑफ अ‍ॅव्हरेजनुसार कदाचित गंडेल. पहिली फलंदाजी जिंदाबाद Happy

<< आफ्रिदीची बोलींग लॉ ऑफ अ‍ॅव्हरेजनुसार कदाचित गंडेल. >> गौतमजी, त्याच लॉ ऑफ अ‍ॅव्हरेजनुसार त्याची फलंदाजी बहरात येऊं शकते व कदाचित न्यूझीलंडची कामगिरी पण !!! Wink

<< पीटरसन गेला.
माइक हसी येतोय.. >> स्पर्धेत मोक्याच्या वेळीं इंग्लंडला धक्का अन ऑसीजना हुकमी एक्का ! May be , "The fortune favours the brave "!!
इंग्लंड विरुद्ध हरल्यानंतर जॅक कालीसच्या लेखस्तंभातील हे उतारे तो एक अफलातून चतुरस्त्र खेळाडूच नाही तर एक परिपक्व विचारवंत पण आहे हेच दर्शवतात -
And although we lost to England, it was another tremendous and exciting game of cricket. Obviously, I think, we should have won, and I'm as fed up as I would have been 16 years ago when my international career began, but life has taught me many lessons over the last decade and a half and I'm happy to see the positives from the game.
.......
There are many things which I remember from the previous four World Cups I've played in, but chief amongst them is the way really confident teams are able to focus on the next game after a defeat. That is, when there IS another game. No point being wise after a quarter or semi-final loss.
[स्त्रोत - रिडीफ स्पोर्टस; इटॅलिक्स माझे]

[ हे मराठीत सांगण्याचा माझा विचार मी तत्काळ सोडला कारण " आयला ! कालीस पण मराठी लिहायला/बोलायला लागला", या संभाव्य प्रतिसादाचा मी धसकाच घेतलाय ! Wink ]

आतापर्यंत आपले बरे चाललेय असे वाटतेय. म्हणजे कोण चालतेय, कोण नाही, काय चालतेय , काय नाही याचा नक्की अंदाज घ्यायला येतोय. उरलेल्या मॅचेस मधे नक्की रैना व अश्विन ला संधी मिळणार. नाहीतर त्यातला एक सुनिल वालसन सारखा नुसता लकी घोडा राह्यचा. Happy

साहेबांना कधी कधी शाळा आठवते. अगदी शाळकरी होतात. Happy

७ बॅटर व ४ बॉलर असेच चित्र रहाणार असे दिसते. आयर्लंडच्या मॅचला एक बॅटर कमी पडत होता.
चावला का अश्विन हे नॉक आउट ला समोर कोण आहे त्यावर ठरणार. पण बहुतेक अश्विन नक्कीए होइल असे वाटतेय. नेहरा आणि मुनाफ ला आलटून पालटून खेळवले तरी काही फरक पडत नाही. श्रीसंथ बाहेर. कोणी जखमी असल्यास खेळेल. खर म्हणजे त्याने बांगला देश विरूद्ध सुरुवात चांगली केली होती पण वहावला.

एकंदरीत आम्हाला काय करायचे आहे हे चांगले माहित आहे. फिल्डींगच्या तृटी साठी आम्हाला २५/३० रन्स जास्ती कराव्या लागतात हे ही माहितीय. फरक काय पडतो. जिंकल्याशी मतलब. Happy

यावेळेस आपल्या फक्त दोन मॅचेस प्रवासामुळे पाहता आल्या नाहीत. पण गेल्यावेळेपेक्षा बरे. त्यावेळेस एका आठवड्यात आपला आख्खा वर्ल्ड कप संपला होता.

आता दोन तारखेला पोझिशन कुठली घ्यावी, हातात काय असावे , मेनू काय असावा,इतरांनी कुठे बसावे अशा महत्वाच्या गोष्टींच्या ट्रायल सुद्धा माझ्या कडून चालू आहेत याची नोंद घ्यावी. हो आपण तयारीत कमी नको. Happy

मॅचचा पहिलाच चेंडू शोहेबने नो टाकला... अंतर डोळ्यात भरणारं असल तरी पंच एकदम ढिम्म... अश्यावेळी तिसरा पंच पण ढिम्मच का असतो?

यावर तीव्र प्रतिसाद - प्रतिक्रिया - येणार हे माहित असूनही खेळपट्टी व विरुद्ध संघ पाहून चावलाला संघात घेणे लाभदायक ठरेल असं धार्ष्ट्याचं विधान मी करतोय; चावला अजून जागतिक किर्तीचा लेगस्पीनर नाही हे वेगळं सांगायला नको पण इथल्या खेळपट्ट्यांवर तो बाहेरच्या संघाना
आपल्या तथाकथित जलदगती गोलंदाजांपेक्षां -किंवा चांगल्या ऑफ-स्पीनरपेक्षाही - त्रासदायक ठरूं शकतो
असं अजूनही मला वाटतं. तज्ञ असल्याचा फुसका आव न आणतां मला प्रामाणिकपणे वाटतं कीं विकेट घेण्यासाठीची व धावा रोखण्यासाठीची गोलंदाजी यांत त्याची गल्लत होते आहे; कुणीतरी मार्गदर्शन करून त्याच्या डोक्यातला हा गोंधळ दूर केला तर त्याला निश्चितपणे लय सांपडेल व तो परिणामकारक होईल.
माझं साफ चुकतही असेल पण हा माझा नसता हटवादीपणा आहे असं मात्र कृपया समजूं नये.

>> या संभाव्य प्रतिसादाचा मी धसकाच घेतलाय
यालाच म्हणतात सरप्राईझिंग द ऑपोझिशन, भाऊ! Proud

आता बहुतेक वेळा ३०० पेक्षा जास्त धावा होतात त्याचं अजून एक कारण म्हणजे बॅट. हल्लीच्या बॅटींच्या अफलातून पॉवरमुळे नुसत्या मनगटाच्या फ्लिकने बाउंडर्‍या बसतात. आयर्लंडच्या विरुद्ध युवराजने नुसत्या फ्लिकने मिडविकेटला आणि धोनीने लाँग ऑनला मारलेले चौकार आठवा. जुन्या बॅटने बॉल ३० यार्ड सर्कलच्या बाहेर पण गेला नसता. शिवाय २०/२० मुळे फलंदाजांचा माईंडसेट बदलला आहे हेही एक कारण आहे.

<< हल्लीच्या बॅटींच्या अफलातून पॉवरमुळे नुसत्या मनगटाच्या फ्लिकने बाउंडर्‍या बसतात. >> १००% सहमत .
<< यालाच म्हणतात सरप्राईझिंग द ऑपोझिशन, भाऊ! >> Wink

हल्लीच्या बॅटींच्या अफलातून पॉवरमुळे नुसत्या मनगटाच्या फ्लिकने बाउंडर्‍या बसतात. >> अहो तो पोलार्ड नुसता जागच्या जागी पंच करतो. नो बॅक लिफ्ट , नो फॉलो थ्रू, बॉल मात्र सरळ बाहेर.

भाउ साहेब चावला बाबत सहमत. यावेळेस इतर टीम्स्ची तयारी तरी बरी दिसतीय स्पिन खेळायची, शिवाय एंग्लंड व साआ कडे स्वतःचे चांगले स्पिनर ही आहेत.

>>आता दोन तारखेला पोझिशन कुठली घ्यावी, हातात काय असावे , मेनू काय असावा,इतरांनी कुठे बसावे अशा महत्वाच्या गोष्टींच्या ट्रायल सुद्धा माझ्या कडून चालू आहेत याची नोंद घ्यावी. हो आपण तयारीत कमी नको.
हळू बोला याला "फिक्सींग" म्हणतील.. Happy

Pages