केल्याने भाषांतर - प्रवेशिका ७ (अजो)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 22 February, 2011 - 14:03

मूळ लेख (इंग्रजी)

The woman in your life…very well expressed…

Tomorrow you may get a working woman, but you should marry her with these facts as well.

Here is a girl, who is as much educated as you are;
Who is earning almost as much as you do;

One, who has dreams and aspirations just as
you have because she is as human as you are;

One, who has never entered the kitchen in her life just like you or your
Sister haven’t, as she was busy in studies and competing in a system
that gives no special concession to girls for their culinary achievements

One, who has lived and loved her parents & brothers & sisters, almost as
much as you do for 20-25 years of her life;

One, who has bravely agreed to leave behind all that, her home, people who love her, to adopt your home, your family, your ways and even your family ,name

One, who is somehow expected to be a master-chef from day #1, while you sleep oblivious to her predicament in her new circumstances, environment and that kitchen

One, who is expected to make the tea, first thing in the morning and cook
food at the end of the day, even if she is as tired as you are, maybe more,
and yet never ever expected to complain; to be a servant, a cook, a mother,
a wife, even if she doesn’t want to; and is learning just like you are as
to what you want from her; and is clumsy and sloppy at times and knows that you won’t like it if she is too demanding, or if she learns faster than you;

One, who has her own set of friends, and that includes boys and even men at her workplace too, those, who she knows from school days and yet is willing to put all that on the back-burners to avoid your irrational jealousy, unnecessary competition and your inherent insecurities;

Yes, she can drink and dance just as well as you can, but won’t, simply
Because you won’t like it, even though you say otherwise

One, who can be late from work once in a while when deadlines, just like yours, are to be met;

One, who is doing her level best and wants to make this most important,
relationship in her entire life a grand success, if you just help her some
and trust her;

One, who just wants one thing from you, as you are the only one she knows in your entire house - your unstinted support, your sensitivities and most importantly - your understanding, or love, if you may call it.

But not many guys understand this……

Please appreciate “HER”

*************************************************

मराठी भाषांतर

ती..(तुमच्या आयुष्यातील स्त्री..अतिशय सुंदर पणे भावलेली..)

उद्या तु आयुष्यात एका नोकरदार (स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या) मुलीशी लग्न करशील, त्या वेळेला पुढील गोष्टींचे भान ठेव…

ही अशी मुलगी आहे..
जी तुझ्याइतकी शिकलेली आहे अन तुझ्या इतके कमावते…

तुझ्या सारखीच स्वप्नं आणि उरी आकांक्षा बाळगून आहे एक व्यक्ती म्हणून..

जी तिच्या आयुष्यात कधीच स्वयंपाक घरात गेली नाही जसा तु किंवा तुझी बहीण,
कारण ती सदैव तिच्या अभ्यासात मग्न होती, स्पर्धेत दंग होती, जिथे तिला या गुणांसाठी खास सवलत नव्हती..

ती तुझ्या इतकेच आनंदाने आपल्या घरी आई, वडील व भावंडासमवेत गेली २० ते २५ वर्षे प्रेमाने रहात होती..
ती जिने एवढ्या धाडसाने निर्णय घेतला, क्षणात या सगळ्यांना सोडून तुझ्या घरी समरसून सामावून जाण्याचा..

ती जिला पहिल्या दिवसापासून एक उत्कृष्ट गृहिणी असण्याचा आग्रह धरला जातो…
जेव्हा तु निश्चिंतपणे झोपला असतोस आणि ती तिकडे स्वयंपाकघरातील नवीन परिस्थितीला धीराने सामोरे जात असते..

ती, जिच्याकडून दिवसाची सुरवात चहाने व शेवट स्वयंपाक करण्याची अपेक्षा ठेवलेली असते, जरी ती दमली असेल, तुझ्या एवढी, किंबहुना जास्तच..
अगदी तक्रार न करता किती अपेक्षा ठेवल्या जातात तिच्याकडून..घरकामाची बाई, स्वयंपाकी, आई, पत्नी, सून..
बऱ्याच वेळा अपेक्षा लादल्या जातात किंबहुना सगळ्या जबाबदाऱ्या गृहीत धरल्या जातात..
एवढं सगळं सांभाळताना ती कधीतरी रागावते, चिडते..पण ते तुला आवडत नाही.. तिच्या अपेक्षांना कुणी विचारतच नाही..

ती.. तिला सुद्धा तुझ्या सारख्याच मित्र मैत्रिणी असतील, शाळेत, कॉलेज अन ऑफिसमध्ये..

तुझ्या इच्छेसाठी (अहं साठी) ती या सर्वांशी लांब राहू इच्छिते.. निव्वळ तुझ्या मनातील अस्वस्थतेसाठी…स्वामित्व गमावण्याच्या भीतीसाठी..

हो..ती सुद्धा तिचं आयुष्य तिच्या मर्जीप्रमाणे जगू शकते. ..
बेधुंद नशेत ,नृत्याच्या मजेत.. पण नाही.. ते तुला आवडणार नाही…

तिला सुद्धा ऑफिसच्या डेडलाईन्स असतात..त्या पूर्ण करताना ती उशिरा देखील येऊ शकते..
एवढं सगळं करताना ती मनापासून करते..
अगदी चांगल्या प्रकाराने निभावत असते..आणि तुमच्या या नात्याला एक वेगळंच, सुंदर सहजीवन साध्य करीत असते..
तिला फक्त थोडीशी मदत आणि आधार हवा असतो तुझा..फक्त तुझा..

ती..पूर्ण घरात तुलाच समजू शकते..फक्त तुझाच आधार तिला आवश्यक असतो..
प्रत्येक वेळी तुझा पाठींबा, तुझ्या भावना आणि प्रेम एवढंच अपेक्षित असतं..
तुमचं सहजीवन सुंदर होईल, जेव्हा दोघांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास असेल..
एकमेकांना समजून घेण्याची आस असेल..

बरेच पती ही गोष्ट विसरतात..त्यांना हे कळतच नाही..
तिला जाणून घ्या आणि प्रशंसा करा (Please appreciate “her” )
तुझे कौतुकाचे चार शब्द तिच्यासाठी शरदाचे चांदणे ठरतील...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy ओरिजिनल उतार चांगला आहे. भाषांतरही चांगले झाले आहे. फक्त काही ठिकाणी अगदीच शब्दास शब्द वाटले.
उदा. एवढं सगळं करताना ती मनापासून करते..
या ऐवजी
एवढं सगळ ती मनापासुन करते

Happy

मस्त! Happy

तुझे कौतुकाचे चार शब्द तिच्यासाठी शरदाचे चांदणे ठरतील... >>> ही शेवटची ओळ ह्या भाषांतराला चार चाँद लावून गेली!!!! Happy

तुझे कौतुकाचे चार शब्द तिच्यासाठी शरदाचे चांदणे ठरतील... >>> ही शेवटची ओळ ह्या भाषांतराला चार चाँद लावून गेली!!!! >>>> अगदी अगदी....
सुन्दर!

Happy

माझा हा भाषांतराचा पहिलाच प्रयत्न आहे...या आधी फक्त १०वी च्या पेपर वेळी केला होता....सर्वांचे खूप खूप धन्यवाद ..खूप दिवसात वेळ नाही मिळाला मायबोली बघायला....उशिरा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व....