विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<मला नाही वाटत तेंडुलकर LBW झाल्यावर विराट कोहलीशी निर्णय पडताळुन पाहायासाठी थांबला होता. तो नेहामीसाराखा समोरच्याला कस साभाळुन खेळ, काय कर हे सांगत असेल.>>

सचिन च्या ओठांच्या हालचालीवरुन सहज कळत होते की तो "आऊट्...आउट ??" असे काहीसे प्रश्नार्थाक बोलला कोहलीशी. म्हणजे तो रिव्ह्यू घ्यावा कि नाही ह्याबद्दलच बोलत होता. कमेंटेटर पण म्हणत होते, की कोहलीला किती अवघड गेले असेल सांगणे की " साहेब आउट आहात तुम्ही ...आता या..." Happy

<<मला नाही वाटत तेंडुलकर LBW झाल्यावर विराट कोहलीशी निर्णय पडताळुन पाहायासाठी थांबला होता.>>
सचिनने कोहलीला तेच विचारले होते. कोहलीच्या पोस्ट मॅच इंटर्व्ह्युत त्याने सांगितले तसे. सगळे समालोचक कोहलीची परिस्थिती कशी अवघड होती(सचिनला , 'हो तू स्पष्ट बाद आहेस' असे सांगायचे म्हणून)हे सांगत होते आणि तसे सांगितल्याबद्दल कालाय तस्मै नमः असे म्हणत होते(म्हणजे आमच्यावेळी नवख्या खेळाडूने असे सांगायची हिंमत केली नसती हो! असे!!)

लोकहो आजच्या मॅचबद्दल काय अंदाज आहे? कॅनडा वि. केनिया?

माझ्यामते कॅ. भारी पडेल के.ला...

गौतम कालच्या २ भारी मॅचेस नंतर आज सगळे मायबोलीकर क्रिकेट रसिक आराम करणार आहे>> Happy खरे क्रिकेट रसिक कोणत्याही मॅच समान उत्साहात बघतील

इंग्लंडचा केव्हिन पीटरसन हार्नियाच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला असून त्याची जागा ऑईन मॉर्गन घेणार आहे. काल आफ्रिकेला जिद्दीच्या बळावर हरवलेल्या इंग्लंडला हा एक प्रचंड धक्का बसलेला आहे.

पीटरसनची दुखापत हा सुध्दा फिक्सिंगचाच प्रकार आहे असे काही महाभागांना नक्कीच वाटेल.

<< (म्हणजे आमच्यावेळी नवख्या खेळाडूने असे सांगायची हिंमत केली नसती हो! असे!!) >> मयेकरानुं, कदाचित, " म्हणजे आमच्यावेळी इतक्या ज्येष्ठ खेळाडूने एका नवख्या खेळाडूचा असा जाहिरपणे सल्ला घेतला नसता हो ! " असंही असूं शकतं !! Wink

<< पीटरसनची दुखापत हा सुध्दा फिक्सिंगचाच प्रकार आहे असे काही महाभागांना नक्कीच वाटेल. >> निदान ह्या विशिष्ठ दुखापतीला "फिक्सींग" मात्र अत्यावश्यक आहे, याबाबत तरी दुमत असूं नये !!! Wink

>> पण मला फारसे काही कळत नाही.
झक्की, इथे बाकीच्यांना कळतं असं वाटतं काय तुम्हाला? Wink

केनिया - ४० षटकांत १४०-६. मिश्रा ४० धावांवर खेळतोय.
[कॅनडात ४-५ मूळचे भारतीय, केनियात एकच ! कांहीसं हास्यास्पद असलं तरी इतर देशांतून खेळणार्‍या भारतियांच्या कामगिरीकडे लक्ष खेचलं जातच हे खरं !एकदां मुंबईत हॉकी स्पर्धेसाठी मुद्दाम न्यूझीलंडहून आलेल्या मोठ्या गुजराथी ग्रूपची चांगली ओळख झाली.त्याना म्हटलं "उद्या भारत वि न्यूझीलंड सामना असला तर कुणाच्या बाजूने रहाणार ? ". त्याना ह्या प्रश्नाचं हंसूच आलं." अर्थात न्यूझीलंड ! त्याकरतां तर आलोय इकडे !!अहो, ही चौथी पिढी आहे आमची तिथली !!!".]

आयला! इतक्या पिढ्या झाल्यानंतरही ते गुजराथी मराठीत बोलले हे विशेष आहे. Proud

काही दशकांनंतर आपल्या आपल्यातच मॅचेस होणार!

ईथले काही प्रतिसाद विशेषतः आपण किती बोअर खेळलो वगैरे वाचून एकंदर क्रिकेट खेळाचे बदलेले स्वरूप आणि त्याकडे सुजाणपणे पाहण्याची लोप पावत चाललेली वृत्ती याचे वैषम्य आहे.

अगदी ९० च्या दशकात देखिल २२० ही धावसंख्या मोठी/विजयी समजली जात असे. ३०० करणे म्हणजे महान अप्रूप होते- याचे बरेचसे कारण म्हणजे अतीशय गुणवान गोलंदाज त्याकाळी खेळत होते. जे पाट विकेट वर सुध्धा फलंदाजाला डांबून ठेवू शकत असत- कुंबळे हा त्या अर्थाने एक्मेवाद्वितीय चेंडू न वळवणारा पण प्रचंड यशस्वी फिरकी गोलंदाज होता.
टी ट्वेंटी, आयपिल चा चस्का लागला आणि प्रेक्षकाला उत्तुंग षटकार, ठोकाठोक, टोलेबाजी आणि तंत्र, मंत्र सोडून निव्वळ वेग, झटापट, आणि मोठ मोठ्या धावसंख्या बघायची नशा चढली. त्याच अनुशंगाने (डीमांड सप्लाय) खेळपट्ट्या आणि खेळाडू आपल्या खेळाला आकार देत गेले.. सचिन सारखे फार थोडे जण अजूनही पूर्वीचे बेसिक्स, तंत्र, मंत्र सर्व प्रकारच्या फॉर्मॅट मध्ये टीकवून आहेत.
मला वाटतं याचा एकत्रीत परिणाम असा झालाय, की गोलंदाजी, क्षेत्ररक्षण किती अचूक, ऊत्कृष्ट होते या कडे दुर्लक्ष होतय.. चांगाल्या चेंडूला मान द्यावाच लागतो हा या खेळाचा नियम आहे पहिल्या दिवसापासून. काल आयर्लंड ची गोलंदाजी, क्षेत्ररक्षण सर्व आपल्यापेक्षा अनेक पटीने वरचढ होते. सचिन, विराट, युवी ने केलेला खेळ हा एका कठीण खेळपट्टीवर आणि अतीशय उत्कृष्ट काम करणार्‍या (दुबळ्या? मिनोज?) संघाविरुध्ध संयम, तंत्र, डावपेच यांचे उत्तम प्रदर्शन होते.
पण आम्हाला युसुफ चे फटके आणि विरु चा हैदोस (मग दोघेही कितीही का बेभरवशाचे असेना) आवडतो त्याला काय करणार? Happy
-------------------------------------------------------------------------------
एकंदरीत धोणी ७ फलंदाज या तत्वावर का अडलाय हे साफ आहे: ५ काय ६ काय कितीही गोलंदज घेतले तरी अवस्था तीच होणार आहे- थोडक्यात कुठलाच गोलंदाज (झहीर सोडल्यास) कामाचा नाही किंवा भरवशाचा नाही हे पुरेसे माहित असल्याने निदान ७ फलंदाह घेवून पहिले मोठी धावसंख्या ऊभारणे किंवा नंतर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणे हे बर्‍यापैकी शक्य आहे याची त्याला खात्री आहे.
तेव्हा धोणी महाशय लगे रहो.....

बदल करायचाच असेल तर मी गंभीर च्या जागी रैना ला घेईन. कारण रैना अष्टपैलू आहे, गंभीर पेक्षा क्षेत्ररक्षण नक्कीच चांगले आहे, गोलंदाजी करू शकतो आणि फलंदाजीत "लागला" तर नक्कीच मॅच विनर आहे.. गंभीर ने तीन सामन्यात काही फार मोठी फलंदाजी कामगिरी केली आहे असे नव्हे. शिवाय तो निव्वळ फलंदाज म्हणून जागा अडवतोय. त्या पेक्षा ऊरव्रीत सर्व सामन्यात रैना ला संधी देवून त्याला आत्मविश्वास देता येईल- जसे युवी चे झाले. आत्मविश्वास आणि फॉर्मात असलेले युवी आणि रैना नक्कीच संघासाठी अधिक लाभदायक असतील.

आणि आता तरी किमान चावला चा नाद सोडावा.. लय झालं भाऊ... अश्विन ला द्या आता संधी.

बाकी राहिला सवाल क्षेत्ररक्षणाचा तर धोणी वारंवार जे सूचित करतोय के "जे स्लो क्षेत्ररक्षक आहेत तो स्लोच राहतील"... यातला बराच्चसा ईशारा विरू, सचिन, झहीर, भज्जी यांचेकडे आहे असे वाटते. पण हे सर्व लोक सर्व सामेन नक्कीच खेळतील- अर्थातच जे स्लो आहेत ते प्रत्त्येक सामन्यात खेळतीलच तेव्हा त्यात सुधारणा होणे शक्य नाही असे धोणी ला म्हणायचे असेल.. Happy

जे काही आहे, वेळेप्रसंगी त्याने विरू, साहेब यांना मैदानावर कंसल्ट करायला हरकत नाही. कॅप्टन कूल असणे म्हणजे कॅप्टन आगाऊ असणे नव्हे ना?

पुढील सर्व सामन्यांसाठी असा संघ बघायला आवडेल/जास्त संतुलीत असेल असे वाटते:

विरू (कुणितरी पुन्हा कान पिळणे आवश्यक आहे)
साहेब
कोहली
रैना
युवी
धोणी
पठाण
झहीर
भज्जी
नेहरा
अश्विन

चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा..................चावला ला काढा...................................................................

>>> अगदी ९० च्या दशकात देखिल २२० ही धावसंख्या मोठी/विजयी समजली जात असे. ३०० करणे म्हणजे महान अप्रूप होते- याचे बरेचसे कारण म्हणजे अतीशय गुणवान गोलंदाज त्याकाळी खेळत होते.

आता बहुतेक वेळा ३०० पेक्षा जास्त धावा होतात त्याची महत्वाची कारणे म्हणजे

(१) २० षटकांचा पॉवर प्ले
(२) नोबॉलवर मिळणारा मुक्त फटका
(३) टी-२० मुळे फटकेबाजी करायला सरावलेले फलंदाज

>>> बदल करायचाच असेल तर मी गंभीर च्या जागी रैना ला घेईन. कारण रैना अष्टपैलू आहे, गंभीर पेक्षा क्षेत्ररक्षण नक्कीच चांगले आहे, गोलंदाजी करू शकतो आणि फलंदाजीत "लागला" तर नक्कीच मॅच विनर आहे..

अनुमोदन

>>> आणि आता तरी किमान चावला चा नाद सोडावा.. लय झालं भाऊ... अश्विन ला द्या आता संधी.

भज्जीला पण बसवा

आफ्रिदी देखिल भज्जी पेक्षा जास्त हातभर चेंडू वळवतो.. नाहितर किमान भन्नाट फास्ट फ्लिपर्स (कुंबळे स्टाईल) टाकून विकेट्स घेतो...
भज्जी ला पुढील सामन्यात शेवटची संधी द्यावी.. अन्यथा अश्विन आहेच.

जे काही आहे, वेळेप्रसंगी त्याने विरू, साहेब यांना मैदानावर कंसल्ट करायला हरकत नाही>> अरे सेहवागला करतो रे बाबा तो. तोही सांगतोय नि सेहवागही सांगतोय. आणि समजा नाहि केले तर Whats the big deal ? संघाचा कर्णधार कोण आहे नक्की ? सामना हरला/जिंकला तर त्याचे खापर/श्रेय कोणाच्या डोक्यावर आधी फोडले जाणार आहे ? "सेहवाग नि सचिनने सांगितले म्हणून अमके केले" हे विधान समजून घेण्याची कुवत general pic मधे आहे का ?

सचिन, विराट, युवी ने केलेला खेळ हा एका कठीण खेळपट्टीवर आणि अतीशय उत्कृष्ट काम करणार्‍या (दुबळ्या? मिनोज?) संघाविरुध्ध संयम, तंत्र, डावपेच यांचे उत्तम प्रदर्शन होते.>> हो. पिच स्लो होते त्यामूळे नेहमीची हाणामारी चालणार नव्हती.

>>> बदल करायचाच असेल तर मी गंभीर च्या जागी रैना ला घेईन>> हो, गुडघ्याच्या वर बॉल न उडणारे पिच असेल तर रैनाला डोळे मिटून घ्यावे. नाहितर त्यातल्या त्यात गंभीर बरा नि रैना substitute म्हणून येणार.

चांगाल्या चेंडूला मान द्यावाच लागतो हा या खेळाचा नियम आहे>> नियम नाहि convention म्हण. Happy

भज्जी ला पुढील सामन्यात शेवटची संधी द्यावी..>> त्याच्या जागी कोण पण, चावलाच्या जागी अश्विन असेल तर ?

कॅप्टन तोच आहे रे.... आणि विरू काय त्याने अगदी मुनाफ कडुन सल्ला घेतला तरि माझी काहीच हरकत नाही.. शेवटी "कुणाचा सल्ला महत्वाचा" हे त्यानेच ठरवावे. मला सचिन चा सल्ला महत्वाचा वाटतो एव्हडच. Happy

झहीर, अश्विन, नेहरा, मुनाफ.
असेही भज्जी काय चावला काय "फिरकी" शी त्यांचा तूर्तास दूरचाही संबंध दिसत नाही.. युवी, पठाण जास्त चांगले वळवतील, नाहीतर किमान धावा तरी आडवतील. परवा भज्जीच्या आधी युसुफ ला धोणी ने चेंडू दिला यातच काय ते आलं..

>>हो, गुडघ्याच्या वर बॉल न उडणारे पिच असेल तर रैनाला डोळे मिटून घ्यावे.
गंभीर गुढघ्याच्या वर अधिक चांगला खेळतो असा भ्रम आहे का? Happy दोघेही त्या बाबतीत तितकेच वाईट्ट आहेत- रैना चे बाकी गुण जास्ती आहेत.
----------------------------------------------------------------------------------
बाकी पब्लिक चे काय घेवून बसायचे? काल पब्लिक च्या प्रेशर मूळे युसूफ (दोन षटकार मारल्यावर) पुन्हा फाजिल ठोकायला जावून बाद होतो काय अशी भिती होती.. युवी ने त्याला लगाम घातला असे वाटते. Happy

रच्याकने:
running between wickets मध्ये आपल्या संघातील all time favorite (good) कोण? आणि all time favorite (bad) खेळाडू/जोडी कोण?
द्रविड स्वतः बरेच वेळा धावबाद झाला आहे किंवा दुसर्‍याला केले आहे? cricinfo वर काही डेटा असेल?

all time fav (bad) मधे मांजरेकरचा नंबर नक्की असावा. काल महाशय सचिनच्या 'रनिंग बिट्विन विकेट्स' बद्दल खूपच आदराने टिपण्णी करत होते.

आपल्या पुढील सर्व सामन्यात युवी "हुकुमी एक्का" ठरेल असे वाटते.. कालची त्याची फलंदाजी प्रचंड संयमपूर्ण आणि जबाबदार होती. एकंदरीत त्याची देहबोली फारच determined वाटते. good for us..

नागपुर ची अफ्रिका भारत सामन्याची तिकीटे माझ्या मित्रा कडे उपलब्ध आहे......? १२ मार्च

हवी आहे का कुनाला

$2AC2A2AD1C41B6C3.GIF

युवी "हुकुमी एक्का"? Lol कळेलच द. आफ्रिकेच्या सामन्याविरुद्ध!

>> मला सचिन चा सल्ला महत्वाचा वाटतो एव्हडच
दुर्दैवाने, तू कप्तान नाहीयेस! मला सचिनची कप्तानगिरी फारशी नाही आवडत. त्यानं आयपीएलची फायनल घालवली पोलार्डला आधी न पाठवून असं माझं एक मत आहे!

खरे क्रिकेट रसिक कोणत्याही मॅच समान उत्साहात बघतील

मी १९७० ते १९८० या दशकात क्रिकेटशी संबंध शून्य. नंतर मात्र इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत इथे गेल्यावर अगदी आधाशीपणे गल्ली क्रिकेटसुद्धा अत्यंत उत्साहाने, लक्ष लावून बघतो.

चिमण, अहो कळते हो, त्यांना नक्कीच जास्त कळते.

गंभीर गुढघ्याच्या वर अधिक चांगला खेळतो असा भ्रम आहे का?>>> माझे वाक्य नीट बघ बरं, "नाहितर त्यातल्या त्यात गंभीर बरा" असे आधीच म्हणालोय. रैना अगदीच वाइट handle करतो short balls, अगदी दादा graceful वाटावा एव्हढा Sad गंभीर technically strong नसेल पण mentally आहे and he can ride out bad periods better.

आपल्या पुढील सर्व सामन्यात युवी "हुकुमी एक्का" ठरेल असे वाटते >> मलाही असे वाटतेय. पण running between wickets फारच ढासळय.

middle overs मधे spinners operate करत असताना मधे पठाण ला फ्री license देऊन सोडायला काय हरकत आहे ? Happy इम्रान ताहिर किंवा peterson खेळत असताना मोकाट सुटलेला पठाण बघायला प्रचंड मजा येईल.

दुर्दैवाने, तू कप्तान नाहीयेस! मला सचिनची कप्तानगिरी फारशी नाही आवडत>> चिमण सचिनचे readings चांगले असतात पण तो over expect करतो असे मलाही वाटते. त्याच्या talent level साठी त्याच्या readings असतील त्या त्याच्यापेक्षा कमी कुवतींच्या players ना झेपत नसतील म्हणून असे वाटत असेल. afridi जसे प्रत्येक बॉल नंतर काहितरी सांगत असतो तसेच सचिन captain असताना सांगत असे ते आठवले एकदम.

युवी "हुकुमी एक्का"? हाहा कळेलच द. आफ्रिकेच्या सामन्याविरुद्ध! >> अनुमोदन.. कुठे एक स्पेल चांगला पडला आहे तर त्याला डोक्यावर चढवत आहेत.. आधीच त्याच्या डोक्यात लगेच हवा जाते.. बाकी तो जेव्हा स्पिनर्स गोलंदाजाविरुद्ध धावा काढेल तेव्हा मी त्याला हुकूमी एक्का म्हणेन ... बरेचदा लटपटतो स्पिनर्संना खेळताना..

बाकी चावला बस्स झाला.. नेहरा नाहीतर अश्विन हवा..

middle overs मधे spinners operate करत असताना मधे पठाण ला फ्री license देऊन सोडायला काय हरकत आहे ? इम्रान ताहिर किंवा peterson खेळत असताना मोकाट सुटलेला पठाण बघायला प्रचंड मजा येईल.>>>>>> मन की बात केलीस असाम्या!!!! काल आपल्या दोन विकेट्स झटपट गेल्या तेव्हा वाटून गेलं की पठाणला वर पाठवला तर प्रेशर एकदम कमी करुन टाकेल. तेव्हा मिड ओवर्स नव्हत्या सुरु हे मी जाणतो पण तू मांडलाय तो मुद्दा म्हणजे त्याला फ्री लायसन्स देऊन पाठवणे हा मला फार भारी वाटतो. पहिल्या बॅटिंगला तर हे फार उपयोगाला येऊ शकतं! प्रतिस्पर्धी संघाच्या आत्मविश्वासाची पार वाट लागून जाते हे "युसुफमियां" सुरु झाले की.
काल पण काय हाणल्या सिक्स!!!! जास्त ताकद ही लावताना दिसत नाहे म्हणजे टायमिंग पण भारी आहे त्याचं. चालताना पण एकदम गुर्मीत चालतो, जबरी बॉडी लँगव्जेज एकदम.

<< मला सचिन चा सल्ला महत्वाचा वाटतो एव्हडच >> सल्ला केंव्हा व कोणाकडून घेणं हें शेवटीं कप्तानानच ठरवणं योग्य, असं मला वाटतं; कारण, कांही निर्णय घेताना अनुभवापेक्षाही वृत्ती व विचार करण्याची पद्धत हे घटक महत्वाचे असतात. जर एखाद्या प्रसंगी सचिनच्या विचारपद्धतीनुसार तो काय सल्ला देईल याची धोनीला पूर्ण कल्पना असेल व त्याच्या विचारपद्धतीत तें बसत नसेल, तर त्याने सचिनचा सल्ला न घेणंच दोघांच्याही हिताचं नाही का !
<< आयला! इतक्या पिढ्या झाल्यानंतरही ते गुजराथी मराठीत बोलले हे विशेष आहे. >> खरंय! आणि, एकदाही मधेच "आयला", "मायला" न घुसडता !! Wink

Pages