विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आफ्रिका नेहमीप्रमाणे उपांत्यपूर्व किंवा उपांत्य फेरीत दडपणाखाली हरेल अशी मला खात्री आहे.

बोपारा 'मॅन ऑफ द मॅच'?

मला वाटलं की ब्रॉडला हा सन्मान मिळेल. त्याने आमला, कॅलिस व नंतर स्टेन आणि मॉर्केल हे महत्वाचे बळी घेतले. त्यामुळे तोच सामनावीर ठरतो.

'मॅन ऑफ द मॅच' पण फिक्स केला असे आता काही जण म्हणतील.

दोन अत्यंत मूलभूत प्रश्नः
१. UDRS म्हणजे काय?
२. एका डावात किती वेळा तिसर्‍या पंचाकडे 'खटला' करता येतो? त्याला काही मर्यादा?

(आणि त्रिफळाचित झाल्यावर सुद्धा तिसर्‍या पंचाला विचारता येता का? )(:डोमा: Happy

धन्यवाद.

१. Umpire Decision Review System.

२. प्रत्त्येक संघाला, एका सामन्यात मॅक्स २ वेळा तिसर्‍या पंचाकडे खटला करता येतो.

३. मैदानावरील पंच, फलंदाज अगदी त्रिफळाचित असेल तरी गोलंदाजाने नो बॉल टाकला नाहीये ना याची खात्री करायला तिसर्‍या पंचाकडे विचारणा करू शकतो. यावर मॅक्स लिमीट नाही आणि यासाठी मैदानावरील पंचाला क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाची परवानगी घ्यावी लागत नाही- किंबहुना संघाने तसे अपिल केले नसले तरी. धावबाद चा निर्णय पुन्हा ठोस कन्फर्म करण्यासाठी देखिल मैदानावरील पंच तिसर्‍या पंचाची मदत घेवू शकतो- थोडक्यात "मदत" कितीही वेळा घेतलेली चालते (मैदानावरील पंचाने), खटला मात्र दोनदाच.. त्यातही काही नियमानुसार खटल करून देखिल कधी कधी शेवटचा निर्णय मैदानावरील पंचावर सोडण्यात येतो- विशेषतः यावर बरेच वाद- विवाद आहेत..

तेव्हा आता झक्की, ईथे नुसते येवून प्रश्ण नाही विचारायचे पण क्रिकेट चर्चेत भाग घ्यायचा- फिक्सिंग आणि अमेरिका हे दोन मुद्दे सोडून Happy

पण क्रिकेट चर्चेत भाग घ्यायचा
आमंत्रणाबद्दल धन्यवाद, पण मला फारसे काही कळत नाही. मी इथे पूर्वी लिहीत असे त्यावरून लक्षात आलेच असेल.

"मदत" कितीही वेळा घेतलेली चालते (मैदानावरील पंचाने),

अशी "मदत" पंचाने घ्यावी अशी 'नम्र विनंति' (रागारागाने हातवारे करून, डोळे वटारून, मोठ्याने अश्लिल शब्द वापरून) केली, तर तसे किती वेळा करता येते?
"मदत" आणि "खटला" यात फरक काय?

सामन्यात खेळण्यासाठी काही वेगळे पैसे मिळतात का? का एकदा १५ मधे निवड झाली की सामन्यात घेतले, नाही घेतले, तरी तेव्हढेच पैसे?

म्हणजे चावलाला घेतले नाही पुढच्या सामन्यात तर त्याचे काही पैशाचे नुकसान होइल का?

काय रटाळवाणी मॅच चालू आहे.. त्यापेक्षा इंग्लंड नि द. आफ्रीकाची मॅच मस्त होती.. आपले फारच टुकूटुकू खेळत आहेत.. साहेब पण एकाग्रता भंग होताच गेले.. आवश्यकता नाहीये.. पण एखाद दुसरा चौकार मारत समोरच्या संघावर चाबूक ठेवावा हे कधी उमगणार यांना.. अति डिफेन्सिव खेळून उगीच समोरील संघाच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवत आहेत..नि त्यात विकेट गेली की मग टेंशन टेंशन... Proud

कर्स्टनबुवांकडे मायबोली अ‍ॅक्सेस आहे की काय.. इथे पोस्ट काय टाकली चौकार चालू झाले.. Proud Wink

भाऊ... Happy

Yusuf Pathan is a madman!
ह्या म्हणतात दरारा!!!!

वैद्यबुवा..अगदी.. Happy त्या स्टेडियममधील प्रत्येक प्रेक्षक पठाणचे आभार मानत असतील.. पठाणच्या तीन सिक्सरमुळे (तीनच !!!! युवीच्या सल्ल्यामुळे लगाम घालत होता ) थोडी कुठे जान आली होती मॅचमध्ये ! असो.. आर्यलंड चे पुन्हा अभिनंदन.. चांगली खेळी केल्याबद्दल.. नि भारतीय संघाचे देखील.. पण पुढेमागे कामाला येणारा रनरेट सुधारण्याची संधी गमावलीय..

सामन्यात खेळण्यासाठी काही वेगळे पैसे मिळतात का? >>>
त्याहुन वेगळे देखिल मिळतात. "विशेष " अशी कामगिरी केली कि! Biggrin

आजचा सामना मस्तच होता. ज्या पिचवर मागच्या दोन सामन्यात ३०० च्या वर धावा झाल्या त्यावर आज २०० मधे दोन्ही संघ जवळजवळ संपले होते. याला म्हणतात फिक्सिंग!

मला समजत नाहि - या वेळेस सर्व मैचेस मधे शेवटच्या पाच ओव्हर संपेपर्यत काय होणार हे का बरे समजत नाहि ? Biggrin

आपण जिंकलो पण स्पर्धेत अजून तरी चेंपियन संघासारखे नाही वाटलो ! आयर्लंडच्या कामगिरीला,विशेषतः गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाला, सलाम !!

मला समजत नाहि - या वेळेस सर्व मैचेस मधे शेवटच्या पाच ओव्हर संपेपर्यत काय होणार हे का बरे समजत नाहि ?
--- उत्सुकता शेवटच्या क्षणापर्यंत ताणणे हि या विश्वचषकाची थिम आहे. कारण बुकींना तसेच संयोजकांना 'अपेक्षा' होती त्या मानाने विश्वचषक क्रिकेट सामन्यांना रसिकांचा प्रतिसाद कमी मिळालेला होता. अर्थात टाय केलेल्या मॅचला थँक्स. या सर्व प्रयत्नांमुळे, आता कुठे रसिक आकृष्टल्या जातो आहे.

या सर्व सामन्यांचा, मी मन-मुराद आनंद लुटतो आहे. मॅचेस फिक्स असल्यात काय आणि नाही काय याने आनंद मिळवण्यात फारसा काही फरकही पडत नाही. आगे आगे देखो होता है क्या...

अंतिम सामन्या मधे कुणाला आणले तर सर्वात जास्त आर्थिक उलाढाल होणार? हा कळीचा प्रश्न आहे. माझी पसंती भारत - पाक सामना अशी असेल. किमान एक झुंज तरी व्हायलाच हवी.

साहेब आउट झाल्यावर थेट चालू न लागता आधी विराट शी बराच वेळ डिसकस करत होते...रिवीव्ह्यू करावा की नाही अश्या दृष्टीने.....अजुन एक उदाहरण साहेब हा खेळ किती सिरीयसली घेतात ते....

मला नाही वाटत तेंडुलकर LBW झाल्यावर विराट कोहलीशी निर्णय पडताळुन पाहायासाठी थांबला होता. तो नेहामीसाराखा समोरच्याला कस साभाळुन खेळ, काय कर हे सांगत असेल. बरेचवेळा आउट नसतानाही सचिनला तंबुत कुरकुर न करता परतताना पाहीलय....
बाकी आयरीश आर्मीने मस्त फाईट दिली भारताला....भारताच काही खर नाहीय वर्ल्डकप जिंकण....

आधी जिंकायचे नाहीत म्हणून बोंब आता जिंकले तरी कितीनी जिंकले ह्यावर सुद्दा बोबं!
टीम मध्ये ११ प्लेयरांपैकी कोणीतरी चांगली खेळलले आणि मॅच जिंकलो येवढं पुरेसं नाहीये का?

ज्या इंग्लड नी भारताला जवळ जवळ हरवलच त्याच इंगलंड ला आयर्लंड नी धुळ चारली आत ह्यात इंगलंडचा कमीपणा आहे की आयर्लंडचा लढाऊपणा? किती ही अनुभव असला तरी टाकलेला प्रत्येक बॉल नवाच असतो म्हणूनच दिग्गज खेळाडू सुद्धा आऊट होतातच की आणि तेव्हाच दुसर्‍यांना पण खेळायची, त्यांची स्कील दाखवायची संधी मिळते.

पार शेवटच्या बॉल पर्यंत गेले तरी जिंकल्याशी मतलब. मी तर म्हणतो जिंकले नाही तरी प्रयत्न केला ह्याला ही महत्व आहे.

टीम मध्ये ११ प्लेयरांपैकी कोणीतरी चांगली खेळलले आणि मॅच जिंकलो येवढं पुरेसं नाहीये का>>

असे वाटते की जिंकण्यातील सहजता हा घटकही महत्वाचा मानला जायला हवा. कारण त्यावरून संघाचा दर्जा ठरू शकेल. आयर्लंडला आणि भारताला ऑस्ट्रेलिया वेगवेगळ्या फरकाने हारवेल. भारत कमी फरकाने तर आयर्लंड मोठ्या फरकाने! याचा मानसिकतेवरही परिणाम होतच असणार!

चुभुद्याघ्या

काल आयर्लंडने मस्त टफ फाईट दिली भारताला. भारताची बॅटिंग अगदीच कंटाळवाणी/रटाळ चालली होती, म्हणून शेवटी झोपायचा पर्याय निवडला. बाऊंड्री मारणंही भारताला कठीण झालं होतं.

भारत खरंच बेस्ट टीम किंवा ते नंबर १ टीम वै म्हणतात तशी आहे असं अजिबात वाटत नाही (हेमावैम). मला तर शाहरूख खान कसं स्वतःला किंग खान म्हणवून घेतो तसं भारतीय टीम स्वतःला नं.१ म्हणवून घेते असं वाटतं.

चांगलं खेळायला अर्थातच स्किल, अनुभव पाहिजे हे जरी खरं असलं तरी बर्‍याच वेळा क्रिकेट हा माईंड गेम ठरतो. म्हणूनच तर आपल्या रोस्टर वर इतके अनुभवी आणि स्किल असलेले लोकं असून सुद्धा आपली टीम हवी तशी चमकली नाही असं म्हणता येइल. पुर्वी वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया (थोडा काळ श्रीलंका सुद्धा) ह्या संघामध्ये एकदम आक्रमक प्रवृत्ती जास्त दिसून यायची. इतकी की समोरचा संघ ह्या सगळ्या अविर्भावानेच गार!
सध्या मात्र सगळेच आक्रमक झालेत पण. आयर्लंड आणि कॅनडा सारखे संघ सुद्धा दबकत न खेळता एकदम आधी पासूनच आक्रमक होऊन खेळतात. ह्यामुळे इथून पुढे मॅचेस खरच "Anybody's Game" असणार आहेत आणि त्याच मुळे पुर्वीपेक्षा मॅचेस जास्त चुरशीच्या होणार. थोडक्यात माझ्यामते चुरशीची मॅच झाली म्हणजे जरा "दादा" समजली जाणारी टीम वाईट खेळली किंवा नीट खेळली नाही असं म्हणता येणार नाही.

आडो, आपल्या किंवा इतर कुठल्याही टीम ला नं १ म्हणणारे/ ठरवणारे आपणच आणि टुकार म्हणणारे सुद्धा आपणच. टीम आणि टीम मधले प्लेयर त्यांच्या परीनी प्रयत्न करत असतात.

वन डेत आपल्याला कोण नंबर वन म्हणतेय? टेस्टमधे नं १ असूनही तसे मान्य करायला गोर्‍यांची जीभ रेटत नाही.

नंबर वन अथवा इतर पोझिशन्स या विशिष्ट कालावधीतील परफॉर्मनसमुळे मिळतात हे गृहीत धरल्यानंतर खरे तर त्या पोझिशन्सना काही अर्थ अ‍ॅटॅच करणे योग्य होणार नाही असे वाटते.म्हणजे दहा महिन्यापुर्वी आपला संघ दक्षिण आफ्रिकेशी फारच सॉलीड खेळला म्हणून तो आत्ताही तसाच खेळेल असे म्हणणे अयोग्य ठरावे.

कुणीतरी वर म्हंटल्याप्रमाणे:

'विशिष्ट क्षणी जो संघ अधिक चांगला खेळणार तोच जिंकणार' हे पटते.

असे झाल्यास फक्त मानसिकता, जिगर, फिटनेस आणि एकाग्रता हेच गुण संघाला तारणार!

मानसिकता - ऑस्ट्रेलिया

जिगर - पाकिस्तान

फिटनेस - अनेक संघातील अनेक खेळाडू

एकाग्रता - अनेक खेळाडू जसे संगकारा, पाँटिंग वगैरे!

भारतीय खेळाडू अनेकदा जोशातच खेळतात, वास्तविक कसे खेळायला हवे आहे हे बाजूला राहते की काय असे वाटते. उदाहरणार्थ इंग्लंडशी खेळताना शेवटच्या ओव्हर्समध्ये सर्वजण बाद होणे! त्याच षटकांमध्ये जर पंचवीस धावा किंवा एकेरी धावा काढून किमान पंधरा धावा वाढवल्या असत्या तरी जिंकलो असतो. पण आपण गोलंदाजी करायला आलो तेच मुळी या मानसिकतेत की आता इंग्लंड हारणारच एवढ्या मोठ्या धावसंख्येपुढे!

नेमका हाच जोश पारंपारिकरीत्या आपल्याकडे दिसून येतो. पुर्वी गावसकर बाद झाला की एकमेव तारणहार आणि जादूगार म्हणजे कपिलदेवच असे मानले जायचे. वेंगसरकरच्या अनेक ऐतिहासिक खेळ्यांमुळे आपण 'वाचलो / जिंकलो' हे हळूहळू मान्य झाले.

व्यक्तीपूजक माणसे या मातीत जन्माला येतात हे क्रिकेटच्या स्टार्सना मिळणारे अभुतपुर्व यश सिद्ध करत नाही का?

-'बेफिकीर'!

सेहवाग बाद झालयावर जॉन्सनने केलेला 'चिकन डान्स' फारच सुरेख होता.. 'पा' मधल्या बच्चनची आठवण झाली बुवा....

कालची युवीची बॉलींग जबरी Happy
युवी आता जरा मॅच्युअर झाल्यासारखा वाटायला लागला आहे.... काल त्याने बॅटींगपण अगदी जबाबदारीने केली!
बाय द वे... सचिन का बॉलिंग करत नाहीये?

चावला साफ निष्प्रभ त्यामुळे आता पुढच्या मॅचला नेहरा किंवा अश्विनला खेळवले पाहिजेल.... आणि बाद फेरीत जाण्याआधी वेस्टइंडीज विरुद्ध श्रीशांतलाही परत आजमावायला पाहिजेल.

<< असे झाल्यास फक्त मानसिकता, जिगर, फिटनेस आणि एकाग्रता हेच गुण संघाला तारणार!>> बेफिकीरजी, संघाला तारण्यासाठी आपण हेरलेल्या सर्व गुणाना आंतून एक अस्तरही असावं लागतं, असं आपलं मला वाटतं - निखळ प्रतिभा व खेळाविषयी अंगभूत आनंदी वृत्ती यांचं !! मला काय म्हणायचं आहे त्याचं बोलकं प्रतिक, मला वाटत, "कपिल देव" आहे [अर्थात, मैदानावरचा !]. प्रतिभेच्या बाबतीत सध्याचे बरेच संघ गुणी असले - भारत तर वरचढ आहे- तरी खेळाचा आनंद लुटणं हा मात्र वेस्ट इंडीजचाच प्रथमपासूनच स्थायीभाव आहे. भारतीय संघ मैदानात तरी रिलॅक्सड व आनंदी न वाटतां नेहमी दडपणाखाली असल्यासारखा वाटतो [सेहवाग हा एकमेव अपवाद !]; ह्याचाही परिणाम कदाचित आपल्या कमगिरीवर होत असावा.
हा माझा नुसता भ्रमच आहे कीं त्यांत कांही तथ्य आहे, हा मलाही पडलेला प्रश्नच आहे !

खेळाचा आनंद लुटणं हा मात्र वेस्ट इंडीजचाच प्रथमपासूनच स्थायीभाव आहे.>>> सहमत आहे. खरच ते आनंदात खेळतात बिचारे! आणि चांगलेही खेळतात.

भारतीय संघ मैदानात तरी रिलॅक्सड व आनंदी न वाटतां नेहमी दडपणाखाली असल्यासारखा वाटतो [सेहवाग हा एकमेव अपवाद !]>>>

दडपण - सहमत आहे.

सेहवाग - त्याने थोडे तरी दडपण घ्यायला हवे असेही वाटते मला आपले !

चुभुद्याघ्या

Pages