भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/
सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.
सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.
आता हे अनवधानाने की
आता हे अनवधानाने की गोंधळल्यामुळे झाले की काय माहीत नाही पण इंग्लंडने १ ली धाव पूर्ण केली तेव्हा क्यामेरा फील्डरवर होता तेव्हा चेन्डू मिसफील्ड झाला होता व हातातून निस्टून जमीनीवर आला होता आणि फील्डर तिथल्या तिथेच लडबडत होता. तेव्हा मला वाटले होते की बहुधा तिकडे दुसरी रन निघाली असावी आणि त्या मिस्फील्ड मुळे क्षणैक मी निराशही झालो होतो पण चिरंजीवानी सांगितले की एकच रन निघून म्याच टाय झाली आहे तेव्हा विश्वासच बसेना...
अर्थात हे फिक्सिंग मुळे झाले आहे असे मला म्हणायचे नाही ;कदाचित गलथानपणाही असू शकेल पण घडले ते असे...
आजचा अंदाज : आज श्रीलंका ऑसीज
आजचा अंदाज :![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज श्रीलंका ऑसीज ना धुळ चाळणार
आज श्रीलंका ऑसीज ना धुळ
आज श्रीलंका ऑसीज ना धुळ चाळणार>>>
इच्छाही अशीच आहे
अंदाजही असाच आहे
आपल्या तोंडात घी शक्कर
आज श्रीलंका ऑसीज ना धुळ
आज श्रीलंका ऑसीज ना धुळ चाळणार >> ली, जॉन्सन ला कुठे पाठवले हो? ऑसीज बॅटींग पण झकास आहे...
आपला सपोर्ट ऑस्ट्रेलिया![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अपला सपोर्ट लंकेला पण अंदाज
अपला सपोर्ट लंकेला पण अंदाज (दुर्दैवाने) ऑस्ट्रेलिआ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्ये पघा लै इन्तेरेस्टिंग
ह्ये पघा लै इन्तेरेस्टिंग हाये
(सौजन्य चिनूक्स)
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
<< अहो आपल्या फलंदाजीच्या
<< अहो आपल्या फलंदाजीच्या वेळेस गोलंदाजाच्या हातात चेंडु असताना पळुन आपले शेवटचे बहाद्दर पळाले होते - तेहि शेवेटची विकेट असताना आणी एक बोल शिल्लक असताना. आणी हे महाशय शेवेटच्या चेडुवर जि़कण्यासाठी देखील पळाले नाहित.म्हणुनच मी म्हणले ढळ्ढ्ळित सत्य समोर दिसत असुनही अंधश्र्द्धा ! >> नुसत मॅचचा निर्णय नाही तर लाखो-करोडो लोक डोळे लावून आहेत तुमच्या फक्त एका चेंडूवरच्या कामगिरीवर, याचा मनावर प्रचंड दबाव असताना खेळाडूकडून घोडचूका होणं अशक्य आहे का ? कितीही अनुभवी खेळाडू असला तरी तो शेवटी माणूसच असतो ! खेळात म्हणून तर
'प्रेशर टॅक्टीक्स"चा उपयोग केला जातो ना. मग अशा चूकाना सरसकट जाणूनबु़जून केलेला खेळ म्हणणं न्याय्य आहे का ?
<< (तरी मला असे वाटते की फिक्सिंग हा सामन्यांबाबतच्या चर्चेचाच भाग असणार ना?) >> बेफिकीरजी, प्रश्न खरंच फिक्सींग हा चर्चेचा भाग असणं हा नाहीय, असं मला वाटतं. ज्या स्पर्धेकरता सर्व देश चार वर्षं नियोजन करतात, कठोर मेहनत घेतात, प्रतिभावान खेळाडू ज्यात खेळणं आयुष्याचं सार्थक मानतात, त्या स्पर्धेकडे फक्त फिक्सींगचा काळा चष्मा लावूनच पहाणं योग्य कीं त्यात चमकणारी प्रतिभा, विजिगीषु वृत्ती, शैलीदार फलंदाजी, गोलंदाजी व चपळ क्षेत्ररक्षण इ.चा रसास्वाद घेणं योग्य, हाच प्रश्न आहे. भातात एखादा खडा सांपडतो, म्हणून पक्वानांचं ताटच फेंकून द्यायचं कां, हाच खरा प्रश्न असावा !
इथल्या चर्चेत उगीचच डींवचण्याचाही भाग डोकावतो व एका ठराविक मर्यादेनंतर मला तरी तो रसभंग करणारा वाटतो; हे अर्थात माझं वैयक्तिक मत व त्यानुसार चर्चेत यापुढे सहभागी होणं न होणं मी ठरवीनच. इतरानी त्यांच्या मताप्रमाणे ठरवावं.
धन्यवाद बाळुभौ, लिंक वरतीच
धन्यवाद बाळुभौ, लिंक वरतीच आहे, धाग्याच्या सुरुवातीला जो कॉमन मजकुर असतो तिकडं
आज आणखी एक वर्ल्डकप अपसेट
आज आणखी एक वर्ल्डकप अपसेट बघायला मिळणार बहुतेक.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
त्या स्पर्धेकडे फक्त
त्या स्पर्धेकडे फक्त फिक्सींगचा काळा चष्मा लावूनच पहाणं योग्य कीं>>> सहमत आहे, 'फक्त' तसाच चष्मा लावून पाहाणे योग्य नाहीच!
रच्याकने हा विडीओ पाहिला का,
रच्याकने हा विडीओ पाहिला का, बालाजी राव व गुल, शेहजाद (पाक) यांनी फुल्ल शिव्याबाजी केलीये मैदानात,
http://www.youtube.com/watch?v=ZfOlr4JcuX8&feature=player_embedded
>>>>बेफिकीरजी, प्रश्न खरंच
>>>>बेफिकीरजी, प्रश्न खरंच फिक्सींग हा चर्चेचा भाग असणं हा नाहीय, असं मला वाटतं. ज्या स्पर्धेकरता सर्व देश चार वर्षं नियोजन करतात, कठोर मेहनत घेतात, प्रतिभावान खेळाडू ज्यात खेळणं आयुष्याचं सार्थक मानतात, त्या स्पर्धेकडे फक्त फिक्सींगचा काळा चष्मा लावूनच पहाणं योग्य कीं त्यात चमकणारी प्रतिभा, विजिगीषु वृत्ती, शैलीदार फलंदाजी, गोलंदाजी व चपळ क्षेत्ररक्षण इ.चा रसास्वाद घेणं योग्य, हाच प्रश्न आहे. भातात एखादा खडा सांपडतो, म्हणून पक्वानांचं ताटच फेंकून द्यायचं कां, हाच खरा प्रश्न असावा !
अगदी सहमत भाऊ.... यापुढे कमीत कमी मी तरी फिक्सिंगच्या चर्चेत भाग घेणार नाहीय.
आजच्या सामन्यात विनर ठरवणं बरच कठीण आहे. दोन्ही संघ आपल्या कुवतीप्रमाणे खेळले तर सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल. ढेपाळला तर ढेपाळणारा संघ बहुतेक लंकेचा असेल, ऑस्ट्रेलियाचा असणार नाही. माज्यामते ऑस्ट्रेलिया जिंकेल पण मनापासून श्रिलंका जिंकावं असं वाटत्य
ज्यांना फिक्सिंगबद्दल लिहायचे
ज्यांना फिक्सिंगबद्दल लिहायचे त्यांना लिहीत राहू दे. अपीलाकडे दुर्लक्ष करणार्या अंपायरकडून स्थितप्रज्ञतेचे धडे घेत आपण फक्त खेळावर लक्ष केंद्रित करू या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज लंकेने पहिली फलंदाजी केली
आज लंकेने पहिली फलंदाजी केली तर जिंकू शकतील (मलिंगा, मुरली)
ऑसीज ने पहिली फलंदाजी केली तर ते जिंकू शकतील.. (ली, जॉन्सन, वॅट्टो)
थोडक्यात पहिली फलंदाजी करणार्या संघाला जिंकायची संधी अधिक आहे असे वाटते. असेही लंका धावांचा पाठलाग करताना थोडे डगमगतात.
थोडक्यात पहिली फलंदाजी
थोडक्यात पहिली फलंदाजी करणार्या संघाला जिंकायची संधी अधिक आहे असे वाटते >> असही लंकन पीचेस आणि दिवसरात्र सामना असला कि पहिली फलंदाजी करणारी टीमच जिंकते बर्याच्वेळा.
हल्ली खरे तर बहुतेकवेळा प्रथम
हल्ली खरे तर बहुतेकवेळा प्रथम फलंदाजी करणारेच जिंकत असावेत असे वाटत आहे. प्रतिस्पर्ध्यावर त्यच्या एक दोन विकेट्स गेल्या तरी लगेच टेन्शन येते.
मालिकावीर होण्यासाठी अतिम
मालिकावीर होण्यासाठी अतिम सामन्यापर्यंत पोचणे आवश्यक असते का?
अन्यथा आफ्रिदीचा तर नूर मालिकावीर होण्याचा दिसत आहे.
अक्रम आणि इतरांच्या कप्तानकीमध्ये खेळताना एक स्फोटक फलंदाज म्हणून अधिक ज्ञात असायचा तो! या स्पर्धेत बोलिंगचे पृथःकरण थक्क करणारे!
मालिकावीर होण्यासाठी अतिम
मालिकावीर होण्यासाठी अतिम सामन्यापर्यंत पोचणे आवश्यक असते का?>> आत्ताशी कुठे निम्मे मॅच झाले हो, जरा राहिलेले २२ मॅच होऊदेत. मग कळेळच कोण किती कंसिस्टंट आहे:-)
आतापर्यंतच्या कामगिरीततर आफ्रीदी फ्रंट लाईन मध्ये आहे.
पण आफ्रिदी आतापर्यंत ज्या
पण आफ्रिदी आतापर्यंत ज्या मॅचेस खेळलात त्या श्रीलंकेत ... तेथे चेंडु बराचसा वळतो.भारतातल्या पाटा खेळपट्टीवर त्याचा खरा कस लागेल.
>>> आज विंडीज ने बांगलाचं
>>> आज विंडीज ने बांगलाचं विमान छान जमिनीवर आणलं.. भारतावि. २९० झाल्याने ते अधिक ऊंच ऊडत होतं..
बांगलादेशाचा संघ हा अजून लिंबूटिंबूच आहे हे मी आधीच लिहिले होते. कसोटी सामन्यांचा विचार केला तर बांगलाने जवळपास ५० कसोटी सामने खेळून एकच (तो सुध्दा झिम्बाब्वेविरूध्द) जिंकलेला आहे. एक दिवसीय सामन्यात त्यांनी काही वेळा तगड्या संघांना हरविले आहे, पण ते त्यांच्या प्रभावी खेळामुळे नसून बहुतेक वेळा प्रतिस्पर्धी वाईट खेळला म्हणून ते जिंकले. ते वेस्ट इंडिजला आपल्या घरच्या मैदानावर सहज हरवतील असा बर्याच जणांचा अंदाज होता. पण घरच्या मैदानावर सुध्दा वेस्ट इंडिजला हरविण्याइतका वेस्ट इंडिजचा संघ दुबळा नाही हेही मी लिहिले होते. काल माझे सर्व अंदाज बरोबर ठरले. अर्थात बांगलादेश इतकी दुबळी हार पत्करेल असे मला वाटले नव्हते.
परवाच्या पाकडे वि. कॅनडा या सामन्यांत पंचांनी एक नवा विक्रम केला. त्यांचे एकून ६ निर्णय (त्यातले डेरिल हार्परचे ४) तृतीय पंचांनी फिरविले. पंचांची इतकी खराब कामगिरी फारशी कधी ऐकली नव्हती.
केमार रोचचे वेगवान यॉर्कर आपल्याला खेळणे सुध्दा जड जाणार आहे. विशेषत: गंभीर, युवराज व पठाण त्याच्यासमोर टिकतील असे वाटत नाही.
आजचा श्रीलंका - आस्ट्रेलिया हा सामना ऑस्ट्रेलिया जिंकेल असे वाटते. माझा पाठिंबा ऑस्ट्रेलियालाच.
त्या स्पर्धेकडे फक्त
त्या स्पर्धेकडे फक्त फिक्सींगचा काळा चष्मा लावूनच पहाणं योग्य कीं त्यात चमकणारी प्रतिभा, विजिगीषु वृत्ती, शैलीदार फलंदाजी, गोलंदाजी व चपळ क्षेत्ररक्षण इ.चा रसास्वाद घेणं योग्य, हाच प्रश्न आहे. भातात एखादा खडा सांपडतो, म्हणून पक्वानांचं ताटच फेंकून द्यायचं कां, हाच खरा प्रश्न असावा ! >>>>
अहो सर्व फिक्स असेल तर कसली आली आहे प्रतिभा, विजिगीषु वृत्ती, शैलीदार फलंदाजी, गोलंदाजी व चपळ क्षेत्ररक्षण ? आणी त्या मैच्मधे चांगल्याच दिसल्या ह्या सर्व गोष्टी -चपळ क्षेत्ररक्षण दिसले - जेव्हा सोपे हातातले कैच सोडले., शैलीदार फलंदाजी - जेव्हा पहिल्याच ओव्हरमधे तीन तीन कैच दिले गेले, विजिगीषु वृत्ती -जेव्हा मैच जिंकण्याएवेजी एकच रन काढउन चांगलीच विजिगीषु वृत्ती दाखवली!
कितीही अनुभवी खेळाडू असला तरी तो शेवटी माणूसच असतो >>>
परत तेच! अहो लहान गल्लीतरि शेंबडी पोरे देखिल पळाली असती हो शेवेटच्या चेडुवर दोन रन काढुन मैच जिंकण्यासाठी, जर खरच विजिगीषु वृत्ती असती तर - चेडु कोठेहि गेला असता तरी. कसला दबाव, कसली घोडचूक सांगता तुम्हि येथे.!
जे जो वांछिल तें तो लाहो !!
जे जो वांछिल तें तो लाहो !!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
गणू,तुझे फ़िक्सड म्हणने
गणू,तुझे फ़िक्सड म्हणने सगळ्यांना पटले आहे.. सगळ्या म्याचेस फ़िक्ष आहेत त्यामुळे... आता कोणत्या म्याचेस कस्श्या फ़िक्स आहेत यावरच इथले लोक्स चर्चा करत आहेत त्यामुळे आपल्या हाताला विश्रान्ती दे आणि आम्ह्च्या फ़िक्स्ड कॉमेन्टस दुर्लक्षित कर!
फ़िक्सिन्ग जय हो,
धन्यवाद!
हायला.... लंकेत पाउस
हायला.... लंकेत पाउस चाललाय.... काय होतय कुणास ठाउक मॅचचं?
गणू, आजचा पाऊस देखिल फिक्स्ड
गणू,
आजचा पाऊस देखिल फिक्स्ड होता..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आजचा पाऊस देखिल फिक्स्ड
आजचा पाऊस देखिल फिक्स्ड होता..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
श्या राव, मस्त मॅच झाली
श्या राव, मस्त मॅच झाली असती...पावसाने अगदीच रसभंग केला...
आजचा पाऊस देखिल फिक्स्ड
आजचा पाऊस देखिल फिक्स्ड होता.. हाहा
बरोबर आहे. भर उन्हाळ्यात पाऊस
बरोबर आहे. भर उन्हाळ्यात पाऊस कधी येतो का? नक्कीच आजचा पाऊस फिक्स केलेला होता.
गिरीराज, जोरदार
गिरीराज, जोरदार अनुमोदन
सगळ्या मॅचेस फिक्स आहेत,
पण त्याचा पुरावा नाही
कारण असे पुरावे मिळत नसतात,
त्यामुळे पुरावे मागणारे मूर्ख आहेत
मी असे पुरावे मागत नाही कारण माझा फिक्सिंग्वर पूर्ण विश्वास आहे
निष्कर्ष - मी तेवढा शाणा बाकी सगळे गाढव
आमेन.
Pages