विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

न्यूझीलंड १२७-७. टेट, जॉनसन, ब्रेट ली व वॅटसन यांची अपेक्षित कामगिरी. न्यूझीलंडची कामगिरी विश्वचषकात अचानक यु-टर्न मारेल, ही अपेक्षा फोल ठरली !
ड्रेसींग रूममधल्या टी.व्ही.ला पाँटींग आज हार घालण्याची शक्यता ! Wink

<<अजून भरपूर खेळ बाकी आहे.....>> हिरकुजी, तुमच्या तोंडात साखर पडो ! न्यूझीलंडने २०९ची मजल मारली !! व्हेटोरीची झुंजार खेळी. सामना एकतर्फी नक्कीच नाही. न्यूझीलंडचा यु-टर्न होईलही !

<<न्यूझीलंडचा यु-टर्न होईलही ! >>....उंहू...उंहू...शक्य नाही ते ( आता तरी...!)

मी प्रतिसाद टाकून ५ मिनिटे झाली आणि २ विकेट गेल्या? अरे वा!

फार काही चांगली परिस्थिती नाही न्यूझीलंडची...

तिकडे बांग्लादेशची जोरदार सुरुवाती नंतर वाट लागलीये.. ४ विकेट धडाधड गेल्या..

TV तोडला नसून फेकेलेली बॅट कशावर तरी आदळून TV ला लागली असे आज वाचले. उगाच चिथवू नका रे त्याला >> हे आपलं काहितरी स्पष्टीकरण. कॉमनवेल्थ गेम्सनंतर या ऑस्ट्रेलियन खेळाडुंनी वॉशिंग मशिन का टीवी वरच्या मजल्यांवरुन खाली फेकून वाट लावली होती. असल्या रानटी लोकांबद्दल आदर कश्याला बाळगायचा आणी असली स्पष्टीकरणे कशी ऐकुन घ्यायची. थोडं generalization होतंय मान्य आहे पण ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी वारंवार असा रानटीपणा केलेला आहे.

<< थोडं generalization होतंय मान्य आहे पण ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी वारंवार असा रानटीपणा केलेला आहे.>> "Genaralization" न करण्यासाठी एक मुख्य समर्थन असं कीं पाँटींगसारखे खेळाडू ऑस्ट्रेलियातही अजिबात लोकप्रिय नाहीत; तिथल्या माझ्या कांही खास परिचितानी दिलेली ही खात्रीलायक माहिती. याउलट, सचिनबद्दल तिथे खूप आदर व आपुलकी आहे !

हे आपलं काहितरी स्पष्टीकरण.>> त्यात काय काहितरीच आहे ? पाँटींग किंवा ऑस्ट्रेलियन टिम धुतल्या तांदळासारखे आहेत असा माझा मूळीच दावा नाहि पण रागाने किटकडे फेकलेली बॅट bounce होऊन TV वर आपटली तर त्यावरून एव्हढा issue करणार्‍यांमधे आक्रस्ताळेपणा प्रतिक्रिया देणार्‍यांचा आहे असे मला वाटते. इतर जण असे फेकत नसतील अस मानणे खरच naive पणाचे लक्षण आहे. भाऊ ICC कडे तक्रार केल्यावर आणखी काय करणे शक्य होते त्यांना ? मूळात हा non issue आहे नि मिडिया उगाच हाईप करतेय. World Cup कडे लक्ष द्यावे त्यापेक्षा. Happy

तिथल्या माझ्या कांही खास परिचितानी दिलेली ही खात्रीलायक माहिती.>>मी असे काही ऐकले नाहिये. Aus मधे स्थित असलेल्या भारतीयांमधे पाँटींग लोकप्रिय नाहि पण Aus public मधे नक्कीच आहे. तेंडुलकर आवडणे न आवडणे ह्याचा ह्या मुद्द्याशी काही संबंध नाहि.

<<भाऊ ICC कडे तक्रार केल्यावर आणखी काय करणे शक्य होते त्यांना ?>> असामीजी, आयसीसीने नियमांनुसार कारवाई केली आहे याचा अर्थ खेळाडूंच्या वर्तणूकी बाबत काही निश्चित अपेक्षा असतात व पाँटींगसारख्या ज्येष्ठ खेळाडूनेच त्या सर्रास धाब्यावर बसवल्या तर ते दखलपात्र आहे, असं नाही वाटत ? << तेंडुलकर आवडणे न आवडणे ह्याचा ह्या मुद्द्याशी काही संबंध नाहि.>> सचिन कटाक्षाने या अपेक्षांचं पालन करतो व म्हणूनच इतरही देशात लोकाना तो आवडतो, हा विरोधाभास मला अभिप्रेत होता; संबंध आहे कीं नाही हे आपण ठरवावं.
<< World Cup कडे लक्ष द्यावे त्यापेक्षा. >> १००% सहमत. पण म्हणूनच पाँटींग, भज्जी यासारख्यानी आपल्या वर्तणूकीने आमचं प्रत्यक्ष खेळावरील लक्ष विचलीत करूं नये, हाही आग्रह !!

अरेरे. काल झुंज देऊन आयर्लॅन्ड सुध्दा हरले. सेट झालेली जोडी खेळत असतानासुध्दा बॅटिंग पॉवरप्ले न घेण्याची सार्वत्रिक चूक त्यांनी सुध्दा केली. शेवटी त्यांचा ऑलआऊट ४५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर होऊन पॉवरप्लेची सर्व ५ षटके वाया गेली. या स्पर्धेत अजून रंग भरत नाहीय्ये. अजूनपर्यंत एकही सामना चुरशीचा झालेला नाही. बहुतेक सामने एकतर्फी झालेले आहेत. भारत्-बांगलादेश ह्या सामन्याचा निकाल सोडला तर एकाही सामन्याचा निकाल मनासारखा लागलेला नाही.

<< भारत्-बांगलादेश ह्या सामन्याचा निकाल सोडला तर एकाही सामन्याचा निकाल मनासारखा लागलेला नाही.>> आमच्या मनासारखा ! Wink

>>सेट झालेली जोडी खेळत असतानासुध्दा बॅटिंग पॉवरप्ले न घेण्याची सार्वत्रिक चूक त्यांनी सुध्दा केली. शेवटी त्यांचा ऑलआऊट ४५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर होऊन पॉवरप्लेची सर्व ५ षटके वाया गेली

थोडक्यात बॅटींग पॉ.प्ले. चं गूढ वाढतच चाललय... दाल मे कुछ काला है क्या? Happy

बॅटींग पॉवर प्ले च्या बाबतीत आपली स्ट्रॅटेजी बरीच बरी आहे... ३४व्या ओव्हरला बॉल बदलला की बॅटींग पॉवरप्ले घ्यायचा...
बॉलिंग पॉवर प्ले हा पण एक फार्स आहे.. तो कधी घ्यायचा हाही प्रश्न आहेच... त्या बाबतीत १६ -१७ ओव्हर झाल्या की बॉल जुना होतो आणि मऊ होतो तेव्हा घ्यायला पाहिजे...

आयर्लंन्ड काल खरच चांगले खेळत होते.. ओब्रायन बंधू सेट झालेले असताना आणि गरज नसताना वेडेपण करुन आऊट झाले आणि मॅच घालवली...

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाला मनःपूर्वक शुभेच्छा !

oldies.JPG

म स्त भाऊ Happy

पाकिस्तान ३००ची मजल गांठेल असं वाटलं होतं पण २७६ वरच रोखलं त्याना श्रीलंकेने. श्रीलंकेची सुरवात तर दमदार झालीय. खेळपट्टी धावां करायला खास अनुकूल नाहीच. पण संगकारा व साथीदार जिगरीने खेळ करणार हे नक्की. बघूंया .

मस्त व्यंगचित्र Happy

शोऐब अख्तर च action वकारसारखी वाटतेय असे अक्रम म्हणतोय, तुम्हाला काय वाटते ? त्याचा पहिला स्पेल तरी खुप controlled होता.

------------------------------------------------

पाँटींगसारख्या ज्येष्ठ खेळाडूनेच त्या सर्रास धाब्यावर बसवल्या तर ते दखलपात्र आहे, असं नाही वाटत ? >> पहिला मुद्दा हा भाऊ कि हा प्रसंग dressing room मधे घडला, मैदानामधे नाहि. दुसरी गोष्ट it was unintentionalन. माझ्या मते त्याचा उगाच बाऊ केला जातोय. ICC सुद्धा level one offense असून (गेल्या महिन्यामधला हा त्याचा दुसरा Level 1 offense असूनही) फक्त reprimand केले. that bare minimum they have to do if complaint is been lodged.

http://www.espncricinfo.com/ci/content/story/502772.html

सचिनचा इथे काय संबंध ते मला अजूनही कळले नाहि. सचिन आणि पाँटींग एकमेकांचे ह्यात प्रतिस्पर्धी आहेत का ? कोण कुठे किती popular आहे ह्यावरून निर्णय घेतले जावेत का ?

असो ह्या मुद्द्यावर माझ्याकडे अजून काही लिहिण्यासारखे नाहि तेंव्हा त्याचा अधिक बाऊ मला तरी करायचा नाहिये Happy

<<कोण कुठे किती popular आहे ह्यावरून निर्णय घेतले जावेत का ?>> प्रश्न कोण, कुठे व किती लोकप्रिय आहे हा खरंच नाहीय; तो कां लोकप्रिय आहे यांत प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे- निर्णय नाही !
श्रीलंकेने कच खाल्ली ! एलबीडब्ल्यू निर्णय रिव्ह्यूनंतर बदलला जाण्याचं आणखी एक उदाहरण; द.आफ्रिकेच्या गोलंदाजाने न दिलेला एलबीडब्ल्यू रिव्ह्यूमधे बदलून घेतला होता - अंपायर बहुधा तोच !!

पाकिस्थान वरचढ ठरली. श्रीलंकेला, पाकिस्थान नक्किच काळा घोडा आहे या स्पर्धेतला.

"Former India captain and ace spinner Anil Kumble says Dhoni's men have to play to their strengths -- bat really well, bowl with control and up their efforts in the field -- to beat England on Sunday."आता मला सांगा, भारताने जिंकावं म्हणून क्रिकेट पहाणारे व न पहाणारे, क्रिकेट कळणारे किंवा न कळणारे यापैकी कुणीही वेगळं कांही बोलेल आजच्या किंवा कोणत्याही भारताच्या सामन्याबद्दल ! अरे भल्या माणसा, तुझ्या पोतड्यांभर अनुभवातून , तुला शक्य असेल तर, आम्हाला कांहीतरी निश्चित डावपेच किंवा भाकित सांग ना आजच्या सामन्याबद्दल !! हे असलं तर मीसुद्धां खरडत असतो मायबोलीवर !!! Wink

कुंबळेचे हे वाक्य, '"I owe a lot to my parents, especially my mother and father' किंवा "That would have been a goal if the goalkeeper hadn't saved it" यासारखे आहे. Proud

>>हे असलं तर मीसुद्धां खरडत असतो मायबोलीवर

अगदी.. मला वाटतं याहीपेक्षा जास्त अचूक ईथले क्रिकेट जाणकार ईथे खरडत असतात.. Happy जंबो कडून अजून थेट मुद्देसूद अपेक्षित. असो.
बँगलोरात हवा कशी आहे माहित नाही.. ढगाळ असली तरिही माझी पसंती दोन सीमर, दोन स्पिनर ला असेल कारण ई./ऑ वगैरे सीम जास्ती चांगले खेळतात अन झहीर सोडला तर ढगाळ हवामानाचा फायदा घ्यायला मुनाफ्/श्री अजून तितकेसे "वर" पोचलेले नाहीत. आपल्या पाट्यांवर लेग्/टॉप स्पिनर गोलंदाज अधिक यशस्वी असतात हे मी नव्याने सांगायला नकोच. भज्जी ला वाईट दिवस लागला तर अजून एक नियमीत फिरकी गोलंदाज असणे आवश्यक आहेच. खेरीज चावला ही थोडी unknown commodity असल्याने फायद्याचे ठरेल. श्री ला हा सामना बसवावे कारण हा पहिला महत्वाचा सामना आहे.

नाणेफेक धोणी जिंकणार नाही अन ईं पहिले फलंदाजी करतील (हे भाकीत वर्तविणे जास्त सोपे आहे!). तसे झाले तर मात्र आपल्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा कस लागेल कारण २७०+ धावा निर्णायक ठरू शकतात- ईं ला त्याच्या आत रोखायला हवे.
-------------------------------------------------------------------------------
युवी आत का बाहेर यावर आकडे लावा Happy

india- bangladesh match madhe.. bharathiy batsman virudha ekahi apeal zalele navhate...its record...

<<आपल्या पाट्यांवर लेग्/टॉप स्पिनर गोलंदाज अधिक यशस्वी असतात हे मी नव्याने सांगायला नकोच>> योगजी, याशिवाय हल्ली ऑफस्पीनरला खेळण्याचं तंत्र बर्‍याच फलंदाजानी आत्मसात केलंय; त्याला रिव्हर्स स्वीपने चौकार व षटकार मारण्यापर्यंत मजल गेलीय ! त्यामानाने लेगस्पीनर अजूनही बर्‍याच फलंदाजाना त्रास देतात. [ द.आफ्रिका व पाकिस्तानच्या लेग्गीजनी ४-४ विकेट त्यांच्या गेल्या सामन्यात घेतल्याच आहेत ]. मला तर आपल्या "साहेबा"ने इंग्लीश सायबाना लेगस्पीन टाकून चकवलेलं बघायची तीव्र इच्छा आहे; पण तें होणें नाही असंच दिसतंय. चावलाला सुवर्णसंधि आहे. पाहूं काय करतो तें [संघात घेतला तर !]. सामना मात्र ५० - ५० षटकं व ३०० +/-व्हावा अशी अपेक्षा आहे.
ऑल दी बेस्ट, इंडिया !

सामना मात्र ५० - ५० षटकं व ३०० +/-व्हावा अशी अपेक्षा आहे.>>
http://www.weather.com/weather/hourbyhour/INXX0012?par=cricinfo&site=www...

हवामान साफ आहे, सध्यातरी सामना ५० षटकं होण्याचे चान्स जास्त...

पण चावलाच्या आधी नेहरा (फिट असला तर) संधी घेणार असे खुद्द कप्तानानं संकेत दिलेत. पाहुया कसकाय व्हतय Happy

ईकड कोण espncricinfo वर फँटसी क्रिकेट खेळनारे नाहीत का?

धोनीने टॉस जिंकला ! पहिली फलंदाजी भारताची. योगजी, तुमचं ऐकून दोन स्पीनर घेऊन खेळणार !! युवीला संधी .
चला टीव्हीसमोर ठाण मांडून बसतो !

अरे... मी टाइपलेला प्रतिसाद गायब,,.. Sad
असो. घरी गेल्यावर आपली बॅटींग रेकॉरर्डींग पहावी लागणार..

विरू ची साथ अखेरीस नशीबाने सोडल्यावर तो पडला.
आता साहेब अन गंभीर १५० पर्यंत टीकले तर आज युवी कोहली च्या आधी येईल असे वाटते. (तसे करायला हरकत नाही, युवी साठी बरे होईल. आणि तो टीकला तर शेवटी ई. ची पिसे काढू शकतो, कोहली पेक्षा अम्मळ जास्त!)
एकंदरीत ३००+ धावा होतील असे वाटते.

Pages