विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झिं ने ऑसी च्या नाकी नऊ आणले... ४४ षटकापर्यंत सही गोलंदाजी/क्षेत्ररक्षण होते.
शेवटच्या ६ षटकात सामना घालवला की काय? (४४ षटकात २०० वरून ५० षटकात २६२ वर!!!)

ऑ. ने पहिल्या पॉ.प्ले मध्ये फक्त २८ (१० षटके), दुसर्‍यात फक्त २५ (५ षटके), तर तिसर्‍या मध्ये ३५ (५ षटके) धावा केल्या! नेमके ईथेच झि. ने किमान ६०, ३५, ३५ केल्या तरी साधारण ४० धावा अधिक असतील. ऊरलेल्या ३० षटकात मग १३२ धावा करणे बाकी असेल. कठीण आहेच पण शक्यही आहे.. ऑसी ने शेवटच्या दहा षटकात साधारण ८०-९० धावा केल्या आहेत. झि. ने देखिल विकेट्स शाबूत ठेवल्या तर धावा पार करणे शक्य आहे, कारण या सामन्यात दडपण ऑसी वर (जास्त) असणार आहे.

असो. पाहुया काय होतय.. शांत डोक्याने अवाजवी धोका न पत्करता खेळले तर २५० पर्यंत नक्की पोचू शकतात. अर्थात ली, टेंट च्या गोलंदाजीचा सामना करायचा आहे...

cricinfo:
Zimbabwe have done all they could to keep Australia to a manageable target and it's been a commendable effort. Their spinners were exceptional. Elton Chigumbura said at the toss that they were hoping to keep Australia below 270. Well they've done that. Now their batsmen have to handle the searing pace of Tait, Lee and Johnson.

कमालच आहे. झिंबाब्वे खतरनाक दिसतायत! फक्त २६२ च करू दिल्या?

पण आपली गोलंदाजी ही एक ऐतिहासिक समस्या असून ती याही विश्वचषकात आपल्याला भोवणार असे पहिल्या सामन्यावरून वाटत आहे खरे!

अगदी अगदी.
खरे तर २४० पर्यंत सुध्धा रोखू शकले असते... पण शेवटच्या ६ षटकात झिं. चा जोर कमी पडला..

एकंदरीत ईतर संघानी झि. विरुध्ध गाफील रहाणे योग्य ठरणार नाही.. विशेषतः आपण- वाचवायला पुन्हा कपिल "देव" अवतरणार नाही Happy (वीरु ने १७५ चा रतीब आधीच घालून ठेवलाय!)

>>> बांगला देशाने "लिंबू टींबू "ची कात केंव्हाच टाकली आहे ! आपल्याला एकदां दंशही केलाय !!

माझ्या मते बांगलादेश अजूनही लिंबूटिंबूच आहे. या स्पर्धेत त्यांनी आयर्लॅन्ड व हॉलंडला हरविणे अपेक्षित आहे. आयर्लॅन्ड त्यांना निश्चितच चांगली झुंज देईल. २००७ मध्ये आयर्लॅन्डने त्यांना हरविले होतेच. त्या व्यतिरिक्त जर ते उरलेल्या चौघांपैकी निदान एकाला तरी हरवू शकले तर ते लिंबूटिंबू गटातून बाहेर पडले असे म्हणता येईल. ते वेस्ट इंडिजला सहज हरवतील असे काही जणांना वाटत आहे. त्यांच्याकडून हरण्याइतकी वेस्ट इंडिजची टीम दुबळी नाही. बांगलाची मध्यमगती गोलंदाजी सुमार आहे. वेस्ट इंडिजचे गेल, सर्वन, ब्राव्हो बंधू, चंद्रपाल इ. फलंदाज फिरकी चांगले खेळतात. त्यामुळे वेस्ट इंडिज त्यांच्याविरूध्द हरणे अवघड आहे. कदाचित माझी अ‍ॅसेसमेंट चुकीचीही असेल. बघूया काय होतंय ते.

ऑसी वि. झिम्बाब्वे सामन्यानंतरच्या चर्चेत चॅपेलगुरूजी व सौरवने एक महत्वाचा मुद्दा अधोरेखीत केला. - कोणत्याही फलंदाजाने आपण ५०पैकी ४५ तरी षटकं खेळायचीच असं आधीच ठरवून विश्वचषकासारख्या स्पर्धेत खेळायला उतरूं नये; एखाद्या अप्रतिम चेंडूवर कोणताही दर्जेदार खेळाडू केंव्हाही बाद होऊं शकतो. खेळत असेपर्यंत धांवसंख्या वाढवत रहाणं हाच निश्चय असावा [सौरवने यावर सेहवागचं उदाहरण दिलं ].
बर्‍याच वेळां आपण कांही खेळाडूंवर "शीट अँकर रोल " लादतो. मला वाटतं ५० षटकांच्या सामन्यात जर एक फलंदाज बहरात येऊन फटकेबाजी करत असेल तर दुसर्‍या फलंदाजाने त्याला जास्त स्ट्राईक देणे योग्य. पण तो फलंदाज बाद झाला तर धांवसंख्या वाढवण्याची जबाबदारी दुसर्‍या फलंदाजाने तात्काळ उचललीच पाहिजे. ' एखाद्या फलंदाजाने एक बाजू धरून ठेवली नाही तर डाव कोसळेल ' ही मानसिकता आपला बर्‍याच वेळा घात करून गेली आहे; याउलट, प्रत्येकाने आपापल्या परिने खेळ केला तर पठाण, भज्जीसारखेही विश्वासपूर्वक शतकं ठोकून जातात !

रच्याकने: काल झिं ने फलंदाज चांगले खेळत असताना बॅटींग पॉवरप्ले घेतलाच नाही.. ४५ षटकानंतर ऊरलेली ५ षटके सक्तीचा पॉवरप्ले झाला तेव्हा त्यांची शेवटची जोडी खेळात होती.. हे अगदीच अगम्य होते Sad
सनीभाय व ईतर म्हणत होते की त्यांना तिसरा पॉ.प्ले. आहे हे माहिती आहे का हे कळायला मार्ग नाही? कुणीच कसे त्याबद्दल बोलत नव्हते?

आज नेदरलँड चे नेमके तेच चालू आहे.. ४० षटके होत आली पण अजून त्यांनी बॅ. पॉ.प्ले. घेतलेले नाही Sad या लिंबूटींबू संघांना हे तिसर्‍या पॉ.प्ले. बद्दल माहित नाहीये की काय? Sad

योग.. पॉवरप्ले जिंक्स नको म्हणून टाळत असतील... बहुतेक वेळा पॉवरप्ले मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये विकेट पडलेली आहे... ते टाळण्यासाठी घेत नसतील पॉवर प्ले... पण आत्ता बघायला गेलं तर लगेच पॉवर प्ले घेतला तर नेदरलँडला चांगला चान्स आहे... त्यात स्वॅनच्या ओव्हर्स पण संपल्या आहेत..

सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया/न्यूझि. कोणीतरी पॉवर प्ले घ्यायला विसरले होते.

कधी कधी पॉवर प्ले फिल्डिंग साईडला फायद्याचा ठरतो. कारण कॅप्टनला डायलेमा असतो. वन रन सेव्हिंग फिल्ड ठेऊ की चार रन सेव्हिंग. पॉवर प्ले मुळे त्याला कंपल्सरी वन रन सेव्हिंग ठेवायला लागते. ते काही (उदा. द्रविड सारख्या) लोकांना (बरेच असतात असे) अवघड जाते. मग विकेट जाते.

नेदरलँडने धुतला इंग्लंडला....
डोशॅटे (याच्या नावाचा नक्की उच्चार काय आहे) अप्रतिम खेळला...त्याच्या स्ट्रोक्सवरून तो काऊंटी प्लेअर असल्याचे कळून येते...
इंग्लंडचे गोलंदाज पण बेभरवशाचा मारा करत होते आणि फिल्डींग तर आरारा अगदीच सुमार..किती कॅच सोडावे...

२९३ जिंकायला...:)

हो ना.. इंग्लंडची पीसं काढली नेदरलँडनी... जर ते ही मॅच जिंकले तर त्यांना शेवटच्या आठ मध्ये खेळायचे खूप चान्सेस आहेत.. त्यांना अजून दोन मॅचेस जिंकण सहज शक्य आहे.. आणि त्यांचे बरेच खेळाडू काउंटी खेळतातच... त्यांना डर्क नॅनेसची कमी नक्कीच जाणवेल... तो असता तर आजची मॅच जिंकण्याचे त्यांचे चान्सेस प्रचंड वाढले असते..

नेदरलँडचा एवढा स्कोर होण्यात इंग्लंडचा हातभार जोरदार होता.. पण २९३ धावा करण अगदीच सोपं जाणार नाही.. अगदी फालतू टीम असली तरी. कारण नाही म्हणलं तरी प्रेशर येतच.. आणि त्यात वर्ल्डकपची मॅच..

घोळ महान होता... तोही माजी कर्णधाराकडून..

इंग्लंड जिंकल,शेवटी रडतखडत, पण असच टी-२० च्या वर्ल्डकपमध्ये पहिल्या राऊंडमध्ये त्यांनी दुबळ्या संघाविरुध्द (बहुतेक आर्यलंड) हरता हरता विजय मिळवला आणि शेवटी कप जिंकलाही, हे विसरुन चालणार नाही

एखादी विकेट थोडी लवकर पडली असती तर इंग्लंडला अवघड गेली असती आजची मॅच.... त्यांच्या पण बॉलिंगची अवस्था गंभीरच होती आज...

<<इंग्लंड जिंकल,शेवटी रडतखडत, पण असच टी-२० च्या वर्ल्डकपमध्ये पहिल्या राऊंडमध्ये त्यांनी दुबळ्या संघाविरुध्द (बहुतेक आर्यलंड) हरता हरता विजय मिळवला आणि शेवटी कप जिंकलाही, हे विसरुन चालणार नाही>> गौतम७स्टारजी, भारतही कपिलच्या "दैवी" खेळीमुळेच झिंबाब्वेविरुद्ध जिंकला व चषक जिंकून गेला; पण १९८३ नंतर त्याची पुनरावृत्ती कांही झाली नाही. पाकिस्तानही स्पर्धेबाहेर होता होता वांचला व चषक जिंकून गेला पण पुन्हा नाही घडलं तसंच. तेंव्हा इंग्लंडच्या बाबतीतच रिपीट परफॉर्मन्स होईल असं मानायचं कारण नाही. Wink

तेंव्हा इंग्लंडच्या बाबतीतच रिपीट परफॉर्मन्स होईल असं मानायचं कारण नाही. >> खरंय भाऊ, पण सराव सामना व आजचा सामना विचारात घेता त्यांना अंडररेट करण पण बाकी बलवान संघांना महागात पडु शकत.

आजचा सामना विचारात घेता त्यांना अंडररेट करण>>बर्‍याच गोष्टी आहेत खर तर. मुळात ते down under खेळून आले आहेत तेंव्हा ती adjustment व्हायला वेळ लागणारच. परत anderson, broad, bresnan are not particularly known for accuracy. Fantastic spinner in Swann and strong batting line that can give headache to us. Peterson moving up the order has really opened up options for Eng.

<< पण सराव सामना व आजचा सामना विचारात घेता त्यांना अंडररेट करण पण बाकी बलवान संघांना महागात पडु शकत>> एकदम मान्य. पीटरसन व स्वान त्यांचे हुकमी एक्के ठरण्याचीही खूपच शक्यता. कॉलींगवूड खेळाडू म्हणून व कप्तान म्हणूनही भरीव कामगिरी करतो आहे [ A quietly efficient guy; I really like & respect him !]

पीटरसन ६० चेंडूत ३९ धावा? त्याही सलामीला येऊन? अरारारा!
बोपाराचा षटकार गेलेला फटका सीमेवर झेलला गेला असता तर मौजा ही मौजा!
कालची म्यांव म्यांव (म्हणजे काय ते ओळखा) इंग्लंडच्या एका फलंदाजाने मारलेला स्ट्रेट ड्राइव्ह जो नक्की स्टंपांवर जाणार होता, तो म्हणे बेस्ट स्ट्रेट ड्राइव्ह.

पाँटींगने धावबाद झाल्यावर ड्रेसिंग रूममध्ये परतल्यावर आपली कवच कुंडले इतक्यात जोरात फेकली की त्यामुळे (त्याने मुद्दाम नाही काही फोडली) ड्रेसिंग रूममधली टीव्ही स्क्रीन बिघडली.

कॉलींगवूड कप्तान ! I don't mind getting bowled but getting caught - oh, that's shameful ! हिरकुजी, विक्रमजी व इतर कुणाच्या लक्षात हे आलं असेल/नसेल त्या सर्वानी या अक्षम्य चुकीबद्दल मोठ्या मनाने माफ करावं !

हॉलंडनी चांगली लढत दिली काल इंग्लंडला... डुकाटी चांगला खेळला.

पाँटींगने धावबाद झाल्यावर ड्रेसिंग रूममध्ये परतल्यावर आपली कवच कुंडले इतक्यात जोरात फेकली की त्यामुळे (त्याने मुद्दाम नाही काही फोडली) ड्रेसिंग रूममधली टीव्ही स्क्रीन बिघडली.
>> आक्रास्तळेपणा त्यांच्या अंगातच आहे, आपला तो बाब्या अन दुसर्‍याच कार्ट ,....
तेथेच जर आपला खेळाडु असता तर किती बाऊ केला असता या लोकांनी...

भाऊ होत कधी कधी अस ...

Pages