१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
निकिता, टोके चाळून जातील,
निकिता, टोके चाळून जातील, वापरायला हरकत नाही. पण टोके झालेत म्हणजे पीठ जुनं असेल ना? चिकटपणा कितपत टिकलाय ते पहा... त्याची भाकरी जमत नाही कारण. चिकटपणा गेला असेल तर मग.. थालिपीठ करतो त्यात थोडं थोडं मिसळून वापरून टाक.
डस्टिंग करताना ओल्या फडक्यावर
डस्टिंग करताना ओल्या फडक्यावर कोलीन घालून पुसले तर लाकडावर टीवी वर पाण्याचे डाग पड्तातेत. कसे करावे? स्वच्छ पण होईल व डाग पण नाहीत पडणार?
मामी, पुसायला फडकं वापरू
मामी, पुसायला फडकं वापरू नकोस.. कोलिन शिंपडलंस की आरसे, टिव्ही, म्युझिक सिस्टिम या वस्तू, शिवाय काचेच्या शोकेसेस वर्तमानपत्राने पुसुन बघ. डाग पडणार नाहीत.
निकिता, ते वापरु नये. टोके
निकिता, ते वापरु नये. टोके निघाले तरी त्यांची सूक्ष्म अंडी त्यात आहेतच. आणि तसेही त्या पिठाचे काही केले तर ते कडवट लागेल. पिठ फार दिवस वापरायचे नसेल तर ते फ्रिजमधे ठेवावे.
ठँकू दक्षे. अग ते डाग वाइट
ठँकू दक्षे. अग ते डाग वाइट दिसतात म्हणून! तसेच मी मूड लागला कि डस्टींग करते .
मला पण अंड्यांची शंका होती.
मला पण अंड्यांची शंका होती. इतकं पीठ टाकुन द्यायला जीवावरं आलयं. पण आज घरी जाउन टाकुन देणार.
अश्विनी, तूमच्याकडचे पाणी पण
अश्विनी, तूमच्याकडचे पाणी पण जड असणार ना ? त्यामूळेही डाग पडतात.
टोके म्हणजे ते लाल/काळेकिडे
टोके म्हणजे ते लाल/काळेकिडे ना ? फेकून द्या पीठ. त्या किड्यांचं आख्ख लाइफ सायकल त्या पीठात चालु असतं हे लक्षात असु द्या.
हो का सिंडे? मध्यंतरी
हो का सिंडे? मध्यंतरी माझ्याकडच्या सगळ्या पिठांमध्ये असेच टोके/ पोरकिडे झाले होते. सगळी पिठं फेकावी लागली.
इथे मला कोणी एखादं चांगले
इथे मला कोणी एखादं चांगले क्लिनर सांगेल का ज्याने टाईल्स छान धुतल्या जातील घासाघासी न करता.
पुण्यात/भारतात मिळणारे सांगा. मला अॅलर्जी आहे बर्याच तीव्र वासाच्या केमिकल्सची. ज्यास्त वेळ मारून घासू शकत नाही. घरी(पुण्याला अर्थात भारतात) असे कुठले ब्रँड आहे जे फक्त मारून ठेवायचे व धूवून टाकायचे थोड्या वेळाने तरी टाईल्स मस्त निघतील..
धन्यवाद आधीच जे कोणी सुचवेल ते...
Mr. Muscle (specially for
Mr. Muscle (specially for bathroom cleaning) वापरून बघितलंय का? मला तरी चांगले वाटले होते.
अंजली_१२, ते भारतात मिळते का?
अंजली_१२, ते भारतात मिळते का?
घरी ज्वारी / बाजरी चे पीठ
घरी ज्वारी / बाजरी चे पीठ उरले आहे. भाकरी सोडुन काय करता येइल?
थालिपीठ. ज्वारीच्या पीठाची
थालिपीठ. ज्वारीच्या पीठाची उकड करतात. नूडल्सची कृती आहे इथेच.
मि बारामुंडी मासा आनलाय. मि
मि बारामुंडी मासा आनलाय. मि जागू ची रेसिपी वाचली पन त्यात तो कसा साफ करायचा ते नाही दिलेय्.मि त्याला ल्किन करुन दे म्ह्ट्ले पन त्याने फक्त मधे एक चीर दिलि त्याचे तुकडे नाही केले.
मला सांगा तो कसा कट करु?
बारामुंडी म्हनजेच रावस ना?
लवकर सांगा प्लिज कधी खाईल असे झालेय्..जागूच्या रेसिपीचे फोटो बघून.
ध्वनी : मिस्टर मसल/ इझी ऑफ
ध्वनी : मिस्टर मसल/ इझी ऑफ बँग मस्त आहेत दोन्ही. कुठेपण मिळतात. अॅमवेचे पण छान आहे. अगदी मंद सुवास आहे. व कमी लागते. साधे पुसून घ्यायला लायझॉल पण आहे. जर्म्स हटविण्यासाठी परफेक्ट.
काहीच नाहीतर चक्क डेटॉल. अगदी एक झाकण पुरते.
हार्पिक व साधे अॅसिड पण असते पण ते तीव्र आहे तुम्हास त्रास होउ शकतो.
मि केला बारामुंडी आणि खाल्ला
मि केला बारामुंडी आणि खाल्ला ही
एकदम मस्त झाली होती करी आणि फ्राय.
मि असाच कट केला.
रसमलई करताना पनीरचे गोळे मऊ
रसमलई करताना पनीरचे गोळे मऊ रहावेत म्हणून काय करायचं? मी १ लि. दुधाला २ टेस्पू. व्हिनिगर घालून पनीर केलं. (प्रमाण वगैरे सगळं पुस्तकात बघून). ते थोडा वेळ टांगून ठेवलं. १५-२० मिनिटं. मिक्सरला फिरवून घेतलं. मग पुन्हा खूप मळून घेतलं. खडीसखरेचा एकेक दाणा घालून गोळे करून नीट शिजवले. मग दुधात घातले. फ्रीझ केल्यावर थोडे कडक झाले रसगुल्ले. नॉर्मल टेंप. वर थोडे मऊ झाले परत. असं नको व्ह्यायला. पूर्णपणे सॉफ्ट राहतील म्हणून काय करायचं?
मला quinoa च्या ट्राईड अँड
मला quinoa च्या ट्राईड अँड टेस्टेड रेसिप्या हव्या आहेत. आपल्या पद्धतीच्या काय काय गोष्टी करता येतात? आणि इतर पण काही छान प्रकार (आपल्या पद्धतीचे नसलेले) माहित असले तर सांगा.
धन्यवाद.
राखी इथे सुलेखा यांनी (बहुदा)
राखी इथे सुलेखा यांनी (बहुदा) मागच्याच महिन्यात काही कृती लिहील्यात त्या बघ.
eggless cake साठी , १ can
eggless cake साठी , १ can evaporated milk वापरावे. मी betty croker cha banana-nut cake केला होता. त्यात सन्गितले होते तेवढे तेल घातले आणी वेगळे दुध (instructions madhe hote) नाही घातले. बाकी instructions प्रमाणे bake केला. खुप मस्त झाला.
राखी, cous cous सॅलड, pasta
राखी, cous cous सॅलड, pasta सॅलड मधे छान लागतो किन्वा (त्याऐवजी).
फ्राईड राईस सारखा पण छान लागतो.
॓पास्ता सूप मधे पण पास्त्याऐवजी पण किन्वा घालून चांगला लागतो.
परवा एका मैत्रिणीने आडोचा तवा पुलाव किन्वा घालून केला होता तो पण चांगला झाला होता ...
धन्यवाद रूनी आणि मिनोती.
धन्यवाद रूनी आणि मिनोती. तुझ्या टोमॅटो बिर्यानीवर पण तू लिहीलेलं पाहिलं की त्यात quinoa वापरता येइल म्हणून. ते पण ट्राय करीन.
इथे चाफ्याची किन्वा सोल
इथे चाफ्याची किन्वा सोल नावाची एक रेसिपी आहे शोध. मस्त होतो तो प्रकार.
चुकुन माझ्या नवर्याने
चुकुन माझ्या नवर्याने सालवाली मुग डाळी ऐवजी , सालवाली उडीद डाळ आणली आहे. आता त्याचे काय पदार्थ करता येतील? १ की आहे . मिश्र डाळीच्या डोश्या व्यतिरीक्त अजुन काय करता येईल?
सालीची उडद डाळ घालून मुगाच्या
सालीची उडद डाळ घालून मुगाच्या खिचडीसारखी खिचडीही मस्त होते. मिरे घालायचे, चव छान येते.
ती डाळ भिजवून ठेवली की काही
ती डाळ भिजवून ठेवली की काही वेळाने साले निघून जातील व साले काढून टाकल्यावर नेहमी सारखे वडे किंवा दोसे करता येतील.
मला सांगा ना कुणीतरी...मी
मला सांगा ना कुणीतरी...मी रसमलई मऊ होण्यासाठी काय करूऊऊऊऊऊ???
रसमलई करताना पनीरचे गोळे मऊ रहावेत म्हणून काय करायचं? मी १ लि. दुधाला २ टेस्पू. व्हिनिगर घालून पनीर केलं. (प्रमाण वगैरे सगळं पुस्तकात बघून). ते थोडा वेळ टांगून ठेवलं. १५-२० मिनिटं. मिक्सरला फिरवून घेतलं. मग पुन्हा खूप मळून घेतलं. खडीसखरेचा एकेक दाणा घालून गोळे करून नीट शिजवले. मग दुधात घातले. फ्रीझ केल्यावर थोडे कडक झाले रसगुल्ले. नॉर्मल टेंप. वर थोडे मऊ झाले परत. असं नको व्ह्यायला. पूर्णपणे सॉफ्ट राहतील म्हणून काय करायचं?
हा प्रॉब्लेम आहे. वर लिहिलाय, स्क्रॉल नको करायला म्हणून पेस्टलंय परत.
दूध नासवून पनीर करताना काहीतरी गडबड झाली असावी असं मला वाटतंय. परतच्या वेळी जमायला हवी नीट.
प्रज्ञा, मी ३-४दा रसमलई केली
प्रज्ञा, मी ३-४दा रसमलई केली होती तेव्हा गायीचं दूध तापत आल्यावर त्यात लिंबू पिळलं होतं दूध फाडण्यासाठी. नंतर तो छाना फडक्यात दाबून पाणी काढून टाकलं. टांगून बिंगून ठेवलं नाही. नंतर तो छाना छान मळून घेतला आणि चपटे गोल केले. नंतर ते कूकरच्या डब्यात तयार केलेल्या कच्च्या पाकात ठेवले आणि २ शिट्ट्या काढल्या. नंतर हाताने हलकेच दाबून पाक काढून टाकला आणि जराशा आटवलेल्या दूधात सोडले. माझे रसगुल्ले चांगले मऊ राहिले होते.
धन्स अश्विनी.. मी पुढच्या
धन्स अश्विनी..
मी पुढच्या वेळी लिंबू पिळून बघेन. बाकीची कृतीपण तशीच करेन. जमायला हरकत नाही.
Pages