१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
मंजे, सिहोर आणि लोकवणची कणिक
मंजे, सिहोर आणि लोकवणची कणिक कशी किलो देतात देशपांडे? माझा वाणी ३० रु किलो दराने देतो. क्वचितच जाड दळलेली असते.
वर मैदायुक्त पीठांविषयी
वर मैदायुक्त पीठांविषयी लिहील्याप्रमाणे, आशिर्वाद चे प्रॉडक्ट्स पण वाईट आहेत असे कोणाला माहीत आहे का ? कारण मी नेहमी वापरते आणि फुलके/पोळ्या चांगल्या होतात. पण फार ब्राऊन नाही दिसत.
मवा मला वाटतंय, बाहेरच्या
मवा मला वाटतंय, बाहेरच्या आट्याच्या पोळ्या करायची टेक्निक तुला जमलेय बरोब्बर
आशिर्वाद मस्त आहे,आणि मैदा
आशिर्वाद मस्त आहे,आणि मैदा नसावा,असल्यास अगदीच कमी असावा कारण त्याच्या पोळ्या लाटताना रबरासारख्या ताणल्या जात नाहित.
नाही मी खरेच विचारतेय , कारण
नाही मी खरेच विचारतेय , कारण तसे असेल तर मी ही गहू आणून दळून आणेन. आई पण गहूच दळून आणते व मलाही नेहेमी तेच कर असे सांगते, पण मी आपली आशिर्वाद वर काम भागवते. पण खरंच ते वाईट असेल आरोग्यासाठी तर बदलेन, म्हणून विचारले.
हो भान, बरोबर. शिवाय मी सध्या तो आशिर्वाद चाच Multigrain आणते आहे, तोही चांगला वाटतोय.
देशपांडे फ्लोर मिल्सची कणिक
देशपांडे फ्लोर मिल्सची कणिक उत्पादने अतिशय सुंदर आहेत >>> अनुमोदन. मी गेले ७-८ महीने त्यांचीच पिठं वापरतेय. कणीक, भाकरीची पिठं अप्रतिम असतात. जरा महाग आहेत त्यांचे दर पण पोळ्या-भाकरी इतक्या छान होतात की त्यापुढे जरा जास्त पैसे द्यावे लागले तरी त्याचे काही वाटत नाही. शिवाय घरपोच मिळते.
आशू, वृंदावनमधे त्यांचा एक एजंट आहे - सुधीश गुप्ते. फोन नं. - ९६१९२०००४९, सौ. गुप्ते - ९८६९५०३३०४
लले, आताची संपत आली की मागवेन
लले, आताची संपत आली की मागवेन त्यांच्याकडून एकदातरी कणीक.
एक-दोन पानं आधी तळणीच्या
एक-दोन पानं आधी तळणीच्या उरलेल्या तेलाची विल्हेवाट अशी चर्चा वाचली. मला एक प्रश्न आहे की हे तेल परत गरम केले तरच प्रॉब्लेम आहे की गार पण वापरु नये? मी बरेचदा कुरमुरे किन्वा पातळ पोहे यावर मेतकूट, मीठ, कांदालसूण चटणी (किंवा लाल तिखट) मिक्स करून ते तेल घालून कालवते. कांदा - कोथिंबीर वरून घेतली कि मस्तच लागतात. कोल्हापूरला आम्ही त्याला लावलेले पोहे अथवा कुरमुरे म्हणतो. किंवा तळून झाल्यावर लगेच्च तेल गरम असतानाच त्यात कुर्मुरे अथवा पोहे घालून भडंग/चिवडा करावा. अगदीच फुकट घालवायच जरा वाईट वाटतं.
शंकरपाळ्याचे पीठ भिजवले आहे,
शंकरपाळ्याचे पीठ भिजवले आहे, तळायला घेतल्यावर लक्षात आले की थोडासा रवा (नेहमी घालते) तो घालायचा विसरला आहे. वरुन रवा, साखर कसे अॅड करायचे? पटकन सांगा कोणीतरी. नाहीतर तसेच तळावे लागतील.
मी इथे अमेरीकेत गेली ५ वर्षे
मी इथे अमेरीकेत गेली ५ वर्षे आशिर्वादची गव्हाची कणीक वापरली आहे. माझ्या अनुभवाप्रमाणे त्यात अजिबात मैदा नाही. पोळ्या अतिशय मऊ होतात. दुसर्या दिवशीपण छान मऊ असतात. सुजाता, नेचर्स फ्री वगैरेचा माझा अनुभव अजिबात चांगला नाही.
मला वाटते प्रत्येकाचा अनुभव
मला वाटते प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे पीठाचा
मी सुजाता, नेचर्स फ्रेश किंवा अन्नपूर्णा वापरते. आमच्या इथे मिळणार्या नेचर्स फ्रेशच्या पॅकमध्ये आधी किडे आणि नंतर अळया (हो मोठ्या पांढर्या अळया) निघाल्यावर आणि दोनदा १० एलबीवाले पॅक फेकून द्यावे लागल्यावर आता अन्नपुर्णाचं किंवा सुजाताचं २ एलबीचं पॅक आणते. पण पोळ्या तीनही पीठांच्या छान मऊ होतात. फुलके नुसत्या तव्यावर भाजले तरी टम्म फुगतात. वातड पोळ्या किंवा फुलके दोन्ही होत नाहीत.
अमेरिकेत आल्याआल्या पंजाबी
अमेरिकेत आल्याआल्या पंजाबी मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे गोल्डन टेंपल आटा आणला होता. अगदी मैदा कळतो डोळ्यांना आणि पोळ्या अजिबातच चांगल्या होईनात ( हाडाच्या सुगरणींना जमतात. माझी एक मराठी मैत्रिण ह्याच आट्याच्या उत्तम पोळ्या करायची
) मग सुजाता आणत होते. सध्या आशीर्वाद. सध्या कॉईल असल्याने फुलक्यांसारख्या लाटते ( घडी न घालता ) आणि पोळ्यांसारख्या भाजते. तव्यावरुन उतरुन तुपाचा हात लावून फॉईलमध्ये ठेवल्यास चांगल्या लागतात. अमेरिकन ग्रोसरीत डकोटा मिल्सचे स्टोन ग्राऊंड होल व्हीट फ्लोअर मिळते. शुद्धतेबद्दल शंकाच नाही पण त्याची कणीक लगेच काळी पडते म्हणून आणवत नाही 
>>>आमच्या इथे मिळणार्या
>>>आमच्या इथे मिळणार्या नेचर्स फ्रेशच्या पॅकमध्ये आधी किडे आणि नंतर अळया (हो मोठ्या पांढर्या अळया) निघाल्यावर आणि दोनदा १० एलबीवाले पॅक फेकून द्यावे लागल्यावर आता अन्नपुर्णाचं किंवा सुजाताचं २ एलबीचं पॅक आण>>><<<
किडे आणि अळ्या? हे तुम्ही बरबटलेले ओले हात घालत असाल अक्ख्या पॅक मध्ये त्याशिवाय होत नाहित काय.. कैच्याकै.. नाहितर कुठेतरी जावून ह्याविषयी बोंब नाहि का मारली मग(रोजच्या सवयीप्रमाणे)
चपातीचे पीठे, ब्रँड आणि
चपातीचे पीठे, ब्रँड आणि त्यांचे अनुभव असा बीबी काढायला पाहिजे आता. बर्याच वेळा तेच तेच प्रश्ण इथे येतात. लोकम तेच तेच अनुभव पुन्हा लिहितात.
जवस म्हणजे आळशी काय?
@सिंडरेला पॅक उघडल्या
@सिंडरेला
पॅक उघडल्या उघडल्या आळ्या निघाल्या असतील तर स्टोर मध्ये परत का केले नाहिस?
@अगो >> कणीक लगेच काळी पडते म्हणून आणवत नाही
>> मळल्यावर किती वेळात काळी पडते? लगेच का? की तो स्टोरेज बद्दल बोलतेयंस? कशी स्टोर करतेस मळलेली कणिक...
धन्स माहीतीबद्दल. आशीर्वाद,
धन्स माहीतीबद्दल. आशीर्वाद, अन्नपुर्णा, सुजाता पैकी लहान पाकीटे आणून बघते एकेक करून.
दक्षिणा, नवेच पॅक होते.
दक्षिणा, नवेच पॅक होते. दुकानदाराला सांगितले तर म्हणे आमच्याइथले नाहीये हे. ते त्यांचे नेहमीचे उत्तर असते. आता तर २ नवी दुकानं झालीत इथे. त्यामुळे ते सरळ 'नव्या दुकानातून घेत नका जाऊ....' वगैरे लांबण लावतात. शक्य झाल्यास जर्सीहुन आणते पीठं. पण प्रत्येकवेळी जमेलच असे नाही.
मीही इथे आल्याआल्या गोल्डन
मीही इथे आल्याआल्या गोल्डन टेम्पल वापरते होते. पोळ्या गरम असतील तरच खायला बर्या लागायच्या, गार झाल्या की वातट. मी बरेच दिवस तो माझ्या स्ययपाकाचा दोष समजत होते.
सध्या अन्नपूर्णा सगळ्यात चांगले वाटले. ते मिळत नसेल तर सुजाता/स्वर्ना आणते. पीठ दुकानातून आपण घेण्यापूर्वी किती दिवस्/महिने तिथे पडून आहे त्यावर अवलंबून आहे, बरेच जुने असल्यास सुजाताच्याही पोळ्या चांगल्या होत नाहीत.
मध्यंतरी मायबोलीकर सीमाच्या हातच्या इतक्या मऊ पोळ्या खाल्ल्या, तिचे पाहून कणीक सैल मळायला सुरुवात केली. मळल्यावर तेलाचे बोट लावून २ मिनिटे तिंबुन घेते. आता बर्याच मऊ होतात.
मैद्याच्या (किंवा पिठासारख्या
मैद्याच्या (किंवा पिठासारख्या मैद्याच्य अथवा मैद्यासारख्या पिठाच्या )चांगल्या पोळ्या करता आल्या तरी त्यांच्या पोषणमूल्याचे काय? भारताबाहेरच्या लोकांचा नाइलाज असेल पण भारतातल्या लोकांनी पर्यायांचा विचार करायला हवा.
एका न्युट्रिशनिस्टने मैद्याला व्हाइट पॉयझन म्हटले होते.
मी लग्न ठरल्यावर पोळ्या
मी लग्न ठरल्यावर पोळ्या करायला शिकले
आणि इकडे आल्यावर खर्या अर्थाने पोळ्यांची जबाबदारी आली. लग्नानंतर १५ दिवसांत आले इकडे. मग इकडच्या कणकेशी जमेना. आधी स्वाद :(, मग सुजाता, आणि शेवटी आशीर्वाद.

त्यात नवीन तवा खराब झाला. मग इकडे calphalon चा Hard anodized घेतला. त्याचं गणित जमेना. एक दिवस नवर्याने डबा खाऊन झाल्यावर ऑफिसमधूनच विचारलं, की तू खरंच डबा न द्यायचा विचार करशील का..अगदीच कडक होतायत पोळ्या...
मग बराच रिसर्च झाला आणि जमलं प्रकरण! आता मी कणीक सैल भिजवते, आणि अजिबातच तेल घालत नाही. नुसतं मीठ आणि कोमट पाणी.
फुलका गॅसवरून काढून वाफ काढली की लग्गेच तूप लावते थोडं. आणि डब्यासाठी देताना थोड्या कोमट झाल्या की अॅल्युमिनियम फॉईलमधे रॅप करून देते.
मी ही आशिर्वाद गेले चार एक
मी ही आशिर्वाद गेले चार एक वर्ष वापरते आहे. त्यात मैदा असावा असं वाटत नाही. सुरुवात सुजातापासून केली. एखाद वर्ष तो वापरल्यावर मगच्या लॉटमध्ये अगदी खरबरीत कणीक आली तेव्हा आशिर्वादला स्विच केलं. पण परवा इथल्या छोट्या ग्रोसरीमध्ये आशिर्वाद मिळाला नाही म्हणून सुजाताची लहान पिशवी घेऊन आलेय. आता एडिसन गाठायला हवं.
मीही आशीर्वादच वापरते. छान
मीही आशीर्वादच वापरते. छान होतात पोळ्या/फुलके.
मैद्याच्या (किंवा पिठासारख्या
मैद्याच्या (किंवा पिठासारख्या मैद्याच्य अथवा मैद्यासारख्या पिठाच्या )चांगल्या पोळ्या करता आल्या तरी त्यांच्या पोषणमूल्याचे काय? >>> हाच प्रश्न मी काल विचारला होता. की मी गेली बरीच वर्षे आशीर्वाद चे पीठ वापरत आहे व त्याच्या पोळ्या/फुलके अतिशय छान होतात, तसेच मैदा असलेली पीठे ओळखण्यासाठीचे जे निकष वर दिले आहेत त्याप्रमाणे देखील त्यात मैदा असल्याचे लक्षण दिसत नाही, तसेच कोणी आत्तापर्यंत मला तसे सांगितलेही नाही. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसे भारतातल्या लोकांना पर्याय असले तरी जर हे पीठ चांगले नाही असे खात्रीलायक रित्या समजले तर पर्यायांचा विचार केला जाईल कारण सध्या तरी सार्वत्रिकपणे हा पर्याय सोपा वाटतो, नोकरी वै करणार्या स्त्रियांना.
मी आशिर्वाद किंवा पिल्सबरी
मी आशिर्वाद किंवा पिल्सबरी वापरते. दोन्हीच्या पोळ्या, फुलके चांगले होतात. मैदा असेल अस वाटत नाही.
मुंबईत साबा आशिर्वाद वापरतात आणि पुण्यात आईकडे सकस.
मध्यंतरी इथे पार्ले चा आटा मिळाला होता... पार्लेच आहे, चांगल असाव म्हणुन २ किलो पाकिट आणुन बघितलं... पोळ्यांना बेक्कार.... धपाटे, पराठे यात वापरुन संपवल..
मी पाकृच्या बीबी वर पण
मी पाकृच्या बीबी वर पण विचारलंय (पण तिकडे फार कोणी नसतं की काय! :अओ:), इथेपण विचारते..
आळीवाचे १०-१२ लाडू करायचे तर प्रमाण काय घेऊ? आणि त्याची सगळी कृतीपण हवी आहे. इथे पाकृ लिहायची नसते बहुतेक :), त्यामुळे मला विपूत लिहिलं तरी चालेल.
प्रज्ञा इथे बघा -
प्रज्ञा इथे बघा - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/115677.html?1158036653
मळल्यावर किती वेळात काळी
मळल्यावर किती वेळात काळी पडते? लगेच का? की तो स्टोरेज बद्दल बोलतेयंस? कशी स्टोर करतेस मळलेली कणिक... >>> दक्षिणा, लगेच नाही काळी पडत पण एक दिवस फ्रिझमध्ये राहिली की काळी पडते. मी शक्यतोवर दोन दिवसांची कणिक मळून टप्परवेअरसारख्या डब्यात घालून फ्रिझमध्ये ठेवते. त्याहून जास्त ठेवली तर कुठलीही कणिक काळी पडते. डकोटा मिल्सची कणिक थोडी भरभरीतही असते. पोळ्या लगेच खाल्ल्या तर गरमगरम चांगल्या लागतात पण ठेवून नाही चांगल्या लागत.
अगो माझीपण कुठलीही कणीक
अगो
माझीपण कुठलीही कणीक फ्रीजमध्ये ठेवल्यावर २ दिवसात काळी पडायची. आई इथे आली होती तेव्हा तिने सांगितले की मी वापरतेय तो टपर वेअरचा डबा बर्यापैकी पातळ आहे. इथे मग मी टपर वेअर ऐवजी दुसरा अगदी जाड प्लास्टीकचा डबा आणला कणीक ठेवायला. आता नीट तेलाचा हात लावून ठेवली त्या डब्यात तर अजिबात काळी पडत नाही. तुझेही असेच काही होतेय का चेक कर.
ओह, असंही असतं का ! करुन
ओह, असंही असतं का ! करुन बघते मी. जास्त प्रमाणात कणिक भिजवून आयत्यावेळी गरम पोळ्या लाटणे सोयीचे पडते. बराच वेळ वाचतो. पण काळपट कणकेच्या खाववत नाहीत म्हणून खूप जास्तही भिजवून ठेवता येत नाही. टिपेबद्दल धन्यवाद रुनी
धन्यवाद मिनोती. या प्रमाणात
धन्यवाद मिनोती.
या प्रमाणात किती लाडू होतील ते कळत नाहिये, पण करून बघते आता.
Pages