१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
पांढरी बासुंदी हवी असेल तर
पांढरी बासुंदी हवी असेल तर आधी दुध तापवुन घ्यायचे.दुध वर आले की गॅस बंद करुन दुधावर झाकण ठेवायचे.म्हणजे साय धरणार नाही. मग थोड्या वेळाने दिनेशदा नी सांगितल्याप्रमाणे प्रखर आचेवर सतत ढवळत दुध आट्वायचे. १ लिटर दुध आटवायला साधारण २० मिनीटे लागतात.पातेल्याच्या बुडाशी छोटा चमचा किंवा झाकण घालायचे. पुर्वी नाणे घालण्याची पद्धत होती. ते हायजेनी वाट्त नाही म्हणुन मी हा बदल केला.
दूध आटवताना पूर्वी एक
दूध आटवताना पूर्वी एक चिनीमातीची चकती दूधात टाकत असत. साधी सपाट चकती, त्याला वर चकलीसारख्या वळ्या आणि एक छिद्र असे. त्याने दूध ऊतू जात नसे. आमच्याकडे होती ती चकती. पण नंतर कूठे दिसली नाही.
वाटीभरच खवा उरलाय. फ्रीजमध्ये
वाटीभरच खवा उरलाय. फ्रीजमध्ये ठेवलाय, चांगला राहील ना? चांगला असेल तर त्याचं काय करता येईल?
घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवून
घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवून डीप फ्रिजमध्ये ठेव आशू. पंजाबी भाज्यांमध्ये तो खवा घालता येईल उदा. मेथी मटर मलई किंवा कसल्या वड्या केल्यास तर घालता येईल उदा. मोहनथाळ.
किती दिवस राहू शकतो तो तसा?
किती दिवस राहू शकतो तो तसा? कारण मी काही झटाझटा उत्साहाने करणार्यातली नाहीय. विसरुनही जाईन कदाचित.
हाताचा स्पर्श जास्त होऊ देऊ
हाताचा स्पर्श जास्त होऊ देऊ नकोस आणि पाणी लागू देऊ नकोस. वापरायच्या आधी किंचीत तोंडात टाकून बघ, चव बदलली नसेल आणि रंग बदलला नसेल तरच वापर. आणि शक्यतो तो खवा लवकरात लवकर वापरून टाक. आवडत असेल तर नुसती पिठीसाखर (जेवढा खवा आहे तेवढी) मिसळ, केशर सिरप चार पाच थेंब घाल आणि सगळं नीट मिसळून पेढे वळ आणि ऑफिसला घेऊन जा, वाटीभर खव्याचे फारतर दहा पेढे होतील.
आशू, आठवडाभर तर आरामात राहावा
आशू, आठवडाभर तर आरामात राहावा माझ्यामते. पण मंजूने सांगितलेली रंग आणि चवीची टीप लक्षात ठेव. गणेशचतुर्थीच्या मोदकांसाठी त्या वीकेंडाला आणलेल्या खव्यापैकी उरलेला खवा त्यापुढच्या रविवारी मी शाही ग्रेव्हीवाली भाजी (खवा घातला म्हणून शाही! :फिदी:) करून संपवला. तेव्हातरी तो मस्तच होता चवीला.
उद्या कच्च्या फणसाची भाजी
उद्या कच्च्या फणसाची भाजी करणार आहे. घरात कच्चे शेंगदाणेच नाहीयेत. दुसर काही व्यंजन म्हणुन घालता येइल का? जर शेंगदाणे न धालताच भाजी केली तर बरी लागेल ना? मी ही भाजी प्रथमच करणार आहे.काही टिप्स?
सा. बाईंनी लसुण , मिरचीची फोड्नी करुन ,शेन्गदाणे,गुळ ,मिठ,भरपुर खोबरे घालुन करायचे अशी कृती सांगितलीय. त्यात गोडा मसाला/गरम मसाला घालतात का?
ऑर्किड, दाणे नसतील तर वाल,
ऑर्किड, दाणे नसतील तर वाल, ओले पावटे, मटार यापैकी काहीही घातलंस तरी चालेल. यापैकी काही नसेल तर नाही घातलंस तरी चालेल. मुख्य चव फणसाची... बाकी हे पदार्थ भर म्हणून घालतात. आम्ही मसाला घालत नाही.
थॅन्क्यु मंजू. सा. बाई एकदम
थॅन्क्यु मंजू. सा. बाई एकदम चविश्ट करतात ही भाजी. मला एवढा मोठा फणसाचा तुकडा मिळालाय. २ जणात खपवायचाय. :स्मितः
नमस्कार मंडळी, मला तातडीने
नमस्कार मंडळी,
मला तातडीने भारतात जावे लागणार आहे व मी तिथे महिनाभर रहाणार आहे. समस्या ही आहे की मी नुकतेच कांद्याची मोठी पिशवी घेतली आहे, तरी हे कांदे महीनाभर कसे टिकवावे हे कोणी सांगेल का? एक उपाय ऐकला तो कांदे कॅरॅमलाईझ करुन फ्रिझ करायचा. या शिवाय काही उपाय आहे का?
भाव उतरायला लागलेत आता
भाव उतरायला लागलेत आता कांद्याचे इथंही.
कांदे भारतात घेऊन ये.
कांदे भारतात घेऊन ये. तिकडच्या गिफ्ट्सपेक्षा कांद्यांचं मोठं स्वागत होईल इकडे

बरोब्बर पौर्णिमा
बरोब्बर पौर्णिमा
पौर्णिमा खरय गं. तिकडचे
पौर्णिमा
खरय गं. तिकडचे कांद्याचे भाव ऐकूनच डोळ्यात पाणी आले(ताँडाचे पळाले).
ते कांदे मैत्रिणीला द्यायचे
ते कांदे मैत्रिणीला द्यायचे होते त्याचे काय झाले?
भाजीसाठी कांदा चिरुन न घेता
भाजीसाठी कांदा चिरुन न घेता मिक्सरमधुन पेस्ट केला तर चालतो का? चवीत काहि फरक नाहि होत आणि सोप्पं पण पडतं. पण आपल्याकडे चिरुन वापरतात ,कधी पेस्ट वापरलेली बघितली नाहि.काहि खास कारण आहे का? मी सध्या direct पेस्टच वापरतेय २ दिवसांपासुन.
आभार मिनोती, मी चुकीने भजी
आभार मिनोती, मी चुकीने भजी वाचले होते (आमच्या परवाच्या भजीत आम्ही पेस्टच वापरली होती)
वेल, तसा भाजीच्या कृतीप्रमाणे ठरेल उभा, आडवा, बारीक चिरुन का किसून, वाटून वापरायचा तो.
अर्थातच चवीत फरक पडतो. दो प्याजा प्रकारात दोन प्रकारे कांदा वापरावा लागतो.
भानचा प्रश्न भाजीसाठी आहे ना?
भानचा प्रश्न भाजीसाठी आहे ना? भजीला कशाला कोण पेस्ट वापरेल?
परवा योगायोगाने लोणी करण्याची
परवा योगायोगाने लोणी करण्याची युक्ती मिळाली. आधी कुणी लिहीलेय का ते माहीत नाही.
कोणी करुन बघितले तर इथे जरुर लिहा.
दुकानात मिळणारे हेवी क्रीम कमी पॉवरच्या मिक्सीमध्ये १ मिनिटभर फिरवले, लोणी आणि बाकीचा दुधाचा भाग वेगळे होउन आले. मी खरंतर क्रीम केकवर घालण्यासाठी फेटायला घेतले होते, हात दुखायला लागला म्हणुन मिक्सरमध्ये फिरवले. आता थालीपीठाबरोबर लोणी खायला मिळणार
दुसरे म्हणजे हेच हेवी क्रीम लाकडी रवीने घुसळले तर अगदी हँड मिक्सरने केल्याप्रमाणे फेटले गेले, अजिबात पातळ झाले नाही. सॉफ्ट पीक्स आल्या, तसेच केकवर घालता आले. वेळ मात्र लागतो.
>>>भजीला कशाला कोण पेस्ट
>>>भजीला कशाला कोण पेस्ट वापरेल?<<<
का नाही? भजीत पेस्ट घालू नये असे आहे का? किती तो वरताणपणा व आपलेच खरं दाखवायचा प्रयास.
.
तुमचे जग लहान आहे कारण माणगावला किसून कांदा घतलेली भजी मिळतेच तसेच पेस्ट घातलेली भजी सुद्धा. तेवढी ऑर्डर देण्याआधी सांगावे लागते.
दिनेशदा, कांद्याची पेस्ट करुन
दिनेशदा, कांद्याची पेस्ट करुन त्यल मिरची कोथिंबीर आणि बेसन करुन नेहेमीप्रमणे भजी करायची का? नेहेमीच्या भजींपेक्षा छान लागतात का हा आपला शॉर्टकट आहे. बेसनात एकत्र करण्याआधी कांदा चिरुन धुवून घेतला तर भजी छान लागतात असे ऐकले आहे आणि करुन पण बघितले आहे.
अश्विनी, आम्ही पिकनीकला जी
अश्विनी, आम्ही पिकनीकला जी भजी केली होती, त्यावेळी कांद्याची पेस्ट करुन त्यात चण्याच्या डाळीचा कोरडा भरडा भिजवला होता (इथे असा भरडा तयार मिळतो.) त्याला अप्रतिम चव आली होती. आपल्याकडे जाडसर बेसन मिळते ते वापरता येईल.
अशा मिश्रणात मेथीची भाजी किंवा दुधीचा किस किंवा उकडलेल्या बटाट्याचा लगदा पण मिसळता येतो.
कांदा धुवून कधी वापरला नाही. अशी भजी बरीच सौम्य होत असतील ना ?
माझी एक पंजाबी मैत्रिण कांदा
माझी एक पंजाबी मैत्रिण कांदा किसून त्याची भजी (पकोडे) करते. खूप मस्त कुरकुरीत लागतात.
ज्ञाती, मस्त कल्पना
ज्ञाती, मस्त कल्पना सांगितलीस. परवा थालिपिठ केले होते तेव्हा खुप जाणवले लोण्याची कमी आणि आता तुझी कृती मिळाली.. मस्त. सावनी ला अनुमोदन, कांद्यच्या पेस्टातली भजी (किसुन पेस्टच होते) जास्त कुरकुरीत होतात हे खरे आहे, खाल्ली आहेत.
ज्ञाती, मस्त आयडिया आहे.
ज्ञाती, मस्त आयडिया आहे. रच्याकने, तु हे लोणी कढवुन पाहिलंस का?
मिनी, कढवून नाही पाहिले
मिनी, कढवून नाही पाहिले गं.
बाकी लोणी कितीही केले तरी असेच संपून जाईल, कढवायला शिल्लक राहणार नाही
माझे थिकन्ड क्रिम उरलेय
माझे थिकन्ड क्रिम उरलेय ,त्याची एक्सपायरी डेट ८ तारखेला संपनार आहे . मि उद्या दुपारी १० दिवसांसाठी बाहेर चाललेय मला त्याचे सोपे असे काय करता येईल? डीप फ्रिजर मध्ये राहील का?
लवकर सांगा प्लिज.
ज्योति, शक्य तेवढे आज फ़्रूट
ज्योति, शक्य तेवढे आज फ़्रूट सलाड मधे वगैरे वापरुन संपवून टाक.
एक्स्पायरी डेटला रात्री बारा वाजता पदार्थ एकदम खराब होतो असे नाही,
पण मनात शंका असेल तर तो न खाणेच योग्य.
डिप फ़्रीझरमधे पण नकोच.
थँक्स दिनेशदा. मला वाट्लेच
थँक्स दिनेशदा.
मला वाट्लेच होते तुम्हि मला येथे नक्की भेटाल ते. तुम्हाला मेलच करनार होते आधी.
माझे फ्रुट्स पन संपतील मग.:)
Pages