युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावली, भारतात तर त्या पातळ पॉलिथीनच्या पिशव्यांवर कायदेशीर बंदिच आहे. मी आमच्याच कंपनीत तयार झालेले फूड ग्रेड पॉलिथीन वापरतो.

प्रज्ञा, शेंगदाणे भाजताना त्यावर झाकण किंवा पेपर नॅपकीन ठेवला तर चांगले. कधी कधी ते उडतात.
मी मिठाच्या पाण्यात भिजवून भाजत असे. छान खारे दाणे मिळतात. सध्या तो प्रकार करत नाही, कारण आमच्याकडे भाजलेले दाणे, रस्तोरस्ती मिळतात. न भाजलेलेच शोधावे लागतत.

मी मिठाच्या पाण्यात भिजवून भाजत असे. छान खारे दाणे मिळतात. >>> किती वेळ दाणे भिजवायचात तुम्ही? आणि साधारण मिठ किती घ्यायचे? माझा मिठाचा अंदाज चुकतो. Sad बरेचदा मिठ कमी पडते.

अर्धा किलो शेंगदाण्याला अर्धा चहाचा चमचा एवढेच मिठ, पण मला फार खारे पदार्थ आवडत नाहीत. तहान लागते त्याने. एवढे प्रमाण ठेवून बघा, कमी वाटले तर पुढच्यावेळी वाढवता येईल.

मी २ चमचे पाण्यात १ चमचे मीठ टाकून ठेवते. मग दाणे खरपूस भाजते.अन छान खरपूस झाले की हे कॉंसंट्रेटेड मीठाचे पाणी त्यावर ओतते. क्षणात कोरडे होतात दाणे. हवे तर त्यातच तिखट अन चाट मसालाही टाकायचा... यम्मी Happy

अवल जून्या पूस्तकात पण दाणे खारवण्याची हिच रित आहे. पण का कुणास ठाऊक, खमंग भाजलेल्या दाण्यावर पाणी शिंपडायला, उगाचच घाबरायला होते.

दिनेशदा, अवल... जर दाणे भट्टीत भाजून मिळाले तर त्यांना किंचित खारटसर अशी चव येते (का, ते माहित नाही!) पण असे दाणे भाजून मिळत असतील तर खार्‍या दाण्यांना पर्याय म्हणून हरकत नसावी. अतिशय खमंग चव लागते ह्या दाण्यांची!

शहाळ्याचं गोड पाणी अर्धी वाटी घेऊन त्यात अर्धा चमचा मीठ विरघळवून घ्यायचं. त्यात कच्चे शेंगदाणे मुरवायचे (बरोब्बर अर्धा किलो शेंगदाणे बसतात या प्रमाणात) आणि अर्ध्या तासाने खमंग भाजून घ्यायचे, जमतील सालं काढायची, ताटलीत घ्यायचे आणि गट्टम करायचे, बरोब्बर पाच मिनिटात ताटली रीकामी होते. Happy

मंजूडी, आयडीया सूचलीच कशी हि ?
अकु भट्टी म्हणजे चण्याची भट्टी असते ती ना ? त्यातला वाळूत मीठाचा अंश असणार बहुतेक. माझ्या मावशीची आहे भट्टी, देवरुखला. तिच्याकडून येतात नेहमी. पण इथे कुठे मिळणार ?

मंजूडी, आयडीया सूचलीच कशी हि ?>>>

नवरा गुजराथेतून येताना नारळाच्या पाण्याच्या स्वादातले खारे शेंगदाणे नेहमी घेऊन येतो. ते खाऊन घरी प्रयोग करून पाहिले, बरेच वेळा बिघडवून झाल्यावर प्रमाण आणि चव फिट्ट जमले.

वा, गुजराथेत असे दाणे मिळतात हेच माहित नव्हतं. नवनवे स्वाद शोधण्यात ते लोक चांगलेच पारंगत असतात.

@दिनेशदा
हो, त्या भट्टीत चणे-फुटाणे-शेंगदाणे-लाह्या-बॉबीज वगैरे सर्व प्रकार भाजून मिळतात. पुण्यात मंडईच्या मागच्या बाजूला आहे. हम्म, तुम्ही म्हणताय तसा तिथल्या वाळूतच मिठाचा अंश असणार!
@मंजूडी
लै भारी! वडील जाणारेत गुजरात दौर्‍याला.... त्यांना आता सांगतेच आणायला हा प्रकार! Happy

हे शहाळ्याच्या चवीचे खारे दाणे खरंच भारी लागतात. बडोद्याला आमच्या घराच्या खालीच "श्रीजी "म्हणून एक फरसाणचं दुकान आहे. त्याच्याकडे मिळतो हा आयटम. अजूनही बर्याच वेगवेगळ्या फ्लेवरचे दाणे मिळतात त्याच्याकडे. मुलुंड मधे ह्यावेळी गेले होते तेव्हा हेच श्रीजी कडचे दाणे एका दुकानात दिसले. आणी जणू काही माझ्याच घरचं प्रॉड्क्ट असल्या सारखं भरून बिरून आलं.

दिनेश , नायजेरियातले भाजके दाणे पण मस्त असतात की . लेगोसहून कोणी येणारे असले की मी नेहमी मागवते.

तेच तर म्हणतोय. आयते मिळत असताना घरी कशाला भाजायचे. तिथे केळी आणि शेंगदाणे हे आमचे (ऑफिसमधले) मधल्या वेळचे खाणे असायचे. संध्याकाळी अननस.
केनयात, हॅझलनट्स, केळी, दाणे, गोड पॅशनफ्रूट्स, जांभळे, लिची यांचे अधूनमधून सेवन होत असते.

दिनेशदा,
आपण रवा आणि मैदा कसा बनवतात ते सान्गितल्यापासून काही प्रश्न पडले आहेत. एकुणच माझी समजुत होती की रवा हा जास्त सकस आहे मैद्यापेक्शा. पण आता शिरा आणि केक दोन्ही पहीले तर अन्डे घातल्यामुळे केक जास्त सकस आहे असे म्हणावे लागेल. बाकि तुप आणि साखर दोन्हित असते. (आणि केकला आपण सकस अन्न म्हणत नाही. junk food च समजतो.) केवळ manufacturing process समजल्यामुळे मोठा खुलासा झाला. धन्यवाद.

मंजूडी, माहीत नव्हता हा प्रकार.

इथे मिळतात असे बरेच फ्लेवरवाले-
http://www.planters.com/varieties/peanuts.aspx

यातले हनी रोस्टेड आणि हनी रोस्टेड चिपोटले मस्त लागतात!

(ध्वने, तुझी रेकॉर्ड अडकली आहे. दुसरे काहीतरी बोल. को.को. नको, गोल्ड स्पॉट आण!)

सुमेधा, आताच्या काळात पूर्वीसारखे चक्कीवरुन गहू दळून आणणे शक्यच नाही, आणि गहू आपल्या आहारातून वगळताही यायचा नाही. म्हणून पराठे, भाजी घातलेला उपमा असे प्रकार करुन संयोग केले पाहिजेत. केकमधेही कॅरट केक, बनाना केक असले प्रकार जास्त चांगले.

आणखी एक सहज माहिती असावी म्हणून सांगतो. तयार पिठात साधारण १४ ते १६ टक्के पाणी असते. जे गहू प्रोसेस केले जातात, त्यात तेवढ्या प्रमाणात पाणी नसले तर ते घालतात. क्वचित त्यात जास्तीची जीवनसत्वे मिसळली जातात. तयार पिठ कूठल्या उत्पादनासाठी वापरायचे आहे त्यावर कूठल्या जातीचा गहू मिसळायचा ते ठरते. हार्ड रेड विंटर (HRW) ड्यूरुम (DURUM) असे अनेक प्रकारचे गहू मिसळले जातात. त्यामूळे जर शक्य असेल तर घरात चपात्या करताना, बेसन, नाचणी, उडीद अशी अनेक पिठे मिसळून चव बदलता येते.

आपण ब्राऊन ब्रेड असे लेबल दिसले कि डोळे झाकून घेतो, पण त्यातले घटक बघितले तर कळून चूकेल कि त्याचा ब्राऊन रंग खूपदा कॅरेमलमूळे आलेला असतो. त्यामूळे होलमील, मल्टीग्रेन असले ब्रेड जास्त चांगले. पावाला वरुन लावलेले ग्रेन्स पोटात जातील असे बघितले पाहिजे.

मग पिझ्झा आणि भाज्यान्चा उपमा पण एका लेव्हल ला येतील. आणि आपण मैदा बेस मुळे पिझ्झा ला जन्क फूड म्हणतो आणि उपम्याला उगिच वरचा दर्जा देतो. थोड्केमे क्या....रवा = मैदा. त्यामुळे गव्हाचा सालासकट दलिया/रवा चक्किवर काढुन आणणे आणि तो रवा म्हणुन वापरणे.

मंजुडी, अर्धि वाटी पाण्यात अर्धा किलो दाणे बसतात , खरच ??????? एव्हढे ??????>>>>>>

साक्षी१, कडधान्य भिजत घालतो तसे शेंगदाणे नाही भिजवायचे. ते तुम्ही असं वाचा : अर्धी वाटी शहाळ्याचं गोड पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा मीठ विरघळवायचं आणि ते पाणी अर्धा किलो शेंगदाण्यावर घालून ते मिश्रण ढवळून चांगलं एकत्र करायचं. मग अर्ध्या तासाने दाणे खमंग भाजायचे.

सुमेधा. आता जो पिझ्झा प्रचलित आहे ते अमेरिकन व्हर्जन. मूळ इतालियन प्रकारात अगदी पातळ बेस आणि त्यावर भरपूर टॉपिंग्ज असतात. शिवाय त्यांच्या आहारात भरपूर लसुण आणि ऑलिव्ह ऑईल असते. फळे असतात. द्राक्षांच्या बियांचा अंश असलेली वाईन असते. ते सगळे चांगलेच की.

कुणी चाखलेय का ते माहीत नाही. पण पुर्वी गव्हाचा जात्यावर रवा काढून त्याच्या सांज्याच्या पोळ्या केल्या जात. किंवा तो रवा भिजवून कुटून त्याच्या शेवया, कानवले, पुरणपोळ्या केल्या जात. त्या पांढर्‍याशुभ्र, मऊसूत, तोंडात विरघळणार्‍या वगैरे नसत. पण खूपच सकस असत.

मी आणखी एका ठिकाणी वाचल्याप्रमाणे, माहाराष्ट्राच्या मूख्य भागात, गहू खाण्याची प्रथाच नव्हती. गहू आला उत्तरेकडून, आपण आपले भाकरी / चटणीवालेच.

मंजिरी, तुझ्या रेसिपीने केले ग आज दाणे. एकदम मस्त. मीठ्पण अगदी माफक आणि बरोबर एक पाऊंड दाणे बसले माझ्या कडच्या अर्ध्या वाटी शहाळ्याच्या पाण्यात. एकदम करेक्ट मापं आहेत. मी दाणे मायक्रोवेव्हमध्येच भाजले. रेसिपीबद्दल धन्यवाद.

पण ते कॅनमधल पाणी साखर घालुन गोडमिट्ट केलेल असतं अगदी... इथे मिळत ते तरी तस असतं...
तु तेच वापरलस का?

Pages