आजचा आवडता मेनु
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
27
आमच्या इथे सिझनमध्ये जेमतेम एकदा दोनदा स्नो पडतो. ह्या खेपेला जरा जास्तच झाला. आज तर चक्क ६ इंच. ऑफिसमधून लवकर यायला मिळालं मग येता येताच थंडीतून घरी गेल्यावर काय करावं. म्हणजे खायला काय कराव असाच विचार केला जातो. ( म्हणूनच तर पार्ले बीबीवर रुळले नसेन न?) तर हा आजचा बेत.
वहिनीने घरी करून पाठवलेल्या ताज्या भाजाणीची थालीपीठं आणि तिनेच करून पाठवेला छुंदा. दोन्हीही गोष्टी सासूकडे शिकल्याचं अगदी कौतुकाने सांगते. खरच तिच्या खुपशा गोष्टींना अगदी आईच्या हाताची चव आहे. मी भाजाणी, लोणची वगैरे आईकडून शिकलेच नाही. आधी आई पाठवायची. आता वहिनीपण तेवढ्याच प्रेमाने आईचा वारसा चालवते आहे.
विषय:
प्रकार:
शेअर करा
वा वा आर्च, अगदी मस्त दिसतंय
वा वा आर्च, अगदी मस्त दिसतंय थालिपीठ.
आमच्याकडे, म्हणजे सोलापूरसाईडला भाजणीपेक्षा ज्वारीच्या पिठाचं थालिपीठ करतात. ज्वारीच्या पिठात अगदी थोडं डाळीचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, कच्चा मसाला, मीठ तिखट घालून थालिपीठ लावायचं...
तुम्ही नशीबवन आहात. इथे
तुम्ही नशीबवन आहात.
इथे (जेवण) करायची मारामारी त्यात मराठी मेनु बाहेर मिळायची मारामारी... आहे हे असे आहे.
वा! मस्तच बेत , आर्च. त्यातून
वा! मस्तच बेत , आर्च. त्यातून खास माहेरचा मेवा.. त्याची चव खासच असणार.
आर्च, मस्तच दिसतंय थालिपीठ.
आर्च, मस्तच दिसतंय थालिपीठ. बरोबर उसळी मिरची अगदी शोभली असती.
ध्वनी, तुम्ही सिंगापूरला आहात ना, मग तुम्हांला काय कमी!!!
मस्तच! (फोटो का डकवलास? आर्च,
मस्तच!
(फोटो का डकवलास? आर्च, तू दुष्ट आहेस! :))
सायो, माझ्या माहितीत(तरी)
सायो, माझ्या माहितीत(तरी) सिंगापूरला घरगुती पद्धतीने बनवलेलं मराठी जेवण कुठेच चांगले मिळत नाही, तुम्हाला माहित असेल तर सांगा मला. माझी सोय होइल व तुम्हाला पुण्य लागेल.
पुण्य नको हो, पुनर्जन्म
पुण्य नको हो, पुनर्जन्म मिळेल.
ते जेवणाचं विचारुन सांगेन. माझी मैत्रिण बरीच वर्ष होती तिथे.
आर्च.. तोंपासु.. लक्कीयेस
आर्च.. तोंपासु.. लक्कीयेस बाबा..
भाजणीचं थालीपीठ तर अतिशय दुर्मिळ गोष्ट झालीये गं..
आर्च मस्त बेत आहे. सिंगापूरला
आर्च मस्त बेत आहे.
सिंगापूरला घरगुती पद्धतीने बनवलेलं मराठी जेवण कुठेच चांगले मिळत नाही, >>> मिळत की बी कडे .
मिळत की बी कडे .>>>>
मिळत की बी कडे .>>>>
यम्मी मिळत की बी कडे<<
यम्मी
मिळत की बी कडे<<
बी, नको रे बाबा, भरपूर प्रश्ण
बी, नको रे बाबा, भरपूर प्रश्ण होतील आधी.
आणि सायो तुम्हाला कशाला हवाय पुर्नजन्म? ह्या जन्मात काय करायचे ते करा.. पुढे (जन्म)कोणता मिळेल कोणी सांगावे... मांजर, बदक,उंदीर...
बरे आर्चचे हे रंगीबेरंगी पान आहे विसरूया नको. तेव्हा पुरे.
आर्च, त्या थालिपिठावर
आर्च, त्या थालिपिठावर लोण्याचा गोळा मुद्दामच ठेवला नाहिस ना? लब्बाड्,कॅलरी कॉन्शस?? हलकेच घे हो.
अहाहा, कसलं तोंपासू दिसतंय ते
अहाहा, कसलं तोंपासू दिसतंय ते थालीपिठ. पण थालीपिठ म्हटलं की, लोण्याचा गोळा आणि उसळी मिरची मस्ट, निदान आमच्या कोकणात तरी.
आर्च मस्तच. रच्याकने, ध्वनी,
आर्च मस्तच.
रच्याकने, ध्वनी, सिंगापोरला दातार म्हणुन आहेत त्यांच्याकडे मिळतो मराठी मेन्यु चांगला.
आर्च, सुंदर केलंयस की अगदी
आर्च, सुंदर केलंयस की अगदी सुबक. आणि तोंपासु..
उसळी मिरची काय आहे?
उसळी मिरची काय आहे?
आर्च, मस्त जमलाय बेत.
आर्च, मस्त जमलाय बेत.
आर्च मस्त आहे. त्या बर्फातून
आर्च मस्त आहे. त्या बर्फातून येऊन अगदी म्हणजे आत्मा तॄप्त झाला असेल. तुला हैद्राबादी मोत्यांचा सेट.
भाजाणी प्रमाण सांग की.
मस्त फोटो एकदम. इतकी पातळ अन
मस्त फोटो एकदम. इतकी पातळ अन स्मूथ कशी काय लावतेस थालिपीठं ?
त्यात काय आहे. तवा उलटा करुन
त्यात काय आहे. तवा उलटा करुन त्यावर थापायच. मग लाटणीने लाटायच. हा.का. ना.का.
हो की नाही आर्च.
खुपच मस्त आर्च!
खुपच मस्त आर्च!
भाई, पुढच्या वेळी तुम्ही आणा
भाई, पुढच्या वेळी तुम्ही आणा अगदी अशीच दिसणारी थालिपीठं करुन.
( थालीपीठाची मघाशीच आठवण झाली
( थालीपीठाची मघाशीच आठवण झाली होती.. शेवटी नाइलाज म्हणून ठेपला खाऊन आलो... )
मस्त बेत!
मस्त बेत!
आर्च, सुरेख दिसत आहे थालिपीठ
आर्च, सुरेख दिसत आहे थालिपीठ
तों पा सु..
तों पा सु..