आजचा आवडता मेनु

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

आमच्या इथे सिझनमध्ये जेमतेम एकदा दोनदा स्नो पडतो. ह्या खेपेला जरा जास्तच झाला. आज तर चक्क ६ इंच. ऑफिसमधून लवकर यायला मिळालं मग येता येताच थंडीतून घरी गेल्यावर काय करावं. म्हणजे खायला काय कराव असाच विचार केला जातो. ( म्हणूनच तर पार्ले बीबीवर रुळले नसेन न?) तर हा आजचा बेत.

वहिनीने घरी करून पाठवलेल्या ताज्या भाजाणीची थालीपीठं आणि तिनेच करून पाठवेला छुंदा. दोन्हीही गोष्टी सासूकडे शिकल्याचं अगदी कौतुकाने सांगते. खरच तिच्या खुपशा गोष्टींना अगदी आईच्या हाताची चव आहे. मी भाजाणी, लोणची वगैरे आईकडून शिकलेच नाही. आधी आई पाठवायची. आता वहिनीपण तेवढ्याच प्रेमाने आईचा वारसा चालवते आहे.

Thalipeeth.jpg

विषय: 
प्रकार: 

वा वा आर्च, अगदी मस्त दिसतंय थालिपीठ. Happy
आमच्याकडे, म्हणजे सोलापूरसाईडला भाजणीपेक्षा ज्वारीच्या पिठाचं थालिपीठ करतात. ज्वारीच्या पिठात अगदी थोडं डाळीचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, कच्चा मसाला, मीठ तिखट घालून थालिपीठ लावायचं...

तुम्ही नशीबवन आहात.
इथे (जेवण) करायची मारामारी त्यात मराठी मेनु बाहेर मिळायची मारामारी... आहे हे असे आहे. Happy

आर्च, मस्तच दिसतंय थालिपीठ. बरोबर उसळी मिरची अगदी शोभली असती.

ध्वनी, तुम्ही सिंगापूरला आहात ना, मग तुम्हांला काय कमी!!! Uhoh

सायो, माझ्या माहितीत(तरी) सिंगापूरला घरगुती पद्धतीने बनवलेलं मराठी जेवण कुठेच चांगले मिळत नाही, तुम्हाला माहित असेल तर सांगा मला. माझी सोय होइल व तुम्हाला पुण्य लागेल. Happy

पुण्य नको हो, पुनर्जन्म मिळेल. Proud

ते जेवणाचं विचारुन सांगेन. माझी मैत्रिण बरीच वर्ष होती तिथे.

बी, नको रे बाबा, भरपूर प्रश्ण होतील आधी.
आणि सायो तुम्हाला कशाला हवाय पुर्नजन्म? ह्या जन्मात काय करायचे ते करा.. पुढे (जन्म)कोणता मिळेल कोणी सांगावे... मांजर, बदक,उंदीर... Wink

बरे आर्चचे हे रंगीबेरंगी पान आहे विसरूया नको. तेव्हा पुरे.

आर्च, त्या थालिपिठावर लोण्याचा गोळा मुद्दामच ठेवला नाहिस ना? लब्बाड्,कॅलरी कॉन्शस?? Lol हलकेच घे हो. Happy

अहाहा, कसलं तोंपासू दिसतंय ते थालीपिठ. पण थालीपिठ म्हटलं की, लोण्याचा गोळा आणि उसळी मिरची मस्ट, निदान आमच्या कोकणात तरी.

आर्च मस्त आहे. त्या बर्फातून येऊन अगदी म्हणजे आत्मा तॄप्त झाला असेल. तुला हैद्राबादी मोत्यांचा सेट.
भाजाणी प्रमाण सांग की.