विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्रिशंकू, विलो लाईव्ह दाखवते. $१२९ त्यात पुढील सहा महिने फ्री !

विलो शिवाय
1. स्काय स्पोर्टस पण $७९ मध्ये दाखवणार आहे. असे त्यांचे इ मेल आले पण अजून विकत घेता येत नाहीये.
2.http://www.liverel.com/ पण स्वस्तात दाखवते.
३. extracover.net वर सर्व मॅच फ्री दिसतील कारण ते निओ थोड्या डिले ने दाखवतात व निओ क्रिकेट भारतात थेट प्रक्षेपण करते. पण नेमके बफरिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो.

पण विलो ह्या सर्वात उच्च आहे.

धन्यवाद केदार.

माझ्याकडे केबल/डिश नसेल तर टीव्हीवर मॅचेस कशा दिसतात?
कंप्युटरला टीव्ही जोडावा लागतो का की सेटटॉप बॉक्स असते विलोटीव्हीची?

बेसिक प्रश्न आहेत पण मी हे कधी केलेलं नाहीये म्हणून विचारतोय.

विलो नेटवरच दिसते. सेटटॉप बॉक्स नसतो. शिवाय कुठल्याही फोनवर पण पाहता येते.

कंप्युटरला टीव्ही कसा जोडायचा?

१. कम्पुटरवर S video आउटपुट असेल तर S video केबल आणि ऑडिओ आउटपुट अश्या दोन केबल घेऊन.
२. HDMI असेल तर त्याने आवाज व चित्र दोन्ही दिसतील.
३. Video input असेल तर ती केबल आणि ऑडिओ आउटपुट अश्या दोन केबल घेऊन.

सोपं आहे. Happy

केदार,

कंप्युटरला टीव्ही कसा जोडायचा हे माहित आहे Wink
माझा प्रश्न विलो टीव्ही चे प्रक्षेपण टीव्हीवर दिसण्याकरता काय करावे लागते केबल/सॅटेलाइट नसेल तर असा होता.
त्याचे उत्तर मिळाले. (कंप्युटरला टीव्ही जोडून).

धन्यवाद.

ईडन गार्डन्स कडून उद्घाटनाचा सामना काढून घेतला. स्टेडियमचे काम अपूर्ण. वानखेडेला १५ दिवसांची मुदतवाढ.

विलो नेटवर तसेच डिश आणि डायरेक्ट टीव्ही वर सुध्धा उपलब्ध आहे. जर का नेटवरच पाहायचं असेल तर टीव्हीएनस्पोर्ट्स.कॉम वर $४० मध्ये विलोच्याच दर्जाचं पॅकेज उपलब्ध आहे.

तशा मोफत लिंक्स सुद्दधा असतात पण दर्जा आणि विश्वासार्हता चांगली नसते. व्हायरस येण्याचे चान्सेस असतात. गेल्या वर्ल्ड कपला मी माझा पीसी २-३ वेळा फॉर्मॅट केला होता.

cric7deal coupon code वापरलात तर $५ सूट आहे. मी घेतले आहे, पण cric7 वर सध्या बफरिन्ग होतय. होपफुली विश्वच्षकाच्या दरम्यान होणार नाही.

प्रवीणकुमार कोपराच्या दुखापतीमुळे २०११ च्या विश्वचषकातून बाहेर पडल्याची बातमी ऐकली. त्याच्याऐवजी श्रीसंथ आत येणार आहे. हा आपल्याला जबरदस्त धक्का आहे. प्रवीणकुमार हा बर्‍यापैकी फलंदाजीही करू शकतो. आपल्याकडे झहीर, हरभजन व प्रवीणकुमार असे तीनच बळी मिळविणारे गोलंदाज आहेत. बाकीच्यांची गोलंदाजी सुमार आहे. तीनातला एक गेल्यावर आधीच दुबळी असणारी गोलंदाजी अजूनच दुबळी झाली आहे.

<<ऑस्ट्रेलिया संघातून माइक हसी आणि हॉरिट्झ दुखापतीमुळे बाहेर.>> आपल्या उपखंडात हे दोघेही कोणत्याही विरुद्ध संघाला डोकेदुखी ठरूं शकले असते !

TVN Sports चा माझा अनुभव काही फारसा चांगला नाही. buffering चा त्रास होतो खुप. आणि पुर्ण सामना पुन्हा (On Demand)नाही दाखवत(बहुतेक). पण Willow TV चे package बरेच महाग आहे. पण reliable आहे. मी Willow TV च घेइन बहुधा.

कॉमकास्टने निओ क्रिकेट चॅनेलचे जे प्रक्षेपण(अमेरिकेत) चालू केले आहे त्यावर World Cup च्या मॅचेस दिसणार आहेत का?

नीओ चे मलाही माहीत नाही. विलो वर आत्तापर्यंत कधीच प्रॉब्लेम वाटला नाही. कधीकधी थोडे बफरिंग होते पण लगेच चालू होते.

दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला.
इडन गार्डन्सने उद्घाटनाचा सामना गमवला असला, तरी पुढले तीन सामने राखलेत.
वानखेडे स्टेडियममध्ये सामान्य प्रेक्षकांसाठी अत्यंत कमी जागा.
कॅमेरे मैदानाच्या दिशेने न लावता, प्रेक्षकांकडेच लावले जातील बहुधा.

हे मिडियावाले फार हाईप करतायत....
आत्तापासूनच असा जल्लोष चाललाय.... जणू वल्डकप आपण जिंकलेलाच आहे.... मॅचेस खेळण्याची फॉरमॅलिटी तेव्हढी राहीलीय!

दरवेळेला वल्डकप आला की ८३ च्या संघातल्या खेळाडूंना पुन्हा बरे दिवस येतात Happy

>>> ऑस्ट्रेलिया संघातून माइक हसी आणि हॉरिट्झ दुखापतीमुळे बाहेर.

हसी हा मॅचफिनिशर व मॅचविनर खेळाडू आहे. तो गेल्यामुळे ओसीजना मोठा धक्का बसलेला असणार. त्याचा हा शेवटचाच वर्ल्डकप होता. दुखापतीमुळे त्याची संधी गेली.

एक निरिक्षण -

भारताचा १९९९ चा कप्तान (अझरूद्दीन) २००३ मध्ये संघात नव्हता.
भारताचा २००३ चा कप्तान (गांगुली) २००७ मध्ये संघात होता पण त्याने कप्तानपद गमाविले होते.
भारताचा २००७ चा कप्तान (द्रविड) २०११ मध्ये संघात नाही.
भारताचा २०११ चा कप्तान (धोनी) २०१५ मध्ये कुठे असेल?

>>>आत्तापासूनच असा जल्लोष चाललाय.... जणू वल्डकप आपण जिंकलेलाच आहे.... मॅचेस खेळण्याची फॉरमॅलिटी तेव्हढी राहीलीय!>>>
एक सामना हरायची देरी आहे फक्त, तेवढ्याच उत्साहानी झोडपायालाही पुढे धावतील हि लोक Happy

>>>दरवेळेला वल्डकप आला की ८३ च्या संघातल्या खेळाडूंना पुन्हा बरे दिवस येतात >>>
पोळ्याच्या बैलांसारखे .... lol

मास्तुरे,

सॉल्लिड निरीक्षण आहे..
धोणी आत्ताच संघाच्या बाहेर असायला हवा खरं तर.. Happy पण नेमकीच विश्वचषक आल्याने आणि तो कर्णधार असल्याने तसला निर्णय घेता येणार नाही.
२०१५ मध्ये- साहेब, सेहवाग, झहीर, भज्जी, धोणी (वयापरत्वे किंव्वा ईतर कारणे) संघाबाहेर असतील असा माझा अंदाज आहे. सध्ध्या भारतीय संघाचा सुवर्णकाळ चालू आहे (चार वर्षापूर्वी कांगारूंचा होता तसाच)- चार वर्षांनी "मंदी" आली तर आश्चर्य वाटायला नको.

२००७ च्या संघात गांगुली होता.
ICC World Cup - 8th match, Group B

Bangladesh v India

Bangladesh won by 5 wickets (with 9 balls remaining)
ODI no. 2538 | 2006/07 season
Played at Queen's Park Oval, Port of Spain, Trinidad (neutral venue)
17 March 2007 (50-over match)

India innings (50 overs maximum) R M B 4s 6s SR
SC Ganguly c Abdur Razzak b Mohammad Rafique 66 178 129 4 0 51.16

मन्दार,

चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. माझी अशी समजूत होती की २००५ मध्ये चॅपेल गुरूजींशी झालेल्या मतभेदानंतर गांगुलीला वन्डेच्या संघातून डच्चू दिला होता. आताच त्याचे स्टॅटिस्टिक्स पाहिले. तो २००७ च्या वर्ल्डकपमधले भारताचे तीनही सामने खेळला (६६, ८९ आणि ७). तो भारतातर्फे शेवटचा सामना नोव्हेंबर २००७ मध्ये खेळला.

वरील पोस्टमध्ये चुकीची दुरुस्ती केलेली आहे.

२००३ च्या विश्वचषकात सचिन्-सेहवाग ओपनिंगला यायचे. ३/४ या क्रमांकावर गांगुली/कैफ, ५/६ व्या क्रमांकावर युवराज्/द्रविड असायचे. नंतर दिनेश मोंगिया यायचा.

२००७ च्या विश्वचषकात भारताची काहीतरी विचित्र बॅटिंग ऑर्डर होती (चॅपेल गुरूजींचे डावपेच).

बांगलाविरूध्द सेहवागबरोबर गांगुली ओपनिंगला आला होता, उथप्पा ३ र्‍या क्रमांकावर, सचिन ४ था तर द्रविड ५ व्या क्रमांकावर आला होता.

श्रीलंकेविरूध्द उथप्पा व गांगुली ओपनिंगला होते, सेहवाग ३ रा, सचिन ४ था तर द्रविड ५ वा होता.

हे काय? २००७ आणि २०१५ बद्दल का बोलताहेत सगळे?

स्टार स्पोर्ट्सवर सध्या १९८३ च्या वर्ल्ड कपमधले सामने दाखवताहेत.

एकच दळण :d

दुसरं नाहीचे भारतात दाखवण्यासारखं.. ऑस्ट्रेलियात दाखवायला बरीच दळणं आहेत.. पण सध्या त्यांची अवस्था फार बरी नाहीये.. त्यामुळे ते काय दाखवणार नाहीत.

Pages