१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
कुठला ब्रँड वापरला आर्च? तो
कुठला ब्रँड वापरला आर्च? तो "व्हिटा कोको" म्हणून एक येतो तो बरा असतो. फार गोड नसतं ते पाणी.
भारतात श्रीजल नावाचे सॅशे
भारतात श्रीजल नावाचे सॅशे मिळतात नारळपाण्याचे. पावडर असते त्यात. छान चव असते त्याची.
प्रॅडी, मी FOCO ब्रँड वापरला.
प्रॅडी, मी FOCO ब्रँड वापरला. १८ औंसाच्या कॅनमध्ये ८० कॅलरीज असतात.
हम्म... बघते मी इथल्या
हम्म... बघते मी इथल्या चपट्यांच्या दुकानात दुसरा कुठला ब्रँड मिळतोय का ते....
कोबी चिरलाय , पण एक प्रकार
कोबी चिरलाय , पण एक प्रकार उग्र वास येतोय. काय करु?
त्या चिरलेल्या कोबीचं काय
त्या चिरलेल्या कोबीचं काय करायचंय? भाजी, पराठे, कोशिंबीर?
भाजी , पण वासामुळे धिर होत
भाजी , पण वासामुळे धिर होत नाहीये. काय करु?
उग्र म्हणजे कोबीला येतो तसाच
उग्र म्हणजे कोबीला येतो तसाच पण उग्र असेल तर मंजूडी ने सुचवलेले पदार्थ करता येतील. नुसताच शिजवला तर आणखी उग्र वास येईल. पण जर काळा / तपकिरी पडला असेल तर वापरु नये.
भाजी करताना फोडणीत आल्याचा
भाजी करताना फोडणीत आल्याचा किस टाका.. थोडं दूध घालून भाजी शिजवा नेहमीप्रमाणे.
नाही दिनेशदा काळा/तपकिरी नाही
नाही दिनेशदा काळा/तपकिरी नाही पडलेला.
ओके आल्याचा किस टाकुन करते
धन्स
सुजाता चा मल्टी ग्रेन आटा
सुजाता चा मल्टी ग्रेन आटा कोणी वापरून बघितला आहे का? चांगला आहे का? पोळ्या कशा होतात?
मी इथे पाचकळशी मसाला पाहीला
मी इथे पाचकळशी मसाला पाहीला पण कसा बनवाय्चा ते दिलेले नाही तर कुणाला माहीत असल्यास कृपया योजाटा.
पाचकळशी मसाला म्हणजेच पांचाळांचा मसाला का?
धन्यवाद
दिपाली
कोबीचा वास थोडा उग्रच असतो.
कोबीचा वास थोडा उग्रच असतो. भाजी करुन मला तरी तेवढा जाणवत नाही. आवडती आहे म्हणून असेल कदाचित.
सानिका, मी आजच मल्टीग्रेन आटा
सानिका, मी आजच मल्टीग्रेन आटा आणलाय. पोळ्या करून सांगते तुला कशा होतात
कढी हमखास फुटत असेल तर काय करायचं? तुप-जिर्याची फोडणी उकळी फुटत असताना घालते म्हणून होते का असे? आणि कढी दाट होण्यासाठी काही टीप्स?
तवकील म्हणजे काय? आणि
तवकील म्हणजे काय? आणि हिंदी/गुजराथी/इंग्रजीत त्याला काय म्हणतात?
थोडं अर्जंट हवं होतं.
तवकील म्हणजे आरारूट.
तवकील म्हणजे आरारूट.
धन्स आर्च. आत आणते पटकन जाऊन.
धन्स आर्च. आत आणते पटकन जाऊन.
अंजली, कढी उकळत ठेवल्यावर सतत
अंजली, कढी उकळत ठेवल्यावर सतत ढवळत उभं रहावं लागतं. जरा ५ मिनिटं जरी बाजूला गेलीस तरी फुटलीच म्हणून समज.
मी दही (इं. ग्रोला मिळणारं दीपचं) बीट करुन घेते बीटरने. त्यात पाण्यात मिक्स करुन बेसन घालते. जरा जास्तच घालते बेसन. मग खलबत्त्यात कुटलेलं आलं, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, हिंग इ. घालून उकळत ठेवते.
धन्स सायो...हो का? आता
धन्स सायो...हो का? आता गॅसजवळच उभं राहूनच कढी केली पाहिजे गं
बेसन मी पण घालते पण कमी.. आता पुढच्या वेळी जरा जास्त घालून बघते.
मी दही (इं. ग्रोला मिळणारं
मी दही (इं. ग्रोला मिळणारं दीपचं) बीट करुन घेते बीटरने. त्यात पाण्यात मिक्स करुन बेसन घालते. जरा जास्तच घालते बेसन. मग खलबत्त्यात कुटलेलं आलं, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, हिंग इ. घालून उकळत ठेवते>> अगदी अगदी आणि वरून तूप जिरे फोडणी. टॉप टेस्ट. बरोबर साधी मूगडाळ खिचडी, पापड.
विकतचा खवा खराब होऊ शकतो का?
विकतचा खवा खराब होऊ शकतो का? ५-६ दि. झालेत आणुन, फ्रिजमध्येच आहे, वास, रंग अजुन तसाच आहे. गाजर हलवा करण्यासाठी आणला होता करायचाच राहुन गेलाय. काय करु? साधारण किती दिवस टिकतो खवा? १-२ दि. वापरला तर चालेल का?
नका वापरू. खवा आणला की लगेच
नका वापरू. खवा आणला की लगेच वापरावा (देशात असाल तर). फार तर १ दिवस ठेवून.
रिस्क घेऊ नका, असं मी म्हणेन. खराब खवा खाल्ला गेला, तर तब्येतीसाठी अतिशय वाईट!
धन्यावाद पौर्णिमा. नाही वापरत
धन्यावाद पौर्णिमा. नाही वापरत मग आता.
त्या खव्याच्या दुकानात
त्या खव्याच्या दुकानात नोटीसही असते मला वाट्ते आजचे आजच संपवा म्हणून. विषबाधा होउ शकते.
त्यापेक्षा येथे मलईबर्फी आहे ती बरी. पण त्याचा गाजर हलवा नाही करता येणार. कंडेन्स मिल्क वगैरे वापरावे.
दुधापासून बनवलेल्या मिठाया
दुधापासून बनवलेल्या मिठाया फ्रीज मध्ये ठेवू नयेत अशी सूचना असते त्यावर किंवा कधी दुकानदार सांगतोही.
खवा फ्रीजमध्ये ठेवलेला चालतो का?
बटाटे, रताळी, अरारूट सारखी
बटाटे, रताळी, अरारूट सारखी कंदमूळे किसून पाण्यात ठेवल्यावर त्यातला स्टार्च वेगळा होतो. तो पाण्यात विरघळत नाही. हे पाणी गाळून घेऊन तसेच ठेवले तर त्याचा साका खाली बसतो. तेच तवकिल.
घरात पुर्वी बटाट्याचा किस वगैरे केला कि असे तवकील गोळा केले जात असे, खीरिला दाटपणा आणण्यासाठी ते वापरतात. ते वापरून बदामी हलवा पण करता येतो. त्याची लापशी पण करता येते.
खवा, मुंबईच्या हवेत तरी फ्रिजमधेच आणि फारफार तर एखादा दिवस ठेवावा. पूण्याला हैद्राबादला, कोरड्या हवामानात तो बाहेरही खराब होणार नाही, पण मुंबईला नक्कीच होईल.
दिनेश , तवकील शब्द आईकडे
दिनेश , तवकील शब्द आईकडे ऐकलेला. तवकील म्हणजे स्टार्च असे तेव्हा कळले होते. मी ती पांढरी पावडर जमवीत असे फार मऊ लागते ती हाताला. मी खव्याच्या वाटेसच जात नाही. इथे मलाई बर्फी आहे तीच कधीतरी करते.
मी काल तवकील = आरारूट पीठ
मी काल तवकील = आरारूट पीठ आणायला गेले, पण ४००ग्रॅमचं पॅक होतं, एवढं नको होतं. म्हणून नाही आणलं.
नवर्याचा घसा दुखतोय, औषधं आहेतच, गुळण्या पण चालू आहेत पण तवकील पेज खाऊन बरं वाटेल, घसा आतुन कोरडा पडलाय तो बरा होईल म्हणून आणायचं होतं.
आता मैत्रीणीकडे असेल तर घेते.
साबुदाण्याची पेज, केळं खाता
साबुदाण्याची पेज, केळं खाता येईल.
माझ्या बाजरीच्या पीठात टोके
माझ्या बाजरीच्या पीठात टोके झालेत. मी ते चाळुन घेतले. वापरलं तर चालेल का?
नाहितर मी त्याचं काय करु
Pages