पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

व्यक्तिच्या वागण्यातला एखादा कोपरा,
जगाला न दिसणारा असतो,
जो जगाला जाणवत नसला तरी,
जवळ्च्याच व्यक्तीला टोचत असतो.

धनी, माझा लई थोर,
जाणतो मानेवरील जू चे उपकार,
खिल्लारी आमची बेलजोड,
कधी नांगर कधी ऊसतोड,
नाही वारा नाही ऊन,
कष्टाची आहे त्याला जाण,
कुठे माझा मुका जिव,
करितो धनी कामाची किव.

मेणबत्ती...

आयुष्यभर एकटीच
उभ्यानेच जळली..
आपल्याच पायथ्याशी
नव्याने साचली....!

अंजली Happy

मध्यरात्री
समुद्राकाठी
लाट झेपावली
कोणासाठी?

चंद्राच्या या दरबारात
चांदण्यांचा राबता आहे
धुंद चांदणी ती
चंद्रास भुलवु पाहे

हासता तू चांदण्या त्या
सांडल्या होत्या कधी
वेचिलेल्या त्या स्मितांची
आजही मज याद आहे

चारोळ्यांची वाहती गंगा.,
धुवून घेती हात सारे,
विशाला सोड संकोच आता,
घे तोडून तूही चंद्र-तारे....! Proud

कधी उन्मादाच्या भरात
तूलाही चंद्राची उपमा देतो
विसरतो सोयिस्कररित्या
चंद्र..., स्वतःच शापित असतो !

यायचीस तु नेहमी
घेउन चांदण्यांची आरास,
तु गेल्यावर मात्र
मागे रहायचे नुस्ते स्पर्शाचे भास.

चांदणरातीला तार्‍यांची आरास
चंद्राला होती प्रियेचे आभास
साले.., आम्हाला मात्र फुकाचे
नसत्या गोड गोड शब्दांचे त्रास .... Wink

खुप झाले चंद्र तारे,
सागर पाण्याच्या लाटा.
भुकेच्या गावात जाऊद्या,
कवितेच्या अवघ्या वाटा.

आता मन राहिल नाही आपल,
याचि तेव्हाच पट्ली पक्की खात्री ,
चान्दण्याचा कवडसा पडताना पाहिला,
त्याने जेव्हा आमवस्येच्या रात्री......!

रैना,
इरीटिरीची आई करत्येय
दुपार पासुन मायबोलीवर दंगा
इरीटीरीचे बाबा म्हणतात
आता कोणी तरी तीला सान्गा

थोडा वेळ दम खा म्हणाव
उद्या कर जोमाने
तिनाक्षरी चार अक्षरी
रोज येउ दया नेमाने

माझी आठोळी

मायबोलीची ओढ
अशी काही जादू करते
शब्द सुचत नसले तरी
आपोआप चारोळी लिहिली जाते...

सर्व मायबोलीकरांना माझा सप्रेम नमस्कार...

Happy Valentine's Day to all माबोकर,

आशा आहे लिहिलेली चारोळी सर्वांना आवडेल (चित्र आवडणार याची खात्री आहे).

Valentine's Day.jpg

Pages