भाषा हे मूलत: संवादाचं माध्यम असलं तरी तो एक संस्कृतीचं प्रतिबिंब दर्शवणारा आरसाही असतो. अनुवादित साहित्याचं मोल म्हणूनच मोठं आहे. एका बाजूला आपल्या हाडीमांशी मुरलेल्यांहून निराळ्या जाणिवा, चालीरीती, जीवनपद्धती आणि विचारधारांची ओळख त्यातून होते, तर दुसर्या बाजूला जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी माणसाच्या मूळ अंतःप्रेरणा अगदी तशाच असल्याचं भानही येतं.
मराठी भाषा दिवसाच्या निमित्तानं म्हणूनच यावर्षी आपण "केल्याने भाषांतर" हा कार्यक्रम करायचं ठरवलं आहे. इतर कोणत्याही भाषेतील कथा, कवितांचं मराठीत भाषांतर करुन आम्हाला पाठवा.
ही स्पर्धा नाही.
१. ज्या साहित्याचे भाषांतर केले जाणार आहे ते प्रताधिकारमुक्त असावे. इंग्रजी भाषेतील असे काही साहित्य आंतरजालावर उपलब्ध आहे. प्रताधिकारमुक्त साहित्य असल्यास परवानगीची गरज नाही. परंतु याशिवाय मूळ लेखकाची अथवा प्रकाशकांची परवानगी घेऊन भाषांतर करता येईल. मूळ लेखकाची/प्रकाशकाची परवानगी मिळवण्याची कायदेशीर जबाबदारी भाषांतरकाराची आहे. मायबोली या गोष्टीला जबाबदार असणार नाही.
२. मूळ साहित्याचे शीर्षक, लेखक, भाषा यांचा स्पष्ट उल्लेख असावा.
३. "स्वैर" भाषांतर नसावे.
४. प्रवेशिका लिखीत (स्कॅन स्वरुपात) किंवा ई-पत्रामध्ये देवनागरीत पाठवता येतील. आलेल्या प्रवेशिकेतील साहित्य प्रकाशित करताना त्यावर कोणतेही संस्करण केले जाणार नाही.
५. एका आयडीला एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठवता येतील
६. प्रवेशिका marathibhasha@maayboli.com या पत्त्यावर पाठवावी.सोबत आपला मायबोलीवरचा आयडी कळवावा. प्रवेशिका पाठवताना ई-पत्राच्या विषयात कृपया Marathi Bhasha : kelyaane bhaaShaaMtar असे नमूद करावे.
७. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीखः २० फेब्रुवारी २०११
अधिक माहितीसाठी संयोजक समितीशी marathibhasha@maayboli.com इथे संपर्क करावा किंवा ह्याच बातमीफलकावर आपला प्रश्न लिहावा.
मराठी भाषा दिवस २०११ च्या इतर कार्यक्रमांसाठी इथे बघा.
धन्यवाद.
सगळ्यात आधी - वरची भाषांतरीत
सगळ्यात आधी - वरची भाषांतरीत कविता खुप खुप आवडली. वाचतावाचताच असे सहजसुंदर भाषांतर, जे भाषांतर आहे हेच न कळावे, असे मला जमणार नाही याची जाणिव झाली
तरीही एक कथा भाषांतरीत करुन पाठवतेय.
मस्त उपक्रम आणि पोस्टरही एकदम
मस्त उपक्रम आणि पोस्टरही एकदम सुंदर आहे. पोस्टरात दिलेलं भाषांतर अगदी सहजसुंदर आणि ओघवतं आहे.
हेवा वाटतो कधीकधी असे सुंदर
हेवा वाटतो कधीकधी असे सुंदर लिहु शकणा-यांचा......
तेच तर! असं सुंदर भाषांतर
तेच तर! असं सुंदर भाषांतर वाचल्यावर भाषांतराला हात घालायला मला नाही धजावणार.
स्वाती,खूपच सुरेख
स्वाती,खूपच सुरेख भाषांतर.
अतिशय आवडलं.
वरील भाषांतर अप्रतिम
वरील भाषांतर अप्रतिम
स्वातीचे भाषांतर इतके सुंदर
स्वातीचे भाषांतर इतके सुंदर आहे!! रॉय किणीकरांच्या 'रात्र' ची आठवण झाली. तीच लय आहे.
स्वाती.. सुरेख!
स्वाती.. सुरेख!
स्वाती, अप्रतिम भाषांतर...
स्वाती, अप्रतिम भाषांतर...
शोधतेच एखादं प्रताधिकारमुक्त लेखन... भाषांतराची फारा दिवसांची इच्छा, हौस भागेल
तसंही, स्वातीच्या भाषांतरासमोर आमचं म्हणजे सूर्यासमोर काजवा... (स्वाती, ही चेष्टा नव्हे, खरंच.)
जेव्हा जेव्हा मी सूर छेडले
जेव्हा जेव्हा मी सूर छेडले तेह्वा
बंधने गळाली होती दिक्कालाची...
मस्त!
स्वातीताई, तुमचा अनुवाद अतिशय
स्वातीताई, तुमचा अनुवाद अतिशय सुंदर उतरलाय!! वाचताक्षणी डोळ्यात पाणी आलं!!!
जबराट आहे वरचं
जबराट आहे वरचं भाषांतर.
निव्वळ बेफाम
http://www.gutenberg.org/wiki
http://www.gutenberg.org/wiki/Main_Page
ह्या साईटवर प्रताधिकारमुक्त साहित्य भरपुर आहे. भरभरुन अनुवाद करा आणि आम्हाला वाचायला द्या
अहाहा ! सुंदर अनुवाद स्वाती.
अहाहा !
सुंदर अनुवाद स्वाती. भाषांतर कुठले, हा तर सुरेख अनुवाद.
स्वाती, सुंदर अनुवाद! ह्या
स्वाती, सुंदर अनुवाद! ह्या निमित्ताने खूप वेगवेगळे सुंदर अनुवाद वाचायला मिळतील.
सुंदर आणि कल्पक पोस्टर.
सुंदर आणि कल्पक पोस्टर. स्वातीचे भाषांतर आवडले.
स्वाती! भाषांतर अ प्र ति म !!
स्वाती! भाषांतर अ प्र ति म !! मस्त आहे ही कल्पनाच.
स्वाती, खूप सुरेख झालय
स्वाती, खूप सुरेख झालय भाषांतर! छान कल्पना!
एखादे साहित्य प्रताधिकारमुक्त
एखादे साहित्य प्रताधिकारमुक्त आहे की नाही हे कसे कळणार ?
कारण आजकाल महाजालामुळे काही कळेनासे झाले आहे.
एकच साहित्य अनेक लोक आपल्या मर्जीनुसार प्रकाशित करीत असतात,
त्यांनी लेखकाची परवानगी घेतलेली असते की नाही देव जाणे.
स्वाती, कविता उत्तम. पाठ
स्वाती, कविता उत्तम.
पाठ करावी अशी आहे. आता ही सगळ्यांना म्हणून दाखवा, उद्या.
स्वाती यांचे भाषांतर वाचुन
स्वाती यांचे भाषांतर वाचुन दोन तर्हेचे प्रतिसाद येतील..
एक - असे आम्हाला जमणार नाही मग कशाला उगाच प्रयत्न करा..
आणि दुसरा..यापेक्षा चांगले नाही तरी या तोडीचे भाषांतर करायलाच हवे..
मायबोलीकर दुसरा पर्याय स्वीकारुन आम्हाला चांगले साहित्य वाचायला देतील ही आशा.
स्वाती, फारच सुंदर भाषांतर(रुपांतर)
धन्यवाद!
ओहो!! क्या बात है
ओहो!! क्या बात है स्वाती!
निव्वळ अप्रतिम..
क्या बात है स्वाती! अगदी
क्या बात है स्वाती! अगदी चपखल!
महेश, या इंग्रजीतील काही
महेश, या इंग्रजीतील काही साईट्स आहेत. उदाहरण म्हणून देत आहे-
http://www.world-english.org/stories.htm
http://www.englishlibrary.org/
क्या बात है !!! स्वाती, अतिशय
क्या बात है !!!
स्वाती, अतिशय सुंदर झालंय हे !
: असंच आणखी दर्जेदार साहित्य वाचायला उत्सुक बाहुली :
स्वाती, मस्त जमलंय
स्वाती, मस्त जमलंय भाषांतर.
खरंतर भाषांतर न वाटता एक कविताच वाटतेय, ओरिजनल.
अत्यंत सुंदर भाषांतर...
अत्यंत सुंदर भाषांतर...
फारच मस्त भाषांतर स्वाती!!!
फारच मस्त भाषांतर स्वाती!!! सहज आणि सुंदर
ओरिजनल कवितेबाबत सायोला अनुमोदन
अहाहा. स्वाती , काय सुंदर
अहाहा. स्वाती , काय सुंदर लिहिलयस गं. मुळच्या कवितेत जितके सुरेख भाव उतरले नसतील ,तितके तुझ्या अनुवादात उतरलेत.
स्वाती, आजचा दिवस कारणी
स्वाती, आजचा दिवस कारणी लावलास. अप्रतिम ...
Pages