भाषा हे मूलत: संवादाचं माध्यम असलं तरी तो एक संस्कृतीचं प्रतिबिंब दर्शवणारा आरसाही असतो. अनुवादित साहित्याचं मोल म्हणूनच मोठं आहे. एका बाजूला आपल्या हाडीमांशी मुरलेल्यांहून निराळ्या जाणिवा, चालीरीती, जीवनपद्धती आणि विचारधारांची ओळख त्यातून होते, तर दुसर्या बाजूला जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी माणसाच्या मूळ अंतःप्रेरणा अगदी तशाच असल्याचं भानही येतं.
मराठी भाषा दिवसाच्या निमित्तानं म्हणूनच यावर्षी आपण "केल्याने भाषांतर" हा कार्यक्रम करायचं ठरवलं आहे. इतर कोणत्याही भाषेतील कथा, कवितांचं मराठीत भाषांतर करुन आम्हाला पाठवा.
ही स्पर्धा नाही.
१. ज्या साहित्याचे भाषांतर केले जाणार आहे ते प्रताधिकारमुक्त असावे. इंग्रजी भाषेतील असे काही साहित्य आंतरजालावर उपलब्ध आहे. प्रताधिकारमुक्त साहित्य असल्यास परवानगीची गरज नाही. परंतु याशिवाय मूळ लेखकाची अथवा प्रकाशकांची परवानगी घेऊन भाषांतर करता येईल. मूळ लेखकाची/प्रकाशकाची परवानगी मिळवण्याची कायदेशीर जबाबदारी भाषांतरकाराची आहे. मायबोली या गोष्टीला जबाबदार असणार नाही.
२. मूळ साहित्याचे शीर्षक, लेखक, भाषा यांचा स्पष्ट उल्लेख असावा.
३. "स्वैर" भाषांतर नसावे.
४. प्रवेशिका लिखीत (स्कॅन स्वरुपात) किंवा ई-पत्रामध्ये देवनागरीत पाठवता येतील. आलेल्या प्रवेशिकेतील साहित्य प्रकाशित करताना त्यावर कोणतेही संस्करण केले जाणार नाही.
५. एका आयडीला एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठवता येतील
६. प्रवेशिका marathibhasha@maayboli.com या पत्त्यावर पाठवावी.सोबत आपला मायबोलीवरचा आयडी कळवावा. प्रवेशिका पाठवताना ई-पत्राच्या विषयात कृपया Marathi Bhasha : kelyaane bhaaShaaMtar असे नमूद करावे.
७. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीखः २० फेब्रुवारी २०११
अधिक माहितीसाठी संयोजक समितीशी marathibhasha@maayboli.com इथे संपर्क करावा किंवा ह्याच बातमीफलकावर आपला प्रश्न लिहावा.
मराठी भाषा दिवस २०११ च्या इतर कार्यक्रमांसाठी इथे बघा.
धन्यवाद.
स्वाती, अफलातून!!सुंदर!!
स्वाती, अफलातून!!सुंदर!!
>>>मूळ लेखकाची परवानगी मिळवण्याची कायदेशीर जबाबदारी भाषांतरकाराची आहे. मायबोली या गोष्टीला जबाबदार असणार नाही.
पुस्तकाच्या भाषांतराला निव्वळ मूळ लेखकाचीच नव्हे तर प्रकाशकांची पण परवानगी घ्यावी लागते. एकदा खात्री करून घ्या. 'कॉपीराइट लेखकाच्या नावाने आहे' असं छापलं असलं तरीही. हार्पर् कॉलिन्स या प्रकाशकांची तरी अशी पॉलिसी आहे असं ऐकलंय.
सुरेख भाषांतत स्वाती.
सुरेख भाषांतत स्वाती.
आंबोळे तै , छान भाषांतर ,
आंबोळे तै ,
छान भाषांतर , आवड्या.
मी असं केलं असत,
प्रिये गीते ही विरुन जायची
वदेन मी " तमा मजला नसे तयाची"
सुर छेडीले मी जेव्हा जेव्हा,
बंधने गळली दिक्कालाची
अप्रतिम भाषांतर स्वाती. खरं
अप्रतिम भाषांतर स्वाती. खरं तर भाषांतर वाटतच नाहिये. ओरिजनलच कविता वाटतेय.
दिलेल्या इ-पत्र आयडी वर माझए
दिलेल्या इ-पत्र आयडी वर माझए पत्र येत नाहीये...
"THE LADDER OF ST. AUGUSTINE- by Henry Wadsworth Longfellow
Saint Augustine! well hast thou said,
That of our vices we can frame
A ladder, if we will but tread
Beneath our feet each deed of shame!
All common things, each day's events,
That with the hour begin and end,
Our pleasures and our discontents,
Are rounds by which we may ascend.
The low desire, the base design,
That makes another's virtues less;
The revel of the ruddy wine,
And all occasions of excess;
The longing for ignoble things;
The strife for triumph more than truth;
The hardening of the heart, that brings
Irreverence for the dreams of youth;
All thoughts of ill; all evil deeds,
That have their root in thoughts of ill;
Whatever hinders or impedes
The action of the nobler will;--
All these must first be trampled down
Beneath our feet, if we would gain
In the bright fields of fair renown
The right of eminent domain.
We have not wings, we cannot soar;
But we have feet to scale and climb
By slow degrees, by more and more,
The cloudy summits of our time.
The mighty pyramids of stone
That wedge-like cleave the desert airs,
When nearer seen, and better known,
Are but gigantic flights of stairs.
The distant mountains, that uprear
Their solid bastions to the skies,
Are crossed by pathways, that appear
As we to higher levels rise.
The heights by great men reached and kept
Were not attained by sudden flight,
But they, while their companions slept,
Were toiling upward in the night.
Standing on what too long we bore
With shoulders bent and downcast eyes,
We may discern--unseen before--
A path to higher destinies.
Nor deem the irrevocable Past,
As wholly wasted, wholly vain,
If, rising on its wrecks, at last
To something nobler we attain."
नमस्कार,
मी मायबोलीवर harshalc या नावाने लिहितो. "केल्याने भाषांतर" या संदर्भात एक प्रश्न विचारायचा आहे.
वरील पूर्ण कविता Henry Wadsworth Longfellow यांची आहे. या कवितेतला; मी इथे (पाठ्यपुस्तकासाठी नाही, गैरसमज झाला असता...) निर्दिष्ट केलेल्या कडव्यांचा महाराष्ट्रातील दहावीसाठीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात कविता म्हणुन समावेश आहे.
सदर कडव्यांचा मी माझ्या कंपनीतर्फे एकलव्य या एन.जी.ओ. मध्ये शिकवायला गेलो असतांना, तेथील विद्यार्थ्यांना कवितेचा भावार्थ कळावा म्हणुन, मी कवितेत अनुवाद करुन ऐकवली होती. परंतू ती मी फक्त माझ्या संग्रही ठेवलेली आहे. "केल्याने भाषांतर"साठी मला ती पाठवता येईल का?
तसेच हा अनुवादही परवानगीच्या कक्षेत येतो का?
कृपया माहिती कळवावी.
अतिशय सुंदर उपक्रम. सहभागी
अतिशय सुंदर उपक्रम. सहभागी व्हायची खूप इच्छा आहे. बघू कसं जमतंय.
स्वाती, अनुवाद अतिशय सुरेख
अतिशयच सुरेख भाषांतर.... याला
अतिशयच सुरेख भाषांतर.... याला भाषांतर तरी कसं म्हणायचं???? इतकं समजून उमजून आतून आलयं ना हे! आणि हे असं उच्च लिहून तुम्ही स्टँडर्ड एकदम वर नेऊन ठेवलयं म्हणजे स्पर्धकांची जबाबदारी वाढलीये.
स्वाती, मस्त! मृण्मयी, अधीकार
स्वाती, मस्त!
मृण्मयी, अधीकार दोघांकडे नसतात. नाहीतर लहान मुल जसे आईबाबांना कसची तरी परवानगी मागायला जाते आणि ते दोघेही दुसर्याला विचार म्हणुन टोलवाटोलवी करतात तसे व्हायाचे.
सुरेख अनुवाद
सुरेख अनुवाद स्वाती!!!
उपक्रमही छान आहे.
स्वाती सुरेख भाषांतर. हेवा
स्वाती सुरेख भाषांतर.
हेवा वाटतो कधीकधी असे सुंदर लिहु शकणा-यांचा......>>>>>अगदी अगदी
भाषांतराचे अधिकार वेगळे
भाषांतराचे अधिकार वेगळे असतात, आणि ते प्रकाशकांकडे असू शकतात. पेंग्विनसारखे प्रकाशक पुनर्मुद्रणाचे, भाषांतराचे इत्यादी हक्कांचे वेगवेगळे करार करतात. मी सध्या पेंग्विनच्या एका पुस्तकाचं भाषांतर करतोय, आणि त्यासाठी लेखक आणि प्रकाशक या दोघांचीही रीतसर परवानगी घेतली आहे, आणि ती आवश्यकच असते.
हा अतिशय उत्तम उपक्रम आहे, आणि प्रताधिकारमुक्त साहित्य आंतरजालावर सहज उपलब्ध आहे.
हे पेंग्विनच्या (अमेरिका) संकेतस्थळावरून -
Q: How do I buy rights?
A: If you're a publisher, contact Penguin Group (USA) through our agents. Generally Penguin would require a monetary offer for rights, including an advance payment of royalties. In addition, Penguin would want to know:
* where do you plan to distribute?
* when will you publish?
* how long will you keep the book in print?
* what language(s) will you publish?
* what other books have you published?
There are also other terms and restrictions.
If you're an individual, you must have the backing or sponsorship of a book publishing house or other corporation that can defend copyright, file tax papers and the like. Have that company contact Penguin. Penguin will not license rights to a individual acting on his sole behalf.
If you are a translator, the above advice to individuals applies to you as well. If you already know of a publisher who wants to publish a translation, then have that publisher contact Penguin Group (USA).That publisher must negotiate for rights, sign a contract and fulfill its terms, and make a separate agreement with you to translate the book.
If you plan to make a translation as part of an academic course, and you need confirmation that a book has not been previously translated, contact the translation rights-holder. It may be the publisher, or it may be the agent. See the book description and rights listing for the title you're interested to find out which.
प्रताधिकार लेखकाकडे असला तरी भाषांतराचा हक्क पेंग्विन बरेचदा राखून ठेवतं, तसंच लेखकानं भाषांतराची, अन्य माध्यमांत वापरण्याची परवानगी देण्याआधी प्रकाशकांची लेखी परवानगी घ्यावी, अशीही अट असते.
आशिष, मला आलेला अनुभव सांगते.
आशिष, मला आलेला अनुभव सांगते. हार्पर-कॉलिन्सच्या एका इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्यापूर्वी मी लेखिकेची परवानगी घेतली. अनुवाद मायबोलीवर प्रसिध्द करणार होते. यात मला काडीचाही आर्थिक लाभ होणार नव्हता. तिने लागलीच परवानगी दिली, आणि तिच्या एजंटाला फोन करून कळवलं. एजंटाने लागलीच "हार्परची परवानगी घेतल्याशिवाय काहीही करू नये". असं कळवलं. (पुस्तकावर मात्र 'कॉपिराइट लेखिकेकडे' असं लिहिलंय.) अगदी तंतोतंत लिहायचं तर :
XXXX (पुस्तकाचं नाव) Copyright © XXXX (साल) by XXXX (लेखिकेचं नाव). All rights reserved. Printed in the United States of America. No part of this book may be used or reproduced in any manner whatsoever without written permission except in the case of brief quotation embodied in critical articles and reviews. For more information address...
>>>without written permission
इथे माझा 'ज्याच्याकडे कॉपिराइट त्याची लिखित परवानगी' असा समज झाला होता. असो,
यु एस कॉपिराइटसंदर्भात इथे बरीच माहिती आहे.
चांगला उपक्रम आहे.. एक
चांगला उपक्रम आहे..
एक शंका... स्वैर अनुवाद म्हणजे नक्की काय ? नियमांमध्ये स्वैर अनुवाद नको असं लिहिलय.. पण वर जे उदाहरण आहे तो स्वैर अनुवादच नाहिये का ? बर्याच जणांनी ती एक वेगळी कविताच वाटते आहे असं म्हंटलय. मूळ कवेतेत एक प्रश्न आहे. अनुवादात अर्थ तसाच आहे पण प्रश्न नाहिये. वाक्यरचना वेगळी आहे. तो जर प्रश्न स्वरूपातच ठेवला असता तर ते तंतोतंत भाषांतर झाले असते (असं मला वाटतं).
कृपया जाणकार माहिती देतील का ?
घोषणेत स्वैर भाषांतर दिलं तर हरकत काहीच नाही. पण ते तसं देऊन नियमांत स्वैर भाषांतर नको म्हणणं हे जरा गंमतशीर वाटलं..
Harshalc, वर घोषणेमध्ये
Harshalc,
वर घोषणेमध्ये लिहिले आहे की "प्रताधिकारमुक्त साहित्य असल्यास परवानगीची गरज नाही. परंतु याशिवाय मूळ लेखकाची परवानगी घेऊन भाषांतर करता येईल. मूळ लेखकाची परवानगी मिळवण्याची कायदेशीर जबाबदारी भाषांतरकाराची आहे." त्याप्रमाणे हि जबाबदारी घेऊन काय लेखन पाठवायचे याचा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे.
धन्यवाद.
>>अनुवादात अर्थ तसाच
>>अनुवादात अर्थ तसाच आहे
म्हणजे हा "स्वैर" अनुवाद नाही.
>>तर ते तंतोतंत भाषांतर झाले असते
चांगले भाषांतर हे तंतोतंत (म्हणजे शब्दाला शब्द, वाक्याला वाक्य, प्रश्नाला प्रश्न :फिदी:) नसते. तसे असेल तर ते भाषांतर केले आहे हे लगेच ओळखू येते.
हे बघा टुकार भाषांतर, असले कोणीही करेल..
जेव्हा मृत्यू येतो आणि मला कुजबुजतो
'तुझे दिवस संपलेत'
मला त्याला सांगूदे, 'मी प्रेमात जगलो
आणि नुसत्या काळात नाही'
तो विचारेल, 'तुझी गाणी रहातील का?'
मी म्हणेन, मला माहीत नाही
पण हे मला माहीत आहे की जेव्हा मी गायलो तेव्हा मला माझे अमरत्व सापडले.
"स्वैर" मध्ये 'मूळ संकल्पना वापरुन' लिहिलेले किंवा 'आधारीत' इ. पण येत असावे. ज्याचे प्रताधिकार वेगळे असावेत.
बाकी जाणकार लिहितीलच.
>>अनुवादात अर्थ तसाच
>>अनुवादात अर्थ तसाच आहे
म्हणजे हा "स्वैर" अनुवाद नाही. >>> नाही पटलं... "स्वैर" अनुवादात अर्थ बदलत नाही. मेसेज तोच जातो पण तो मूळ कलाकृतीपेक्षा वेगळ्या पध्दतीने दिला जातो (शब्दशः भाषांतर न करता).
चांगले भाषांतर हे तंतोतंत (म्हणजे शब्दाला शब्द, वाक्याला वाक्य, प्रश्नाला प्रश्न ) नसते. >>>> माझा प्रश्न हा चांगले भाषांतर किंवा वाईट भाषांतर ह्या संदर्भात नव्हता. माझा मुद्दा वरच्या भाषांतराला स्वैर का म्हणू नये इतकाच आहे. ते चांगलं आहे की वाईट ह्यावर मी काहीच म्हंटलेलं नाही.
मी नेटवर जरा शोधाशोध करतो कोणाला ह्या दोन्ही गोष्टींची व्याख्या माहित असेल तर द्या कृपया.
>>अनुवादात अर्थ तसाच आहे पण
>>अनुवादात अर्थ तसाच आहे पण प्रश्न नाहिये. वाक्यरचना वेगळी आहे. तो जर प्रश्न स्वरूपातच ठेवला असता तर ते तंतोतंत भाषांतर झाले असते (असं मला वाटतं)
म्हणजे तुझी तीच अपेक्षा होती ना? म्हणून मी करुन दाखवले.
पटत नसेल तर त्यापेक्षा वरच्याच कवितेचे तुझ्या मते स्वैर नसलेले आणि तंतोतंतही नसलेले भाषांतर कर.
रविंद्रनाथ टागोरांची ही कविता
रविंद्रनाथ टागोरांची ही कविता मुक्तछंदात आहे स्वातीने मत्र छंदात ती लिहिली. उत्तम.
वर जे आहे तो 'भावानुवाद' आहे,
वर जे आहे तो 'भावानुवाद' आहे, तू 'भावानुवाद' आणि 'स्वैर' मध्ये गोंधळ करत आहेस.
उदा. एका कथेत हॅरी आणि टॉम हे बालमित्र बर्याच काळाने भेटत आहेत. मूळ कथेतील संवाद -
टॉम : "Harry, is that really you? To what do I owe this honor?"
तंतोतंत (आणि टुकार :फिदी:) भाषांतर -
टॉम : "हॅरी, तो खरेच तू आहेस का? हा सन्मान मला कशामुळे मिळत आहे?"
तंतोतंत नसलेलं, पण स्वैरही नसलेलं भाषांतर -
टॉम : "चक्क हॅरी! आमचं भाग्यच उजाडलं म्हणायचं!"
(दोन्ही प्रश्नांचे उद्गार झाले.)
स्वैर भाषांतर -
"आँ! हर्या! जिवंत हाईस व्हय!"
वर जे आहे तो 'भावानुवाद' आहे,
वर जे आहे तो 'भावानुवाद' आहे, तू 'भावानुवाद' आणि 'स्वैर' मध्ये गोंधळ करत आहेस. >>>> हम्म्म्म हे पटण्यासारखं आहे...
तुझं उदाहरण चांगलं आहे... धन्यवाद..
पण जाणकार आलेच नाहीत अजूनही..
पटत नसेल तर त्यापेक्षा वरच्याच कवितेचे तुझ्या मते स्वैर नसलेले आणि तंतोतंतही नसलेले भाषांतर कर. >>> हे म्हणजे ते आपल्या बाई, उजेड, फेडरर, विंबल्डन सारखच झालं की..
असो..
भाषांतर आवडल्याचं आवर्जून
भाषांतर आवडल्याचं आवर्जून सांगितल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.
आता भरपूर संख्येने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करू या.
>>हे म्हणजे ते आपल्या बाई,
>>हे म्हणजे ते आपल्या बाई, उजेड, फेडरर, विंबल्डन सारखच झालं की..
हे तू त्याचे केलेले स्वैर भाषांतर आहे.
ते सिरियसली लिहिले आहे. मूळ कविता, एक अनुवाद, एक तंतोतंत अनुवाद सगळं वरच आहे. वाटलं तुला देता येईल उदाहरण. नसेल जमत तर राहूदे.
लालू
लालू
एक शंका, जालावर पूर्वप्रकाशित
एक शंका,
जालावर पूर्वप्रकाशित असलेलं भाषांतर/अनुवाद चालेल का?
'केल्याने भाषांतर' ही कल्पना
'केल्याने भाषांतर' ही कल्पना खुप आवडली. कुठल्याही भाषेतले असो, खरे अभिजात साहित्य मराठीत अनुवादित करून वाचकांना त्याची ओळख करुन देण्याची, आनंद मिळवून देण्याची परंपरा फार जूनी आहे, त्याच परंपरेचे एक प्रकारे पुनरुज्जीवन केले जात आहे आणि भाषा- भाषा, संस्कृती- संस्कृतीं मधिल संगमातून आपल्या भाषेच्या विकासा साठी प्रयत्न केले जात आहेत, ही फारच आनंदाची बाब आहे! महाराष्ट्रातिल गावो-गावच्या, लहान्-मोठ्या वाचनालयातून 'अनुवादित' साहित्याला जी प्रचंड मागणी असते, त्यावरून 'अनुवादित' साहित्य किती लोकप्रीय आहे याची कल्पना येवू शकते.
आणि विशेषतः गेल्या काही दिवसात माबो वर काही बा. फ. मधुन 'मराठेतर' भाषांवर अनावश्यक चिखलफेक करून भाषिक विद्वेषाचा धुरळा उडवला जात होता, त्या पार्श्वभूमीवर 'केल्याने भाषांतर' ही संकल्पना (ते ही - 'मराठी भाषा' दिवसाला अनुलक्षून) फारच औचित्यपूर्ण आणि धाडसी भासते आहे!
या 'धाडसा' बद्दल संयोजकांचे अभिनंदन आणि उपक्रमासाठी अनेक उत्तम शुभेच्छा !
हेवा वाटतो कधीकधी असे सुंदर
हेवा वाटतो कधीकधी असे सुंदर लिहु शकणा-यांचा....>>> मलापण!
पण आनंद पण होतो कि निदान सुंदर असे वाचायला तरी मिळाले....
संयोजक तुम्हाला मेल केला आहे.
संयोजक तुम्हाला मेल केला आहे.
साधना, तुमचे इमेल मिळाले
साधना,
तुमचे इमेल मिळाले आहे.
धन्यवाद.
स्वाती, काय केलाय अनुवाद!
स्वाती, काय केलाय अनुवाद! खरोखर अप्रतिम.
कविता आणि अनुवाद दोन्ही आवडले.
संयोजक, इमेल केलंय तुम्हाला.
संयोजक, इमेल केलंय तुम्हाला. पोचपावती मिळाली तर बरं होईल.... म्हणजे इमेल मिळालं आहे हे कळेल. धन्स.
Pages