Submitted by नानबा on 19 January, 2011 - 13:03
माहित असलेल्या किंवा हव्या असलेल्या कवितांचे अर्थ, गुढार्थ, रसग्रहण - सगळं इथं टाकता येईल...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>> गोष्ट जशी मुळात आहे तशी ती
>> गोष्ट जशी मुळात आहे तशी ती जाणून घ्यायची. स्वतःला पार वगळून. तिच्या 'तथा'पणाला धक्का न लावता.
Easier said..
धागा सुरेख सुरू आहे...
धागा सुरेख सुरू आहे... विंदांच्या बर्याच कविता वाचायला मिळत आहेत ... ठांकू...
क्षितिज नाचले वाळूभवती वाळु
क्षितिज नाचले वाळूभवती
वाळु बरळली, 'नाही, नाही.'
अशाच वेळी उंट उगवला;
आणि म्हणाला 'करीन काही.'
अन मानेच्या बुरुजावरती
चढले डोळे अवघड जागी;
क्षितिज पळाले दूर दूर अन
वाळु जाहली हळूच 'जागी'.
रुप पाहूनी असे अजागळ
भुलले वाळूचे भोळेपण;
आणि तिच्या त्या वांझपणावर
गळला पहिला सृजनाचा क्षण.
मला क्षितिज याचा अर्थ प्रतिभेची / पराकाष्ठेची व्याप्ती / मर्यादा असा घ्यावासा वाटतोय. वाळू म्हणजे प्रयत्न असं समजल्यास प्रयत्न थिटे पडत असताना ( वाळू नाही म्हणत असताना) क्षितीज मर्यादितच राहतं. ते प्रयत्नाभोवती नाचत राहतं.
उंट म्हणजे शहाणा माणूस असा असावा किंवा डोळस माणूस असा असावा. त्याची दृष्टी इतकी सावध होती ( नाजूक जागी डोळे बसवले) कि त्याला क्षितिजाच्या विस्तारणा-या मर्यादा दिसू लागल्या आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल हे त्याला उमजलं.. ( क्षितिज पळाले दूर दूर... विस्तारणारा परीघ ).
इथं अजागळ हा शब्द वापरला असला तरी मला ते आता विस्तारलेल्या परीघाचं वर्णन वाटतय आणि प्रयत्नांती प्रतिभेला धुमारे फुटू लागले आणि सृजनाचा पहिला शब्द , अविष्कार उमटला..वांझपणावर हा शब्द खूपच सडेतोड आहे. प्रयत्न शून्य असल्याने प्रतिभा वांझ होती. अर्थातच सृजन, नवनिर्मिती घडत नव्हती..
प्रत्येक सृजनशील कलाकारासाठी हे वर्णन लागू पडत असावं असं वाटत का ?
असा पूर्वार्धाचा अर्थ मला वाटतोय.
उंट चालला वाळूवरुनी
वाळु म्हणाली 'आहे, आहे.'
...खय्यामाने भरले पेले;
महम्मदाने रचले दोहे.
हा यात्रेकरु तिथे न खळला.
निळा पिरॅमिड शोधीत जाई!
तहानेसाठी प्याला मृगजळ;
भूक लागता तहान खाई.
निळा पिरॅमिड दिसला का पण?
.. खूण तयाची एकच साधी..
निळा पिरॅमिड दिसतो ज्याला
तोच पिरॅमिड बनतो आधी.
निळा पिरॅमिड याला देहान्ताच्या यात्रेचा अंतिम क्षण म्हणता येईल किंवा प्रतिभेच्या अंतिम कणापर्यंतचा प्रवासही म्हणता येईल.. पण इतर प्रतिमांचा सुसंगत अर्थ घुसला नाही अजून.. पुन्हा प्रयत्न करून पाहूयात
स्वातीताई, सलाम.. मस्त
स्वातीताई, सलाम.. मस्त रसग्रहण लिहिलं आहेस... नाहीतर हा अर्थ आपला आपण कळायला किती वर्ष गेली असते माहित नाही!!
उंट चालला वाळूवरुनी वाळु
उंट चालला वाळूवरुनी
वाळु म्हणाली 'आहे, आहे.'
...खय्यामाने भरले पेले;
महम्मदाने रचले दोहे.
हा यात्रेकरु तिथे न खळला.
निळा पिरॅमिड शोधीत जाई!
तहानेसाठी प्याला मृगजळ;
भूक लागता तहान खाई.
निळा पिरॅमिड दिसला का पण?
.. खूण तयाची एकच साधी..
निळा पिरॅमिड दिसतो ज्याला
तोच पिरॅमिड बनतो आधी.
उत्तरार्धाचा अर्थ लावताना अध्यात्माचा अभ्यास नसणे ही एक उणीव सतावतेय. तरीदेखील एक प्रयत्न.. जाणकारांनी तो अभ्यासून दोष दूर करावेत.
उंट चालला वाळूवरूनी..
उंट हा शहाणा माणूस, प्रतिभेचा विश्वस्त.. प्रयत्न करीत चाललाय. अनुभवाच्या शिदोरीवर प्रयत्न करीत चाललाय. प्रयत्न देखील जोमाने चालू आहेत ..म्हणून वाळू म्हणतेय आहे आहे.. सकारात्मक प्रतिमा असाव्यात.
अशा रितीने अथक प्वासात काय काय घडत गेलं ?
तर खय्यामाने भरले पेले
महंमदाने रचले दोहे
प्रतिभावंतांकडून अशी निर्मिती होत गेली. खय्याम पेला भरतो म्हणजे उच्च दर्जाची निर्मिती करतो. ही निर्मिती रिझवणारी आहे तर दोहे हे त्याच्या शोधासाठी आहेत.. मनास रिझवण्याकडून आता वाटचाल मनःशांतीकडे चालली आहे. हे दोहे अजरामर झालेत इतकं उच्च काम हातून झालय
पण हा प्रतिभावंत एव्हढ्यावरच आता थांबत नाही. खर म्हणजे आपल ध्येय हे नव्हेच हे त्याला कळून चुकलय.
त्याला ज्ञानाचा मार्ग दिसतोय. सृजनाच्या रस्त्यावरून तो ज्ञानाच्या मार्गावर चाललाय. हा तो निळा पिरॅमिड. पिरॅमिड ही कबर आहे तसच ते एक आश्चर्यही आहे, मानवजातीच्या प्रतिभेचा तो ठेवा आहे. मृत्यूशी संबंधित अशी ही प्रतिमा वापरताना तिला निळा रंग देताना सृजनाचा प्रवास कुठवर ते विंदांनी सूचित केलय असं वाटतय..
अंतिम ज्ञान मिळण्यासाठी स्वतः निळा पिरॅमिड व्हाव लागत हे तत्वज्ञान मेंदूला चढलेली वाळूची पुटं घासून त्याला पुन्हा चकचकीत करणार आहे.
खूप सुंदर धागा आहे. उंट ही एक
खूप सुंदर धागा आहे.
उंट ही एक विशेष कविता आहे. सृजनाचा प्रवास सांगणारि
निळा रंग ही प्रतिमा आत्मतेजासाठी वापरली जाते. या अर्थाने आत्मतेज गवसण्यासाठी किंवा अत्मभान येण्यासाठी स्वतःला कबर व्हावं लागत असं काहीसं त्यांना सुचवायचं असेल. प्रतिभेला आत्मभान येताना जे तेज जी झळाळी मिळतेय त्यासाठी निळा रंग सुचवावासा वाटला असावा. हे आत्मभान येतानाचा क्षण अर्थातच महामृत्यूच्या संयोगातून जात असणार.. ते भान मिळण्यासाठी ती अवस्था प्रत्येकालाच प्राप्त करावी लागते. मृत्यूचं ज्ञान असंच असतं.. ज्याला त्याला ते त्याच क्षणी मिळतं.. !!
मस्त धागा. मला स्वतःला
मस्त धागा. मला स्वतःला कवितेचा अर्थ कोणी नीट समजावून सांगितल्याशिवाय नाही कळत. unless कविता पहिल्या वाचनातच भूरळ पाडणारी असेल,लक्षवेधक असेल तर.
इथले रसग्रहण वाचायला खरच मजा येणारे. धन्स!
प्रत्येकाच्या दृष्टीस
प्रत्येकाच्या दृष्टीस शोभायंत्राप्रमाणे वेगवेगळ चित्र दिसत राहत..एक माझा अल्पसा प्रयत्न.
क्षितिज नाचले वाळूभवती
वाळु बरळली, 'नाही, नाही.'
मला वाटत वाळू म्हणजे रखरखीत प्रदेश. नापीक जमीन. क्षितिज हे अमर्याद शक्यतांचं, जमीन आणि आकाशाच्या मीलनाचं प्रतीक आहे. त्याची मर्यादा ज्याच्या त्याच्या उंचीवर असते. अनेक शक्यता असूनही जमीनच नापीक असल्यासारखी नकारात्मक भूमिका जेव्हा मनाची असते त्याचं वर्णन विंदा वाळू आणि क्षितिजाच्या माध्यमातून करू पाहतात..
अशाच वेळी उंट उगवला;
आणि म्हणाला 'करीन काही.'
उंट हे वाळवंटातील वाहन आहे. वाळवंटात देखील तग धरून राहणारा उपयुक्त प्राणी. इतक्या नकारात्मक विचारांनी भारलेल्या मानसिक अवस्थेमधे तग धरून राहीलेला एखादा सकारात्मक असा आशेचा किरण दिसतोय. करीन काही ही सकारात्मकता आहे.
अन मानेच्या बुरुजावरती
चढले डोळे अवघड जागी;
उंटाच्या मानेवरचा उंचवटा हे त्याचं मर्मस्थळ. जीव कि प्राण.. म्हणजेच निकराचा प्रयत्न केला गेला असं तर नाही म्हणायचं ना कवीला ?
क्षितिज पळाले दूर दूर अन
वाळु जाहली हळूच 'जागी'.
अशा प्रकारे सकारात्मक अशा क्षीण विचारानेही निकराचा प्रयत्न करायला सुरूवात केल्याबरोबर शक्यता वाढत गेल्या. परीघ रूंदावू लागलेला आहे.
रुप पाहूनी असे अजागळ
भुलले वाळूचे भोळेपण;
परीघ रूंदावल्यामुळे जे चित्र आता समोर आलय ते अजागळ वाटणारच कारण इतका विस्तीर्ण पट मांडण्याची मरगळ आलेल्या प्रतिभावान मनास सवय नव्हती. त्या रूपापुढे नकारात्मकतेचं सकारात्मकतेत रूपांतर झाल.
आणि तिच्या त्या वांझपणावर
गळला पहिला सृजनाचा क्षण.
आणि त्या नापीक प्रतिभेकडूनही नवनिर्मिती झाली.
पूर्वार्धात इतकाच बदल सुचवावा वाटतो. उत्तरार्थ ठीकच..
विंदांच्या या कवितेत दडलेल्या गुढार्थाचं हे माझ विश्लेषण आहे. ही कविता वाचताना माझ्या डोळ्यांपुढ त्या प्रतिमांमधून जे चित्र उभं राहत गेलं ते माझ्या अनुभवविश्वाशी निगडीत होतं.. त्यामुळं कवीला काय अर्थ अभिप्रेत होता हे सांगणं कठीण आहे. ते अभिप्रेतही नसावं. मला ही कविता अशी दिसली इतकाच त्याचा अर्थ घेतला जावा ही अपेक्षा ..!
क्षितिज नाचले वाळूभवती वाळु
क्षितिज नाचले वाळूभवती
वाळु बरळली, 'नाही, नाही.'
जगातील रूढी, बाकी अडचणी ह्यांनी मनासमोर अडचणी निर्माण केल्या .. मनाला वाटले 'नाही, हे जमणार नाही '
अशाच वेळी उंट उगवला;
आणि म्हणाला 'करीन काही.'
त्यावेळीच आशेचा किरण मनाला दिसतो आणि वाटते काहीतरी करेन.. आपल्याकडून नक्कीच काहीतरी घडेल ...
अन मानेच्या बुरुजावरती
चढले डोळे अवघड जागी;
उंटाची मान उंच असते, डोळे खूप वरच्या जागी असतात ..
ह्याचा अर्थ असा की कठोर परिश्रम म्हणा किंवा अवघड असे सायास करून शेवटी ना जमणार्या गोष्टीपर्यंत जाणायचा रस्ता सापडतो...
क्षितिज पळाले दूर दूर अन
वाळु जाहली हळूच 'जागी'.
रुप पाहूनी असे अजागळ
भुलले वाळूचे भोळेपण;
आणि तिच्या त्या वांझपणावर
गळला पहिला सृजनाचा क्षण>>>
जेवढे डोळे वरती तेवढे क्षितीज जास्त दिसते.. आपण जेवढे उंचावर तेवढी क्षितिजाची मर्यादा वाढते ... व्यास वाढतो...
ह्याचा अर्थ ह्या प्रयत्नाने अडचणी अडथळे दूर होतात.. संकुचित मर्यादा विस्तारतात ... आणि अशामुळेच नवनिर्मिती चा क्षण जन्मास येतो ..
उंट चालला वाळूवरुनी वाळु
उंट चालला वाळूवरुनी
वाळु म्हणाली 'आहे, आहे.'
...खय्यामाने भरले पेले;
महम्मदाने रचले दोहे.
हा यात्रेकरु तिथे न खळला.
निळा पिरॅमिड शोधीत जाई!
तहानेसाठी प्याला मृगजळ;
भूक लागता तहान खाई.
निळा पिरॅमिड दिसला का पण?
.. खूण तयाची एकच साधी..
निळा पिरॅमिड दिसतो ज्याला
तोच पिरॅमिड बनतो आधी.>>
निळा पिरामिड असतो का? नसतो.. तरीही हा निळा पिरामिड शोधतोय.. ह्याचा अर्थ जे कुणी आधी केले नाही असे काहीतरी करण्याच्या ध्यासाने हा पुढे जातो.. कुठेही ना थांबता .. विचलित ना होता... पण त्याला निळा पिरामिड दिसतो का? ज्याला दिसतो तोच पिरामिड बनतो... ह्याचा अर्थ जो पहिल्यांदा काही निर्मिती किंवा असे अकल्पित असे काही करतो... तो स्वत: एक दिशादर्शक बनून सर्वांपेक्षा वेगळा ठरतो.. आणि स्वर:चे स्थान निर्माण करतो..
निळा पिरॅमिड ही प्रतिमा
निळा पिरॅमिड ही प्रतिमा आहे.
पिरॅमिड हे विशेष कार्य आहे. मैलाचा दगड आहे. पण या अर्थाने त्याचा वापर झालाय असं दिसत नाही. सृजनाच्या या प्रवासात प्रतिभा इतकी विस्तारतेय, तिचं क्षितिज एव्हढं रूदावतंय कि तहान भूक हरपून ती अंतिम सत्याच्या शोधात निघाली आहे. हा अनुभव कुणी कुणाला सांगू शकत नाही. प्रत्येकाला तो घ्यायचा असतो. या अनुभवाशिवाय प्रतिभा अपूर्ण आहे. पण हा अनुभव घेतल्यानंतर जे पूर्णत्व येतं ते सांगायला थडगंच उरतं. प्रतिभेचं उत्तूंग लेणं असं जे मृत्यूच्या दारातून दिसतं ...
भारी!!! येऊ द्यात अजून...
भारी!!!
येऊ द्यात अजून...
मी इतका वेळ घालवून, जीव तोडून
मी इतका वेळ घालवून, जीव तोडून इथं लिहीत बसले... पण त्याबद्दल बरं वाईट काहीच नाही
सांजसंध्या- लिहीत रहा. वाचते
सांजसंध्या- लिहीत रहा. वाचते आहे. प्रतिक्रिया येतील किंवा येणार नाहीत. आपण स्वतःसाठी अर्थ शोधतो. तो कवितेशी संवाद खाजगी असतो ना? इथे टाकला काय, न टाकला काय.
षडज, अनिलसोनावणे, इदं न ममं, सांजसंध्या- वाचते आहे.
रैना, संवादाबद्दल अगदी. वाचते
रैना, संवादाबद्दल अगदी. वाचते आहे, मस्त लिहित आहेत सगळे
रैना छान लिहीलस.. पण हा धागा
रैना
छान लिहीलस.. पण हा धागा रसग्रहणासाठी उघडलाय. मनात ठेवल तर एकमेकांना कसं कळणार ?
रसग्रहणे वाचते आहे. सगळेच छान
रसग्रहणे वाचते आहे. सगळेच छान लिहितायत.
जालावर आढळलेली विंदांची ही
जालावर आढळलेली विंदांची ही उत्तम गझल.
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे
मी चालतो अखंडच चालायाचे म्हणूनी
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे
डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!
मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे
चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे (न्या रे?)
आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?
अर्थ स्वयंस्पष्ट आहे.
उंट क्षितिज ही आपल्या
उंट
क्षितिज ही आपल्या दृष्टीची सीमा. प्रत्यक्षात नसलेली, पण आहेशी भासणारी, अर्थात स्वत:च स्वत:साठी कल्पिलेली, आखून घेतलेली. या क्षितिजाने बंदिस्त केलेली जमीनही त्या मर्यादेत राहून वाळू झालेली. कितीही घेतले तरी परत काही न देणारी. आणि याचीच तिला धुंदी चढली. तिच्याकडे काही मागणार्याला ती `नाही’ `म्हणत' नाही, तर `बरळते'. अशात उंट आला, वाळूच्या नकारांची त्याला तमा नाही. वाळूत त्याची पावले इतरांसारखी रुतत नाही. रेताडातून कितीही प्रवास करायची इच्छा त्याच्याकडे आहे, शक्ती तर आहेच. उंटाच्या मानेवरचा बुरुज हेच त्याचे शक्तिस्थान. तेच त्याला क्षितिजापल्याड पाहण्याचे सामर्थ्य देते. त्याच्या समर्थ नजरेच्या निश्चयासमोर क्षितिजाचा टिकाव लगत नाही. आपल्याभोवतीचे अदृश्य बंध पुसून टाकणारा हा उंट पाहून वाळूही फुलते. तिच्यातल्या सृजनशक्तीची तिला जाणीव होते, ओढ लागते.
(वाळू हे मानव-समाज जीवनाचे, क्षितिज हे त्याच्या ज्ञानाला असलेल्या मर्यादांचे आणि उंट हे सत्याच्या शोधात निघणार्या आत्म्याचे अशी प्रतीके आहेत.)
सत्याच्या शोधार्थ निघालेल्या उंटाला वाळूही आता सकारात्मक प्रतिसाद देते. कधी सुखाच्या तर कधी अध्यात्म्याच्या मार्गाने या सत्याचा शोध घेणार्या पूर्वसूरींच्या मुक्कामाशी उंट थांबत नाही, त्याला आणखी पुढे जायचे असते. सत्याचे रूप कसे हे त्याला कळलेले असते. हे रूप आतापर्यंत कुणीही पाहिले नाही असे, अथांग (समुद्राचा आणि आकाशाचा रंग ल्यालेले), पुरातन आहे. या शोधात तो फ़सव्या संकल्पना (मृगजळे) प्राशून पचवतो, स्वत:ला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वत:तच शोधतो (भूक लागता तहान खाई) .
हे अंतिम सत्य त्याला गवसले की नाही, हे कोण सांगणार?
ते प्रत्यक्ष अनुभवावेच लागते. कुणा एकाला गवसले म्हणून ते तो अन्य कुणाला दाखवू शकतो असे नाही. तो प्रवासी स्वत:च सत्यस्वरूप होतो. (देव हे या अंतिम सत्याचे रूप आहे असे क्षणभर समजुतीसाठी घेतले, तर ज्याने देव पाहिला, तो अन्य कुणाला तो कसा हे सांगण्यापलीकडे जातो, स्वतःच देवस्वरूप होतो, त्या रुपात विलीन होतो. दोघांमध्ये अद्वैत निर्माण होते)
निळा पिरॅमिड दिसते ज्याला
तोच पिरॅमिड बनतो आधी.
(मंगेश पाडगावकरांनी संहिता या विंदांच्या निवडक कवितांच्या संकलनात निळे पिरॅमिड=अंतिम सत्य, उंट =सत्याच्या शोधात फ़िरणारा आत्मा. अंतिम सत्य =अहं ब्रह्मास्मि किंवा तत् त्वं असि असा अर्थ लावला आहे. त्याचा आणि वर अनेकांनी लिहिलेल्या रसग्रहणांत स्पष्ट केलेल्या कल्पनांचा आधार घेत मी थोडीशी वाट तुडवायचा प्रयत्न केलाय.)
रसग्रहण सगळ्यांचेच छान! वाचत
रसग्रहण सगळ्यांचेच छान! वाचत आहे.
अवांतर माहिती (कालच्या लोकसत्तातील बातमी): २, ९, १६ फेब्रुवारीला सह्याद्रि वाहिनीवर बा. भ. बोरकरांच्या कवितांविषयक (रसग्रहण, चर्चा ई.) कार्यक्रम आहे. वेळ नक्की दिली नव्हती. शंकर वैद्य आणि बा. भ. बोरकरांचा पुतण्या (नाव विसरले) सहभागी होणार आहेत.
कोणाला वेळ नक्की माहिती असेल तर लिहा.
भरतजी, खूपच सुंदर..
भरतजी, खूपच सुंदर..
सह्याद्री टाटा स्काय वर दिसते आता. पाहता येईल. छान बातमी आहे.
'माझ्या घरी मी पाहुणी' -
'माझ्या घरी मी पाहुणी' - विंदा करंदीकर - जातक
जीवनाची वाट चालायला सुरुवात केली आणि तू भेटलास; असा की सर्वस्व तुला अर्पण करावे. तू त्याचा स्वीकार केलास , न केलास आणि वेगळी वाट धरून चालू लागलास. हातावरच्या रेषांचा हवाला देत; की आपल्या वाटा जुळणे शक्य नाही. मग मलाही, मला आखून दिल्या गेलेल्या वाटेने चालावेच लागले. येऊन पोचले या घरी - माझ्या घरी. जे घर मला कधी आपलं वाटलं नाही, ना कधी वाटेल. मी इथे परकी, पाहुणी आपला मुक्काम हलायची वाट बघत बसलेली.
एकदा सर्वस्व कुणाला वाहिलं की ते परत घेता येतं का रे? जगाच्या नियमांत बसेल असा अंक घेऊन गणित पुढे सोडवण्यातच धन्यता मानणारा तू. मला अपूर्ण का वाटतं हे मी तुलाच काय, कुणालाच, अगदी मलाही कसं सांगणार?
तुझ्या स्मृती चेटकीप्रमाणे सतत निर्दयपणे माझ्या जुन्या जखमांवर
बोचकारत असतात. दिवसभराची सावध वस्त्रे उतरवल्यावर रात्रीचा अंधार पुन्हा मला त्याच त्या भग्न वेड्या स्वप्नांची आठवण देऊन पिसे लावतो.
माझ्या मनाभोवती या संसारच्या विटांची भिंत रचून बंदिस्त करू पहाते. पण हाय! ती भिंतही काचच ठरते आणि दिसत राहतोस फ़क्त तू ...भिंतीपलीकडे. (काच फ़क्त माझ्यासाठीच का रे? तुला मात्र मी दिसत नाही, त्या बाजूने)
या जगात मी जे जे काही माझं आहे असं मानलं त्यातलं काहीच माझं राहिलं नाही. सारं हिरावून गेलं. इतके घाव सोसण्यासाठीच मी तरी का शिल्लक राहिले? का नाही संपून गेले?
या माझ्या संसारात जगाच्या दृष्टीने मी रडावं असं काही नाही. (त्याला तरी मी काय सांगू शकणार?), तरीही हुंदका दाटलेला. तो फ़ुटू नये म्हणून सतत दात ओठावर दाबूनच जणू मुक्यानेच हा संसार मी करीत राहते. रोज सती जावे तशीच मी शेजेवर जात असते.....तुझ्या नावाने सती जाते, तुझी आज्ञा म्हणून.
वहिवाटेने पायाखाली आलेली वाट मी काटत असते, एका जागी थांबूनही रहात नाही, न कुठे निघून जात. ज्या प्राक्तनाचा हवाला तू मला ही वाट दाखवताना दिलास त्या प्राक्तनावर रेलते, जणून तुझी छाती असावी असे मानून.
आता हे सगळं मी तुला किंवा आणखी कुणाला, कसं सांगणार?
नायिकेचं विवाहपूर्व प्रेम असफ़ल झालं आहे. समाजाचा रूढींचा सामना करून तिचा स्वीकार करण्याचं धैर्य तिच्या प्रियकराकडे नव्हतं. त्यानं आपल्या नशिबाला बोल लावत तिला समाजाला मान्य अश्या ठिकाणी आपला संसार मांडण्याचा मार्ग दाखवला आणि स्वत:ही चोखाळला...एक डाव सोडून दुसरा मांडताना काही त्रास होतो हे त्याच्या गावीही नाही. अशा नायिकेचे हे मनोगत. आपल्या विवाहपूर्व प्रेमाची वाच्यता करायची तिला चोरी. ’तिच्या’ संसारात उणं तसं काही नाही, तरीही ती दु:खी, त्याचं कारण सांगणंही तिला अशक्य.
हा संसार ती मन मारुन करीत रहाणार आहे, अर्ध्यात टाकुन उठून जाणार नाही. एकदा मनाने, कदाचित शरीरानेही कुणाला वरल्यावर पुन्हा अन्य कुणाला स्वत:चे शरीर अर्पण करताना तिची सती जात असल्यासारखीच होरपळ होते.
आणि हे सगळे नशिबी का आले? तर विरुद्ध परिस्थितीतून एकत्र मार्ग काढायला लागणारं धाडस दाखविणारी छाती त्याच्याकडे नव्हती. मग या फ़ोलक्या नशिबालाच त्याची छाती मानून त्यावर ती रेलते. छाती हा शब्द असा उपरोधाने वापरणे एक विंदाच करू जाणे. (तसं करायला कवीला छाती लागते- इति पं यशवंत देव)
गझलेतल्या काही द्विपदींमधल्या पहिल्या ओळीत दोन दोन यमके साधून विंदांनी गंमत आणली आहे : जसे वाहुनी-पाहुणी, खावया-दया, मानले-राहिले, मुका-हुंदका. वहिवाटलेली वाट काटते इथे अक्षरांच्या पुनरावृत्तीतून ती वाटचाल अधिकच लांबल्यासारखी वाटते.
ही रचना मी प्रथम ऐकली दूरदर्शनवरील शब्दांच्या पलीकडले या कार्यक्रमात उत्तरा केळकर यांच्या स्वरात. संगीत अर्थातच पं यशवंत देवांचे. कवितेतला थकवा, हरलेपणा उत्तरा केळकरांच्या आवाजात अधिकच पोचतो. जसे कभी तन्हाइयों में यूं मधला मुबारक बेगमचा ‘ न तुम जी सकोगे और न तुझको मौत आएगी’ असा दुखावलेला, शाप देणारा आवाज.
या गझलेतल्या ’माझ्या सभोती घालते माझ्या जगाची भिंत मी’ या ओळी वाचताना कुसुमाग्रजांची एक कविता आठवली. त्या भिंतीपलीकडल्या त्याचे मनोगत व्यक्त करणारी. 'आकलन' -वादळवेल मधली.
तिने स्वतःभोवती स्फटिकाची पारदर्शक नादवाही भिंत रचून घेतलीय. त्यातून तिच्या जीवनाचे आविर्भाव त्याला दिसतात. पण त्याचे क्षमाप्रार्थी हात तिच्या हातापर्यंत पोहोचू शकत नाहीत, तेव्हा त्याला कळतं की तिने स्वतःभोवती रचली आहे एक दफनपेटी!
सॉरी..
सॉरी..
हे तुझे अशा वेळी लाजणे बरे
हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाहि
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाहि
हि गझल कुणाची आहे? कुणि गायली आहे ? माझ्या कडे आहे ती मात्र आवाज नाहि ओळ्खता येत आहे मला
कालच्या महाराष्ट्र टाइम्स ला
कालच्या महाराष्ट्र टाइम्स ला आलेली कविता
bhay ithale sampat nahi maj
bhay ithale sampat nahi maj tuzi atwan yete
me sandhykali gato tu mala shikawali geete
te zare chndra sajnache ti dharati bhgavi maya
zadashi nijalo apan zadat punha ugwaya
to bol mand halwasa aayush saprshuni gela
seetechy wanwasatil janu aangi raghav shela
stotrat indriye awghi gungunati dukh kunache
he sarta sampat nahi chandane tuzy samrnache
हे गाणे फारच सुंदर आहे. मन शांत होते ऐकताना. पण गाण्याचा अर्थ नाही कळला. फक्त पहिल्या आणि शेवटच्या ओळीचा अर्थ कळला. कुणाला माहित असेल तर सांगा.
मला फक्त लढ म्हणा ही
मला फक्त लढ म्हणा ही कुसुमाग्रजांची कविता लेखी हवी आहे.
जागू : ‘ओळखलत का सर मला?’ -
जागू :
‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’!
विंदांच्या कविता पठवा:
विंदांच्या कविता पठवा: more_bl@rediffmail.com
चित्र पुनव
चित्र पुनव
Pages