वाग्युद्ध : गिलानी (आणि मं.) सरकार विरुद्ध सिंग (आणि मं.) सरकार
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
58
पाकिस्तानी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी पाक शासनावतीने केलेल्या वक्तव्यांसंदर्भात :
प्रकार:
शेअर करा
सही है बाप.
सही है बाप. आवडले एकदम. ती मेणबत्ती जबरा.
हे त्या अहिंसावाद्यांना दे. त्यांना ह्यातील उपरोध कळनार नाही.
(ह्या लायनीची जरुरी नाही पण तरिही टाकतोच)
सुरेख
सुरेख !!
डौलदार पण तय्यार भारतीय सेना आणि उधळलेले पाक लष्कर मस्त रेखाटले आहेत..
दोन्ही
दोन्ही बाजूला जे हात आणि हातात काहीतरी जे दिसत आहे ते नाही कळले नीट. पण चित्र उत्तम आहे फ. डाव्या बाजूला जो हात आहे सर्वात खाली त्या हातामधे पाल आहे का? तसेच काहीतरी दिसत आहे
>>>> डाव्या
>>>> डाव्या बाजूला जो हात आहे सर्वात खाली त्या हातामधे पाल आहे का? (आ वासलेला चेहरा)

शक्य हे बी! तसही असेल!
मलातर ती जपमाळ वाटली होती
असो
चान्गला विषय, माण्डणी चान्गली!
फक्त एक वाटले, की दोन्ही घोडे अन घोडेस्वार अजुन थोडे लहान दाखवुन दोन्ही बाजुच्या कडान्वरील "हस्तक्षेपाच्या" विषयान्ना अजुन मोठी जागा देवुन जास्त वजन द्यायला हवे होते!
बाकि गिलानीच्या घोड्याचे शेपुट ओढल्याने तो मागिल पाय झाडतो हे दृष्य परिणामकारक! चित्राचा विषय तिथे जास्त ठळकपणे कळतो हे!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
लिंबु, मी
लिंबु, मी जी बाजू म्हंटली त्याच्या अगदी विरुद्ध बाजुला तो पहातो आहेस. बरं तू उजव्या बाजूला पहा. मी चुकुन डाव्या बाजूला लिहिले आधी.
जपमाळ तर अगदी योग्यच दिसत आहे. पण जपमाळ ही मुस्लीमांच्या बाजूने का?
बी तो माईक
बी तो माईक आहे. मीडियाच्या हातांत नेहमी असतो तसा.
अरे बी, ती
अरे बी, ती पाल नाहिये. तो माईक आहे मिडियावाल्यांचा. आणि मुसलमानांच्यातपण जपमाळ असतेच की.
फ, खूप सुंदर व मार्मिक चित्र. मार्मिकवरुन आठवलं, माझ्या बाबांनी (जे ठाकर्यांच्या व्यंगचित्रांचे फॅन आहेत) जपून ठेवलेली मार्मिकमधली व्यंगचित्रे मी पाहिली होती लहानपणी. त्यात देखिल चालू घडामोडी खोचकपणे छान दाखवलेल्या असायच्या, तसेच तुझेही हे चित्र आहे.
------------------------------
श्री राम राम रणकर्कश राम राम
बी, मुल्ला
बी, मुल्ला मौलवीन्चा प्रभाव दाखविण्यासाठी जपमाळ!
मला उजवीकडच वरुन दुसर नि तिसर कळल नाही! तिसर काहीतरी टुथपेस्ट सारख वाटल!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
<<तिसर
<<तिसर काहीतरी टुथपेस्ट सारख वाटल! >>
ती पाटी असावी.
दुसरं काय आहे?
------------------------------
श्री राम राम रणकर्कश राम राम
तो
तो मिडीयाचा व्हिडियो कॅमेरा आणि वरचा त्याचा फ्लॅश असावा.
फ,
मस्त काढलंयस रे चित्र. एकदम सद्य परिस्थिती
फ तुझे
फ तुझे व्यंगचित्र सुरेख... अगदी बोलके...
गिलानीचा उधळलेला घोडा... मस्तच...
गिलानीच्या मागे AK-47, चाँद-सितार्याला पण जागा द्यायला हवि होती.
बी,
बी, श्रद्धा आणि अश्विनीने सांगितलं तसा, तो चॅनलवाल्यांचा माइक - मायक्रोफोन आहे. लिंबूटिंबू, एसव्हीएस म्हणतो तसा, तो मीडियावाल्यांचा कॅमेरा आहे.. त्यावर फ्लॅशर लावलेला मुद्दामून दाखवलाय. आता ती टूथपेस्टीची ट्यूब वाटू शकते, हे तू म्हटल्यावर जाणवलं.
थोडंसं या चित्रामागच्या कल्पनेबाबत लिहितो : चित्रात पाकिस्तानी लष्कराचं रूपक म्हणून वापरलेला घोडा बिथरलाय, उधळलाय असं वरकरणी वाटू शकतं, पण ते खरं तर तस नाहीये. बारकाईनं चित्र न्याहाळलं तर असं दिसतं की डावीकडच्या हातांमधून एकानं घोड्याला चिथावायला प्रतोद (इंग्लिशीत 'व्हिप' - अश्वशर्यतींमधले जॉकी वापरतात तसा) उगारलाय, आणि एकानं घोड्याला काठीनं ढोसकलंय. पाकिस्तानी समाजात भारतविरोधी भावना असणारा गट आहे, त्यांचं प्रतिनिधित्व म्हणजे हे प्रतोद उगारणारे, काठीनं ढोसकणारे हात. या भारतविरोधी गटांचं पाकिस्तानी लष्करातल्या काही विभागांमध्ये (विशेषकरून आयएसआय) बरंच वजन, गुप्त लागेबांधे असल्याचं बोललं जातं.. किंबहुना रॉ, मोस्साद, सीबीआय वगैरे आंतरराष्ट्रीय गुप्तचरसंस्थांच्या रिपोर्टांमध्ये तत्सबंधित धाग्यादोर्यांचे दावेदेखील केले जातात. या गटाने सोव्हिएत-अफगाण मुजाहिदीन युद्धापासून मुजाहिदिनांना आपल्या कारवायांकरता "वापरायला" सुरुवात केली आणि भारताविरुद्धही त्यांचा वापर सुरू केला. गेल्या महिन्यातल्या मुंबईतल्या हल्ल्यांनंतर भारताने पाकिस्तानातले दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी लोकनियुक्त पाकिस्तानी सरकारावर राजनैतिक दबाव आणला. पण गिलानी-झरदारींच्या या लोकनियुक्त सरकाराचा त्यांच्या लष्करातल्या भारतविरोधी गटांवर (आणि आणि एकंदरीत लष्करी सत्ताकेंद्रावर) परिणामकारक अंकुश नाही असं जाणवतंय. भारत/अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्यांपासून पाकिस्तानाचं सार्वभौमत्व अबाधित राखायचं दडपण गिलानी-झरदारी सरकारावर पाकिस्तानी जनतेकडून आणलं जातंय. डावीकडचे आवेशदर्शक हात, वळलेल्या मुठी पाकिस्तानी समाजातला भारत-अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्यांविषयीचा भयगंड, आणि त्याचा प्रतिकार करण्याकरता (चुकीच्या दिशेने व्यक्त होत असलेला) आवेश दाखवताहेत.
खुद्द पाकिस्तानी लष्कराची दिशा अजून स्पष्ट कळत नाहीये. लष्करातल्या भारतविरोधी गटांनी वेळप्रसंगी पाकिस्तानातल्या लष्करी राजवटींचे, लष्करशहांचे हात बळकट केल्याचा इतिहास आहे. जेमतेम वर्षभरापूर्वी लोकशाहीची पुनर्स्थापना झाल्यावर सत्तेवर आलेलं गिलानी-झरदारी सरकार लष्करावर पूर्णपणे, नीट मांड ठोकू शकलं नाहीये असं दिसतं. किंबहुना सध्याच्या तापलेल्या वातावरणात बाहेरच्या भानगडी निस्तरतानाच, एखाद्या महत्त्वाकांक्षी लष्करशहाकडून आपलं सरकार उलथून पडणार नाही ना याचीही चिंता गिलानी-झरदारींना भेडसावत असणार. पाकिस्तानातल्या लोकनियुक्त सरकाराला ही तारेवरची कसरत आहे; तरीही सरकार म्हणून असलेल्या सार्वभौमत्वाच्या जबाबदारीची बूज राखण्याकरता अवसान आणत गिलानी म्हणताहेत : "संघर्ष उद्भवल्यास, मुकाबला करण्यास आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत'.
हे सारं वास्तव घोडा बिथरल्यामुळं मांड सावरायची तारांबळ उडालेल्या गिलानींच्या रेखाटनातून दाखवायचं आहे.
तुलनेनं मनमोहन सिंगांची परिस्थिती बरी आहे.. भारतीय लष्कराला भलत्यासलत्या महत्त्वाकांक्षा बाळगण्यात रस नाही हे भारताचं राष्ट्रीय सुदैव आहे.
पण मुंबईतल्या हल्ल्यांनंतर जनतेकडून सरकारावर आणि सरकाराधीन सुरक्षायंत्रणांवर दहशतवादविरोधी कारवाईकरता, कडक धोरणाकरता दबाव वाढतोय. उजवीकडले हात, मेणबत्त्या/वृत्तपत्रांची भेंडोळी वगैरे धरून सरसावलेले हात, वळलेल्या मुठी, बजावणारे हात मनमोहन सिंग सरकारावरचा हा दबाव दाखवताहेत.
लिंबूटिंबू म्हणतो, तसं दोन्ही बाजूंकडच्या दबावांना, हस्तक्षेपांना दर्शवणारे काही प्रातिनिधिक हात दोन्ही बाजूंना दाखवलेत. त्यामध्ये कॅमेरे-माइक घेऊन सरसावलेली प्रसारमाध्यमं, राजीनामे मागणारे-देणारे आणि आरोप-प्रत्यारोप करणारे खादीधारी हात, मेणबत्तीवाल्यांच्या मेणबत्त्या, भावना भडकवणार्यांच्या वळलेल्या मुठी, दुर्घटनेत बळी गेलेल्यांचे/सोसलेल्यांचे रिते झालेले हात, पाकिस्तानातल्या मौलवींपैकी भारतविरोधी अजेंड्याचा उपदेश पसरवणार्या जपमाळा, लोकनियुक्त सरकाराला न जुमानणार्या टोळीप्रमुखांच्या बंदुका आणि पाकिस्तानी लष्करातील भारतविरोधी घटकांना चिथावू पाहणारे "हस्तक्षेप" दाखवायचा प्रयत्न केला आहे.
शिवाय, वरच्या कडेने आपले हितसंबंध राखायला या दोन अण्वस्त्रधारी दक्षिण आशियाई शेजार्यांमधल्या घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या काही दुर्बिणीदेखील आहेत.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
वरचा खुलास
वरचा खुलास पटला... छान
वरती
वरती दुर्बीणीहेत होय! (मला आधी ते स्टेजवरचे स्पॉटलाईट्स वाटले होते! :))
बाकी चित्रात मनमोहन नि गिलानीन्चे चेहरे, नाव न देताही ओळखू आले अस्ते इतके चान्गले रेखाटलेत (जे सगळ्यात अवघड काम होत)
वरील विवेचनामुळे चित्र अधिक सहजरित्या समजायला सोपे झाले
गुड वर्क
...;
आपला, लिम्बुटिम्बु
खुपच छान,
खुपच छान, सध्याच्या परिस्थितीचे अत्यंत समर्पक दर्शन.
दोन्ही बाजुंनी सर्वांनी डरकाळ्या फोडल्या, नंतर लवकरच शांतही झाले (व्हावे लागले). पण भारताच्या रक्षामंत्र्यांचे मौनव्रत अजुनही सुटलेले नाही.
ए फ, प्रणव
ए फ, प्रणव मुखर्जींचं काढ ना व्यंगचित्र ! बिचारे रोज नेमाने काहितरी बोलत होते.
------------------------------
श्री राम राम रणकर्कश राम राम
भारीच की
भारीच की !
बरं झालं फ , तू खुलासा दिलास..त्यामुळे आपल्यालाही चित्रातलं काहीतरी समजू शकतं असा जरासा दिलासा तरी मिळाला..
---------------------------------------------------------------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!!
छानंच
छानंच वर्णन!
गिलानीच्या पाठीमागे पाकळीसारखे काय आहे?
चित्रात काय काय आहे हे ओळखण्याचा खेळ छान आहे
ते छोटे छोटे सैन्य खूपचं सुंदर आले आहेत.
बी, ती
बी, ती पाकळी नाहिये काही! ती गिलानींच्या घोड्याची शेपटी आहे. जरा म्.सिंगांच्या घोड्याच्या शेपटीकडे बघ म्हणजे confirm होईल.
पण ते डाव्या बाजुच्या हातात हेल्मेट सारखे काय आहे?
------------------------------
श्री राम राम रणकर्कश राम राम
अतिशय
अतिशय मार्मिक चित्र आहे.

आपल्याला बुआ भलतेच आवडले.
गिलानीच्य
गिलानीच्या पाठीमागे पाकळीसारखे काय आहे?

>>>
बी, आप नही सुधरोगे..
मस्तच रे फ.
मस्तच रे फ. एकदम मार्मिक..
~~~~~~~~~
अश्विनी,
अश्विनी, मी दुसर्या घोड्याची शेपटी पाहीलीचं नाही म्हणून या घोड्याची शेपटी लक्षात आली नाही
फ
फ दादा,
तुस्सी ग्रेट हो.. एक नंबर आलय चित्र..
==================
फ, छान
फ, छान कल्पना आहे. फक्त मला त्यातल्या काही काही गोष्टी नीट कळल्या नाहीत (मी अहिंसावादी आहे की काय ?! :)). उदा. भारतीय बाजूला जे हात आहेत त्यात वरून दुसरं आणि तिसरं नक्की काय आहे ते कळले नाही. शिवाय, ते कागदाचे भेंडोळे म्हणजे आपण करत असलेल्या आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचे प्रतीक वाटले. असो.
अर्थात, चित्रात कमतरता आहे असे सुचवायचे नाही. या गोष्टी न कळणे म्हणजे माझा दोष हे मान्य करतो. (स्वतःचे दोष मान्य करणे.. म्हणजे तर मी नक्कीच अहिंसावादी :फिदी:)
***
Mostly harmless
स्लार्टी,
स्लार्टी, ते वरुन दुसरं आणि तिसरं म्हणजे कॅमेरा आणि त्याचा फ्लॅश आहे (ह्याची चर्चा वर झाली आहे)..
त.टी.: स्लार्टी 'बी' प्रश्ण विचारतो आहे.. स्लार्टीजी, आपके जीवन मे सब कुशल मंगल और नॉर्मल है ना?
अरे कळले
***
Mostly harmless
अरे फ, तू
अरे फ, तू व्यंगचित्रांचे विवेचन लिहीलेस? लेका मग चित्र फसले असे नाही का होत?
काल लिहीनर होतो पण ह्याच कारणाने लिहीले नाही. - ते घोडे फार मार्मीक काढलेस. इच्छूकांसाठी - जो घोडा तिन पायांवरच उभा राहतो तो 'तयार आणी सज्ज' घोडा असतो.
स्लार्टी तूला आता प्रवचन द्यायला हवंच. अहिसांवादी मी पण आहे पण बहूतेक खरा अहिंसावाद तूला नाही कळाला.
बोल कधी भेटतोयस.
मला तुझा
मला तुझा अहिंसावाद नाही कळला हे मात्र नक्की
तेव्हा प्रवचन ऐकण्यास कधीही तयार 
***
Mostly harmless
स्लार्ट्य
स्लार्ट्या, मोठमोठ्या लांबीच्या प्रतिक्रिया वाचत नाहीस ना, लेका? खरं बोल.


उदय : आपल्या नव्या संरक्षणमंत्र्यांनीदेखील विधानं केलीत की. परवाच त्यांनी 'पुरावे दिलेत, कारवाई करावी' एतदर्थाचं काहीतरी विधान वदलंच की. अपेक्षित होतं म्हणा.
अश्विनी, बाळ ठाकर्यांनी आणि त्यांचे भाऊ (अन् राज ठाकर्यांचे वडील) संगीतकार श्रीकांत ठाकर्यांनी अत्र्यांच्या साप्ताहिक नवयुगात, मार्मिकात, पुढे सामन्यात बरीच व्यंगचित्रं चितारली आहेत. मध्यंतरी माझ्या पाहण्यात नवयुगातली संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अनुषंगाने रेखलेली व्यंगचित्रं आली. खरोखर ठेवा आहे तो.
बाकी, ते हातामध्ये पकडलेलं हेल्मेटच आहे. खरंतर घोड्यावर बसण्याआधीच चिलखत, शिरस्त्राण, दांडपट्ट्याची मूठ वगैरे ऐवज चढवला जातो. सज्ज होऊन मगच घोड्यावर मांड ठोकली जाते. कारण स्वतः घोडेस्वाराला या गोष्टी इतरांच्या मदतीशिवाय अंगावर चढवणं, बांधणं अशक्यप्राय असतं; दांडपट्ट्याची मूठ चढवल्यावरतर शक्यच नाही. हे माहीत असूनही गिलानी-मनमोहन सिंगांचे चेहरे दाखवायला शिरस्त्राणं त्यांच्या डोक्यावर न चढवण्याचं काव्यात्म स्वातंत्र्य मी घेतलं.
>> व्यंगचित्रांचे विवेचन लिहीलेस? लेका मग चित्र फसले असे नाही का होत?
अरे, मुद्दामच लिहिलं. चित्राबद्द्दल विवेचन लिहू नये हे तत्त्वतः कबूल! पण काही वेळा तसं करण्यानं एक वेगळा हेतू साधता येतो - चित्रामागची भूमिका आपल्या शब्दांत मांडता येते. ज्यामुळे प्रेक्षकाला काही गोष्टींचा/रूपकांचा/प्रतिमांचा वापर करण्यामागचं प्रयोजन उलगडतं. ही प्रक्रियाही मजेशीर वाटू शकते. तुला अपेक्षित असलेली प्रेक्षकानं स्वतःचं डोकं लावून चित्राचा आशय समजून घेण्याची प्रक्रिया चित्र पाहता-पाहताच पूर्ण होते (असं माझं मत आहे.). नंतर प्रेक्षक म्हणून इकडं आपण प्रतिक्रिया लिहायला घेतो, तेव्हा चित्रकाराने मांडलेली भूमिका वाचून रसग्रहणाच्या प्रक्रियेला - तिचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा अगोदरच घडून गेला असल्यामुळे - थेट धक्का पोचणार नाही (असं मला वाटतं.). काही चित्रं आपण पुनःपुन्हा पाहतो.. तेव्हा त्यांचा आशय हळूहळू मनात उतरत जातो. चित्र सकृद्दर्शनी पाहिल्यावर मनात काहीतरी पडसाद उमटलेला असतोच. त्या मुळातल्या पडसादवर आता रसग्रहणाचे आणखी थर चढू लागतात. या पुनर्दर्शनांमध्ये चित्रातल्या रेषा, आकार, रंग, पोत यांमधून आशयाची समज खुलत जाते.. तेव्हा तुम्ही चित्रकारानं/अन्य कुणी लिहिलेलं विवेचन वाचलं असलं तरीही या पुढच्या टप्प्यांमधल्या रंजकतेत खोट येत नाही (पुन्हा - असं माझं मत आहे. :फिदी:).
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
Pages