व्यंगचित्र
काही आर-एस-व्ही-पी
१५-२० वर्षांपूर्वी बहुतेक मराठी मंडळात "कार्यक्रमाला जायच्या अगोदर कळवायचं" असलं काही नव्हतं. त्यामुळे जेवणाची व्यवस्था (आणि इतरही व्यवस्था) करणार्या कार्यकर्त्यांची बोंब व्हायची. कारण नक्की किती लोक येणार हे अंदाजपंचे ठरायचं. त्यावर उपाय म्हणून काही मराठी मंडळानी आरएसव्हीपी (R.S.V.P) करण्याची सोय, आणि जे आरएसव्हीपी करतील त्यांनाच जेवण मिळेल असे धोरण अंमलात आणायला सुरुवात केली. पण अचानक जेवणासाठी येऊन टपकायची सवय पिढ्यांनपिढ्या जोपासलेल्या मराठी माणसाला हे थोडं जड गेलं.
जुन्या मायबोलीवरून.... आमचे जीवन, म्हणजे जीव न
फार फार वर्षांपूर्वी म्हणजे १९९६ च्या डिसेंबर महिन्यात , म्हणजे हितगुज वगैरे चालू होण्याच्याही अगोदर, मायबोलीवर माझी "आमचे जीवन, म्हणजे जीव न" नावाची व्यंगचित्रमालिका प्रसिद्ध झाली होती. दर महिन्याला एक अशी सहा महिने ही मालिका चालली. तीच चित्रे जुन्या मायबोलीवरून नवीन मायबोलीत आणायला आत्ता वेळ मिळतोय. जुन्या मेंब्रांना कदाचित तोच तोच पणा जाणवेल त्याबद्दल क्षमस्व. (काय करू नवीन व्यंगचित्रे परत झालीच नाही हो !)
सत्यम् घोटाळा
वाग्युद्ध : गिलानी (आणि मं.) सरकार विरुद्ध सिंग (आणि मं.) सरकार
पाकिस्तानी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी पाक शासनावतीने केलेल्या वक्तव्यांसंदर्भात :
टाटा नॅनो
टाटानी लाखाची कार आणली. आत्ता रहेजा, हिरानंदानी,
लोखंडवाला ही मंडळी जोपर्यंत हजारात पार्कींग नाही देत
तो पर्यंत आपल्याला बसच्या रांगेत उभ रहाव लागणारच